महाभारतात चंपावती किंवा रेवतीक्षेत्र म्हणून उल्लेखलेले #चौल हे तिमुल्ल, सेमुल्ल, चेमुल्ल, चिमोलो, सैमूर, सिबोर चेऊल अशा विविध नावांनी प्राचीन भारतीय वाङ्मयात प्रसिद्ध आहे चौल हे अलिबागच्या दक्षिणेस १८ किलोमीटरवर असलेले सातवाहनकालीन
प्राचीन बंदर आहे. येथल्या प्रसिद्ध अक्षी-नागावप्रमाणे चौल-रेवदंडा हीदेखील एक जोडगोळी समजली जाते. मूळच्या चौलच्या दोन-तीन पाखाड्या स्वतंत्र करून रेवदंडा आकारास आले; परंतु आजही या परिसरात चौलचा उल्लेख चौल-रेवदंडा असा एकत्रित होतो.
सातवाहन काळात हे बंदर सर्वोच्च शिखरावर होते.
१७ व्या शतकानंतर याचे महत्व कमी होत गेले.
चौल हा पुर्वी 15 पाखाडयामध्ये विभागलेला होता, या 15 पाखाडयापैकी भोरसी पाखाडीत चौलचे ग्रामदैवत श्री रामेश्वर मंदिर आहे.
चौलचे श्री रामेश्वर मंदिर फार वर्षापुर्वीचे असावे असा अंदाज बांधण्यात येतो.
हे स्वयंभू देवस्थान असल्याने लोकांची श्रध्दा आहे. परंतू हे मंदिर कोणी व केव्हा बांधले यांचा उल्लेख मिळत नाही. पण मंदिराची दुरूस्ती अनेकदा झाल्याचे उल्लेख आहे. ऑक्टोबर 1741 श्रीनिवास दिक्षीतबाबा नावाच्या गृहस्थाने या मंदिराचा जिर्णोध्दार केला.
त्यासाठी लागलेेले द्रव्य नानसाहेब पेशवे व मानाजी आंग्रे यांनी पुरविले. किरकोळ कामे राहिली ती विसाजीपंत सरसुभेदाराने 1769-70 मध्ये पुरी करून नंदीजवळ दिपमाळ व तुळशीवृंदावन बांधले. मार्च 1816 मध्ये रामेश्वर मंदिराचा नगारखाना बांधण्याचे काम सुरू झाले.
मंदिरासमोरील पुष्करणीची दुरूस्ती 1838 मध्ये झाली. रूप्याचा पंचमुखी मुखवटा पेशव्यानी ऑगस्ट 1817 पुर्वी रामेश्वरास अर्पण केला होता. मंदिराच्या सभामंडपात अग्निकुंड, व पर्जन्यकुंड व वायुकुंड आहेत. पाऊस पडत नाही तेव्हा पर्ज्यन्यकुंड उघडतात.
प्रज्यन्यकुंड उघडल्याचे बरेच जुने दाखले मिळतात. जुन 1731 मध्ये पर्ज्यनवृष्टी व्हावी म्हणून येसांजी आंग्रेंनी पर्ज्यनकुंड उघडल्याचा दाखला मिळतो सन 1653,1731,1790,1857,1876
1899 व 1941 मधील वेळीही पर्जन्यकुंड उघडल्याचे म्हणतात. शेवटी सन 1942 साली शेवटचे कुंड उघडलेले होते.
पुर्वाभिमुख असलेल्या रामेश्वर मंदिराचा गाभारा चौकोनी असून मध्यभागी लांब रूंद व जमीनीपासून थोडी उंच पितळी पत्राचे मढवलेली शाळुंका आहे. तिच्या मध्यभागी नेहमीप्रमाणे उंच लिंग नसून चौकोनी खड्डात स्वयंभू शिवलिंग आहे. गाभार्यांचे उंच असलेल्या शिखराचे व संपूर्ण गाभार्यांचे
बांधकाम दगडी आहे. सभामंडपात प्रवेश करण्यासाठी भिंतीत मध्यभागी मोठा दरवाजा आहे.
मंदिरास लागून सभामंडप असून तो दुमजली आहे. मंदिर परिसरात मंदिरासमोर नंदी असून दोन दिपमाळी व तुळशी वृंदावन आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी व त्रिपुरा पौर्णिमेचे दिवशी मंदिरात दिपोत्सव साजरा केला जातो.
सरदार #पानसे#मल्हार_गड#सोनोरी (सरदार पानसे) #Sanket_Jagtap
महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला मल्हारगड पुण्याहून सासवडला जाताना लागणाऱ्या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी त्याची निर्मिती केली गेली. या किल्ल्याची निर्मिती इ.स. १७५७ ते १७६० या काळातील आहे.
पायथ्याला असणाऱ्या सोनोरी गावामुळे या गडाला 'सोनोरी' म्हणूनही ओळखले जाते. पुण्यापासून मल्हारगड सुमारे ३५ किलोमीटर दूर आहे. मल्हारगड हा साधारण त्रिकोणी आकारचा असून आतील बालेकिल्ल्याला चौकोनी आकारचा तट आहे. मल्हारगड आकाराने लहान आहे.
या किल्ल्याची बांधणी पेशव्यांचे सरदार भीमराव पानसे यांनी केली. भीमराव पानसे हे पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख होते. सन १७७१-७२ मध्ये थोरले माधवराव पेशवे किल्ल्यावर येऊन गेल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतात. या पानसेंचा किल्ल्याखालच्या सोनोरी गावात एक चिरेबंदी वाडा आहे
#शिवविचार_प्रतिष्ठान#शिवदिनविशेष
१० जानेवारी इ.स.१६६४
शिवाजी महाराज सूरतेहून राजगडाकडे निघाले. महाबत खान सुरतेच्या बचावासाठी येत असल्याने ४ दिवस सूरत लुटल्यानंतर जमा झालेली अर्धी लुट जमीन मार्गाने राजगडाकडे चालवली तर बाकीची अर्धी सागरी मार्गाने कोकणात.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
१० जानेवारी इ.स.१७२४
बाजीराव-पोर्तुगिज यांच्यात तह झाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
१० जानेवारी इ.स.१७३०
शनिवारवाड्याचे बांधकाम १७३०ला सुरू झाले, तर २२ जानेवारी १७३२ रोजी शनिवारवाड्याची वास्तूशांत करण्यात आली.शनिवारवाड्यासंबंधी अनेक घटना, दुर्घटना आहेत.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
१० जानेवारी इ.स.१७३४
बाजीरावाविरुद्ध लढताना सिद्दी अंबर अफबानीचा रायगडाखाली पराभव होऊन मृत्यू.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
१० जानेवारी इ.स.१७३९
इ.स १७३९च्या वसई मोहिमेत माहिम किल्ल्यावरील विजयानंतर १० जानेवारी १७३९ रोजी केळवे किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला.केळवे पाणकोटा प्रमाणे
#शिवविचार_प्रतिष्ठान#शिवदिनविशेष
९ जानेवारी इ.स.१६३६
शाहजहान त्याच्या दुसऱ्या दख्खन मोहिमेसाठी निघाला. निजामशाही संपवायची ह्या ध्येयाने तो निघाला होता.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
९ जानेवारी इ.स.१६५७
छत्रपती शिवरायांचा "गायकवाड" घराण्यातील "सकवारबाई" यांच्याशी विवाह.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
९ जानेवारी इ.स.१६६४
बहरोचहून मुघलांची फौज सुरतच्या दिशेने रवाना झाल्याची बातमी छत्रपती शिवरायांना समजली, शिवरायांचे मावळ्यांना परतीच्या प्रवासासाठी तात्काळ लवाजमा बांधणीचे आदेश.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
९ जानेवारी इ.स.१६७१
बहादूरखान स्वराज्यावर चालून यायला निघाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
९ जानेवारी इ.स.१६८०
सिद्दीने उंदेरी बेटाचा ताबा घेऊन किल्ला बांधण्यास सुरुवात केली. अर्थातच मराठ्यांनी सिद्दीचा हा बेत तडीस जाऊ नये म्हणून उंदेरीवर अनेक हल्ले केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
९ जानेवारी इ.स.१७२२
पोर्तुगीजांनी मराठ्यांशी तह केला
सन १७२१ च्या अखेरीस गोवेकर पोर्तुगीज
#शिवविचार_प्रतिष्ठान#शिवदिनविशेष
८ जानेवारी इ.स.१०२६
गझनिच्या मेहमुदाचे सोमनाथ मंदिरावर आक्रमण.महमूद गझनिच्या हिंदुस्तानवरील १७ हल्ल्यांपैकी १६ वा आणि सर्वात भयानक असा हल्ला म्हणजे सोमनाथ मंदिरवरील हल्ला होय.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
८ जानेवारी इ.स.१६५८
कल्याणहून शिवाजी महाराज स्वत: माहुलीच्या किल्ल्यावर चालून निघाले. माहुलीचा किला असनगावच्या जवळ आहे. याच माहुलीगडावर शहाजी राजांनी निजामशाही टिकवण्यासाठी अखेरची झुंज मोगलांशी एकवीस वर्षापूर्वी दिली होती. त्यांत ते हरले होते. तो माहुली - भंडारगड - पळसगड ,
शिवाजी महाराजांनी विजापूर बादशाहाकडून आज जिंकला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
८ जानेवारी इ.स.१६६४
सुरतेवरील स्वारी - लूटीचा तिसरा दिवसइनायतखानाने दग्याचा प्रयोग केल्यामूळे मराठे सरसहा चवताळून उठले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#छत्रपती_शिवाजी_महाराज आणि #इतिहास
शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख कोण होता ??
खोटे उत्तर - दौलत खान.
खरे उत्तर - याच दौलतखानाने परत सिद्दीशी हातमिऴवणी केली. त्या अगोदरच राजांनी दर्यासारंगास आरमार प्रमुख नेमले होते.
शिवाजी महाराजांच्या घोडदळाचा प्रमुख कोण होता ??
खोटे उत्तर - सिद्दी हिलाल
खरे उत्तर - हा बाटगा सिद्दी हिलाल शाहेस्तेखानाला गुप्त बातम्या पुरवत होता. तेव्हा आमच्या बहीर्जी नाईकांनी याला वाटेतच ठार केला.
शिवाजी महाराजांचा पहिला सर-सेनापती कोण होता ?? खोटे उत्तर - नूरखान
खरे उत्तर - पहिले सेनापती माणकोजी दहातोंडे होते.
नूरखान हा दरोडेखोर होता जुन्नर मावऴात.
गडाचा हा मुख्य दरवाजा, संरक्षणाच्या, गडाच्या दृष्टीने याची बांधणी संरक्षण बाजू अतिशय महत्त्वाची म्हणूनच शिवरायांच्या दुर्गबांधणीतील
एक अद्भूत प्रयोग आपल्याला पहायला मिळतो तो म्हणजे महादरवाजाची बांधणी.. आदी दोन बुरूजांच्या कवेत अगदी शेवटपर्यंत न दिसता बेमुलाग पद्धतीने लपवलेली ही बांधणी भक्कम बुरुज, अरूंद अधिक चढाच्या पायऱ्याही काही खास वैशिष्ट्ये शत्रूला अगदी शेवटपर्यंत न दिसता दोन भक्कम बुरूजांच्या मध्ये
लपवलेली अशी ही बांधणी दरवाजावर सतत पहारा तसेच संरक्षणाच्या दृष्टीने जंग्या झरोके अशी केलेली आढळते पहारेकऱ्यांच्या सोयीसाठी देवड्यांची रचना दरवाजातच पहायला मिळते गडाला महादरवाजा खेरीज एक दोन असे वेगवेगळे दरवाजे असत गडाचे महत्वाचे आणि मुख्य प्रवेशद्वार म्हणजे महादरवाजा...