जगण्याची एक संधी मिळावी म्हणून त्या काकांनी माझा हात घट्ट पकडून ठेवलेला अजूनही आठवतोय... पण त्यांना ती संधी मिळालीच नाही!
कोविडमुळे ५ लाखांहून अधिक लोक या देशात आपल्या डोळ्यासमोर गेले, प्रत्येकाच्या घरातील, नात्यातील किमान एकजण ...
एका न दिसणाऱ्या विषाणूने मारुन टाकला. त्यावेळी आपल्या मनात काय विचार होते हे प्रत्येकाने स्वतःला एकदा विचारून पाहावे. सगळं पहिल्यापासून सुरुवात करू, पुन्हा उभं राहू... फक्त या आजाराच्या संकटातून बाहेर पडावं, आपल्याला एक संधी मिळावी हाच विचार प्रत्येकाच्या मनात होता ना?
आपल्याला ती संधी मिळालीही... आणि आपण काय करतोय?
जागतिक पातळीवरील रशिया-युक्रेन युद्ध असो की भारतातील दंगली असो... की महाराष्ट्रातील सध्याचं किळसवाणं राजकारण असो... माणूस म्हणून लाज वाटली पाहिजे!
३६५ दिवसांपूर्वी आपल्या नातेवाईकांसाठी बेड उपलब्ध होत नव्हते...
बेड मिळाला तर ऑक्सिजन पुरत नव्हता, ऑक्सिजन मिळायचा तर औषधं नव्हते... आणि कुठेतरी हे सगळं मिळायचं तर व्हेंटिलेटर नसायचे! स्वतःच्या गळ्याभोवती बोटं गच्च पकडून, घोगऱ्या आवाजात... "डॉक्टर वाचवा... जीव घाबरलाय" म्हणत तरणीताठी पोरं जीव सोडताना बघितली आहेत.
खरंतर त्यांचं कर्तव्य होतं, व्यवहारिक भाषेत त्यांना त्याचे पैसे मिळायचे पण तरीही त्यापलीकडे जाऊन सफाई कर्मचाऱ्यांनी आपलं योगदान दिलं, रुग्णांचं हागणं मुतणं साफ केलं, सिस्टर लोकांनी घरी लेकरं बाळं सोडून त्या नरकयातना देणाऱ्या किट घालून अठरा-वीस तास काम केलं, ...
आपल्या जीवाचा विचार न करता असंख्य डॉक्टरांनी उपचार केले. ते सर्व काही आजचा दिवस पाहण्यासाठी नक्कीच नव्हतं...माणूस जगला पाहिजे हीच सर्वांची एकमेव इच्छा होती!
शंभर वर्षांपूर्वी युरोपमध्ये आलेल्या साथीच्या रोगांनी त्यांच्या जगण्याच्या पद्धती बदलल्या.
साफसफाई आली, बंद नाल्या आल्या, खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल आला, वरून 'सॉरी' बोलणं आलं... आपण एवढ्या मोठ्या आजाराच्या लाटेनंतर काय शिकलो? धर्म, जाती, दंगली, झेंडे आणि अजेंडे? शतकातून एखादी अशी आपत्ती येते जी माणसामध्ये परिवर्तन घडवून आणते...
इथे आपण रानटी माणसासारखं एकाच वर्षात काही शतकं मागे गेलोय! आपत्तीच्या काळात जात, भाषा, धर्म, अस्मिता, अजेंडा असलं काहीच नव्हतं... एक माणूस दुसऱ्या माणसाला वाचविण्यासाठी शक्य होईल ते सर्व काही करत होता एवढं सरळ सोपं होतं... एकाच वर्षात सगळं संपलंय!
आपली प्राथमिकता काय आहे हे अजूनही कळू नये यापेक्षा दुर्दैव ते काय? सत्ताधारी असो की विरोधक... यांची पोटं भरलेली आहेत, यांच्या पुढच्या सात पिढ्या बसून खाणार आहेत. भरल्यापोटी त्यांचे खेळ सुरू आहेत! नोकऱ्या, महागाई या गोष्टी तर फार दूरच्या राहिल्या पण...
उद्या जर ही किंवा अशी आपत्ती पुन्हा आली तर आपली तयारी काय आहे हा प्रश्न आज विचारणं गरजेचं असताना आपणच जर अर्थहीन अस्मितेमध्ये आनंदी होत असू तर मग आज ना उद्या आपली लायकी साथीच्या रोगात मरण्याचीच आहे असं म्हणायला काही हरकत नाही.
कसल्या राजकारण आणि धर्मकारणाच्या टिमक्या वाजवता... श्वास पुरत नव्हता म्हणून पायाच्या टाचा घासून गोळामोळा झालेल्या पाचशेहून अधिक बेडशीट अजून नजरेसमोर आहेत...! आपण त्यांच्यापैकी एक नव्हतो, आपल्याला दुसरी संधी मिळाली आहे ही गोष्ट पुढचं आयुष्य समाधानाने जगण्यासाठी पुरेशी आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी, खरे तर सर्वांसाठी!
लघवी केली की लगेच पाणी प्यायला हवे!
नॉक्टुरिया म्हणजे रात्री वारंवार लघवी होणे, हे हृदयाच्या विफलतेचे लक्षण आहे, मूत्राशयाचे नाही.
शिवपुरीचे प्रसिद्ध डॉक्टर डॉ. बन्सल स्पष्ट करतात की, नॉक्टुरिया हे खरेतर हृदय आणि मेंदूच्या रक्तप्रवाहात अडथळा येण्याचे लक्षण आहे. याचा प्रौढ आणि वृद्ध लोकांना सर्वात जास्त त्रास होतो कारण त्यांना लघवी करण्यासाठी रात्री वारंवार उठावे लागते.
झोप मोड होईल वा उठण्याचा कंटाळा, या भीतीने लोक रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिण्यास टाळाटाळ करतात. पाणी प्यायलं तर लघवी करण्यासाठी पुन्हा पुन्हा उठावं लागेल, असं त्यांना वाटतं. त्यांना माहित नाही की झोपण्यापूर्वी किंवा रात्री लघवी केल्यानंतर पाणी न पिणे ...
लोकांच्या मनावर एखादी गोष्ट कशी बिंबवायची याचे एक आधुनिक विज्ञान आहे आणि त्यामधील पीएचडी भाजपने संपादन केली आहे. मोदीजींनी फारसा विकास केला नसूनही, ते 'विकासपुरुष' असल्याची प्रतिमा या मंडळींनी निर्माण केली.
त्याचप्रमाणे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री सकाळी हातपायतोंड धुवून, मग लगेच पैसे खायला बसतात, अशाप्रकारचे समीकरण त्यांनी ठळक केले आहे. हे सरकार महावसुली सरकार आहे, असे भाजपमधील सर्व नेते जप केल्यासारखे म्हणत असतात.
जणू यांच्याबाबत मात्र 'गंगा मेरी माँ का नाम बाप का नाम हिमाला' अशीच स्थिती आहे... मविआ सरकारमधील काहीजण भ्रष्ट आहेतच, पण अवघे मंत्रिमंडळ अहोरात्र नोटा मोजत आहेत, असे कोणी म्हणू लागले, तर नाइलाजाने दुसरी बाजूही दाखवावी लागते.
सुपर मार्केटमध्ये वाइन विकायला ठेवली म्हणून काही प्रत्येक दारू न पिणारा माणूस वाइन प्यायला सुरू करणार नाही. हातभट्टी, देशी, फेनी, व्हिस्की, स्कॉच, रम, जिन, ब्रँडी, व्होडका, टकीला, श्यांपेन वगैरे वेगळ्या प्रकारची दारू पिणारे लोकही इतर सगळ्या दारू सोडून ...
फक्त वाइन प्यायला सुरू करणार नाहीयेत.
वाइन ही आजकाल उच्चभ्रू आणि रईस (जमिनी विकून श्रीमंत झालेल्या अडाणी लोकांना वगळून) लोकांमध्ये इज्जतीने पिली जाणारी गोष्ट आहे. २००० रुपयांची वाइन पिवून कुठल्या रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुराने बायकोला मारहाण केल्याचे माझ्या तरी ऐकिवात नाही.
ख्रिस्ती धर्मात वाइन हे सर्वमान्य आणि दैवी पेय आहे. येशू ख्रिस्ताने एका लग्नात वाइन कमी पडली म्हणून पाण्याला वाइनमध्ये बदलण्याचा चमत्कार केला. आजही जगभरातल्या चर्चमध्ये प्रार्थनासभेत प्रसादासारखी बुचभर वाइन प्यायला दिली जाते.
बराक ओबामांची अकरा मिनिटं आणि मोदींची वीस मिनिटं...
पंतप्रधान मोदींच्या पुलावरील वीस मिनिटाच्या जाममुळं गोदी मीडिया पिसाळला होता. अगदी राष्ट्रपती भवन ते सर्वोच्च न्यायालयही धुंडाळून झाले. २०१० मध्ये जगाचा महासत्तेचे प्रमुख तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा मुंबईत आले होते.
मुंबईच्या झेवियर महाविद्यालयात कृषी प्रदर्शन (USDA-ICAR) करार आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद असा कार्यक्रम होता. कृषी पत्रकार या नात्याने अमेरिकन कॉन्सुलेटने हा कार्यक्रम कव्हर करण्याची संधी मिळाली. बराक ओबामा ताज हॉटेल थांबले होते. माझे कार्यालय फोर्ट विभागात होते.
अमेरिकन सुरक्षा यंत्रणांनी पूर्ण फोर्ट आणि नरिमन पॉईंट विभागाची नाकेबंदी केली होती. सोबतीला मुंबई पोलिसांची यंत्रणा होती.
सेंट झेवियर येथे ओबामा यांच्या भेटीच्या एक दिवस अगोदर अमेरिकन सुरक्षा यंत्रणा आणि मुंबई पोलीस यांच्यात खटका उडाला होता.
शहिद शिवराम हरी राजगुरु ...
काही न माहित असलेल्या गोष्टी ...
पंजाबातील लोकांच्या जागृतीमुळे आपल्याला भगतसिंहांबद्दल त्रोटक तरी माहिती असते. परंतू 'राजगुरु' मराठी असूनही आपल्याला त्यांची माहिती चार वाक्यांपलीकडे सांगता येणार नाही. ही काय दर्जाची उपेक्षा म्हणायची?
मूळचा खेड (राजगुरुनगर) येथील असलेला हा तरुण स्वकर्तृत्वाने काशीस संस्कृतचा पंडित बनला होता. ते इतके निष्णांत होते की, संस्कृतमधून सहज संभाषण करीत असत.
कुस्तीत त्यांचा हात धरणारा कुणीच नव्हता. नेमबाजीत ते शब्दवेधी होते.
एवढेच नव्हे तर उताणे झोपून पाठीमागे असलेले लक्ष्यही ते बाणाने सहज उडवित (कधी प्रयत्न करा मग कळेल ही गोष्ट किती अवघड आहे ते!).
स्वत:स कणखर बनविण्यासाठी रात्रीतून धावत-धावत १५-२० मैलांवरील स्मशानात जात, तेथील विहिरीत पोहत आणि तशीच दौड करीत पुन्हा येऊन झोपत, इतका त्यांचा दम होता.
कोल इंडिया लिमिटेड हि कंपनी भारत सरकारचा उपक्रम म्हणून १९७५ साली सुरु झाली. त्या वर्षी बहुदा इंदिरा गांधी प्रधानमंत्री असाव्यात.
भारतातल्या ८२ टक्के कोळशाचे उत्पादन कोल इंडिया करते. कोल इंडिया मध्ये जवळपास २७२००० कर्मचारी कार्यरत आहेत, पैकी १८००० अधिकारी वर्गाचे आहेत.
२०१० मध्ये कोल इंडियाचा आयपीओ आला ज्याला अपेक्षेपेक्षा १४ पट जास्ती लोकांनी प्रतिसाद दिला. २०११ मध्ये तत्कालीन सरकारने कोल इंडियाला ‘ महारत्न ‘ कंपनीचा दर्जा दिला. या काळात डॉ.मनमोहन सिंग प्रधानमंत्री असावेत बहुदा.
ऑक्टोबर २०१५ मध्ये कोल इंडियाचे बाजारमूल्य २.११ लाख कोटी होते.
जे भारतातल्या मौल्यवान कंपन्यात आठव्या क्रमांकावर होते आणि त्यावेळी कोल इंडियाचे बाजारमूल्य रिलायन्स पेक्षा जास्त होते.
२०१२ मध्ये कोल इंडिया फोर्ब्सच्या ५०० कंपन्याच्या यादीत ३७७ क्रमांकावर होती आणि २०१२ मध्ये भारतातल्या फोर्च्युन इंडिया ५०० लिस्टमध्ये नवव्या.