तुमच्या घरात येणारी घरकामवाली स्त्री, जीने एक सुट्टी घेतली तर तुम्ही ५० रुपये पगारातून कापून घेता, ती बाई ८-१० हजारात शहरात स्वतःचे कुटुंब कसे चालवत असेल? आपल्या घरी तर ती बाथरूम वापरत नाही, मग ७-८ तास ती स्वतःची लघवी, मासिक पाळीचा स्त्राव धरून ठेवत काम
कशी करत असेल? भल्या पहाटे थंडी-पावसात तुमच्या घरी दूध, पेपर टाकणारी पोरे महिन्याला ३-४ हजार रुपये कमावून स्वतःच्या घरावर कोणता सोन्याचा कळस चढवत असतील? २००-३०० रुपयांच्या पार्लरच्या कामासाठी भली मोठी बॅग सोबत घेवून तुमच्या घरी येणारे अर्बन कंपनीचे ब्युटिशिअन दिवसात किती कॉल करत
असतील आणि किती कमावत असतील?अमेझॉन, स्विगी, डंझो वगैरेसाठी मोठाल्या बॅग पाठीला लावून दिवसाला २००-३०० रुपयांसाठी उसासे टाकत जिने चढणारे डिलीव्हरी बॉय कुठल्या करीयर ग्रोथची स्वप्ने पाहत असतील? ओला, सुका कचरा गोळा करणारे आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन उकिरड्यावर, डंपिंग ग्राउंडवर कचरा
वेगळा करून त्यातून उपजीविका कमावणारी लहान पोरे, स्त्रिया कुठला हेल्थ इन्शुरन्स विकत घेत असतील? लॉकडाऊन मध्ये आपण जेव्हा घरात बसून काम करत होतो, तेव्हा हे लोक कसलेही उत्पन्न नसताना कसे जगत असतील?यांना कुठलाही PF,पेंशन,नरेगा नसताना ही लोक भविष्याची खात्री कशी ठेवत असतील? शंभर-दोनशे
लोकांमध्ये एक सार्वजनिक संडास कसे वापरत असतील? यांच्या झोपड्यात पिण्याचे पाणी कसे येत असेल? यांच्या पोरांना लाख रुपये वर्षाला देवून मिळणारे चांगले शिक्षण मिळत असेल का? नोकरी गेली म्हणून कुणाला डिप्रेशन आले तर हे लोक मानसोपचार तज्ज्ञांची हजारो रुपयांची ट्रीटमेंट कुठे घेत असतील?
शहरी गरीबी हे भारताचे धगधगते वास्तव आहे ज्याकडे इथल्या प्रत्येक सरकारने आणि व्यवस्थेने दुर्लक्ष केले आहे. २००९ साली आपल्या देशात २५% शहरात राहणारे लोक दारिद्र्य रेषेखाली होते. २०३० पर्यंत भारतातील ५०% लोक शहरात राहत असतील, आणि सध्याची विषमता पाहता कदाचित त्यात गरिबांची संख्या ३०%
पेक्षा जास्त असेल. ही आर्थिक विषमता येत्या काळात खूप मोठे सामाजिक, राजकीय आणि कायदेशीर प्रश्न निर्माण करणार आहे. टोलेजंग इमारतींच्या कडेने बसणाऱ्या बकाल झोपडपट्टी हा व्यवस्थेने संधी नाकारलेल्या, सामावून न घेतलेल्या सर्व जाती-धर्मातील लोकांचा एक समूह असतो. चार्ल्स डार्विन म्हणतो
'गरिबांची दुर्दशा ही नैसर्गिक कारणाने न होता आपल्या व्यवस्थांमुळे होत असेल, तर ते आपले महापाप आहे'. एखाद्या ठिकाणी बकाल झोपडपट्टी उभी राहणे हे आपले पाप आहे, आणि हे पाप उंच भिंती बांधून झोपडपट्टी नजरेआड करून संपणारे नाही. इथे मने मोठी करावी लागतील आणि भिंती छोट्या कराव्या लागतील.
नागराज आण्णांचा 'झुंड" आपल्या पापाची जाणीव करून देणारी आणि त्याचे सकारात्मक समाधान सांगणारी एक अस्सल कलाकृती आहे.
जिथे शोषण ही संस्कृती असते, तिथे माणुसकीचे गाणे म्हणणे हा विद्रोह असतो!
नागराज माणुसकीचे गाणे गातो आहे. मनातला माणूस जागा करून फक्त ऐकायचा प्रयत्न करा....झुंड
"तथागत गौतम बुद्धांएवढा बुद्धिमान, प्रगल्भ,परिपूर्ण माणूस जगाने आजवर पाहिलेला नाही.बुद्धांच्या सामर्थ्याचा एक थेंब माझ्याकडे असता,तरी खूप झाले असते! एवढा थोर तत्त्वचिंतक कोणीच आजवर बघितला नाही.असा शिक्षक यापूर्वी कधी होऊन गेला नाही.
काय सामर्थ्य होते पाहा. जुलमी ब्राह्मणांच्या सत्तेसमोरही हा माणूस वाकला नाही. उभा राहिला, तेवत राहिला…"
हे कोण म्हणतंय?
साक्षात स्वामी विवेकानंद.
हिंदुत्वाचा ध्वज जगभर घेऊन जाणारे विवेकानंद १९०० मध्ये तथागत गौतम बुद्धांविषयी कॅलिफोर्नियात बोलत होते.
भारताची जगभरातली खरी ओळख आजही 'बुद्धांचा देश' हीच आहे. भलेही त्यांचे जन्मगाव असणारे लुंबिनी आता नेपाळमध्ये असेल, पण बुद्ध आपले आणि आपण सारे बुद्धांचे. 'बुद्धांशी तुलना होईल, असा एकही माणूस नंतर जन्मलाच नाही', असे आचार्य रजनीशांनी म्हणावे!
☆ संयुक्त महाराष्ट्र आंदोलन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
आज १ मे, जागतिक कामगार दिन तसेच आपला महाराष्ट्र दिन. १ मे १९६० ला संयुक्त महाराष्ट्राची घोषणा झाली आणि मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. आज आपण सर्व ६१वा 'महाराष्ट्रदिन' साजरा करत आहोत.
"मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे" या मागणीतून 'संयुक्त महाराष्ट्र समिती' ची स्थापना झाली आणि तब्बल २२ वर्षांच्या (१९३८-६०) अथक मेहनतीतून, अनेक मोर्चे-आंदोलनातून, आणि १०६ हुतात्मे होऊन आपला आजचा महाराष्ट्र आपण पाहतोय. जबरदस्त संघर्ष हा महाराष्ट्र मिळविण्यासाठी झालाय.
सर्व उपेक्षित-शोषित, कष्टकरी आणि मध्यमवर्गीयांची अभूतपूर्व एकजूट होऊन हा लढा यशस्वी झाला.डाव्या चळवळीतील कार्यकर्ते आणि शोषित-वंचित-कष्टकरी समाजाचे नेतृत्व करणारे 'शेड्यूल कास्ट फेडरेशन (शे.का.फे)'चे नेतेमंडळी यांच्या मार्गदर्शनपर आंदोलनामुळे 'संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला'