या काळजीने ही, आपल्या मैत्रिणीच्या घरी फोन करते... घर सगळं उध्वस्त...पार कोलमडून गेलं असेल...साधारण अशा अपेक्षेने...आणि तिला दुःखद धक्का बसतो..तिच्या मैत्रिणीच्या जाण्याने नात्याची पोकळी नक्कीच निर्माण झाली होती...पण कुणाचं अडून राहिलं न्हवत..घरकामाला दोन जास्तीच्या बायका लाऊन.
साधारण प्रत्येकाची पोटापाण्याची...घरकामाची सोय झाली होती...आणि प्रत्येकजण आपल्या वाटेकडे परत वळुन व्यस्त झाला होता...घरच्यांचं ही फारस, चुकलय असं ही न्हवत...उणीव जाणवतच होती, पण शेवटी घडी बसवावी लागणारच होती.
हिच्या या मैत्रिणी साठी...कायमच घर हेच प्राधान्य...अगदी कधीही कुठल्या ट्रीप ला, कार्यक्रमाला जायचं...साधं भेटायचं ठरलं तरी "नाही बाई जमणार मला"...असा नन्नाचा पाढा... कधी अमक्याला बरं नाही...कधी हे घरीच आहेत (बरं मग🤔)...कधी मुलांच्या परीक्षा...तर कधी पाहुणे अशी एक ना अनेक कारणं
स्वतःपेक्षा...खरतर स्वतःला कायमच दुय्यम स्थान देणं..म्हणजेच खरं स्त्रीत्व जपणं...असा काय तो पगडा...लहानपणापासून आई, आज्जी...नी नंतर सासू यांच्यात बघितलेला...आणि नंतर नकळत स्वतःत मुरलेला...खोलवर रुजलेला "संस्कार"...
साधारणपणे आज्जी लोकांपासून ते अगदी 1950 ते 1970 पर्यंतच्या.
आपल्या आई, मावशी, काकू... सासू मंडळी... सगळं बालपण आजोबा, बाबा, काका, समाज यांना काय आवडेल...रुचेल...चालेल या कडक शिस्तीत...आणि मग सासरे...दिर...नवरा...यांच्या धाकात... तो काळच तसा होता...त्यामुळं त्यांना नावं ठेवणं हा मुळीच हेतू नाही...पण नवऱ्याला आवडतात म्हणून मोठे केस.
नाष्टा साऱ्यांच्या आवडीचा. नवऱ्याला हे चालत नाही बाबा. मग हे मुलाला आवडतं म्हणून..अगदी टीव्ही वर लागणारा प्रोग्रॅम सुद्धा दुसऱ्या कुणाच्या तरी आवडीचा...चुकून कधी आजारी पडली, तरी त्याचीही अपराधी भावना.का तर आता घरच्याची गैरसोय होईल म्हणून🙄.हीच घरच्यांना इतकी परावलंबी करून ठेवते.
अशा सगळ्यात "स्वतः " ती. तिची आवड.निवड.शिल्लकच राहते कुठं??? काही वर्षांनी आपल्याला आपली निराळी आवड.मत असू शकत.खरतर असायला हव...हेच पार विसरून गेलेली.सर्वांवर निस्वार्थ प्रेम..त्याग हे कायमच भारतीय संस्कृतीत अग्रेसर राहिलय. असा फक्त त्यागच करत मरण येणं, म्हणजे आयुष्यच सार्थक होण
इतकी खोलवर रुजलेली भावना...
हे असं मन मारणं, मनाविरुद्ध जगत रहाण, सतत त्याग करण आणि कायमच स्वतःला दुय्यम स्थान देणं हे इतकं अंगवळणी पडत...की आयुष्याच्या संध्याकाळी स्वतःसाठी वेळ न काढल्याचा पश्र्चाताप डोकं वर काढतो..
इतक्या वर्षात पूर्वी आपल्याला काय आवडायचं हे तरी आठवतंय का? नसेल तर आठवा...जुन्या पेटाऱ्यातून... निघू देत जुन्या आठवणी... तुमच्या खास आवडी...निवडी...छान जपा... फुलवा त्यांना...मोकळा दीर्घ श्वास घेऊन... स्वतच्या आवडत्या साडीत...मस्त गिरकी घेऊन...त्या आरश्यात स्वतचं असं मुक्त...
स्वच्छंद.निखळ प्रतिबिंब बघाल तेव्हा नक्कीच म्हणाल...
"मै अपनी फेवरेट हुं.."!!!
आता काळ नक्कीच बदलतोय "ती" ला तीच्या असण्याची जाणीव होतीये! आजची पिढी... नवरे. मुलं...हे नात मस्त मित्रा सारखं झालय.त्यांना नक्कीच आवडेल तुमचं असं हे स्वतः वर प्रेम करण. स्वतःला वेळ देणं.स्वतःसाठी..!!!
एकदा बघा तरी प्रयत्न करून...💃☕🍹🎻🎤🎶🥰
कुणाच्या भावना दुखावणे, हा अजिबात हेतू नाही...
पण या जगरहाटीत स्वतःला हरवू नका, एवढीच कळकळीची विनंती🤗!
सदर पोस्ट मी विजय पांढरे यांच्या वतीने लिहिली आहे, त्यांना त्यांच्या मुलासाठी लेखनिक ची अत्यंत गरज आहे, आपणा सर्वांना कळविण्यात येते की, माझा सुपुत्र चि. प्रतीक पांढरे हा 17 नंबर फॉर्म भरून 10 वि च्या परीक्षेत मार्च 2022 ला बसणार आहे.परीक्षा केंद्र Pune केंब्रिज, Dhankawdi,Pune.
त्याला Epilepsy अर्थात फेफरं चा त्रास व बौद्धिक अक्षमता व्यंग्य असल्याने त्याला लिहिण्याचा प्रक्रियेत अडथळा येतो. या कारणाने त्याला परीक्षेत लिखाणासाठी इयत्ता 9 वित असणाऱ्या लेखनिक ची आवश्यकता आहे. तसेच लेखनिक विद्यार्थ्यांच्या आई - वडील यांची हरकत नसावी.
घर ते परीक्षेत येण्या जाण्याची सर्व सोय करण्यात येईल.
आर्थिक अपेक्षा असल्यास कृपया तसे अगोदर कळवावी.
आम्ही आमच्या परीने प्रयत्न केला आहे पण त्यात अजूनही काही यश आले नाही. मुलाची परीक्षा 16 मार्च रोजी सुरू होणार असून फार कमी वेळ राहिला आहे.
हे आहेत भारतातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक, आनंद देशपांडे. नुकताच त्यांनी बिलियन डॉलर संपत्ती असणाऱ्या व्यक्तींच्या यादीत प्रवेश केलाय . Persistent या मल्टीनॅटशनल सॉफ्टवेअर कंपनीचे ते संस्थापक आहेत. तब्बल १८ देशांत ५३ ऑफिस असणाऱ्या या कंपनीने आणखी एका ठिकाणी नवीन
ऑफिसमध्ये 'गृह' प्रवेश केला.
सॉफ्टवेअर कंपनी म्हंटल की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ते म्हणजे 'वेस्टर्न कल्चर'. पण Persistent त्याला अपवाद. सोबतचा हा फोटो पहा. भारतीय (हिंदू) पद्धतीने सत्यनारायणाची पूजा करून त्यांनी या नवीन ठिकाणी प्रवेश केला. या कंपनीत केवळ भारतीय म्हणजे हिंदू
त्यातही मराठीच सणांना सुट्टी दिली जाते.म्हणजे नूतनवर्ष १ जानेवारी नाही, तर 'गुढीपाडव्याला' सुट्टी नक्की असते. ख्रिसमसला नाही पण गणेशमूर्ती स्थापना आणि विसर्जन या दोनही दिवशी सुट्टी असते.पुण्यातील हिंजवडीमध्ये ऑफिसचे ४ टॉवर आहेत त्यांना ऋग्वेद,सामवेद,यजुर्वेद आणि अथर्ववेद अशी नावं
नमस्कार
मी स्वप्नील मेहेंदळे! मी स्वतः कर्णबधिर आहे.. कर्वे नगर पुणे येथे राहतो. मी आर्टिस्ट असून मातीच्या साधे कुंड्या घरी आणून त्यावर चित्र काढून विकतो..
तसेही पावसाळ्यात झाडे व फुले छान आणि लवकर वाढतात आणि कुंड्यावर असे वेगवेगळे चित्र काढले की आणखी छान आणि उठून दिसते..
●कुंड्याची Size:-
Height - 8 inch
Big size 10 inch
●किंमत:-
8 इंच 250/-
10 इंच 300/-
लवकरच ऑर्डर द्या
कुंड्या घरपोच देण्यात येईल..
त्यासाठी अंतरानुसार चार्जेस घेतले जाईल..
जास्त हवी असल्यास तुम्ही येऊन घेऊन जाणे..
मी काढलेले 3री आणि 4थी वॉल पैंटिंग
वारली बरोबर फुले झाडे, कार्टून, इमोजीस तसेच entrance, किंवा बाल्कनी, हॉल वर पेंट काढायचे असल्यास मला ऑर्डर देऊ शकता..
साधारण 9-10 बाय 4-5 फूट पर्यंत भरून काढायचे असल्यास 3/4 दिवस लागतील..
किंमत:- 4 ते 10 हजार