'भारतीय शास्त्रीय संगीतातील स्त्रिया'
थ्रेड पहिला.

सुरश्री गानसम्राज्ञी वंदनीय 'केसरबाई केरकर'

#SeriesOfThreads
#शास्त्रीय_संगीत
#DoyensOfClassicalMusic
#म #मराठी @MarathiRT @ashish_jadhao
हा काळ सुमारे दीडशे वर्षांपूर्वीचा. भारतीय शास्त्रीय संगीत हा मुख्यत्वाने पुरुषांचा प्रांत समजला जाई. भलेभले पुरुष गायक आपल्या प्रतिभेने राज/लोकमान्यता मिळवत होते. सुरसम्राट अल्लादिया खाँ, फैय्याझ खाँ, अब्दुल करीम खाँ, सवाई गंधर्व, बालगंधर्व हे त्यांत आघाडीवर होते.
हा तो काळ आहे, जेव्हा फुले दाम्पत्याने 1848साली नुकतीच मुलींसाठीची शाळा सुरू केली होती. तरीही या काळात मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी एत्तदेशीय पितृसत्ता किती झटत होती हे आपण जाणतो. मग पुरुषसत्ताक कलेच्या प्रांतात बायकांनी कला शिकायला जाणं हा फारच मोठा विद्रोह झाला असता.
'बाईने गाणं करावं आणि नाचावं, ते फक्त पुरुषांना रिझवण्यासाठी' - अशी गलिच्छ विचारसरणी ठेवणारी पितृसत्ता तर शास्त्रीय संगीत वगैरे शिकवणं या भानगडीत अजिबात पडली नसती. गाणं ही पुरुषांसाठी परफॉरमिंग आर्ट आणि स्त्रियांसाठी बदफैलीपणा असं समजलं गेलेलं होतं.
स्त्रीशिक्षणासाठी झटणाऱ्यांना शेणाचे गोळे मारणाऱ्या भटशाहीने तर शास्त्रीय संगीत शिकू इच्छिणाऱ्या बायकांच्या चारित्र्यावरही शेण फेकलं असतं!

त्या काळात 1892 मध्ये गोव्यातील केरी या छोट्याशा गावी जन्म झाला, केसरबाई केरकर या मुलीचा. ही मुलगी वयाच्या आठव्या वर्षी मिरजेत आली.
लहानपणी मिरजेत केसरबाई छोट्या मुलांसाठीच्या नाट्य स्पर्धांमध्ये त्या श्रीकृष्णाची भूमिका करत आणि वाहवा मिळवत. त्यांचं ते बालनाटक बघण्यासाठी परगावाहूनही लोक येत असत, असं सांगितलं जातं. पण केसरबाईंना खरी ओढ होती, ती गायनाची.
पुढे अनेक ठिकाणी स्थलांतर करत अब्दुल करीम खाँ, रामकृष्णबुवा वझे, भास्करबुवा बखले यांकडे शिकत शिकत एके दिवशी कोल्हापुर संस्थानाच्या His Highness छत्रपती शाहू (IV) यांचे राजगायक उस्ताद अल्लादिया खाँ यांच्या गाण्याने त्या मंत्रमुग्ध झाल्या. अल्लादिया खाँसाहेबांचं शिष्यत्व पत्करलं.
उस्ताद अल्लादिया खाँ हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एक युगपुरुष होते. त्यांच्याकडून केसरबाई यांनी अतिशय कठीण समजली गेलेली गानविद्या घेतली. पुरुषांच्या फुफ्फुसांचा भाता मोठा असल्याने त्यांच्यासारखं गाणं स्त्रियांनी सादर करणं शक्यच नाही, हा गैरसमज केसरबाईंनी फोल ठरवला.
केसरबाई एकाच श्वासात विलंबित तीन तालाचं संपूर्ण चक्र पूर्ण करू शकायच्या! अतिशय शिस्तशीर रियाझ आणि कठोर परिश्रमच्या जोरावर स्वर/व्यंजनांच्या निर्दोष उच्चारांद्वारा सांगीतिक मांडणीत त्यांनी प्राविण्य मिळवलं. 'आकार' हे त्यांच्या गायकीचं मुख्य वैशिष्ट्य.
आलाप ते बारहात पासून थेट ताने पर्यंत स्वरांची रांगोळी काढत जाणे व मूळ बंदीशीचं सौंदर्य अधिकाधिक फुलवणे हा तर केसारबाईंचा यूएसपी. जयपूर घराण्याचं वैशिष्ट्य असलेल्या पल्लेदार तानांमधून केसरबाईंनी गायकीचं असं शिल्प निर्माण केलं की त्यापुढे आजही श्रोते अवाक आणि नतमस्तक होतात.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे सुद्धा अनेकदा केसरबाईंच्या मैफिलींना हजेरी लावत. संयुक्त महाराष्ट्र हे वेगळं राज्य म्हणून अस्तित्वात आलं, तेव्हा यशवंतराव चव्हाण यांनी पदभार स्वीकार सोहळ्यात केसरबाईंना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रण दिलं होतं.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा सन्मान मिळाल्याने अतिशय खुश झालेल्या यशवंतराव चव्हाण यांनी केसरबाईंच्या मैफिलीनंतर त्यांना अतिशय उत्साहात म्हणतात -'तुम्ही आज हवं ते मागा, मी आज तुम्हाला बिदागी म्हणून अक्षरशः काहीही देऊन टाकीन!'
त्यावर केसरबाई उतरल्या : मला एका दिवसासाठी मुख्यमंत्री बनवा!

या उत्तराने यशवंतराव अचंबित झाले आणि त्यांनी केसरबाईंना - तुम्ही मुख्यमंत्री बनणार तर गाणं कोण गाणार? तुम्ही मला कोणतंही मागणं मागा; मी ते मुख्यमंत्री म्हणून पूर्ण करतो! - असं आश्वासन दिलं.
त्यावर केसरबाई म्हणतात - "राजकारण्यांनी कलाकारांना न झेपणारी आश्वासने देऊ नये!"

केसरबाई केरकर कोणाहीपुढे झुकल्या नाही; त्या नतमस्तक झाल्या होत्या फक्त कलेशी. कलेलाच आपलं आयुष्य अर्पण करणाऱ्या केसरबाईंच्या आवाजात इतकी जरब होती, की एकही श्रोता त्यांच्यासमोर चुळबुळ करू शकायचा नाही.
मित्रांनो, साक्षात गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर हे केसारबाईंच्या गायनाचे चाहते होते. केसरबाईंचा दरारा स्वातंत्र्यपूर्व काळात संस्थानांत तर होताच, पण स्वातंत्र्योत्तर काळातही राजकारण्यांत होता. केसरबाईंना पद्मभूषण सन्मान मिळाला तेव्हा दिल्लीत इंदिरा गांधी आणि केसारबाईंनी भेट झाली.
तेव्हा केसरबाईंच्या फॅन असणाऱ्या इंदिरा गांधींजी तर त्यांच्या गळ्याला स्पर्श करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर मार्मिकपणे केसरबाई इंदिरा गांधींना म्हणतात - अहो, इंदिराजी! तुम्ही राजकारणी लोक रात्रंदिवस आरडाओरडा करत असतात. मग आमच्या गळ्याला कसला हात लावता ?
पण इथं एक लक्षात घ्या. केसरबाईंचा हा दरारा फक्त आणि फक्त एकाच कारणामुळे. ते म्हणजे- त्यांच्या कलेशी असलेल्या प्रामाणिकपणामुळे आणि कलेसाठी आयुष्य अर्पण केल्यामुळे. पुल देशपांडे केसरबाईंविषयी अतिशय विनम्रपणे कोणत्या शब्दांत व्यक्त होतात, हे वाचण्यासारखं आहे!
संगीत नाटक अकादमीची फेलोशिप/अवार्ड स्वीकारताना केसरबाई.
आज गोव्याची कला अकादमी केसरबाईंच्या नावाने संगीत संमेलन भरवते. अभिजात शास्त्रीय संगीत सर्वांना उपलब्ध व्हावं, यासाठी गोव्यात केसरबाईंनी शाळा सुद्धा सुरु केलेली आहे. @bbcnewsmarathi ने यावर अतिशय उत्तम बातमी केली होती.

केसरबाईंचा आवाज अंतराळातील व्होएजर यानात कसा पोहचला आहे, यासंदर्भात आधीही मी एकदा एक थ्रेड ट्विट केलेला आहे. जरूर वाचा.
👇

तर अशा ज्ञानतपस्विनी सुरश्री केसरबाई केरकर या आहेत माझ्या थ्रेएड्समधल्या पहिल्या आद्य शास्त्रीय संगीत गायिका. अजूनही बऱ्याच गायिकांवर थ्रेएड्स लिहीन म्हणतो. वाचून जरूर अभिप्राय कळवा.
Thanks ❤️
संदर्भ:
1) मैत्र : पु ल देशपांडे
2) Master on Masters : Ustaad Amjad Ali Khan
3) सुरश्री : बाबुराव केरकर

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Bhushan Eshwar

Bhushan Eshwar Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Bhushan_Eshwar

Apr 27
ज्या जिग्नेश मेवाणी यांना मोदी सरकारच्या विरोधात एक ट्विट बद्दल अटक करून नेण्यात आलेलं होतं, त्यांना म्हातारे आईवडील आहेत.

ज्या रिया चक्रवर्तीचं मिडीया ट्रायल चालवून मुख्य मुद्द्यांपासून भरकटवण्याचा प्रयत्न केला गेला, तिला सुद्धा म्हातारे आईवडील आहेत.
👇
फर्जी टूलकिट प्रकरणात बंदी बनवलं गेलेल्या दिशा रवी या हवामानबदल संदर्भातील कार्यकर्तीला सुद्धा आईवडील होते.

जामिया मिलिया इस्लामिया मधील विद्यार्थी असलेल्या सफुरा झरगर या सीएए कायद्याविरोधात प्रोटेस्ट करत असताना पकडून डांबण्यात आलं, त्यावेळी सफुरा झरगर गरोदर होत्या.
👇
पिंजरा तोड आंदोलनाच्या कार्यकर्त्या व जेएनयू च्या विद्यार्थिनी नताशा नरवाल यांनाही दिल्लीतील फेब्रुवारी 2020 साली झालेल्या दंगलीबद्दल केवळ संशयावरून युएपीए लावून जेव्हा जवळपास वर्षभर तुरुंगात डांबलं गेलं, तेव्हा तुरूंगाबाहेरचे त्यांचे वडील महावीर नरवाल कोव्हीड होऊन वारले.
👇
Read 10 tweets
Apr 22
ब्राह्मणी विचारसरणी कलेच्या क्षेत्रात सर्वात जास्त घुसलेली आहे. शास्त्रीय गायनाच्या क्षेत्रात तर खूप जास्त. कुमार गंधर्व आणि वसंतराव देशपांडे सोडले, तर सगळेच शास्त्रीय गायक भटशाहीचे सुप्त पाईक झालेले असल्याचे पुरावे सांगता येऊ शकतात.
👇
कुमार तर चारचौघात मी फक्त गाण्यालाच धर्म मानतो, असं सांगायचे! माझं घराणं माझ्यापासून सुरु होतं म्हणताना गाणं हाच धर्म असणारे वसंतराव त्या काळात तथाकथितांच्या टीकेचा विषय झाले होते. दोघांनी शास्त्रीय गाण्यात विद्रोह केला. रागांना नव्या पद्धतीने मांडलं आणि लोकप्रिय केलं.
👇
परंपरेलाच गुरु मानणाऱ्यांनी कुमार आणि वसंतरावांना नेहमीच कमी लेखलं. नव्याने विचार मांडणाऱ्यांना कमी लेखून त्यांच्या टॅलेंटला अनुल्लेखाने मारणं ही ब्राह्मणशाही नाही तर काय आहे? जे नवं गाणं कुमार ने किंवा वसंतरावांनी आणलं, तसा विद्रोह करायला कोण आज धजावत आहे?
Read 22 tweets
Feb 19
शिवरायांच्या जयंती निमित्त काही मुद्दे:

1) शिवजयंतीची सुरुवात जोतीराव फुल्यांनी केली. त्यांनी रायगडावरील शिवरायांची समाधी शोधून काढली, स्वच्छ केली, तिच्यासमोर नतमस्तक झाले. त्यांनी शिवरायांना वाहिलेली काव्यसुमनांजली म्हणजे रचलेला आठ कडव्यांचा दीर्घ पोवाडा खूपच महत्वाचा आहे.
👇
2) बीएम पुरंदरे नामक RSSवादी माणसाच्या ब्राह्मणी विचारधारेच्या नादी लागून काही लोक शिवरायांना गोब्राह्मणप्रतिपालक असे संबोधतात. वास्तविक, राजे शिवाजी शहाजी भोसले हे कुळवाडीभूषण क्षत्रियकुलवतसं श्रीराजा शिवछत्रपती होते, आणि म्हणूनच ते बहुजनांमध्ये कायमस्वरूपी वंदनीय ठरले आहेत.
👇
3) बीएम पुरंदरे या RSSवादी माणसाच्या ब्राह्मणी विचारधारेत स्वतःची बुद्धी गहाण टाकून काहीजण शिवराय मुस्लिमद्वेष्टे होते, ही समजूत करून बसलेले असतात. त्यांनी असा विचार करून पाहावा-शिवरायांच्या मावळ्यांमध्ये मदारी म्हेतर, इब्राहिमखान, दौलतखान, काजी हैदर, सिद्दी हिलाल हे कोण होते?
👇
Read 7 tweets
Jan 4
मॅडम, आपल्या कमेंट मध्ये भरपूर असंबद्धता आहे, पण ठिके. पं कुमार गंधर्व यांच्याविषयीच्या तीन facts द्वारे आपला अर्धवटपणा दूर करण्याचा प्रयत्न करतो.
👇
१) ८ ऑगस्ट १९४२ रोजी गोवलिया टॅंक-मुंबई इथल्या सभेत महात्मा गांधींनी भारत छोडो हे भाषण दिले होते. त्या सभेत कुमार गंधर्व यांनी भजन गायले होते. पं कुमार गंधर्व हे गांधीवादी विचारांचे होते. म्हणूनच, त्यांनी महात्मा गांधी यांना आदरांजली म्हणून गांधी-मल्हार नावाचा राग निर्माण केला
👇
अतिशय सुश्राव्य असा हा राग आपण 👇इथे ऐकू शकता.

👇
Read 11 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(