उर्जा साक्षर होणं ही काळाची गरज आहे. एकविसावं शतकं हे विज्ञान-तंत्रज्ञान तसेच चौथ्या औद्योगिक क्रांतीचे आहे.
सोलार, विंडएनर्जी, बायोएनर्जी, इलेक्ट्रिक गाड्या हे शब्द जरी आज रोजचे झाले असले तरी जैविक इंधने- डिझेल,पेट्रोल, कोळसा, सीएनजी, एलपीजी #उर्जासाक्षरता#SaturdayThread
१/१२
रोजच्या वापरातले प्लॅस्टिक, सौंदर्यप्रसाधने, डांबर, औद्योगिक वापरासाठीचे फरनेस ॲाईल, लाईट डिझेल ॲाईल तसेच आपल्या आजूबाजूच्या शेकडो गरजेच्या वस्तूंसाठी हे जैविक इंधन क्रूड ॲाईलच्या स्वरुपात वापरले जाते.
आपण कल्पनाही करू शकत नाही इतके मोठे हे उर्जा विश्व आहे. बरं ते आपल्या
२/१२
अगदी बेसिक गोष्टींसाठी वापरले जाते तरीही आपण फक्त डिझेल, पेट्रोल, एलपीजी आणि हल्ली सीएनजी भाववाढ इथपर्यंतच सिमित ठेवतो.
खर तर क्रुड ॲाईल, त्यावरील प्रोसेस आणि त्यातून आपण काढत असलेली उत्पादने ही मानवाला गेल्या दिड-दोन शतकात मिळालेले वरदान आहे. आज कितीही आपण ग्रीन हायड्रोजन
३/१२
कार्बन न्युट्रल इकॉनॉमी, इथोनॉल , बायोसीएनजी किंवा बायोडिझेल याचा जप केला तरी पुढील पन्नास वर्षे आपल्या देशाला तरी कोळसा तसेच इतर जैविक इंधनांशिवाय पर्याय नाही. या इंधनाच्या योग्य वापराशिवाय आपल्या देशाची आर्थिक, औद्योगिक पर्यायाने सामाजिक प्रगती केवळ अशक्य आहे.
अगदी खरे
४/१२
बोलायचे तर पवनचक्क्यांची निर्मिती असो, सोलार पॅनेलची निर्मीती असो, इथेनॅाल असो, या प्रत्येकाच्या निर्मातीसाठीही प्रचंड प्रमाणात जैविक इंधनच लागते.
उदाहरणादाखल पवन उर्जा निर्मितीचे संच घ्या. खर तर आपण पवन उर्जेला स्वच्छ उर्जा निर्मितीचा स्त्रोत मानतो परंतू यासाठी ज्या
५/१२
पवनचक्क्या बनवल्या जातात त्यासाठी प्रचंड प्रमाणात इंधन वापरले जाते.
सहसा या पवनचक्क्या डोंगराळ भागात उभारल्या जातात, जिथे रस्ते, वीज, पाणी काहीही नसते. तिथे रस्ते बनवायला डिझेलच्या गाड्या असतात. पवनचक्क्यांचा पाया (जो अत्यंत महत्वाचा भाग असतो) तो खोदण्यासाठी तसेच त्या
६/१२
पवनचक्क्या तिथपर्यंत वाहून नेण्यासाठी,पुढे त्या खोदलेल्या पायात शेकडो टन लोखंड घातले जाते. हे लोखंड बनवण्यासाठीही फरनेस ॲाईल हे इंधन वापरले जाते. (फक्त लोखंड बनविण्यासाठी जगाच्या एकून वापराच्या ७% एवढ्या मोठ्या प्रमाणात इंधन वापरले जाते.)
पुढे त्या पवनचक्क्क्याची फायबरची
७/१२
पाती असो की जनरेटर सेट हे सर्व बनविण्यासाठी जैविक इंधनांचाच वापर होतो.
मग यात सोलार पॅनेल्स असो की अजून काही. बरं जेव्हा आपण या प्रकारांपासून उर्जा निर्मिती करतो तेंव्हा मजेशीर गोष्ट आपण पहायला हवी ती म्हणजे या वस्तू बनविण्यासाठी (अगदी शून्यापासून) खर्च झालेली एकून उर्जा
८/१२
आणि या स्त्रोत्रांपासून तयार झालेली एकून उर्जा याचे गुणोत्तर!
जर आपण हे पाहिले तर खरे गणित आपल्या लक्षात येईल.
याला पर्याय म्हणून ग्रीन हायड्रोजनकडे पाहिले जाते पण तो पर्याय काही नवा नाही आणि गेली कित्येक दशके यावर काम चालू आहे.जरी याच्या स्वस्त उर्जानिर्मिताचा शोध लागलाच
९/१२
तरी हायड्रोजनचा इंधन म्हणून सर्वाधिक चांगला वापर लोखंड (स्टिल) निर्मितीसाठी प्राधान्याने करायला हवा!
गाड्यांसाठी खर तर इतर अनेक चांगले पर्याय आहेत.
आपल्यातील प्रत्येक जण दिवसभरात या ना त्या कारणाने प्रचंड उर्जेचा वापर करतो, खर तर तो अतिप्रचंड वाढायला हवा. आपण
१०/१२
जर प्रगत देश पाहिले तर त्यांच्या वापर हा आपल्या कित्येक पटीत आहे फक्त तो जास्तीत जास्त कार्यक्षम असावा.
कृषी, औद्योगिक विकास, रस्ते, वीजनिर्मीती, पायाभूत सुविधा अगदी सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपल्याला विविध माध्यमातून ही उर्जा लागतेच.
आणि सध्या तरी जगाच्या उर्जेचा
११/१२
महत्वाचा सोर्स हा क्रूड ॲाईलच आहे.
आपल्याला प्रगती करायची असेल,जगाच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर हा विषय समजून घ्यावा लागेल.
येणाऱ्या काळात एकंदर वर्तमानातील “उर्जा” क्षेत्र तसेच भविष्यातील आव्हानं, संधी याबद्दल जाणून घेवू.
महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपुर्ण भारतात तापमानाचा पारा अंगाची लाही लाही करतोय.
पुर्वी या दिवसात विदर्भात जायचे म्हटले तरी एसीमधेही दरदरून घाम फुटायचा पण समस्त मानवजातीची पृथ्वीवर कृपा झाली व ग्लोबल वॉर्मिंगमुळे अखंड विश्वाचेच चंद्रपुर व्हायला सूरूवात झालीये.
ग्लोबल वॉर्मिंग हा आजचा मुद्दा नाही तो खरं तर आपल्या प्रत्येक श्वासासोबतचा मुद्दा आहे त्यावर पुन्हा कधीतरी.
आजचा विषय म्हणजे यावर्षी आपल्या आयुष्यात आलेला नवा उन्हाळा.
आपल्याकडे एप्रिल, मे मधे तापमान वाढते आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणात विजेची गरजही वाढते, बरं हे दरवर्षी
२/१०
होणारं ऋतुचक्र काही नवे नाही. वीजेची गरज अचानक किती जास्त वाढू शकते याचे वर्षानूवर्षाचे सरासरी आकडे सरकार दरबारी असतातच.
मागचे दशकानुदशके हे चालू आहे. बरं आपल्याकडे ७५ ते ८०% वाजनिर्मिती ही कोळश्यावरच होते त्यामुळे वीजनिर्मितीसाठी कच्चा माल काय लागणार याबाबत काही संदिग्धता
३/१०
काही महिन्यांपूर्वी अत्यंत अभ्यासपुर्ण मराठी पुस्तक वाचनात आले.
मी अगदी ॲाफीसमधेच थांबून एका बैठकीत संध्याकाळी ७ ते ११.३० वाजेपर्यंत त्याचा फडशा पाडला. पुढचे काही दिवस त्या पुस्तकातील भाग पुन्हा पुन्हा वाचला. त्या लेखकाबद्दल खूप आदर तयार झाला.
काहीही करून त्यांना भेटायचे आणि त्यांना धन्यवाद सांगायचे हे मनोमन ठरवलं.
खरं सांगायच तर मागच्या पाचएक वर्षात माझ्या वाचनात मराठी पुस्तक फार मोजकी येताहेत, आणि त्यात मला नक्कीच सुधारणा करायच्या आहेत. मला ते पुस्तक वाचून अजून काही मराठी पुस्तकं वाचायची प्रेरणाही मिळाली होती.
२/१४
दरम्यान मी त्यांची अजून एक पुस्तक वाचून काढले. लेखकाचा एकंदर आवाका मोठा होताच शिवाय त्यांचे कष्टही त्या लिखाणातून दिसत होते. मी काही जवळच्या मित्रांकडून त्या लेखकाचा नंबर मिळवायचा प्रयत्न करत होतो पण यश मिळत नव्हते.
असेच काही दिवस गेले, मी ही कामात बिझी झालो होतो. एक दिवस
३/१४
आमची काही पुर्वी ओळख नव्हती, मी जिथे नोकरी करायचो त्याच बिल्डिंगमधे तो ही एका कंपनीत काम करायचा. आमची दोघांचीही सकाळी जायची एकच वेळ होती त्यामुळे येताजाता दिसायचा.
मुंबईत येऊन मला एक महिनापण झाला नव्हता. लोकल ट्रेनची मला प्रचंड भीती वाटायची, पहिल्यांदा ट्राय करायला गेलो
👇
आणि जाम चेंबलो गेलो, अगदी भूगा झाला त्यामुळे रोज बसने कांदिवली ते अंधेरी प्रवास करायचो.
एक दिवस सकाळी सकाळी नेहमीप्रमाणे बसमधे शिरलो आणि अचानक युवराज पण त्या बसमधे मला दिसला. मी पटकन त्याच्या बाजूच्या सीटवर बसलो. त्यानेही मला लगेच ओळखले. बस सूरू झाली तसा दोघांनीही एकाच वेळी
👇
प्राथमिक शाळेत असताना वडिलांनी सांगितलेलं एक वाक्य डोक्यात फिट्ट झालंय - “जनावरात आणि माणसात एक फरक फार महत्वाचा आहे, माणसाला वाचन करण्याची सर्वोच्च शक्ती लाभलीये… जो तीचा वापर करेल, ज्ञान मिळवेल, शहाणा होईल, सतत वाचत राहील आणि मिळालेल्या ज्ञानाचा वापर करेल तो पुढे जाईल.
१/९
आपल्या सारख्या सर्वसामान्य माणसांना प्रगतीचा याहून सोपा मार्ग दुसरा कोणताच नाही….शाळेत शिकून, वाचायला येत असून जर वाचत नसाल तर म्हसरात, कुत्र्यामांजरात आणि तुमच्यात फरक तो काय?”
आज जी मला एखाद्या विषयातील Clarity आहे ती लहानपणी किंवा पाच-दहा वर्षांपूर्वी नक्कीच नव्हती आणि
२/९
आज जो Confidence आहे तो ही नव्हताच.
पुढील पाच वर्षांनी या दोन्ही बाबतीत मी कदाचित अजून समृद्ध होईन..... बरेच दोष, चुका समजतील, अजून सुधारणा होतील पण पुर्ण Clarity आणि Confidence येईपर्यंत मी Pause घेतला असता तर हा आयुष्याचा प्रवास कदाचित अवघड आणि खुप धिम्या गतीने झाला असता.
३/९
नुकसान केलेय, काहींचे तर आयुष्य संपुर्ण बदलून गेलेय.
कोविडपुर्व आणि कोविडनंतरचे जग अशी सरळ काळाची विभागणी आता झालीये.
येणाऱ्या काळात चॅलेंजेस अजून कठीण होत जातील. गुणवत्ता, प्रोडक्टिव्हीटी आणि चांगली एफीशियंसी देणाऱ्या लोकांना आणि कंपन्यांना भविष्य निश्चितच उज्वल असेल.मग
२/१९
आपली तरूण पिढी यासाठी तयार आहे का? ते शहरी भागातले असो, ग्रामिण भागातले असो, या स्पर्धेत टिकायचे असेल तर प्रोफेशनलिझम रक्तात मुरायला हवे.
आपल्याला आर्थिक साक्षरतेबद्दल बऱ्यापैकी जागरूकता निर्माण करण्यात (निदान वर्तमानपत्र/समाजमाध्यमात तरी) थोडफार यश मिळालेय असे मला वाटतेय.
३/१९