पूर्वी बहुतांश गोष्टी लिमिटेड होत्या व त्यामुळे आपले आयुष्य किती सुखी होते बघा.....
टी.व्ही.वर 1-2 channels होती व तीपण लिमिटेड वेळेसाठी. रात्री ठराविक वेळेनंतर बंद व्हायची व घरातील लोकं एकतर झोपायला जायची, नाहीतर छान गप्पा मारायची.... 😊😃😁
दोन चाकी वाहनांचे उत्पादन लिमिटेड होते, बुकिंग केल्यावर वर्षादीड वर्षाने वाहन मिळायचे. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या लिमिटेड होती.. प्रवासाचा आनंद मिळायचा... 😄
गोडाधोडाचे पदार्थ फक्त सणासुदीला असायचे, तेपण लिमिटेड. त्यामुळे स्थूलतेचे प्रमाण कमी होते.....😉
शाळांमध्ये लिमिटेड अभ्यास असायचा. त्यामुळे मुलांना खेळायला वेळ मिळायचा व मुलांची मानसिक व शारीरिक जडण घडण नीट व्ह्यायची... 💪👍
बहुतांश ठिकाणी वर्किंग अवर्स लिमिटेड होते, संध्याकाळी ५-६ च्या दरम्यान ऑफिसेस बंद व्हायची व माणसे वेळीच घरी पोहोचून कुटुंबासाठी वेळ द्यायची...... 👏💞
अशा अजून अनेक गोष्टी आहेत ज्या लिमिटेड होत्या. त्यामुळे आपले आयुष्य खूप सुखी होते......
........... पण आता सगळंच अनलिमिटेड झालंय.... 😢आणि त्यामुळे जीवनातील सुख मात्र खूपच लिमिटेड झालंय !!😧😩
बाबा तुमच्या लहानपणी आणि आता आमच्या लहानपणी काय काय बदल झालेले वाटतात"?
बेटा काळ खूप बदलला बघ...
तेव्हा पोरांच्या छातीच्या बरगड्या दिसायच्या आणि पोट अगदी पाठीला टेकलेले दिसायचे. आता चौथीपाचवीच्या पोरांचीपण सुटलेली पोटे दिसतात.
तेव्हा पोरं दिवसभर खेळून खेळून रात्री बिछान्यावर अंग टाकले की गाढ झोपत.
आता पोर दिवसभर बसून 'कॉम्प्युटर गेम्स' खेळून रात्री late night movies एन्जॉय करत जागत बसतात.
तेव्हा आमच्या घरात फक्त आजी आजोबांना डोळ्याला चष्मा असायचा. आता दुसरीची मुलं नाकावरील चष्मे सावरत शाळेत बसतात.
तेव्हा वडिलांचा आम्हाला फार धाक असायचा. आता पोरं नाराज होऊ नयेत म्हणून त्यांचे डॅड त्यांना ते म्हणतील तेव्हा हॉटेलात नेऊन ते म्हणतील ते खाऊ घालतात.
तेव्हा आम्हाला कधीतरी सणावाराला केलेली पुरणपोळी गोड लागायची.
आता मुलांना दररोज झोपेतून उठल्यावर आई मागे लागून खाऊ घालते ते अंजीर, पिस्ते, मनुका पण बेचव लागतात.
तेव्हा आमच्या वाढदिवसाला आई एखादा बेसनाचा लाडू हातावर ठेवायची. आता मुलांच्या वाढदिवसाला तोंडाला फासण्यासाठी एक आणि खाण्यासाठी एक असे दोन मोठे केक्स लागतात.
मुळात काय की,
तेव्हा आम्हाला फार काही मिळत नसतानाही आनंदात जगता यायचं
आता
बरंच काही मिळत असूनही आनंदी जीवन कसे जगावे यांवरील सेमिनार्स' अटेंड करावे लागतात.🙏🙏 वास्तव। सत्य
🌴सहसंवेदना.🌴
एक सुंदर मेसेज वाचण्यात आला... भाळणं संपलं की सांभाळणं उरतं किती छान..आणि शेजारी एका वयस्क जोडप्याचा फोटो. खूप आवडलं.
भाळणं आणि सांभाळणं.. खरंच किती वेगळं आहे दोन्ही... भाळण्यामधे स्वार्थ आहे... सांभाळण्यात त्याग...
प्रेमविवाह करून थोड्याच दिवसात बिनसणं हे केवळ भाळणं आहे पण एखादी भावना आयुष्यभर निस्वार्थपणे जोपासणं हे सांभाळणं आहे...
प्रेम ही सहसंवेदना आहे, ती जाणवते ती आपोआप जोपासली जाते. त्यासाठी वेगळं काही करावं नाही लागत. प्रेमात स्वार्थ नाही, त्यात काही मिळवणं नाही.
खरंच फक्त अनुभुती आहे ती...
भाळणं हे सोबत राहून व्यवहारी असू शकतं..दूर राहूनही एकमेकाची सुखदुःखं जाणवणं हे एकमेकांना सांभाळणं आहे. खरं प्रेम सांभाळतं. भाळण्याच्या पलिकडं जाऊन..🌹
झाडावरचं फूल आवडलं म्हणून पटकन तोडून घेऊन सुगंध घेणं अथवा केसात माळणं, हे भाळणं आहे.
केवळ जीन्स घालून बाहेर पडणारी स्त्री पटकन तयार होऊ शकते.😊
...पण भरजरी कपडे अन् सर्व दागदागिने घालून बाहेर पडणारी स्त्री जास्त वेळ घेणारच ! 😃
आमची मराठी भाषा
काना, मात्रा, वेलांट्या, उकार यांचे दागदागिने लेऊन समोर येते❗
म्हणूनच ती समोर आल्यावर
तिला यायला लागणारा वेळ कोणी बघत नाही,
तिचं सौंदर्य बघून सर्व धन्य होतात.'
👌👌👌👌
मराठी भाषेतील स्वल्पविराम, अनुस्वार आदींचा वापर करुन लिहिलेली कविता नेटवर सापडली....।
कुणी लिहिली हे कदाचित विकीपीडियालाच ठाऊक असेल.
वाचाच, मस्त आहे.
कोरोना आला, आणि स्वयंपाकघर हे केवढं कला दालन आहे हे कळलं.
एवढ्याशा ओट्याच्या मंचावर किती मैफिली रंगतात. कढया,पातेल्या,झारे,पळ्या,शेगडी,तेल,डाळी,पीठं मुके नाहीत. ते बोलतात ,पण त्याची रूचिर भाषा आपण इतके वर्ष ऐकली नाही.
कारण त्या रंगदेवतेकडे, स्त्रीकडे आपण दुर्लक्ष केलं. राजाचा मुकूट प्रधान घालत नाही आणि प्रधानाचा मुकूट राजा! तसं हात, भांडी, ओटा पुसायचे फडकेही वेगळे असतात. स्वच्छता हेच ध्येय पण भूमिका वेगवेगळ्या!
पट्टीचा गायकीवर हुकूमत असलेला गायक जसा जरा असंबद्ध होत नाही.
तसं कितीही मोठी तान घेऊनही, भांडी पुसायचं फडकं ती हात पुसायला वापरत नाही. साधी बाटल्यांची बुचंही अदलाबदल करायला घाबरतात तिच्या प्रेमापोटी! उकळत्या दूधाचं भांडं पकडीत पकडून, दुसऱ्या हातानं साय अडवून, दूध कपाबाहेर न सांडता चहा नितळ ठेवण्याएवढी , मोठी कला नाही.