गेल्या एक – दीड महिन्यात अनेक घटना फार वेगाने घडलेल्या आहेत. महाबलाढ्य रशिया ने युक्रेन वर आक्रमण केले. साधारण दोन – चार दिवसात युक्रेन चा पूर्ण पाडाव होईल हेच सर्वांचे भाकीत होते. मात्र तसे झाले नाही. नाटो देश आणि
अमेरिका यांनी प्रत्यक्ष मैदानातून माघार घेऊनही युक्रेन सारखा लहानसा देश, आज सदोतीस दिवस झाले तरी चिवटपणाने झुंजतोय. लढतोय. ह्या दरम्यान दोन गोष्टी घडल्या. एक – पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि दोन – दिनांक ११ मार्च ला ‘द कश्मीर
फाईल्स’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. विधानसभांच्या निकालांनी एक गोष्ट परत अधोरेखित केली की उत्तर प्रदेश सारख्या महाकाय राज्यातली जनता हिंदुत्वाचे समर्थन करणार्या भाजपा च्या मागे उभी आहे.
‘द कश्मीर फाईल्स’ ने मात्र जणू एखाद्या क्रांतीची सुरुवात केली. सुमारे चौदा कोटींचा हा सिनेमा.
भारतीय सिने जगताच्या भाषेत बोलायचं तर सर्वार्थानं ‘लो बजेट फिल्म’. पण या चित्रपटाने इतिहास घडविला. फक्त ६३० स्क्रीन्स वर प्रदर्शित झालेल्या ह्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी चक्क ४.२५ कोटी रुपये कमावले. या यशाला ह्या दृष्टिकोणातून बघता येईल – काही महिन्यांपूर्वीच, म्हणजे
नोव्हेंबर २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या ‘अंतिम’ ह्या चित्रपटाला ३,२०० पडद्यांवर प्रदर्शित केल्या गेले होते. ह्या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे उत्पन्न होते – मात्र ५ कोटी रुपये ! या पार्श्वभूमीवर कश्मीर फाईल्स चे यश झळाळून दिसतेय.
अगदी पहिल्या दिवसापासूनच हा चित्रपट ‘लोकांचा चित्रपट’ झाला. सर्वसामान्य चित्रपटात असणार्या ‘मसाल्याचा’ पूर्ण अभाव. गाजलेली गाणी नाहीत, की खूप गाजलेले कलावंतही नाहीत. चित्रपट गंभीर. अंगावर येणारा. आणि तरीही हा चित्रपट रोज यशाचे नवनवीन कीर्तिमान स्थापित करत होता.
चित्रपट संपल्यावरही लोकांनी आपापल्या खुर्च्यांवर बसून राहणं; त्याच स्थितीत अनेक ठिकाणी कोणी तरी हृदयाच्या तळातून आलेल्या आत्यंतिक आवेशानं, या चित्रपटाच्या निमित्ताने सद्य स्थितीवर भाष्य करणं; हिंदूंच्या भविष्याबद्दल बोलणं; शहरा – शहरांतून, गावा – गावांतून लोकांनी चक्क
मोर्चे काढत, गटा-गटाने घोषणा देत, भगवे ध्वज नाचवत हा चित्रपट बघायला जाणं..... हे सारं अद्भुत होतं. या देशात प्रथमच घडत होतं. हिन्दी चित्रपटसृष्टीला जबरदस्त हादरे देत होतं..!
या देशाच्या एका भागात हिंदूंवर भयानक आणि अमानुष अत्याचार होत होते आणि या देशातील अधिकांश हिंदूंना
त्याची माहिती नव्हती, जाणीव नव्हती. ह्या जळजळीत सत्याने अनेक जण अस्वस्थ होत होते. आणि ह्या वेदनेतूनच जणू काही या देशातील हिंदू खडबडून जागा झाला. त्याला हिंदू एकोप्याची, संघटित ताकदीची गरज जाणवायला लागली. अखिल विश्वात हिंदूंना संघटित करणार्या राष्ट्रीय स्वयंसेवक
संघाबद्दल कुतूहल आणि आकर्षण निर्माण झाले. आणि त्यातूनच, जेंव्हा काही चित्रपटगृहांत, हा चित्रपट संपल्यावर एक – दोन स्वयंसेवक संघाची प्रार्थना म्हणू लागले, तेंव्हा त्या गच्च भरलेल्या चित्रपटगृहातील प्रत्येक व्यक्तीने अत्यंत अनुशासित पद्धतीने संघाची प्रार्थना म्हटली. हे असं विलक्षण
या देशात पहिल्यांदाच घडत होतं. दोन आठवड्यात अडीचशे कोटी रुपये गोळा करणार्या ह्या चित्रपटानंतर आला दक्षिणेतला ‘बिग बजेट’ चित्रपट – RRR. तेलंगाणा मधील दोन क्रांतिकारकांच्या जीवनावरील हा चित्रपट विशुध्द भारतीय रंगात रंगलेला होता. ह्याचे नायक
आणि इतर अभिनेते चक्क भारतीय पध्दतीने धोतर नेसलेले आणि कपाळावर गंध लावलेले होते. छत्रपती शिवाजी महाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस हे आदर्श पुरुषांच्या रूपात दाखवले होते. महत्वाचे म्हणजे, चित्रपटाच्या शेवटी, चित्रपटाचा नायक हा कोदंडधारी रामाच्या स्वरुपात समोर येतो.
ह्या चित्रपटानेही उत्पन्नाचे सर्व कीर्तिमान ध्वस्त केले. या पूर्वी दणदणीत यश मिळवलेला, प्राचीन भारतीय परिवेशातला ‘बाहुबली’ हा चित्रपट या एस एस राजमौलींचाच. पण RRR ने त्याचाही विक्रम मोडला. ह्या सर्व गोष्टींचा हिन्दी चित्रपट सृष्टीवर परिणाम होताच होता. फक्त ‘पैसा’ आणि ‘यश’ या
दोनच गोष्टी समजणार्या ‘बॉलीवुड’ ला पुरतेपणी कळून चुकलं की यापुढे या देशाच्या संस्कृती आणि परंपरेशी फटकून असलेला कोणताही चित्रपट, या देशात चालू शकणार नाही. आणि म्हणूनच या कालावधीत सलमान खान, शाहरुख खान, अमीर खान ही खान गॅंग बिळात लपून बसली होती. अक्षय
कुमार ने, त्याच सुमारास प्रदर्शित झालेल्या, त्याच्या ‘बच्चन पांडे’ ह्या मार खाल्लेल्या चित्रपटावर फारसं काही न बोलता, त्याच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली. दसरा – दिवाळीत प्रदर्शित होणारा त्याचा ‘पृथ्वीराज’ हा चित्रपट, पृथ्वीराज चौहान वर केन्द्रित आहे आणि संपूर्णतः भारतीय रंगात
रंगलेला आहे! हे सर्व सविस्तर सांगायचं कारण म्हणजे हिंदुत्वा बद्दल गेल्या महिन्या – दीड महिन्यात दिसलेली ही प्रचंड अनुकूलता आणि जनजागरण. हिंदू मूल्य, हिंदू संस्कृती, हिंदू परंपरा या बद्दल देश – विदेशात प्रचंड कुतूहल निर्माण झालेले आहे. कदाचित आपल्यापैकी अनेकांनी ‘आज तक’ ह्या
वाहिनी युक्रेनच्या आंद्रे (Andre) नावाच्या सैनिकाची, भारतीय वार्ताहर महिलेने घेतलेली मुलाखत बघितली असेल. रशियन – युक्रेन युध्द प्रारंभ होऊन तीन आठवडे झाले होते. आपल्या देशासाठी लढणार्या त्या युक्रेन सैनिकाने सांगीतले की त्याला युध्दाची
भीती वाटत नाही. तो निर्भयतेने लढतोय. कारण त्याची श्रध्दा आहे – ‘भगवान श्रीकृष्ण त्याच्या पाठीशी आहेत’. तो सैनिक आपल्या जवळची जपमाळ त्या वार्ताहर महिलेला दाखवतो आणि सांगतो की ‘अगदी युध्दाच्या धामधुमीतही मी भगवान श्रीकृष्णाचा जप करत असतो. त्यामुळे मला आत्मिक बळ मिळतं.’
हा सैनिक अपवाद नाही. अगदी रशियन सैन्यातही असे जपमाळ घेतलेले सैनिक सापडतील. रशिया आणि त्याच्या प्रभावाखाली असलेल्या अनेक देशांमध्ये ‘इस्कॉन’ चे मोठे काम आहे. हिंदुत्वाकडे आकर्षित झालेल्या लोकांसाठी ‘इस्कॉन’ हे
माध्यम ठरत आहे. मध्य पूर्वेत आणि युरोपियन देशांत श्री श्री रविशंकर, माता अमृतानंदमयी वगैरे संतांचे अनुयायी वाढताहेत. अनेक ठिकाणी क्रिश्चन / इस्लामी पूजा पध्दती आणि हिंदू जीवन पध्दती हे त्यांच्या जीवनाचे सूत्र बनत चाललेय. अमेरिका आणि युरोप मध्ये अनेक चर्चेस चे रूपांतर मंदिरांमध्ये
होत आहे. हिंदुत्वाच्या पुनरुत्थानाचा (resurgence) हा प्रतिसाद अक्षरशः जगाच्या कानाकोपर्यातून मिळतोय. विशेषतः कोरोंना काळामध्ये ज्या पध्दतीने लोकांनी योग आणि आयुर्वेद यांचा स्वीकार केला, त्यामुळे ह्या हिंदू जीवन पध्दतीकडे, हिंदुत्वाकडे आकर्षित होण्याचा कल हा वाढता आहे. गेल्याच
वर्षी इंडोनेशिया मध्ये सुकार्नोपुत्री मेघावती यांनी त्यांच्या २८,००० अनुयायांसह इस्लाम चा त्याग करून हिंदू धर्मात प्रवेश केला होता. त्यापूर्वी, साधारण वर्षभर आधी, जावा प्रांताच्या राजकुमारी ने तिच्या अनुयायांसह हिंदू धर्माचा स्वीकार केला होता. इंडोनेशिया मध्ये अल्पसंख्यांक
असलेल्या हिंदूची संख्या दरवर्षी वाढते आहे. जवळपास हीच परिस्थिती घाना सारख्या आफ्रिकन देशातही आहे. सत्तर च्या दशकात स्वामी कृष्णांनंदांनी भारतातून जाऊन हिंदू धर्माचा प्रसार केला होता. आज त्यांच्या जाण्या नंतर ही त्यांचा शिष्य परिवार वाढता आहे. सुमारे चाळीस
हजारांच्या वर कडवे आफ्रिकन हिंदू आज घाना मध्ये आहेत. अमेरिका, कॅनडा आणि युरोपियन विद्यापीठांमध्ये ‘भारतीय ज्ञान परंपरा’ (Indian Knowledge System – IKS) चे अनेक पाठ्यक्रम चालू आहेत. हे पाठ्यक्रम नॉन – ग्रेडेड असले तरीही फार मोठ्या संख्येत विद्यार्थी ते निवडताहेत.
अनेक विद्यापीठांमध्ये IKS हा परवलीचा शब्द आहे. जगभरात शास्त्रशुध्द पध्दतीने योग शिकवणार्या लोकांची मागणी प्रचंड प्रमाणात वाढलीय. अस्सल आयुर्वेदिक औषधांच्या निर्यातीत जबरदस्त वाढ झालीय.... हे सर्व फार सुखद आहे. हे ‘हिंदुत्वाचे वैश्विक पुनरुत्थान’ (Global Hindu Resurgence) आहे.
अनेक गोष्टी जुळून येताहेत. राजकीय पटलावर योगींच्या पुन्हा झालेल्या विजयामुळे हिंदुत्वाचा राजकीय आधार सशक्त झालाय. ‘द कश्मीर फाईल्स’ मुळे हिंदू खडबडून जागा झालाय. जागतिक पातळीवर भारत हा विश्व नेतृत्व करण्याच्या दिशेने दमदार पावलं टाकतोय.
आजच्या ह्या वर्षप्रतिपदेला हिंदुत्वाचं हे सुखद चित्र समोर येतंय. संघ संस्थापक डॉक्टर केशवराव बळीरामपंत हेडगेवार यांच्या जयंती च्या दिवशी सार्या जगात हिंदुत्वाचा जयघोष दुमदुमतोय. होय, हा हिंदुत्वाचा हुंकार आहे...!
(पूर्व प्रसिध्दी - 'मुंबई तरुण भारत' / शनिवार / २ एप्रिल, २०२२)
१) त्यांचा एक आमदार आहे. तो विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव आणू शकतो. सर्वोच्च न्यायालयाचा सुस्पष्ट निर्णय आहे आणि त्याचे राज्य सरकारने पालन केले पाहिजे. जर हा हक्कभंग प्रस्ताव सरकारने बहुमतावर
रेटून नेला तर याविरुद्ध ते राज्यपालांना ज्ञापन देऊ शकत होते. मुख्यमंत्र्यांना पत्र देऊ शकत होते.
२) हे पण जर साधले नसते तर ते सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करू शकत होते.
३) हे सुद्धा जमले नसते तर ते या विषयावर आंदोलन पुकारू शकले असते.
परंतु हे सर्व पर्याय नाकारून ते
काय सांगत आहेत ??? मशिदीवरील भोंगे निघत नसतील तर तुम्ही भोंगे लावून हनुमान चालीसा सुरु करा.
अर्थात ते कायदा मोडत आहेत आणि म्हणून आता तुम्ही पण कायदा मोडा.
कायदा कोण मोडतील ? मनसैनिक , तुरुंगात जाणे , दंड भरणे हे कुणाच्या नशिबी .. मनसैनिकांच्या.
साडे नऊ वाजता : अल्पोपहार- चहा पाव ( प्रायोजक -फादर दिब्रिटो )
सत्र दुसरे : मनोगत
अ) 'संघ एक कीड' (वक्ते - ज्येष्ठ विधिज्ञ श्री गं.ड. लेले )
ब) 'प्रेषित व नास्तिकांचा बंधुभाव' ( वक्ते- मौलाना सैफ हसरे )
क) 'हिंसा एक नाईलाज-भगतसिंग' (वक्ते- ज्येष्ठ कवी वरावरा राव)
ड) 'प्रेषित एक दिव्यदर्शन' या साने गुरुजींच्या लेखाचे सामूहिक अभिवाचन
हिरव्या शिवसेनेचा होणार लवकरच पालापाचोळा !!!
अनंत सामंत या जेष्ठ पञकारांनी संजय राऊतांवर लिहिलेला हा लेख म्हणजे प्रत्येक शिवसैनिकाची मनातील सलच आहे. 👇👇
सूचना: संजय राऊत "यांच्या महाराष्ट्रात" त्यांच्या विचाराच्या शिवसेनेचे कोणी कट्टर समर्थक असतील त्यांनी या लेखावर जरूर व्यक्त होण्याची हिंमत करावी. स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या सच्चा शिवसैनिकांच्या दुःख आणि वेदनात मात्र आम्हीही सहमत आहोत. अगदी मनापासून!!
बदमाश आघाडी सरकार
बदनाम महाराष्ट्र
"तपास संस्था महाराष्ट्र बदनाम करीत आहेत..!"
"मराठी लोकांविरुध्द आकसाने कारवाया.....!"
--शिवसेनेचे एकमेव ज्येष्ठ विचारवंत 🤦♂️🤭 खासदार संजय राऊत
काश्मीर मधील समस्त मुस्लीम हे कन्व्हर्ट होऊन मुस्लीम झालेले आहेत. हे सगळे मुळचे हिंदू. त्यामुळे तुम्हाला भट्ट हे तद्दन ब्राह्मणी आडनाव तेथील मुस्लीम धारण करताना दिसेल.
काश्मीर भौगोलिक दृष्ट्या थोडीशी अधिक संरक्षित भूमी. त्यामुळे तेथील संस्कृती अनाघ्रात राहिली. लोकांनी इस्लाम स्वीकारला, पण राजवट हिंदू आणि त्यामुळे थोडाफार संघर्ष वगळता एकंदर शांत भूमी.
१९४७ ला याला पहिला तडा गेला. कबाइली या नावाने आलेल्या परंतु पाकिस्तानी सैन्याच्या तुकडीने या भूमीवर हल्ला केला. इथल्या सर्वधर्मीय सुंदर स्त्रियांवर बलात्कार आणि लुटालूट सुरु केली. संत्रस्त मुस्लीम प्रजा राजावर दडपण आणते आणि राजा भारताची मदत घेतो. हल्ला करणारे मुस्लीम हल्ला सहन
#TheKashmirFiles मध्ये न दर्शवलेले सत्य. ( भाग १ )
बोफोर्स घोटाळ्यामुळे बदनाम झालेल्या राजीव गांधी यांना अल्पमत मिळाले आणि जनता दल आणि इतर विरोधी पक्षांनी मिळून सरकार स्थापन केले.
गृहमंत्री झाले मुफ्ती मोहम्मद सईद. कालावधी. २ डिसेंबर १९८९ ते १० नोव्हेंबर १९९०.
या कालखंडात काय काय झाले ?
स्वतःच्या मुलीचे अपहरण घडवून पाच अत्यंत खुंखार दहशतवादी मोकळे सोडले. याच अकरा महिन्यांच्या
कालखंडात पाकिस्तानशी संगनमत करून काश्मिरी पंडितांचा नरसंहार घडवला आणि काश्मिरी पंडितांना काश्मीर सोडून पळून जाण्यास भाग पाडले.
केंद्रीय गृहमंत्र्याचा वरदहस्त असला तर राज्य पोलीस आणि केंद्र सरकारची रक्षा दले निष्क्रिय झाली असतील हे सांगायला ज्योतिष्याची गरज नाही. आपण हे
मेडिकल रिप्रेझेन्टेटीव्ह हा शब्द ऐकला की सर्वांना आठवतो तो एकच शब्द तो म्हणजे 'M.R'. मग M.R. म्हणजे कोण 'अरे म्हणजे तू तोच ना जे डॉक्टर च्या क्लीनीक मध्ये लायनीत उभे असता'.
हो तोच मी. मी M.R. जो एका डॉक्टर ला भेटण्यासाठी दोन दोन तास
उभा असतो. जो एका मेडिकल वाल्याकडे जातो आणि एक मिनिटांचा वेळ घेण्यासाठी 4-5 फेऱ्या मारतो. कधी कधी अपमानित होतो तरी पुढच्या वेळेस त्याच केमिस्ट च्या माणसाला स्मित हास्य देऊन भेटतो.
हो तोच मी. ज्याच्यासाठी एखाद्या हॉस्पिटलमध्ये बसण्यासाठी कधीच जागा नसते. एखादा पेशंट आला तर तो लगेच
उभा राहण्याचं सौजन्य सुद्धा दाखवतो .
हो तोच मी. जो एखाद्या ठिकाणी वेटिंग मध्ये बसलेला असतो आणि सीट्स रिकाम्या असून सुद्धा एक आवाज येतो... " M.R's बाहर जाइये... ये आपके बैठने के लिये जगह नही है". आणि तो तोंडातून एक शब्द सुद्धा न काढता बाहेर जातो.