Qपुणेरी पाट्या - वाइन स्पेशल
१. मुलांना वाइन हवी असल्यास फोटो आधार कार्डची कॉपी आणि आई वडिलांकडून लेखी पत्र त्यांच्या मोबाईल नंबर सकट लागेल. आम्ही नंतर कधीही त्यांना व्हिडिओ कॉल लाऊन तुमचा फोटो दाखवून खात्री करून घेऊ.
२. आमच्या कडे द्राक्ष उरली आहेत त्याची वाइन करून मिळेल का असे प्रश्न विचारल्यास तुमचा फोटो दुकानाबाहेर लाऊन "वायनरी मध्ये नोकरी साठीचे उमेदवार" असा उद्धार करण्यात येईल.
३. कालची वाइन जरा गोड होती अस म्हणल्यावर बेडेकर मिसळ मध्ये जाऊन तुमची मिसळ गोडसर आहे म्हणाल्यावर जसा अपमान होतो तसा केला जाईल.
पूर्वी बहुतांश गोष्टी लिमिटेड होत्या व त्यामुळे आपले आयुष्य किती सुखी होते बघा.....
टी.व्ही.वर 1-2 channels होती व तीपण लिमिटेड वेळेसाठी. रात्री ठराविक वेळेनंतर बंद व्हायची व घरातील लोकं एकतर झोपायला जायची, नाहीतर छान गप्पा मारायची.... 😊😃😁
दोन चाकी वाहनांचे उत्पादन लिमिटेड होते, बुकिंग केल्यावर वर्षादीड वर्षाने वाहन मिळायचे. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या लिमिटेड होती.. प्रवासाचा आनंद मिळायचा... 😄
गोडाधोडाचे पदार्थ फक्त सणासुदीला असायचे, तेपण लिमिटेड. त्यामुळे स्थूलतेचे प्रमाण कमी होते.....😉
शाळांमध्ये लिमिटेड अभ्यास असायचा. त्यामुळे मुलांना खेळायला वेळ मिळायचा व मुलांची मानसिक व शारीरिक जडण घडण नीट व्ह्यायची... 💪👍
बहुतांश ठिकाणी वर्किंग अवर्स लिमिटेड होते, संध्याकाळी ५-६ च्या दरम्यान ऑफिसेस बंद व्हायची व माणसे वेळीच घरी पोहोचून कुटुंबासाठी वेळ द्यायची...... 👏💞
🌴सहसंवेदना.🌴
एक सुंदर मेसेज वाचण्यात आला... भाळणं संपलं की सांभाळणं उरतं किती छान..आणि शेजारी एका वयस्क जोडप्याचा फोटो. खूप आवडलं.
भाळणं आणि सांभाळणं.. खरंच किती वेगळं आहे दोन्ही... भाळण्यामधे स्वार्थ आहे... सांभाळण्यात त्याग...
प्रेमविवाह करून थोड्याच दिवसात बिनसणं हे केवळ भाळणं आहे पण एखादी भावना आयुष्यभर निस्वार्थपणे जोपासणं हे सांभाळणं आहे...
प्रेम ही सहसंवेदना आहे, ती जाणवते ती आपोआप जोपासली जाते. त्यासाठी वेगळं काही करावं नाही लागत. प्रेमात स्वार्थ नाही, त्यात काही मिळवणं नाही.
खरंच फक्त अनुभुती आहे ती...
भाळणं हे सोबत राहून व्यवहारी असू शकतं..दूर राहूनही एकमेकाची सुखदुःखं जाणवणं हे एकमेकांना सांभाळणं आहे. खरं प्रेम सांभाळतं. भाळण्याच्या पलिकडं जाऊन..🌹
झाडावरचं फूल आवडलं म्हणून पटकन तोडून घेऊन सुगंध घेणं अथवा केसात माळणं, हे भाळणं आहे.
केवळ जीन्स घालून बाहेर पडणारी स्त्री पटकन तयार होऊ शकते.😊
...पण भरजरी कपडे अन् सर्व दागदागिने घालून बाहेर पडणारी स्त्री जास्त वेळ घेणारच ! 😃
आमची मराठी भाषा
काना, मात्रा, वेलांट्या, उकार यांचे दागदागिने लेऊन समोर येते❗
म्हणूनच ती समोर आल्यावर
तिला यायला लागणारा वेळ कोणी बघत नाही,
तिचं सौंदर्य बघून सर्व धन्य होतात.'
👌👌👌👌
मराठी भाषेतील स्वल्पविराम, अनुस्वार आदींचा वापर करुन लिहिलेली कविता नेटवर सापडली....।
कुणी लिहिली हे कदाचित विकीपीडियालाच ठाऊक असेल.
वाचाच, मस्त आहे.