Makarand Desai Profile picture
Jan 29 9 tweets 3 min read
फडणवीस आता टीपूला व्हिलन ठरवत आहेत. तिकडे राष्ट्रपती कोविंद तर म्हणून बसलेत की टिपूला ब्रिटीशांशी वीरमरण आलं, तो रॉकेट तंत्रज्ञानाचा प्रणेता होता. हे राष्ट्रपती महोदय २०१७साली कर्नाटकच्या विधानसभेसमोर भाषणात म्हणालेत, तेही राष्ट्रपती असतानाच!

हे एवढंच नव्हे तर भाजपच्या कर्नाटक
सरकारने टिपू हा कसा बदल घडवणारा योद्धा होता असं पुस्तक त्यांच्या सांस्कृतिक विभागाद्वारे प्रकाशित करून झालं आहे. ते करताना टीपू कसा भारी होता ते सांगणारी पत्रे भाजपचे मुख्यमंत्यांनी लिहून दिली आहेत. भाजपचे नेते कर्नाटकात टीपू जयंती साजरी करताना टीपूसारख्या पगड्या
बांधून फोटो सुद्धा काढायचे!

त्यामुळे हे टीपू सुलतान प्रकरण म्हणजे भाजपच्या सुविख्यात "गुजरातमध्ये माता, गोव्यात कापून खाता" धोरणाचा अजून एक नमुना आहे!! यांनी शाखेत गोडसेचे गोडवे गायचे आणि यांच्या परदेशात गांधींचे गुणगान करायचे असल्या ढोंगीपणाचीच हे टीपू प्रकरण
म्हणजे अजून एक आवृत्ती आहे!

त्यामुळे फडणवीसांनी आधी भाजपमध्ये टीपूबद्दल प्रबोधन करावं, वाटल्यास शाखेत जाऊन तीन-चार बौद्धिकेही करावीत,आणि काऊ ते नीट ठरवून घ्यावं की टीपू हिरो होता की व्हिलन! म्हणजे त्यांच्यासारख्या अभ्यासू नेत्याची अशी सपशेल फजिती तरी होणार नाही!!

#TipuSultan
१. फडणवीसांचे विधान
२. राष्ट्रपती महोदयांचे गौरवोद्गार
४. भाजपच्या मुख्यमंत्र्यांचे पत्र

google.com/amp/s/www.then…
५. टीपूप्रेमी भाजपचे नेते

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Makarand Desai

Makarand Desai Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @makmd

Jan 23
अनपॉप्युलर ओपिनियन: जपानी क्रूरकर्मे साम्राज्यवादी, जर्मन नाझी यांच्याकडून महायुद्ध सुरू असताना आपल्याच देशावर आक्रमण करवण्यापेक्षा देश स्वतंत्र न होता ब्रिटिश कॉलनी राहणे श्रेयस्कर होते.

#NotMyHero
In a speech to students of Tokyo University in 1944,Netaji said India needs to have a philosophy that “should be a synthesis between national socialism (Nazism) and communism”.

m.timesofindia.com/india/netaji-s…
जपानने चीनमध्ये केलेले नृशंस हत्याकांड

en.m.wikipedia.org/wiki/Japanese_…
Read 4 tweets
Jan 12
रोज नवा नीचपणा, रोज वाढणारी रानटी वृत्ती...

या नव्या व्हिडीओमध्ये नरसिंहानंद काय म्हणतो बघा!

तो म्हणतो की मुस्लिम महिला इस्लामसाठी कोणाखालीही झोपतात. तसं हिंदू महिला करत नाहीत म्हणून हिंदू धर्म कमजोर आहे. नंतर तो म्हणतो की सामान्य हिंदू एक लग्न करत असेल तर युवा
संन्यासी, धर्मचार्य लोकांनी दोन दोन लग्न केली पाहिजेत. म्हणजे शुद्ध डीएनए वाढेल.

यात तो मुस्लिम महिलांचा अपमान करतो आहेच, पण धर्म टिकवायचा असेल तर हिंदू महिलांना नक्की काय करावं लागेल ते सांगून हिंदू महिलांचाही अपमान करतो आहे. इतकं बोलून वर नाझीस्टाईल डीएनएशुद्धीच्या बाता करतो.
हा माणूस तुम्हाला फ्रिन्ज वाटेल. पण एकेकाळी आज जे यूपीचे सीएम आहेत त्यांनाही मेनस्ट्रीम असंच फ्रिन्ज समजत असे. नरसिंहानंदाचा धोका समजून घेतला नाही तर थोड्या वर्षांनी हासुद्धा कुठल्यातरी खुर्चीवर पोलिसांचे सॅल्युट घेताना दिसेल!
Read 4 tweets
Jan 11
केंद्र सरकार आता व्होडाफोन आयडियामध्ये 35.8% इतक्या शेअरहोल्डिंगची मालकी घेऊन बसले आहे. व्होडाफोन-आयडियाकडून स्पेक्ट्रम आणि एजीआर संबंधित थकीत असलेल्या रकमेचे रूपांतर शेअर्स मध्ये करायची अफलातून आयडिया केंद्र सरकारने मान्य केली आहे.

म्हणजे आता त्यातील व्होडाफोन(28.5%) आणि
बिर्ला ग्रुप (17.8%) यांच्यापेक्षा केंद्र सरकारची त्या कंपनीत जास्त गुंतवणूक झाली आहे. या गुंतवणूकीची किंमत सोळा हजार कोटींच्या घरात आहे.

म्हणजे एकीकडे असलेल्या सरकारी कंपन्या OLX वर सेल लावल्यागत विकायच्या आणि दुसरीकडे सरकारी पैश्याची वसुली करता येत नाही म्हणून खासगी कंपन्यात
आपणच मालक होऊन बसायचं असा हा मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक आहे!

उद्या समजा शेतकरी म्हणाले की आमच्या व्याजाचे किंवा लाईटबिलाचे किंवा इन्शुरन्स प्रीमियमचे थकीत पैसे असे इक्विटीमध्ये रूपांतर करून घ्या, आम्ही परतफेड करत नाही तर केंद्र सरकार त्यांनाही व्होडाफोन-बिर्लाग्रुप सारखीच
Read 6 tweets
Jan 11
#गैरसोयीचेमहापुरुष या सिरीजचा चौथा भाग पेरियारांवर...

पेरियारांचे विचारधन!

१. पेरियारांचा संविधानाचा द्वेष करण्यावर आणि गांधींचे पुतळे तोडण्यावर भलताच भर होता. गांधींनी अन्य जातींना ब्राह्मणांचे गुलाम बनवले, गांधी ब्राह्मणांसाठी काम करतात असे त्यांचे मत होते.
१९५७साली त्यांनी बंडाळीची भाषा करताना, आधी आम्ही संविधान जाळणार आणि मग गांधीचे पुतळे पाडणार अशी योजना केली होती. यासाठी हजारो लोक मृत्युमुखी पडले तर पडू द्याअसं ते म्हणत होते.

(संदर्भ १अ, १ब : पेरियारांचे १९५७मधील लिखाण)
२. पेरियार आंबेडकरांचा उल्लेख हा "आदि द्रविडार" गटाचे प्रतिनिधी असा करतात.त्यांच्यामते आंबेडकरांनी आपल्या गटापुरते आरक्षण
Read 7 tweets
Jan 9
राजा अरिस हा तरुणपणापासूनच एक अकलेने सुमार, गर्विष्ठ आणि भाटांच्या स्तुतीसुमनांमध्ये रमणारा राजा होता. त्याने त्याच्या क्रूर, कपटी आणि धूर्त प्रधानाच्या म्हणजे टायविनच्या जीवावर राज्य आपल्या काबूत ठेवलं होतं. मात्र जसजसा त्याचा पाडाव होऊ लागला, तो जनतेत अप्रिय होऊ लागला तसतसा तो
अधिकाधिक क्रूर, खुनशी, संशयग्रस्त आणि पिसाट बनू लागला. लोकांना जाळून मारताना, तडफडताना, जीवाची भीक मागताना बघून या राजाला चरमसुख लाभत असे. आपल्या विरोधात बोलणारे शिल्लक असतील ते सगळेच देशद्रोही असल्याची भयाण कल्पना या राजाला छळत असे. शेवटी एकेकाला पकडून जाळून मारण्याचे तंत्र Image
अपुरे पडले म्हणून या राजाने त्याच्या डोक्यातील "त्याच्या पूर्वजांचे महान कार्य" सिद्धीस नेण्यासाठी हजारो लहान मुले असलेली आपलीच राजधानी जाळून खाक करण्याचे आदेश दिले. त्याच्या शेवटच्या दिवसांत माझ्या विरोधात जे जिंकतील त्यांनी जळालेल्या हाडांची सत्ता भोगावी अशी त्याची मानसिकता
Read 5 tweets
Dec 29, 2021
ते नवीन इनकम टॅक्स पोर्टल बनवायला सव्वाचार हजार करोडचा प्रोजेक्ट इन्फोसिसला दिलेला आठवतं का ?

त्याची सध्याची अवस्था इतकी मजेशीर आहे की
#Extend_Due_Date_Immediately
आणि
#Extension_दो_भीख_नहीं
हे सध्या ट्रेंडिंग हॅशटॅग म्हणून दिसत आहेत....
आधीच Extend केलेल्या Due Dates सुद्धा पोर्टलच्या ग्लिच आणि बग्जमुळे अपुऱ्या पडत असल्यामुळे अजून मुदतवाढ करावी म्हणून टॅक्स प्रोफेशनल्स गेले पंधरा दिवस ट्विटरवर ट्रेंड चालवताहेत...

#Extend_Due_Dates_Immediately
रोज नवनवीन इश्यू निर्माण करण्याची सदर पोर्टलची क्षमता बघता हे पोर्टल आहे की टॅक्स रीटर्न भरणाऱ्यांचा रोज मोरू करायला बनवलेली मयसभा आहे असा प्रश्न लोकांना पडला आहे!!
Read 5 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(