#राहुलबजाज__एक_आठवण
नोकरी, व्यवसाय करताना त्या ठिकाणी तुमची जात, धर्म आणि राजकीय अभिनिवेश बाजुला ठेवावा लागतो. आजचं मोदी सरकारचं ब्रीद वाक्य "सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास" हे आचरणात आणावं लागतं.+
वर्ष भर एका छोट्या कंपनीत औरंगाबाद आणि गोवा ईथे पाइपलाइनचं काम करून १९८९ ला मी गॅनन डंकर्ली कंपनी मधे जॉईन झालो आणि माझा पहिला प्रोजेक्ट होता वाळूज औरंगाबाद इथल्या बजाज ऑटोचा कावासाकी प्लांट.+
राहुल बजाज हे बजाज ग्रूपचे सर्वेसर्वा. मी जरी संघ परिवारातून आलेला असलो तरी राहुल बजाज हे काँग्रेसी आहेत किंवा भाजप द्वेष्टे आहेत याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नव्हतं कारण मला नोकरी देणाऱ्या कंपनीसाठी ते एक क्लायंट होते.+
तसं पाहिलं तर माझ्या कंपनीचे मालक कमल मुरारका हे समाजवादी पक्षाचे खासदार होते.
भगवान विश्वकर्मा हे आम्हा कामगारांचं दैवत. दरवर्षी १७ सप्टेंबरला प्रत्येक प्रकल्पाच्या ठिकाणी विश्वकर्मा जयंती जोरदार साजरी केली जाते तशीच आमच्या बजाज ऑटोच्या साईट वर पण होत असे. +
पुजा, होम हवन आणि नंतर अधिकारी वर्ग, कामगार यांच्यासाठी महाप्रसाद म्हणून पोटभर जेवण केलं जायचं. यावेळी येणाऱ्या खर्चाचा भार आमची कंपनी तर उचलत असेच पण राहुल बजाज यांच्या सुचनेवरुन बजाज ऑटो पण बराच हिस्सा देत असे.
प्रचंड मोठा प्रोजेक्ट असल्याने आमचे एक हजाराच्या वर लेबर होते, +
जवळपास दीडशे स्टाफ आणि सर्वांचे परीवार असे खूप लोक असायचे. जेवणाच्या पंगती वर पंगती उठत असत
विशेष म्हणजे श्री राहुल बजाज हे स्वतः दिवसभर आमच्या सोबत लेबर लोकांच्या जेवणाच्या पंगती वाढत असत. कोणताही अभिनिवेश, मोठेपणा बाजुला ठेवलेला असे इतकंच...
✍️रंगा
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
आम्ही वरसावे खाडीवर जो ब्रीज बांधत आहोत त्याचे आम्ही दोन भाग केलेले आहेत. पहिला भाग हा जमिनीवरचा आणि दुसरा भाग हा पाण्यातला. जमीनीवरच्या १२ फाऊंडेशनच्या १५०० मिमी व्यासाच्या ८० पाईल आहेत तर पाण्यातल्या ४ फाऊंडेशनच्या १८०० मिमी व्यासाच्या ६० पाईल आहेत. +
साधारणपणे एका पाईलची लांबी ३२ ते ३५ मीटर आहे.
१.आजकाल पाईलिंग करायला सर्वत्र वापरली जाते ती "हायड्रॉलिक पाईलिंग रीग(फोटो क्रं १). रणगाड्यासारखे चाकं असलेल्या एका ट्र्रक वर ती फिट केलेली असते. समोर जो लोखंडी शाफ्ट दिसतो त्याला पाईलच्या व्यासाचा ऑगर लावलेला असतो. +
सोप्या भाषेत सांगायचं तर आपण छिद्र पाडायला वापरतो तशी मोठ्या आकाराची ड्रील मशीन.या मशीनच्या साह्यानेच जमीनीत किंवा पाण्यात लायनर, लोखंडाची जाळी टाकली जाते.+
विषय तसा खोल आहे.
पाण्यामध्ये काँक्रिट कसं करतात हा तसा प्रत्येकाच्या कुतूहलाचा विषय आहे. लिहिलेले किती समजेल हे मी सांगू शकत नाही पण प्रत्यक्ष अनुभव घेऊन पाहिला तर ते जास्त चांगलं समजेल.
काँक्रिट म्हणजे काय असतं वाळू, खडी, सिमेंट आणि पाणी +
यांचं प्रमाणबद्ध मिश्रण.
काँक्रिटची शक्ती म्हणजे काॅम्प्रेसिव्ह स्ट्रेंग्थ ही सिमेंटच्या प्रमाणावर अवलंबून असते ती वाढवायची असेल तर त्याप्रमाणात सिमेंट वाढवावं लागतं पण त्यालाही मर्यादा असतात म्हणून त्यात तत्सम पदार्थ मिसळावे लागतात. +
ते म्हणजे मायक्रो सिलिका किंवा सिलिका फ्युमस इत्यादी.
सिमेंट हा असा पदार्थ आहे कीं वातावरणाशी किंवा पाण्याशी त्याचा संपर्क आला कीं पावडर स्वरूपात असलेलं सिमेंट घट्ट व्हायला सुरुवात होते. आपण बघतो कीं अतिशय बंदिस्त गोडाऊन मध्ये ठेवलेल्या सिमेंटच्या गोण्या पण +
कोणत्याही ब्रिजचे ढोबळमानाने भाग करता येतात ते साॅलिड ऍप्रोचेस आणि व्हायाडक्ट.
व्हायाडक्ट मध्ये असतं फाऊंडेशन, सबस्ट्रक्चर आणि सुपरस्ट्रक्चर.
सुपरस्ट्रक्चर हे साधारणपणे दोन पियरमधल्या अंतरावर अवलंबून असतं. दोन पियर मध्ये अंतर कमी असेल तर तिथे शक्यतो +
प्रीकास्ट आय गर्डर किंवा कास्ट इन सिटू बाॅक्स गर्डर किंवा साॅलिड स्लॅब असतात. आय गर्डर हे जमीनीवर तयार करून नंतर क्रेनच्या सहाय्याने उचलून पियरवर ठेवले जातात.
पियर्स मधलं अंतर म्हणजे स्पॅन लेंग्थ जर जास्त असेल तर आय गर्डरचं वजन वाढतं आणि मग ते उचलून ठेवणं शक्य होत नाही.+
आमच्या वर्सोवा क्रिक ब्रिजमध्ये जमीनीवरचे जे स्पॅन आहेत त्यात जास्तीत जास्त स्पॅन लेंग्थ जवळपास ३८.५० मीटर आहे. यात गर्डरचं वजन १२५ टनापर्यंत आहे. आम्ही ३५० टनांच्या २ क्रेन वापरून या गर्डरचं लाॅंचिंग करत आहोत. +
#Statue_Of_Unity
७५००० क्युबिक मीटर काँक्रीट, १८००० मेट्रिक टन स्टील, ५७०० मेट्रिक टन स्ट्रक्चरल स्टील, क्लॅडिंगसाठी २२५०० ब्राँझ शीट्स एवढं मटेरियल वापरून २४० मीटर उंच बेस स्ट्रक्चर असलेला सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर उंचीचा जगातला सर्वात उंच पुतळा
गुजरातमधील नर्मदा नदीच्या तीरावर उभारण्यात आलाय आणि देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी त्याचं लोकार्पण करीत आहेत.
यातील चीनच्या एका कंपनी कडून घेतलेले ब्राँझ शीट्स सोडले तर बाकी सर्व मटेरियल हे आपल्या भारत देशातच उत्पादन करून वापरण्यात आलंय.
१ क्युबिक मीटर काँक्रीट करण्यासाठी सरासरी ९ सिमेंट बॅग वापरल्या असं समजलं तर एकूण कामासाठी ६ लाख ७५ हजार सिमेंट बॅग वापरल्या आहेत, त्याचबरोबर १ क्युबिक मीटर काँक्रीट करायला सरासरी ०.७०० क्युबिक मीटर खडी आणि वाळू लागते म्हणजे साधारण पणे ५२५०० क्युबिक मीटर खडी