ह्यात पॉलिसी घेणाऱ्याकडून थोडे पैसे (प्रीमियम)घेतले जातात आणि काही अघटीत झाल्यास(पॉलिसीत नोंदल्याप्रमाणे उदा. अपघात ,मृत्यू ,आजारपण इ इ)पॉलिसी असणाऱ्याला भरलेल्या प्रीमियमच्या काही पट रक्कम दिली जाते..त्या रकमेला म्हणतात - Sum assured .
आता प्रश्न असा पडतो की इन्शुरन्स कंपनी इतके पटीने पैसे आणते तरी कुठून..??
ह्यासाठी इन्शुरन्स कंपन्या २ गोष्टी करतात - १.मागच्या वर्षी समजा १०० लोकांनी पॉलिसी घेतली आणि त्यातले १० लोकांनी क्लेम केला तर ह्या बाकीच्या ९० लोकांच्या प्रीमियममधून क्लेम केलेल्या लोकांना रक्कम दिली जाते
२.पण 👆 असे बहुतेक वेळा होत नाही..कारण..पॉलिसी घेणाऱ्याचा क्लेम हा बहुतेकदा अनेक वर्षांनी येतो..ह्याने होते हे की
अ) त्याने अनेक वर्ष प्रीमियम भरलेले असते व येवढ्या वर्षात कंपनीने ते पैसे स्टॉक मार्केट इ ठिकाणी गुंतवून वाढविलेले असतात.
ब) महागाई मुळे पैशाची
किमत कमी झालेली असते. (उदा. १९९० च्या पॉलिसी ला २० लाख भेटणार असे सांगतात पण क्लेम जर २०२२ मध्ये गेला तर आताच्या २० लाखाची किंमत तेव्हा सांगितल्या पेक्षा नक्कीच कमी असते)
क) येवढ्या वर्षात पॉलिसी घेणाऱ्या लोकांची संख्या आणि त्यांना लागणारे प्रीमियम दोन्हीही वाढल्याने कंपनीला
बहुतेक वेळा मोठ्या कंपनीला आधीच्या प्रीमियम ने केलेली गुंतवणूक न विकता ही कित्येक क्लेम चे पैसे देता येतात..!
आणि ह्या वर्षानुवर्ष चालत असलेल्या गुंतवणूक केलेल्या रकमेला(भावी नफा) म्हणतात 'embedded value / EV '..!
LIC ची अशी ev (गुंतवणूक) आहे ~५.४ लाख कोटी आणि ह्यातील ~२५% ही
स्टॉक मार्केटमध्ये गुंतवली आहे..! म्हणजे आपण स्टॉक सुरक्षित नाही असे म्हणून जी रक्कम इन्शुरन्स कंपनीला देतो त्यातील मोठा भाग हा स्टॉक मध्येच गुंतवला जातो..!😬😁
असो..
थोडक्यात काय तर कंपनी जेवढी मोठी तेवढा त्या इन्शुरन्स कंपनीला फायदा जास्त होतो..आणि LIC ही भारतातील सर्वात मोठी
कंपनी आहे..! भारतातील ६४% इन्शुरन्स हे LIC मार्फत घेतले जातात..! २ नं ची कंपनी आहे ती फक्त ८% पॉलिसी देते..ह्यावरून LIC किती प्रचंड आहे याचा अंदाज येऊ शकतो..! ह्यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की ९०च्या दशकातील आर्थिक उदारीकरण होईपर्यंत LIC ही १००% पॉलिसी द्यायची पण त्यानंतर
आजच्या घडीला हा हिस्सा ६४% वर आलेला आहे..अजूनही LIC खूपच पुढे असली तरी LIC हळू हळू मागे पडत चालली आहे..२०१६ ते २०२० ह्या काळातही LIC चा हिस्सा ~७२% वरून ६४% टक्क्यांवर आलेला आहे..! ह्याची कारणे बरीच आहेत..! पण ह्याचे सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे LIC चे एजंट आणि LIC ची पॉलिसी तयार
करायची पद्धत..!
कसे ते बघा..
LIC कडे १३ लाखांहून जास्त एजंट आहेत..आणि ह्या एजंटनी खरे तर LIC ला घराघरात पोहोचले आहे..आणि ह्या साठी LIC त्यांना कमिशन देते..पण..जेव्हा पॉलिसी renew/ नूतनीकरण करायची वेळ येते तेव्हा..जिथे खाजगी कंपन्यांना ९०% प्रीमियम ऑनलाईन मिळते..तिथे हेच प्रमाण
LIC साठी फक्त ३६% आहे..थोडक्यात काय तर LIC ने डिजिटल होण्यावर फारसा भर दिलेला नसल्याने..तिचा खर्च जास्त होतोय..आणि त्यामुळे नफा मात्र कमी होतोय..! एजंट बाबत अजून एक गोष्ट म्हणजे आज काल बरेचसे LIC चे एजंट हे फक्त LIC चे एजंट राहिले नाहीयेत..विशेषतः जुने आणि मोठे एजंट हल्ली सर्व
इन्शुरन्स कंपन्याचे पॉलिसी विकतात आणि अगदी SIP सारखे म्युचुअल फंड इ गोष्टीही विकत आहेत..! अशीच गोष्ट LIC च्या पॉलिसी मध्येही दिसते..LIC ही मुख्यत्वे ६० वर्षांनंतर इतके इतके पैसे इतके इतके वर्ष/मरेपर्यंत मिळणार ह्या प्रकारच्या जास्त प्रीमियमच्या पॉलिसी विकते..आणि LIC आणि ग्राहक
ह्या दोघांच्या फायद्याच्या आणि कमी प्रीमियमच्या Pure /निव्वळ टर्म इन्शुरन्स पॉलिसी फार कमी विकते..तुम्हीही कोणत्या एजंट कडे गेल्यास तुम्हाला २०-२५ लाखाच्या पॉलिसी साठी ३-४००० प्रीमियम ची पॉलिसी सांगण्यापेक्षा २०-३०००० प्रीमियमची पॉलिसी सांगितली जाते हे पहिले असेल..! ह्याने होते
काय तर सगळ्या प्रणालीला कमिशन जास्त भेटते..पण ह्यात LIC ला जास्त फायदा होत नाही..! तर ह्या अशा ग्राहक आणि LIC दोघांच्या नफ्याच्या पॉलिसी ची संख्या वाढवणे LIC च्या शेअर ची किंमत वाढण्यास कारणीभूत राहील.
सारांश - सर्वोत्तम इन्शुरन्स कंपनी होण्यासाठी लागणाऱ्या
- लोकांच्या मनातील विश्वास
- गावा गावातील प्रत्येक घरात पोहोचण्याची क्षमता आणि
- ४० लाख कोटी ₹ एवढी प्रचंड प्रचंड गंगाजळी(AUM)
ह्या सर्व गोष्टी असताना
-LIC एजंटची बदलती निष्ठा व LIC ची एजंट बाबतची न बदलणारी निष्ठा आणि
- सरकारचा स्वतः ची लाज वाचविण्यासाठी LIC चा केला जाऊ शकणारा वापर (उदा.IDBI बँक ला विकत घ्यायला लावणे)
अशा मोठ्या अडचणी देखील LIC च्या समोर आहेत..अशा वेळेस काळानुरूप LIC मध्ये बदल (डिजिटल आणि टर्म इन्शुरन्स इ) झाल्यास लाँग टर्म(>१५वर्ष) साठी LIC ही उत्तम गुंतवणूक ठरू शकते..! #म
टीप - LIC IPO मार्फत सरकार सध्या फक्त ५% हिस्सा विकत आहे..पण सेबी च्या नियमानुसार IPO नंतर च्या ३ वर्षात सरकारला अजून २०% शेअर विकणे बंधनकारक आहे..! म्हणजे जेव्हा पण किंमत खूप जास्त वाढणार..तेव्हा सरकार येऊन शेअर विकणार असे होण्याची शक्यता आहे..!😬
टीप- इतिहास हे सांगतो की सरकारी कंपन्यांना उत्तम सेवा देता येत नसल्याने लोक खाजगी कंपन्यांकडे वळतात..! जियो आणि एअरटेल चा त्रास होत असूनही लोक BSNL कडे जाण्यास अजूनही फार धजावत नाहीयेत..! सरकारी बँका आणि त्यांचा त्रास तर वेगळा सांगायला नको..! तर एकेकाळी ह्या BSNL आणि सरकारी बँका
ह्यांनी पण असेच प्रचंड मोठे मार्केट काबीज केलेले होते..लोकांचा विश्वासही होताच तरीही आजची ही परिस्थिती आपल्या समोर आहे..! पण..तेव्हाही आणि आजही LIC ही सर्वोत्तम सरकारी कंपनी होती व आहे..पण ती तशी राहू शकेल का ? जगातील सर्वोत्तम इन्शुरन्स कंपनी बनू शकेल का ? तुम्हाला काय वाटते ? ?
तुमचा टर्म इन्शुरन्स अजून नसेल तर त्या साठीचा धागा 👇
नामिबिया , पाकिस्तान आणि शाहू ,फुले ,आंबेडकरांचा भारत
२०२१ च्या क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये नामिबियाची टीम 👇 होती..आता नामिबिया हा आफ्रिकेतील एक देश आहे आणि आफ्रिकेत तर बहुतांशी कृष्णवर्णीय राहतात असे असूनही त्यांची टीम ही अशी का दिसत असावी हा प्रश्न मला पडला..जरा शोधल्यावर मला १/n
कळले की नामिबियात फक्त ६% लोकसंख्या ही श्वेतवर्णीय आहे..आणि ते देशातील ७०% जमीन आणि उद्योगांचे मालक आहेत..! साहजिकच ज्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होतात त्यांनाच खेळ किंवा मनोरंजन ह्यासारख्या गोष्टींसाठी वेळ भेटतो..! बरं..हे नामिबियासारख्या एखाद्या आफ्रिकेतील देशाचे नाहीये..तर २/n
हे अगदी आपला शेजारी पाकिस्तानातही आहे..पाकिस्तानची बहुतांशी जमीन आणि सर्वच मोठे उद्योग तसेच राजकीय/सरकारी पदे ही त्या देशातील फक्त १००००कुटुंबांच्या ताब्यात आहेत..आणि विशेष म्हणजे तिथे दुहेरी नागरिकत्व चालते..म्हणजे सगळा देश ओरबाडून अंगाशी आले की दुसऱ्या देशात पळायला मोकळे..!३/n
क्रूड ऑईलच्या किमतींचा हा 👇आलेख बघा..ह्यात दिसेल की २००८ तसेच २०११-१४ ह्या काळात क्रूडच्या सध्याच्या किमतीपेक्षा जास्त होत्या व तरीही तेव्हा पेट्रोलच्या किमती आतापेक्षा(कर कमी)किमान ३०-४०₹ नी कमी होत्या..!
आता पेट्रोलच्या किमती वाढल्या की महागाई वाढते हे जरी सर्वांना माहीत असले तरी त्याने गरिबी सुद्धा वाढते हे लक्षात घेतले पाहिजे.ते कसे हे बघू
Disposable Income म्हणजे आपल्या एकूण उत्पन्नातील ते पैसे जे आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या मूलभूत गरजा (अन्न,वस्त्र,निवारा,शिक्षण,आरोग्य)
पुरवल्यानंतर आपल्याकडे उरतात.
जिथे गरीब माणसाची सर्व कमाई ही मूलभूत गरजा पुरवण्यात जाते तिथे श्रीमंत/मध्यम त्याच्या कमाईचा छोटा हिस्सा अशा मूलभूत गोष्टींवर खर्च करतो.
म्हणून पेट्रोलच्या किमती पर्यायाने महागाई वाढल्याने जेव्हा मध्यम वर्ग किंवा श्रीमंत वर्गाच्या राहणीमानात फारसा
का घ्यावा ?
कोणी घ्यावा ?
किती घ्यावा ?
कधी घ्यावा ?
कोणाकडून घ्यावा ?
कोणता घ्यावा ?
टर्म इन्शुरन्स चा धागा वाचायला सुरुवात करण्यापूर्वी 👇 ह्या poll मध्ये नक्की सहभागी व्हा..!
आपण ह्यापैकी कोणत्या इन्शुरन्स/विमा याचे पैसे एकदा तरी भरले आहेत?
का घ्यावा ?
Insurance/इन्शुरन्स हा शब्द मूळ ensure ह्या शब्दापासून आलाय ज्याचा अर्थ होतो खात्री देणे / शब्द देणे.
म्हणजेच जेव्हा आपण कशाचाही इन्शुरन्स/विमा घेतो तेव्हा ती कंपनी आपल्याला शब्द देत असते की कराराप्रमाणे विमा घेतलेल्या गोष्टीला जर काही झाले तर जबाबदारी आमची..! #म
थोडक्यात काय तर आपण आपली मोठी जबाबदारी (आणि त्या जबाबदारी सोबत येणारा धोका/ risk) थोडे पैसे देऊन त्या कंपनीवर टाकत असतो.
म्हणजेच आपण गाडीचा insurance घेतला आणि गाडीला काही झाले तर कराराप्रमाणे त्या गाडीचा खर्चाची जबाबदारी त्या कंपनीची..!
अशी कमान तेव्हाही अस्तित्वात नव्हती आणि आताही नाही..कमीत कमी आणीबाणीच्या काळात अशी एखादी कमान अस्तिवात यायला हवी..! अशी कमान अस्तित्वात असती तर कदाचित ताज हॉटेल पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या नौदलाच्या तळा वरून Marocs कमांडो NSG च्या आधी पोचले असते..किंवा NSG ला RAW च्या
विमानांची वाट पाहत न बसता त्या विमानतळावर जे विमान आहे त्या विमानाला/हेलिकप्टरला आदेश देऊन NSG काही बहुमोल तास ( ज्या तासांची किंमत आपल्याला आपल्या लोकांच्या प्रणांनी मोजावी लागली) वाचवू शकली असती..ह्या आणि अशा अनेक गोष्टी..पुण्याचे दक्षिण कमानचे कमांडो किंवा नगरच्या सेनेच्या
प्रश्न जरी साधा असला तरी त्याचे उत्तर प्रत्येकासाठी वेगळे असणार आहे..तरी मी साधारण idea देण्याचा व एखादी गोष्ट का करावी हे सांगण्याचा प्रयत्न करेन ज्याने निर्णय घेणे सोपे होईल.
"MF investments are subject to market risk, read the offer document carefully before investing" हे खूप महत्त्वाचे वाक्य आपण #mutualfund च्या जाहिरातीत खूपदा ऐकले असेल.
पण ह्याचा अर्थ असा असतो की मार्केट मधून मिळणारा परताव्याची गॅरंटी नाहीये.तो दिवसागणिक बदलू शकतो.
आज मार्केट मध्ये असणाऱ्या १ लाखाची किंमत उद्या मार्केट पडले तर ५०हजार किंवा वाढले तर २ लाखही होईल.सतत होणारा चढउतार हा मार्केटचा पहिला आणि शेवटचा नियम आहे.
म्हणूनच आपल्याला कधीही लागू शकतो असा पैसा मार्केट मध्ये टाकणे तोटा होण्याच्या दृष्टीने धोक्याचे ठरते. हा धोका कमी करण्यासाठी