Thread: #बाजीराव_पेशवा 1. हिंदवी स्वराज्य विस्तारक - श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे"
आपल्या अजेय युध्द कौशल्याने शत्रूला अक्षरशः सळो की पळो करून सोडणारे ईश्वरदत्त सेनानी "श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे" म्हणजेच "रणपंडीत राऊ" यांची आज पुण्यतिथी...
2. १८ ऑगस्ट १७०० या दिवशी पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट आणि सौ. राधाबाई यांच्या पोटी एक तेजस्वी पुत्र जन्माला आला तो म्हणजे "बाजीराव" अर्थात "राऊ"
१८ ऑगस्ट १७०० ते २८ एप्रिल १७४० या अवघ्या ४० वर्षांच्या आयुष्यात यांनी आपल्या राजनैतिक कौशल्याने दैदिप्यमान गौरवशाली इतिहास घडवला.
3. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांचे निधन झाल्यावर पेशवाईची वस्त्रे कोणाला द्यायची याबद्दल शाहू महाराजांचे दरबारात विचार विनिमय सुरू झाला. "बाजीराव साहेब शिपाईगिरीत मातब्बर पण मुत्सद्दीगिरीत कमी" असे दरबारातील सुमंत, पंतप्रतिनिधी यांचे मत होते.
4. या सर्वांचा विरोध डावलून छत्रपती शाहू महाराजांनी १९-२० वर्षांच्या तरूण बाजीरावांस पेशवेपदाची वस्त्रे दिली (इ. स. १७२०). बाजीरावांनी हा विश्वास सार्थ ठरवून सह्याद्रीच्या पट्टयात असलेल्या स्वराज्याचा विस्तार तापी, नर्मदा, चंबळ आणि यमुनेच्या पलीकडे नेऊन ठेवला.
5. आपल्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने दुप्पट असलेल्या अनेक मुघल सरदार, निजाम, सिद्दी यांचा पराभव करून स्वराज्य सुरक्षित तर केलेच पण शत्रू वाकड्या नजरेने स्वराज्याकडे पाहण्याची हिंमत करणार नाही इतके बलशाली केले.
6. बाजीरावांचे लष्करी शिक्षण धनाजी जाधवांसारख्या कसलेल्या सेनापतीकडे झाले होते. धनाजी जाधवांचे युद्ध कौशल्य, लष्करी गुण आणि वडील बाळाजी विश्वनाथ यांचे मुत्सद्दीपण, प्रशासकीय कौशल्य या सगळ्या गुणांचा उत्तम परीपाक बाजीरावांच्या व्यक्तिमत्वात उतरलेला दिसतो.
7. २० वर्षांच्या कारकीर्दीत ४७ पेक्षा जास्त लढाया बाजीरावांनी निर्णायकपणे लढल्या आणि जिंकल्या.
माळवा - १७२३, धार - १७२४, पालखेड - १७२८, बुंदेलखंड - १७३०, दिल्ली - १७३७, भोपाळ - १७३८
या त्यांच्या कारकिर्दीतील काही प्रमुख लढाया. याचा भारताच्या राजकारणावर दुरगामी परिणाम घडला.
8. या सगळ्या लढायांचा मुकूटमणी म्हणजे
"पालखेडची सुप्रसिद्ध लढाई"
बाजीरावांनी बुऱ्हानपुरापासून गुजरातेपर्यंत विद्युतगतीने हालचाली करून गनिमी काव्याने निजामाला अक्षरशः हैराण केलं आणि सरते शेवटी पालखेड या गावी निजामाच्या सैन्याची रसद तोडून त्यास मुंगी शेवगावचा तह करण्यास भाग पाडले.
9. ही लढाई म्हणजे युद्धनीतीशास्त्राचा अत्युच्च नमुना म्हणून गणली जाते. बाजीरावांचे वय अवघे २७ आणि निजामाचे वय ५० च्या पुढे असूनही निजामाला मात दिली. हा पराक्रम पाहून अवघा हिंदुस्थान गुंग झाला. याने शाहू महाराजांचे स्थान तर बळकट केलेच पण शत्रूंनी राऊंच्या कार्यपद्धतीची दखल घेतली
10. राऊंचा शत्रूवर धाक किती होता याचं उत्तम उदाहरण. १७३५ साली त्यांच्या मातोश्री राधाबाईनी काशीयात्रा केली. एकही सैनिक बरोबर न घेता पुण्याहून निघून राजपुताना, दिल्ली, अयोध्या मार्गे काशीला गेल्या. मार्गावर सवाई जयसिंह, दिल्लीचा बादशहा, बंगालचा महंमदखान बंगश यांची राज्ये होती.
11. या सर्वांना बाजीरावांनी युध्दात पराभूत केलेले होते. बाजीरावांच्या मातोश्रींना अटकाव करायची यापैकी एकाचीही हिंमत झाली नाही उलटपक्षी सर्वांनी त्यांच्या सुरक्षेची तजवीज करून आपापल्या प्रांतातून त्यांना सुरक्षित पुढे पाठवले.
12. बाजीरावांनी आपल्या संपूर्ण कारकीर्दीत सामरिकशास्त्रातील "योजनाबध्द नियोजन, जलद हालचाल आणि धक्कातंत्र" या ३ सूत्रांचा प्रभावी वापर केला म्हणूनच बहुतेक सर्व लढायांत बाजीरावांचे सैन्य शत्रू सैन्यापेक्षा संख्येने कमी असून देखील विजय बाजीरावांचा होत असे.
13. मुघलांनी आपले साम्राज्य टिकवले ते राजपुतांच्या मैत्रीवर ! बाजीरावांनी हे ओळखून मुघल साम्राज्य खिळखिळे करण्याच्या दृष्टीने राजपुतांशी मैत्री करण्याचे धोरण आखले आणि ते बहुतांशी यशस्वी झाले यावरून बाजीरावांच्या राजनैतिक कौशल्याचे दर्शन घडते.
14.राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर, विंचुरकर, रेठरेकर, पवार इ. इतिहासात नावारुपास आलेल्या सरदारांना अचूक हेरण्याची जातीभेदापार जाणारी गुणग्राहकता होती. आपला धनी उपाशी राहू नये म्हणून सरणावर भाकरी भाजणाऱ्या गोविंदपंत खेर (बुंदेले) यांची समयसूचकता ओळखून बुंदेलखंडात मामलतदार केले.
15.उमदे आणि अष्टावधानी बाजीराव:
स्वराज्याचा कट्टर शत्रू निजाम आणि बाजीराव यांची औरंगाबाद जवळ भेट झाली. निधड्या छातीचे राऊ आपल्याबरोबर फक्त ५ सेवक घेऊन निजामाच्या भेटीसाठी गेले.
16. निजामाच्या बेगमांनी उधळलेले मोती त्या बेगमांकडे मान वर करून न पाहता विनम्रपणे स्वीकारून बाजीरावांनी त्यांच्यातील उमद्या आणि सज्जन माणसाचे दर्शन घडवले."आपल्या बेगमांनी केलेले स्वागत पाहून निजाम मनातल्या मनात चरफडला पण वरकरणी मात्र काहीच बोलला नाही.
17. गप्पांच्या ओघात त्याने बाजीरावांना प्रश्न केला... याक्षणी तुम्ही माझ्या छावणीत फक्त ५ माणसं घेऊन आलेला आहात. तुमचे पराक्रमी सरदारही सध्या जवळपास नाहीत. यावेळी मी दगा केला तर तुम्ही काहीच करू शकत नाही.
18. बाजीरावांनी उत्तर दिले..मी जिथेही जातो तिथे माझे प्रिय सरदार माझ्यासोबतच असतात आणि त्यांनी फक्त मागे नजर टाकली. निजामाच्या लक्षात आले की बाजीरावांसोबत आलेली सेवक वेशातील माणसे म्हणजेच सरदार राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर, पवार इत्यादी आहेत. निजाम हतबुद्ध होऊन पहातच राहीला..."
19.कुंवर मस्तानी जुदेव:
बाजीराव पेशव्यांची द्वितीय पत्नी, बुंदेलखंडची शूर राजकन्या जिची उपेक्षा आणि बदनामी पेशव्यांच्या कुटूंबापेक्षा इतिहासकारांनीच जास्त केली असं अतिशय खेदाने म्हणावं लागतं. बुंदेलखंडचे राजपूत राजे छत्रसाल हे अतिशय कृष्णभक्त घराणे होते.
20. यांची ही कन्या रूपसुंदर तर होतीच पण युध्दशास्त्रात देखील पारंगत होती. वेळ प्रसंगी आपल्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून युद्धभूमीवर लढत असे.मोगल सरदार महंमदशहा बंगश याने जैतापूरच्या किल्ल्याला वेढा घालून छत्रसाल राजांची कोंडी केली.प्रसंग अगदी बाका होता
21. पण बाजीरावांनी तत्परतेने धाव घेऊन बंगशाचा पराभव करून बुंदेलखंडाचा गळफास सोडवला. या संकटातून मुक्त झाल्यावर खूष होऊन छत्रसालांनी पेशव्यांना आपल्या राज्याचा १/३ भाग भेट दिला. सागर, झांसी, काल्पी आणि हि-यांची खाण असलेले पन्ना..
22. आणि आपली सुस्वरूप राजकन्या कुंवर मस्तानी जुदेव हीचा विवाह करून दिला. हिंदू रीती रीवाजानुसार कन्यादान केले.त्यांच्या आयुष्यातील केवळ शेवटचा १० वर्षांचा काळ मस्तानीने व्यापला आहे. त्यामुळे बाजीरावांच्या लष्करी, राजनैतिक कारकिर्दीवर कोणताही अनिष्ट परिणाम घडून आलेला दिसत नाही.
23. बाजीरावांची दिल्लीची इतिहास प्रसिद्ध धडक आणि १७३८ साली निजामाचा भोपाळच्या लढाईत केलेला दारूण पराभव या घटना ठळकपणे याची साक्ष देतात.
24.वस्तुतः महापुरूषांची "जात" पहायची नसते तर त्यांनी जनसामान्यांच्या मनामनात पेटवलेली अभिमानाची "वात" आणि त्यायोगे संपूर्ण समाजाने टाकलेली "कात" पहायची असते.हा विचार आचरणात आणणे या पराक्रमी योध्द्याला मानवंदना आहे. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे हे हिंदवी स्वराज्य विस्तारक होते.
25.तीन-साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या काळातला अजिंक्य, युद्धनीतीनिपुण, राजनैतिक कौशल्यात सरस असणारा हा पेशवा आपल्या असामान्य कर्तृत्वाने हिंदवी साम्राज्याचा सुवर्णकाळ निर्माण करून वैशाख शुद्ध त्रयोदशी म्हणजे दिनांक २८ एप्रिल १७४० या दिवशी काळाच्या पडद्याआड गेला.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
#thread:
चला काश्मीर बाबत जाणून घेवू:
१.
काश्मीरच्या अनंत जुन्या कथा
(मायथोलॉजी नाही, मिथ्या नाही हे ठासून सांगत) -
काश्मीर हे ज्ञानसाधनेचे केंद्र म्हणून कश्यप ऋषींनी वसवले. काश्मीर हे नाव आलेच मुळी काश्यपांपासुन. 'काश्यपस्य मीर'! संस्कृत भाषेत मीर म्हणजे मोठे सरोवर.
२.
काश्यप हे सध्या सुरू असलेल्या वैवस्वत मन्वंतरातील मरीची या सप्तॠषींपैकी एक असलेल्या ऋषींचे पुत्र. त्यांचा वंशजांचे काश्यप गोत्री हे गोत्र ठरले.
मेरू पर्वत रांगांमध्ये एक अतिशय विस्तृत व रमणीय सरोवर होते.
३.
भगवान शंकर व त्यांच्या अर्धांगिनी सती या दोघांनाही हे सरोवर अतिशय प्रिय असल्यामुळे, हे दोघेही या सरोवरावर नियमित येत असत. काश्यपांनी आपली मेहुणी सतीला हे सरोवर आंदण दिले तेव्हापासून या सरोवराला 'सतीसार' हे नाव पडले.
#Thread: विजया एकादशी..इदं न मम इति राष्ट्राय स्वाहा.. 1. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के द्वितीय सरसंघचालक माधवराव सदाशिवराव गोलवलकर ( श्री गुरूजी) जी का जन्म फाल्गुन मास की विजया एकादशी 19 फरवरी 1906 (संवत् 1963) को महाराष्ट्र के रामटेक में हुआ था।
2. इनके पिता का नाम श्री सदाशिव गोलवलकर व इनकी माता का नाम श्रीमती लक्ष्मीबाई उपाख्य ताई था।वे अपने माता-पिता की चैथी संतान थे। इनके बचपनका नाम माधव रखा गया। लोग इन्हे प्यारसे मधु कह कर पुकारते थे।दोवर्षकी आयुमें इनकी शिक्षा दीक्षा प्रारम्भ हुई।वे बचपनसेही अत्यधिक मेधावी छात्र थ
3. उन्होंने सभी परीक्षाएं हमेशा प्रथम श्रेणी में उत्तीर्ण कीं। माधव में कुशाग्र बुद्धि, ज्ञान की लालसा, असामान्य स्मरण शक्ति जैसे गुणों का समुच्चय बचपन से ही विकसित हो रहा था। कक्षा में हर प्रश्न का उत्तर वे सबसे पहले दे देते थे।
Thread: #गीता_जयंती
१.
आज मार्गशीर्ष शुद्ध एकादशी म्हणजे गीताजयंती, म्हणजे आपण हिंदू ज्या ग्रंथाला आपला धर्मग्रंथ म्हणतो त्या भगवद्गीतेची जयंती.कुरुक्षेत्रावर याच दिवशी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला वेद आणि उपनिषदे यांचे सार सांगितले, आणि ते तत्वज्ञान म्हणजे 'भगवद्गीता'
२.
हिंदू समाजाने धर्मग्रंथ म्हणून स्विकारला आहे...!
आज परिस्थिती अशी आहे की शाश्वत तत्वज्ञान सांगणाऱ्या आपल्या संस्कृतीचा आणि पर्यायाने भगवद्गीतेचा अभ्यास जगभरात अनेक विद्वान करतात आणि इथे अनेक हिंदुंनाच गीतेमधे किती श्लोक आहेत ह्याचासुद्धा पत्ता नाही .
३.
आपला समाज आपल्याच अमूल्य तत्वज्ञानाकडे सोईस्कर दुर्लक्ष करतो हे आपल्या समाजाचे पर्यायाने देशाचे दुर्दैव ! एक रूढ़ असलेला गैरसमज म्हणजे हे वृद्धापकाळात वाचन करायचे तत्वज्ञान आहे; हा समज फ़क्त आपल्या हिंदू समाजातच रुजला आहे .
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ @RSSorg की प्रार्थना का हिन्दी में अनुवाद ... पढ़िए और सोचिये कि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की भारत माता के प्रति भावना क्या है 🚩 @friendsofrss
1. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोsहम्। 🚩
हे प्यार करने वाली मातृभूमि! मैं तुझे सदा (सदैव) नमस्कार करता हूँ। तूने मेरा सुख से पालन-पोषण किया है। 🚩
2. महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे, पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते।। 🚩
हे महामंगलमयी पुण्यभूमि! तेरे ही कार्य में मेरा यह शरीर अर्पण हो। मैं तुझे बारम्बार नमस्कार करता हूँ। 🚩
१.
*क्या करोगे इतनी संपत्ति कमाकर* ? *तुम्हारा समाज तो वैसे ही खत्म हो जाना है*
एक दिन पूरे काबुल (अफगानिस्तान) का व्यापार सिक्खों का था, आज उस पर तालिबानों का कब्ज़ा है |
-सत्तर साल पहले पूरा सिंध सिंधियों का था, आज उनकी पूरी धन संपत्ति पर पाकिस्तानियों का कब्ज़ा है |
२.
एक दिन पूरा कश्मीर धन धान्य और एश्वर्य से पूर्ण हिंदूओं का था, उन महलों और झीलों पर अब आतंक का कब्ज़ा हो गया और तुम्हें मिला दिल्ली में दस बाई दस का टेंट..|
-एक दिन वो था जब ढाका का हिंदू बंगाली पूरी दुनियाँ में जूट का सबसे बड़ा कारोबारी था | आज उसके पास सुतली बम भी नहीं बचा |
३.
ननकाना साहब, लवकुश का लाहौर, दाहिर का सिंध, चाणक्य का तक्षशिला, ढाकेश्वरी माता का मंदिर देखते ही देखते सब पराये हो गए |
पाँच नदियों से बने पंजाब में अब केवल दो ही नदियाँ बची |
-यह सब किसलिए हुआ.?
पूर्वी आमच्या शाखेच्या "हाफ पॅन्टला" दात विचकत हसायचे, स्वत: मात्र बर्मूडा घालून मिरवायचे... तरीही *आम्ही आत्मियतेनं रक्षाबंधन उत्सवानंतर राख्या बांधायला आणि मकरसंक्रांती उत्सवानंतर तिळगुळ आणि लाडू द्यायला त्यांच्या घरी जात राहीलो.*
२.
नंतर दोन जणांच्या उपस्थिती असलेल्या शाखेवर हसत स्वत: मात्र घरदार भरण्यासाठी जगायचे....
मग आमच्या शाखेतल्या खेळांवर हसायचे...जेव्हा ते घरात बसून ढे-या वाढवायचे...मात्र *संकटसमयी त्यांना आमचीच आठवण यायची आणि आम्ही?कोडगे ना आम्ही! त्यांनी हाक मारली न मारली तरी धावून जात राहीलो.
३.
आमच्या विचारांच्या प्रेरणेनं स्थापन झालेल्या पक्षाच्या निवडून आलेल्या केवळ दोन खासदारांना हसायचे.....
#३७० व ३५ब या मुद्द्याला विनोदाची वारी दाखवत... राम मंदिरा विषयी म्हणायचे तारीख नहीं बताएंगे...आणि आम्ही ?.....