"मी"
हा लेख वाचून झाल्यानंतर किंवा वाचत असतानाच मध्ये मध्ये शांतपणे डोळे मिटा व हा विचार करा.
आजूबाजला एखादे टेबल असेल तर ते "मी" आहे असा विचार करू शकते का. किंवा त्याला असा फिल देखील असेल का?
माझा स्वतःचा हात जरी जिवंत वाटत असला तरी देखील त्याला स्वतःच्या अस्तित्वाची "मी" आहे अशी जाणीव असते का? मी आता हलणार नाही किंवा मी आता अजिबात बोट हलवणार नाही असा विचार तो करू शकतो का?
तुमच्या शरीरातील कोणत्याही अवयवाला या पद्धतीने "मी" आहे ही जाणीव आहे का?
माझ्या मनात जो विचार येतो त्या विचाराला देखील "मी" आहे अशी जाणीव असते का? तो फक्त येतो आणि जातो. त्याला मी आलो, मी गेलो अशी जाणीव असते का?

एक लक्षात येईल की या कोणत्याच गोष्टींना मग भले त्या निर्जीव वाटू देत किंवा जिवंत वाटू देत त्यांना "मी" ही जाणीव नाहीच आहे.
मग आपल्या आत मध्ये असे काय आहे ज्यामुळे आपल्याला "मी" ही जाणीव सतत असते. अगदी लहानपणापासून म्हणजे अगदी जन्माला आल्यापासून "मी"ही जाणीव आत्तापर्यंत कायम सतत सोबत आहे.

जर का नीट निरीक्षण केले तर तुम्हाला आढळून येईल.
कोणताही विचार घ्या त्यामध्ये मी हे जाणीव असतेच.
मी शाळेत जातो. मी आनंदी आहे. मी दुःखात आहे. मी त्रासात आहे. आकाशात चांदण्या आहेत ( हे कोण बघताय? मीच. म्हणजे indirectly मी येथे पण आहे)..

आयुष्यामधील कोणतेही घटना किंवा विचार आठवा. "मी" कधी नव्हतो असा कोणताही क्षण तुम्हाला सापडणार नाही.
परंतु आपले लक्ष मी कडे नसते तर आपण काय अनुभवत आहोत याकडे असते त्यामुळे मन सैरावैरा भटकत राहते.
मी आनंदी आहे किंवा मी दुखी आहे किंवा मी अपमानित आहे किंवा मी प्रेमात आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये आपले मन आनंद किंवा अपमान किंवा प्रेम या भावनांकडे बघते
परंतु जो कायमस्वरूपी "मी" जो या सर्व भावना आणि अनुभव अनुभवत आहे त्याकडे मात्र बघत नाही.

भले मी प्रेमात पडलो किंवा माझा प्रेमभंग झाला तरी या दोन्ही घटनांमध्ये "मी" होतोच. म्हणजेच थोडक्यात त्या "मी" समोर कोणतीही घटना व कोणताही अनुभव आला तरी त्याच्यावर काहीही फरक पडत नाही.
परंतु आपण त्या "मी" कडे न बघता तो मी काय अनुभवत आहे याकडे बघत असल्यामुळे आनंद व दुख या दवैतमध्ये आपण अडकून राहतो.

अजून एक समर्पक उदाहरण देतो. जर तुम्हाला आकाशाकडे बघायला सांगितले तर तुम्ही काय बघावे व काय सांगाल?
तुम्ही सांगाल आकाशात इंद्रधनुष्य आहे किंवा आकाशाचा रंग निळा आहे किंवा पक्षांचा थवा, पतंग किंवा विमान आकाशात उडत आहे वगैरे वगैरे. परंतु यातील कोणतीच गोष्ट म्हणजे आकाश नाहीये. या सर्व गोष्टीही आकाशाच्या पटलावरती येणाऱ्या व जाणाऱ्या आहेत.
आकाश तसेच स्थिर निरंतर व कोणत्याही रंगाचे देखील नाहीये. तसेच "मी" असतो. आकाशाकडे भक्तांना ज्या पद्धतीने आपण प्रत्यक्ष आकाशा पेक्षा आकाशाच्या पटलावरती येणाऱ्या गोष्टींमध्येच हरवून बसलो तसेच आयुष्यातील प्रत्येक अनुभवाबाबत आपले होत असते.
अनेक विचार त्या मीच या अथांग व अनंत पटलावर येतात आणि जातात परंतु आपले लक्ष त्या "मी" कडे नसते तर त्यावर ती येणार्‍या विचारांकडे असते.

त्यामुळेच कोणत्याही परिस्थितीमध्ये असताना आपण सवय लावून घेतली की
त्या अनुभवाकडे बघण्यापेक्षा तो "मी" जो कोणी आहे जो ते अनुभवत आहे त्याकडे बघितले तर समोरील सुख, माज येऊ देणार नाही व समोरील दुःख, निराशा येऊन देणार नाही.
हळूहळू तो मी प्रत्यक्ष जाणवत जाईल. स्थैर्य येऊ लागेल. कोणत्याही परिस्थितीत मन ढासळणार नाही, किंवा त्याचा प्रभाव कमी होत जाईल. याचा परिणाम म्हणून काही काळाने शेवटी सर्व काही मीच आहे ही अनुभूती येईल.

हेच अद्वैत वेदांताचे सार.

#mayurthelonewolf

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with The Lone Wolf

The Lone Wolf Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @mayurjoshi999

Apr 14
पॉर्न बघणे गुन्हा आहे का?
आज एक पॉर्न वर असलेली पोस्ट वाचली. केवळ पॉर्न बघितल्यामुळे बलात्कार करण्याची इच्छा कशी होत असेल याबाबत.

मी देखील पॉर्न बघितलेले आहेत एकेकाळी. परंतु त्यानंतर ते बंद केले कारण मला माझा स्वतःचा रस्ता बदलायचा होता म्हणून. परंतु नंतर काही गोष्टी समोर
आल्या त्या मांडायचा प्रयत्न करतो. त्याआधी एक स्वतःचा अनुभव सांगतो.
कॉलेजला असताना मी बुधवार पेठ मधील वेश्या वस्ती मध्ये तेथील वेश्यांच्या मुलांना शिकवण्या करता जायचो शनिवारी. साधारण काही महिने गेलो असेल. त्यामध्ये तेथील एका मुलाच्या आईची ओळख झाली होती. तीस पस्तीस वर्षाची असेल ती.
या व्यवसायात कशी आली हे मी तिला एकदा विचारले होते तिच्याकडे चहा पिताना. तिने मला सांगितले ती मूळची बंगालची. लहानपणी आई-वडील वारले. ती तिच्या काकाकडे राहायला होती. 13 14 वर्षाची असताना काकाने तिला विकले कलकत्त्यामध्ये.
Read 27 tweets
Apr 13
एकटेपण
अर्थात यातील शेवटचा परिच्छेद सगळ्यांनी नीट वाचावा. नाहीतर लोक उगाच पेटतात.
I am the lone wolf...
I am single by choice..not by situation....
माझ्या वयाच्या 18 व्यं वर्षी मे निर्णय घेतला होता की मी एकटा जगणार. कोणतेही रिलेशन किंवा लग्न यात न जाता.
बाकी लोकांपेक्षा थोडे वेगळ्या पद्धतीने.
बाकी लोकांपेक्षा थोडे वेगळ्या पद्धतीने. चाकोरी बाहेर.

जवळपास सगळे जण एकाच पद्धतीमध्ये आयुष्य जगत असतात. बालपण त्यानंतर शिक्षण मग नोकरीधंदा त्यानंतर लग्न आणि मुलेबाळे.
परंतु त्यातील एकही माणूस छातीठोकपणे हे सांगू शकत नाही की मी पूर्णपणे समाधानी आहे. पूर्णपणे आनंदी आहे. आज जर का त्यांना आनंद झाला असेल तर तो उद्या टिकेल की नाही याची त्यांना शाश्वती नसते.
Read 38 tweets
Apr 12
I love u but i dont need u.

Am so happy by myself that i don't need u for my happiness. Yes i would love to share and celebrate my happiness with u for whole life if possible.
But i was happy when u were not there. I am happy when u r here. I will be happy if u won't be there.
Why our happiness should be depend on anyone? Or anyone's actions or presence? We invest our happiness in to others action, thought process, presence and many qualities so much that every tiny thing makes life rollar coastar. Why? So we deserve this? Not at all.
Yes my original joy and bliss would be more if u r there. I would feel more amazing. But it doesn't mean ur abcense or any activity would take me in the deep sorrow and anger and sufferring.
Thats why when person truly loves himself/herself then only it's possible.
Read 4 tweets
Apr 12
सिंगल राहायचे फायदे
1. निवांत झोपता येते. आजचा दिवस दैवयोगाने चांगला गेला असला तरी उद्या सकाळी अचानक (तिच्या डोक्यात कायपण विचार आल्याने)  काय नवीन संकट उभे राहील याची काळजी नसते.
2. स्वतःच स्वतःला महागडे गिफ्ट देता येते. सिंगल नसेल आणि ती असेल आणि तिला गिफ्ट घेतले तरी "इतके महागडे का घेतलेस किंवा मला विचारून तरी घ्येयचे ना माझा आवडीचा कलर तरी घेतला आता अश्या वाक्याने ओम फट स्वाहा फुस्स होत नाही.
3. कोणाचा तरी मेसेज आलेला नाही की व कॉल करायचा आहे या क्षुल्लक विचारांपासून मन मुक्त राहते.
4. मूड स्विंग या अत्यंत दळभद्री आजाराच्या रुग्णांशी सामना होत नाही. पुरुष म्हणून मी ते समजू शकत नाही हे मान्य. पण म्हणून ते मूड स्विंग आणि त्याचे परिणाम सहन करणे अशक्य.😂
Read 14 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(