आंद्रे अगासीच्या 'ओपन' या आत्मचरित्रामध्ये वाचलं होतं. आंद्रेच्या करियरमध्ये भयानक बॅड पॅच आलेला. एकेकाळचा टॉप सिडेड खेळाडू क्रमवारीमध्ये १४१क्रमांकावर गेला होता. टॉप टेन खेळाडू तर राहूच द्या,पण कोणीही यायचं आणि आंद्रेला हरवून जायचं. मग आंद्रे आणि त्याच्या टीमने एक अनाकलनीय(१/७)
निर्णय घेतला. आंद्रेने एकदम बेसिक टेनिस स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली, जिथं एकदम नवोदित, सिडींग नसणारे खेळाडू खेळायचे. लोकांनी अर्थातच आंद्रेची खूप हेटाळणी केली. तज्ञ लोक आंद्रेच्या करियरचा मृत्युलेख लिहून मोकळी झाली. मोठ्या स्पर्धांमध्ये आंद्रेचं नावपण ऐकू येईना. (२/७)
लोक हळूहळू आपल्या या लाडक्या खेळाडूला विसरू लागले. पण जवळपास अज्ञातवासात असताना या फारशा माहित नसलेल्या टेनिस स्पर्धांमध्ये आंद्रेला हळूहळू जिंकायची सवय लागत होती. पुन्हा. आंद्रे अडखळत ठेचकाळत का होईना जिंकायला लागला. मग आंद्रे पुन्हा मेन सर्किटमध्ये आला. तेंव्हा आंद्रेला (३/७)
कुणी संधीपण द्यायला तयार नव्हतं.
पण जिंकण्याची सवय लागलेला आंद्रे आगासी आला आणि तिथं पण दिग्गज खेळाडूंना हरवायला लागला. अवघ्या दीड वर्षात १४१रँकिंगवरून आंद्रे पुन्हा नंबर एक बनला. बच्चनने सिनेमात सतत अपयश मिळाल्यावर TVवर नवीन इनिंग सुरु केली आणि त्याची सेकंड इनिंग पहिल्या (४/७)
इनिंगपेक्षा भारी ठरली. अनेक क्रिकेटपटू फॉर्म हरपला की इंग्लिश कौंटी मध्ये जाऊन खेळतात.सगळे रस्ते खुंटले असं वाटलं की 'बॅक टू बेसिक्स' जावं असं म्हणतात. 'कराटे कीड'मध्ये जॅकी चेन विल स्मिथच्या पोराला म्हणतो की हरवलेली गोष्ट शोधण्यासाठी ती जिथं हरवली आहे,तिथंच ती शोधावी लागते.(५/७)
'बॅक टू बेसिक्स' जाणं सोल्युशन मिळवण्यासाठी महत्वाचं असतं.
हें आठवण्याचं कारण म्हणजे श्रेयस तळपदे. 'पुष्पा'मध्ये त्याचा आवाज आणि डॉयलॉग फेक ऐकून दिल खुश हुआ. त्याला सिरीयलमध्ये काम करण्यावरून आणि सिनेमा डब करण्याच्या असाइन्मेण्टवरून लोक हसले असतीलच. पण 'पुष्पा'मुळे श्रेयस
(६/७)
कुठलेही सण, मग ते धार्मिक असोत किंवा १५ ऑगस्ट/२६ जानेवारी सारखे राष्ट्रीय; हे आपल्या धर्मातील, समाजातील, देशातील जे काही चांगलं, उदात्त आहे ते साजरं करण्यासाठी असतात!
पण काही लोक (विशेषतः सोशल मिडियावरचे) नेमक्या अशा सणांच्याच दिवशी सुतकी पोस्ट्स टाकून आपल्या धर्मातील, (१/४)
राष्ट्रातील जे काही न्यून आहे, ज्या काही उणीवा आहेत त्याच मोठ्या हौसेने उगाळताना दिसतात.
आणि अलिकडे तर ही फॅशनच झाली आहे.जगातील सगळ्या वाईट गोष्टी, सगळ्या अपप्रवृत्तीनी आपल्या इथेच अवतार घेतलाय असं त्यांच्या पोस्ट्स वाचून वाटून जातं.जगात जर काही परफेक्ट असेल तर ते आपल्या(२/४)
धर्माच्या/देशाच्या बाहेरच आहे असा यांचा एकंदरीत सूर असतो.
धार्मिक सण जाऊद्या, निदान स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन तरी जसे जमतील तसे मोकळ्या मनाने साजरे करत जा!
१५ऑगस्टला भारताचा स्वातंत्रदिन न मानणारे आणि २६जानेवारीला झालेल्या प्रजासत्ताकावर प्रश्न उठवणारे यांच्यात
(३/४)
( शिक्षणाधिकारी म्हणतात त्याप्रमाणे ) जर गैरहजर राहून , नियमभंग करुन 'ते' यश शिक्षक श्री रणजितसिंह डिसले यांनी मिळवले असेल किंवा आणखी कांही ते मिळवू पाहत असतील तर त्याचे समर्थन करत येणार नाहीच , सुरळीत प्रशासनासाठी तो घातक ट्रेंड आहे .
उद्या प्रत्येक अधिकारी/कर्मचारी तसा
(२/३)