🌴सहसंवेदना.🌴
एक सुंदर मेसेज वाचण्यात आला... भाळणं संपलं की सांभाळणं उरतं किती छान..आणि शेजारी एका वयस्क जोडप्याचा फोटो. खूप आवडलं.
भाळणं आणि सांभाळणं.. खरंच किती वेगळं आहे दोन्ही... भाळण्यामधे स्वार्थ आहे... सांभाळण्यात त्याग...
प्रेमविवाह करून थोड्याच दिवसात बिनसणं हे केवळ भाळणं आहे पण एखादी भावना आयुष्यभर निस्वार्थपणे जोपासणं हे सांभाळणं आहे...
प्रेम ही सहसंवेदना आहे, ती जाणवते ती आपोआप जोपासली जाते. त्यासाठी वेगळं काही करावं नाही लागत. प्रेमात स्वार्थ नाही, त्यात काही मिळवणं नाही.
खरंच फक्त अनुभुती आहे ती...
भाळणं हे सोबत राहून व्यवहारी असू शकतं..दूर राहूनही एकमेकाची सुखदुःखं जाणवणं हे एकमेकांना सांभाळणं आहे. खरं प्रेम सांभाळतं. भाळण्याच्या पलिकडं जाऊन..🌹
झाडावरचं फूल आवडलं म्हणून पटकन तोडून घेऊन सुगंध घेणं अथवा केसात माळणं, हे भाळणं आहे.
केवळ जीन्स घालून बाहेर पडणारी स्त्री पटकन तयार होऊ शकते.😊
...पण भरजरी कपडे अन् सर्व दागदागिने घालून बाहेर पडणारी स्त्री जास्त वेळ घेणारच ! 😃
आमची मराठी भाषा
काना, मात्रा, वेलांट्या, उकार यांचे दागदागिने लेऊन समोर येते❗
म्हणूनच ती समोर आल्यावर
तिला यायला लागणारा वेळ कोणी बघत नाही,
तिचं सौंदर्य बघून सर्व धन्य होतात.'
👌👌👌👌
मराठी भाषेतील स्वल्पविराम, अनुस्वार आदींचा वापर करुन लिहिलेली कविता नेटवर सापडली....।
कुणी लिहिली हे कदाचित विकीपीडियालाच ठाऊक असेल.
वाचाच, मस्त आहे.
कोरोना आला, आणि स्वयंपाकघर हे केवढं कला दालन आहे हे कळलं.
एवढ्याशा ओट्याच्या मंचावर किती मैफिली रंगतात. कढया,पातेल्या,झारे,पळ्या,शेगडी,तेल,डाळी,पीठं मुके नाहीत. ते बोलतात ,पण त्याची रूचिर भाषा आपण इतके वर्ष ऐकली नाही.
कारण त्या रंगदेवतेकडे, स्त्रीकडे आपण दुर्लक्ष केलं. राजाचा मुकूट प्रधान घालत नाही आणि प्रधानाचा मुकूट राजा! तसं हात, भांडी, ओटा पुसायचे फडकेही वेगळे असतात. स्वच्छता हेच ध्येय पण भूमिका वेगवेगळ्या!
पट्टीचा गायकीवर हुकूमत असलेला गायक जसा जरा असंबद्ध होत नाही.
तसं कितीही मोठी तान घेऊनही, भांडी पुसायचं फडकं ती हात पुसायला वापरत नाही. साधी बाटल्यांची बुचंही अदलाबदल करायला घाबरतात तिच्या प्रेमापोटी! उकळत्या दूधाचं भांडं पकडीत पकडून, दुसऱ्या हातानं साय अडवून, दूध कपाबाहेर न सांडता चहा नितळ ठेवण्याएवढी , मोठी कला नाही.
लेटेस्ट पुणेरी किस्सा
जोशी : मी इथले टॉयलेट वापरू का?
नेने : हो, पण पैसे पडतील
जोशी : नाही पडणार, बसताना काळजी घेईन मी
🤣😃🤣
पुणेकर : आहो, अजून बिस्किटे घ्या ना
पाहुणा : नको हो, आधीच मी ५ खाल्ली आहेत
पुणेकर : तशी तुम्ही ६ खाल्ली आहेत, पण आजून खा की, ईथे कोण मोजत बसलंय??
🤣🤣🤣
मुलगा : चाहूंगा मॆ तुझे सांज सवरे
मुलगी : आणि दुपारचे काय?
मुलगा : १ ते ४ विश्रांती. मी पुण्याचा आहे
🤣🤣🤣😃🤣🤣
भिकारी : साहेब खूप भूक लागली आहे. ५ रुपये द्या ना
पुणेकर : १०० रुपयाची नोट आहे ९५ रुपये सुट्टे आहेत का?
भिकारी : हा आहे साहेब
पुणेकर : आधी ते खर्च कर
🤣🤣🤣😃😃🤣🤣
पुण्यातील एक खवचट म्हातारा एकदा दातांच्या डॉक्टरांकडे गेला. त्या खुर्चीत बसल्यावर डॉक्टरांनी त्यांना मोठा आ आ आ करायला सांगितले. कितीही मोठा केला तरी ते आजून मोठा करायला सांगायचे.
म्हातारा म्हणाला, “तोंडात बसून काढणार असाल तर ती पायातली चप्पल आधी काढा”
🤣🤣🤣😃😃😃😃🤣🤣