बायको म्हणजे कोण???
बायको ह्या शब्दाला जर फोडले तर “बा” म्हणजे तुमच्या बाजूने भक्कम पणे उभी राहणारी “य” म्हणजे येईल त्या परिस्थितीला खंबीरपणे तोंड देणारी आणि “को” म्हणजे कोणासाठीहि नाही तर फक्त आणि फक्त नवऱ्यासाठी जगणारी!
सुख दुःखात साथ देणारी म्हणून तिला बायको असं म्हंटलं जात मैत्रिणीला सहज समजून घेतलं जातं पण बायकोला मैत्रिण बनवलं तर आयुष्य किती सुंदर होईल शेवटी नवऱ्यापेक्षा अधिक जवळचा मित्र तिच्यासाठी कोण असेल बाहेर मैत्री आणी मैत्रिणी शोधण्यापेक्षा बायको मध्येच
मैत्रीण सापडली तर तिला आणखी काय हवं प्रत्येक नवऱ्याला वाटत बायकोसाठी खूप काही करावं लागतं पण सत्य परिस्थिती अशी असते तिला लागते नवऱ्याची साथ हातात भक्कम हात समजून घेणार हृदय इतकं प्रेम कि तिला माहेरच्या लोकांची आठवण हि ना यावी
एक जवळचा मित्र आणि जो अहंकार बाजूला ठेवून तिच्याशी वागेल ज्याच्या जवळ इतकं मन मोकळं करता येईल की मैत्रिणीची हि गरज नाही भासणार जिच्या डोळ्यात आपल्यामुळे कधीच अश्रू नाही येणार एक स्त्री म्हणून मान आणि तिच्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी
भक्कम साथ बस इतकंच मिळालं कि ती झोपडीला हि स्वर्ग बनवेल आणि भाकरीचा तुकडाही तिला पंचपक्वान्न वाटेल आणि नवऱ्याच्या मिठीत स्वर्ग सुख बस आणखी काहीही नको असत कुठल्याही बायकोला म्हणून म्हणते मग ती एक सुन म्हणून… एक बायको म्हणून… एक वहिनी म्हणून… एक आई म्हणून…
एवढ्या वर्षानंतर आयुष्याच्या शेवटच्या स्टेशनवर आलो तरी ज्याच्यासाठी स्वतःला विसरून त्याची झाले…पण तो विचारतो तू कोण आहे? मी आहे म्हणून तू आहेस मी नसतो तर तुला कोणी विचारले पण नसते तरी त्याचा राग न करता… त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारी त्याला माझी गरज याची जाणीव असणारी…
म्हणजे बायको नाही कां?
बायको वरील पोस्ट टाकणं म्हणजे तिला समजणं नसत बायको म्हणजे एक संसारासाठी सतत तेवणारी ज्योत असते स्वतःला विसरून नवऱ्यासाठी जगणारी आयुष्यभराची साथ असते.. #cp #fb #आवडलेलं
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
आजही आपल्या भारतभुमीकडे पाहीलं तर एक गोष्ट जी भारतीय समाजव्यवस्थेला वाळवीप्रमाणे खाते ती म्हणजे जातीप्रथा.हे जातीव्यवस्थेचं मूळ उपटण्यासाठी महाराष्ट्रात भागवतधर्मी संतांनी अतोनात प्रयत्न केलेले दिसतात.काही संत तर याच व्यवस्थेने वाळीत टाकले,त्यातील एक होते #संत_चोखामेळा..! (१/१३)
तेराव्या ( इसवी सन १३०० ) शतकात उदयास आलेल्या निस्सीम विठ्ठल भक्ताबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच! ज्ञानदेवांनी संत लोकशाहीचा पाया रोवला होता.तोच भागवतधर्म नामदेवांनी आणि चोखामेळा यांनी तत्कालीन उपेक्षित ठेवलेल्या समाजापुढे आणून ठेवण्याचं काम चोखपणे पार पाडलं. (२/१३)
एक महार म्हणून जन्माला आलेल्या चोखोबां मरेपर्यंत भेदभाव आणि शिवाशिव, उच्चनीच, शुद्र अति शुद्र, सामाजिक जीवन व वर्णव्यवस्था या गोष्टींनी होरपळून निघाले होते.
लहानपणापासून विठ्ठल भक्तीची कास धरलेल्या चोखोबांनी अखेरपर्यंत ईश्वरभजनाची, नामस्मरणाची संगत सोडली नाही. (३/१३)
दिनकरराव जवळकर आणि र. धो कर्वेंच्या वादग्रस्त खटल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लढवलेल्या तिसर्या खटल्याबाबत खूपच कमी जणांना ठाऊक आहे. तर खटला चालला होता फिलीप स्प्रॅट या ब्रिटिश लेखकावर! फिलीप स्प्रॅट ( २६ सप्टेंबर १९०२ - ८ मार्च १९७१ ) हा ब्रिटिश लेखक होता. (1/11)
फिलीप हा कम्युनिस्ट होता, फिलीपला ब्रिटिश आर्म ऑफ कम्युनिस्ट इंटरनॅशनल ने भारत आणि मॉस्को येथे कम्युनिझमचा प्रचार प्रसार करण्यासाठी पाठवलं होतं. फिलीप हे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक मनबेंद्रनाथ रॉय यांचे मित्र आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे सभासद होते. (2/11)
भारतीय कम्युनिस्ट चळवळीत चैतन्य उत्पन्न करण्यासाठी ते भारतात आले. फिलीप स्प्रॅट यांनी 'इंडिया अँड चायना' या मथळ्याखाली 'नॅशनल हेरॉल्ड' मधुन लेख लिहीण्याचं कार्य केलं. या लेखांचं संपादन 'क्रांती' या नियतकालिकाचे संपादक श्री मिरजकर यांनी प्रसिद्ध केलं होतं. (3/11)