महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपुर्ण भारतात तापमानाचा पारा अंगाची लाही लाही करतोय.
पुर्वी या दिवसात विदर्भात जायचे म्हटले तरी एसीमधेही दरदरून घाम फुटायचा पण समस्त मानवजातीची पृथ्वीवर कृपा झाली व ग्लोबल वॉर्मिंगमुळे अखंड विश्वाचेच चंद्रपुर व्हायला सूरूवात झालीये.
ग्लोबल वॉर्मिंग हा आजचा मुद्दा नाही तो खरं तर आपल्या प्रत्येक श्वासासोबतचा मुद्दा आहे त्यावर पुन्हा कधीतरी.
आजचा विषय म्हणजे यावर्षी आपल्या आयुष्यात आलेला नवा उन्हाळा.
आपल्याकडे एप्रिल, मे मधे तापमान वाढते आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणात विजेची गरजही वाढते, बरं हे दरवर्षी
२/१०
होणारं ऋतुचक्र काही नवे नाही. वीजेची गरज अचानक किती जास्त वाढू शकते याचे वर्षानूवर्षाचे सरासरी आकडे सरकार दरबारी असतातच.
मागचे दशकानुदशके हे चालू आहे. बरं आपल्याकडे ७५ ते ८०% वाजनिर्मिती ही कोळश्यावरच होते त्यामुळे वीजनिर्मितीसाठी कच्चा माल काय लागणार याबाबत काही संदिग्धता
३/१०
नसावी.
आर्थिक देणीघेणीही बऱ्यापैकी ठरलेली, स्थिरस्थावर असतात तरीही यंदा कोळश्याच्या अभूतपूर्व टंचाईचा उत्सव आपण साजरा करतोय.
देशातील शंभरहून अधिक पॉवर प्लॉंट्समधे २५% पेक्षा कमी कोळसा आहे तर पन्नास ठिकाणी तो अगदी १०% टक्यांच्याही खाली गेलाय आणि आता उंदीर धावाधाव करताहेत.
४/१०
कोळश्याचा धंदा तसा फार जूना आणि फार विविध कंगोरे असलेला.
आजही एकविसाव्या शतकात, कंम्प्युटर, इंटरनेट, SAP, ERP, Supply Chain Management, Crisis Management सोबत अत्यंत हुशार, कर्तबगार अधिकारी तसेच काळाच्या पुढचे पाहणाऱ्या नेते, मंत्री, त्यांचे सहाय्यक यांच्या लक्षात ही
५/१०
छोटीशी कोळसाटंचाई कशी काय आली नसावी हा सर्वसामन्य नागरीकाला पडलेला प्रश्न आहे.
अशीच चूक जर सर्वसामान्य नागरीकाकडून झाली तर मात्र लगेच कायदा, दंड, शिक्षा किंवा झालेच तर सात पिढ्यांची इज्जत काढून हे सर्व मोकळे होतात.
आता मात्र सर्वच “प्रयत्न करतोय” म्हणून मूग गिळून गप्प!
६/१०
जगण्यामरण्याचे प्रश्न बाजूला सारून भावनात्मक होणाऱ्या नागरीकांना खर तर या अशा मुद्द्यांनी काय फरक पडणार म्हणा?
आज वीजेची समस्या, उद्या शिक्षणाची, परवा महागाईची, नंतर रोजगाराची, नंतर अजून नवीन काही….. इंटरनेट जोपर्यंत स्वस्त आहे तोपर्यंत जाग येणे केवळ अशक्य दिसतेय.
७/१०
त्यातही मुद्दा केंद्राचा, राज्याचा , धर्माचा की जातीचा यावर तो बरोबर की चूक ठरवणारे नागरीक म्हणजे या देशाची खरी संपत्ती!
मराठीत अशा लोकांसाठी उत्तम म्हण आहे -“नवरा मेला तरी चालेल पण सवत रंडकी झाली पाहिजे.”
असो.
वीज ही जगण्याची मुख्य गरज आहे, शेती, उद्योग, ओव्हरॲाल देशाची
८/१०
प्रगती ही एकून विजेच्या वापरावरच ठरते.
वीज जपून वापरायला हवी हे ठिकच पण ती चांगल्या कारणासांठी अधिक वापरली गेली तर त्यात राज्याची, देशाची प्रगती १००% होते.
यानिमित्ताने का होईना वीजनिर्मितीचे नवे,चांगले,स्वच्छ मार्ग अवलंबायला हवेत. जगासोबत डोळे उघडून चालायला हवे.
नाहीतरी
९/१०
कोळसा हे सर्वाधिक प्रदुषण करणारे इंधन म्हणून कुप्रसिद्ध आहेच तरी त्यावर इलेक्ट्रीक गाड्या चालवून प्रदूषण कमी करणारे आपण सुशिक्षित लोक आपल्याला तर भविष्यात कोळसा अजून अधिक प्रिय होणार आहे!
काही महिन्यांपूर्वी अत्यंत अभ्यासपुर्ण मराठी पुस्तक वाचनात आले.
मी अगदी ॲाफीसमधेच थांबून एका बैठकीत संध्याकाळी ७ ते ११.३० वाजेपर्यंत त्याचा फडशा पाडला. पुढचे काही दिवस त्या पुस्तकातील भाग पुन्हा पुन्हा वाचला. त्या लेखकाबद्दल खूप आदर तयार झाला.
काहीही करून त्यांना भेटायचे आणि त्यांना धन्यवाद सांगायचे हे मनोमन ठरवलं.
खरं सांगायच तर मागच्या पाचएक वर्षात माझ्या वाचनात मराठी पुस्तक फार मोजकी येताहेत, आणि त्यात मला नक्कीच सुधारणा करायच्या आहेत. मला ते पुस्तक वाचून अजून काही मराठी पुस्तकं वाचायची प्रेरणाही मिळाली होती.
२/१४
दरम्यान मी त्यांची अजून एक पुस्तक वाचून काढले. लेखकाचा एकंदर आवाका मोठा होताच शिवाय त्यांचे कष्टही त्या लिखाणातून दिसत होते. मी काही जवळच्या मित्रांकडून त्या लेखकाचा नंबर मिळवायचा प्रयत्न करत होतो पण यश मिळत नव्हते.
असेच काही दिवस गेले, मी ही कामात बिझी झालो होतो. एक दिवस
३/१४
आमची काही पुर्वी ओळख नव्हती, मी जिथे नोकरी करायचो त्याच बिल्डिंगमधे तो ही एका कंपनीत काम करायचा. आमची दोघांचीही सकाळी जायची एकच वेळ होती त्यामुळे येताजाता दिसायचा.
मुंबईत येऊन मला एक महिनापण झाला नव्हता. लोकल ट्रेनची मला प्रचंड भीती वाटायची, पहिल्यांदा ट्राय करायला गेलो
👇
आणि जाम चेंबलो गेलो, अगदी भूगा झाला त्यामुळे रोज बसने कांदिवली ते अंधेरी प्रवास करायचो.
एक दिवस सकाळी सकाळी नेहमीप्रमाणे बसमधे शिरलो आणि अचानक युवराज पण त्या बसमधे मला दिसला. मी पटकन त्याच्या बाजूच्या सीटवर बसलो. त्यानेही मला लगेच ओळखले. बस सूरू झाली तसा दोघांनीही एकाच वेळी
👇
प्राथमिक शाळेत असताना वडिलांनी सांगितलेलं एक वाक्य डोक्यात फिट्ट झालंय - “जनावरात आणि माणसात एक फरक फार महत्वाचा आहे, माणसाला वाचन करण्याची सर्वोच्च शक्ती लाभलीये… जो तीचा वापर करेल, ज्ञान मिळवेल, शहाणा होईल, सतत वाचत राहील आणि मिळालेल्या ज्ञानाचा वापर करेल तो पुढे जाईल.
१/९
आपल्या सारख्या सर्वसामान्य माणसांना प्रगतीचा याहून सोपा मार्ग दुसरा कोणताच नाही….शाळेत शिकून, वाचायला येत असून जर वाचत नसाल तर म्हसरात, कुत्र्यामांजरात आणि तुमच्यात फरक तो काय?”
आज जी मला एखाद्या विषयातील Clarity आहे ती लहानपणी किंवा पाच-दहा वर्षांपूर्वी नक्कीच नव्हती आणि
२/९
आज जो Confidence आहे तो ही नव्हताच.
पुढील पाच वर्षांनी या दोन्ही बाबतीत मी कदाचित अजून समृद्ध होईन..... बरेच दोष, चुका समजतील, अजून सुधारणा होतील पण पुर्ण Clarity आणि Confidence येईपर्यंत मी Pause घेतला असता तर हा आयुष्याचा प्रवास कदाचित अवघड आणि खुप धिम्या गतीने झाला असता.
३/९
नुकसान केलेय, काहींचे तर आयुष्य संपुर्ण बदलून गेलेय.
कोविडपुर्व आणि कोविडनंतरचे जग अशी सरळ काळाची विभागणी आता झालीये.
येणाऱ्या काळात चॅलेंजेस अजून कठीण होत जातील. गुणवत्ता, प्रोडक्टिव्हीटी आणि चांगली एफीशियंसी देणाऱ्या लोकांना आणि कंपन्यांना भविष्य निश्चितच उज्वल असेल.मग
२/१९
आपली तरूण पिढी यासाठी तयार आहे का? ते शहरी भागातले असो, ग्रामिण भागातले असो, या स्पर्धेत टिकायचे असेल तर प्रोफेशनलिझम रक्तात मुरायला हवे.
आपल्याला आर्थिक साक्षरतेबद्दल बऱ्यापैकी जागरूकता निर्माण करण्यात (निदान वर्तमानपत्र/समाजमाध्यमात तरी) थोडफार यश मिळालेय असे मला वाटतेय.
३/१९
मला बाजरीची भाकरी आवडते, मस्त घडीची चपाती, भाजी, डाळ-भात, तळलेले मासे, वडापाव,पोहे, उप्पीट वेगवेगळ्या चटण्या आणि बरंच काही.
बर मला हे पचायलाही सोपे जाते पण हेच युरोप, अमेरीका, चीन किंवा साऊथ इस्ट एशियातल्या लोकांना आवडायलाच हवं असा आग्रह #SaturdayThread#BusinessDots#मराठी 👇
मी धरू शकत नाही.
आणि त्यांचा पिझ्झा, बर्गर, कॅार्नफ्लेक्स, ब्रेड मला जस्साच्या तस्सा आवडावाच असेही काही नाही. कदाचित तो मला पचेल, रूचेल असेही काही नाही.
बऱ्याचदा अमेरीका आणि युरोपियन लोकांच्या विकासामुळे असेल म्हणा किंवा वर्णद्वेष वा मोठेपणाच्या गर्वामुळे असेल म्हणा 👇
भारतीय लोकांकडे आणि भारतीय बाजारपेठेकडे त्यांचा पहायचा दृष्टीकोन वेगळाच आहे.
बरेच लोकं भितीने हे मान्य करत नाहीत पण तिकडे राहणाऱ्या भारतीयांना बऱ्याचदा याचा अनुभव येतोच पण “गिरा तो भी टांग उपर” या आपल्या मुळ स्वभावामुळे तसेच पाण्यात राहून माश्याशी वैर कशाला या बोटचेप्या 👇