अशाच एका वक्तृत्व स्पर्धेत तालूका पातळीवर मी पहिला आलो. काही दिवसातच जिल्हा पातळीवरील स्पर्धेसाठी वाईच्या द्रविड हायस्कूलला जायचे होते.
त्याकाळी एसटीच्या तिकिटाचे पैसे एवढाच काय तो खर्च असायचा पण त्यासाठीही घरून पैसे मिळणे अशक्य असायचे. मग शाळेतले काही शिक्षकच त्यांच्यातच
२/१८
वर्गणी काढून आम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायचे. जेवणाचा दोनतीन वेळेचा डबा काय तो घरून असायचा.
माझा भाषणाचा विषय होता - आधूनिक भारताचे शिल्पकार - पंडीत जवाहरलाल नेहरू.
तालूका पातळीवर जे भाषण केले होते तेच रिपीट करायचे असं माझं मनोमन ठरलेलं पण आमच्या सरांना ते काही पटत नव्हतं.
३/१८
एक तर तालूका स्तरावर सर्व स्पर्धक हे ग्रामिण भागातले होते आणि जिल्हापातळीसाठी सातारा, कराड तसेच इतर अनेक शहरातूनही मुलं येणार त्यामुळे तयारी, चांगली हवी यासाठी त्यांनी नव्याने मला भाषण तयार करायला सांगितले.
मी बरीच शोधाशोध केली, त्यांना भाषण दाखवले त्यात त्यांनी अजून काही
४/१८
भर टाकून माझ्याकडून ते तयार करून घेतले.
जायच्या काही दिवस आधीपासूनच रंगीत तालिम, घरी पण सतत त्यावर चर्चा, हावभाव,आवाज यावर बरेच काम, बदल झाले आणि मुख्य स्पर्धेला आम्ही पोहोचलो.
तेंव्हा सर्रास खाकी पॅंट, पांढरा शर्ट, डोक्यावर टोपी असा शाळेत ड्रेस असायचा. एसटीत खिडकीजवळच्या
५/१८
सीटचा हट्ट , कच्चे रोड, माचीचा फुफाटा यामुळे शर्टाचा वाईला उतरेपर्यंत फुल्ल कार्यक्रम झाला होता.
आम्ही एसटी स्टॅंडला उतरून द्रविड हायस्कूलला चालतच गेलो. जिल्हाभरातून सगळी मुलं आली होती. काही आमच्यासारखी होती तर काही अत्यंत चकाचक! नाही म्हटलं तरी थोडं बुजल्यासारखं झालच.
६/१८
भाषणाची काळजी मला होती. पण मी पहिला येणार हे माझ्यापेक्षा इतरांना अपेक्षा त्यामुळे एक तरी ढाल मिळणार असं त्यांना वाटायचं.
आम्ही सगळे एका वर्गात स्पर्धेसाठी आत जाणार एवढ्यात एक जीपगाडी शाळेसमोर उभी राहिली. सगळे तिकडे पाहू लागले. सेम पंडीत नेहरूंच्या ड्रेसमधला आमच्याच
७/१८
वयाचा एक मुलगा त्यातून उतरला. पाठीमागून क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या वेशभूषेतला मुलगा. एका मोटारसायकलवरून सावित्रीमाई, वर्गात गेलो तर गांधीजी पण बसले होते.
माझ्या घशाला कोरड पडली होती. मी आवंठे गिळत होतो. त्या मुलांकडे पहायची हिम्मत होत नव्हती.
केसात घामासोबत मातीपण
८/१८
डोक्यावरच सुकली होती. मी सरांकडे पाहिले, सर पण त्या मुलांकडे कौतुकाने पहात होते.मला काहीच सुचेना.घाबरून गांगरून गेलो.हळूच वर्गातून बाहेर पडलो. कसतरीच होतं होतं.
दहापंधरा मिनटं झाली, आमचे सर, मला शोधत शोधत आले. त्यांनी पाठीमागून खांद्यावर हात टाकला तसं मी दचकून मागे पाहिलं.
९/१८
माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव त्यांना कळले. मला त्यांनी उठवलं, म्हणाले अरे फक्त कपडे चांगली घातले म्हणून माणसांचे विचार, बोल चांगले असतीलच असे नाही.
तूला नेहरुंचे विचार समजलेत तू अधिक प्रभावी बोलशील. मनापासून बोलं. तू नक्की जिंकणार.उठ अन चल लवकर.
ते धीराचे शब्द मला पुरे होते.
१०/१८
त्यांनी बाटलीतलं पाणी दिलं.
मी थोडं पिलं आणि बाकी सगळं तोंडावर, केसावर मारले. स्वतःची कपडे नीट केली आणि पुन्हा वर्गात आलो.
परिक्षक आले. भाषणं सूरू झाली. आमच्या गटात वीसपंचवीस स्पर्धक होते. सगळे तयारीचे होती. उत्तम भाषणं करत होती.
एकदोन ड्रेसवाल्या मुलांची भाषणं माझ्या
११/१८
आधी झाली. नंतर माझा नंबर आला. काय बोललो, कसा बोललो ते आता सांगता येणार नाही पण सरांनी भाषण संपल्यानंतर - झपाटल्यासारखा बोललास म्हणून खाली आल्याआल्या उचलून घेतलेलं चांगलं आठवतेय.
चांगला सूर पकडला. त्याचे भाषण सर्वसाधारण होते परंतू त्याचा पंडीतजींचा औरा सर्वांना भावला.
निकालाची वेळ आली. माझा नंबर येईल याची सर्वांना खात्री होती. पण स्पर्धेत मी दुसरा आलो. अर्थात पहिला तोच पंडीतजींच्या ड्रेसमधला मुलगा आला. मी फार नाराज झालो.सरही थोडफार तिथं भांडले पण
१३/१८
परिक्षकांचा निर्णय अंतिम होता.
चांगली कपडे,नीटनेटकं राहणं,गुलाबाचं फुलं,रुबाब आणि राजबिंडापणा हा नेहरूजींचा गुण त्या दिवशी जणू माझ्याही अगदी डोक्यात भिनला,भावला,आवडला.
गरीबी म्हणा, त्यावेळचा भवताल असो, सामाजिक परिस्थिती म्हणा पुढेही कधी शालेय जीवनात अशी कपडे घालून भाषणं
१४/१८
करता आली नाहीत. (प्रचंड इच्छा असूनही) पण या सर्व महापुरूषांच्या वेशभूषा मला प्रचंड आवडायला लागल्या.
महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जगातील इतर सार्वकालिन महान नेते, उद्योजक, शास्त्रज्ञ, जे जे असे नीटनेटके,उच्च राहणीमान ठेवायचे ते सर्वच भारी वाटायला लागले. विचारांसोबत
१५/१८
राहणीमानही उत्तमच ठेवायचं हे मनोमनं पटलं.
पुढे साहजिकच पंडीतजीबद्दल अवांतर वाचन, निबंध, वक्तृत्व स्पर्धा झाल्या. ते सार्वकालिन महान नेते तर होतेच पण पंडीत नेहरूजींचे विविध फोटो, त्यांची फॅशन, स्टाईल, त्यातला त्यांचा वावर, नैसर्गिकपणा, सहजता ही त्यांच्या आधूनिक वैज्ञानिक,
१६/१८
सर्वसमावेशक विचारांमुळे अधिक खूलून यायची.
या देशातल्या स्वार्थाने बरबटलेल्या, ऐशोआरामी, पाणचट, कर्तृत्वहीन राजेशाहीचा अस्त जरी इंग्रज राजवटीत झाला तरी स्वातंत्र्यानंतर या देशात लोकशाही रूजविण्याचे फार मोठे अन ऐतिहासिक काम पंडीतजींनी केलेय.
हे एकसंध राष्ट्रउभारणीचे,
१७/१८
पायाभूत सोईसुविधा उभारणीचे महत्वाचे काम त्यांनी केले. त्यांच्याबद्दल विविध भाषांत विपूल लेखन उपलब्ध आहे. तरूणांनी नक्की ते वाचायला हवे.
शेवटी मी जरी त्या स्पर्धेत जरी हरलो तरी मला जणू खरे पंडीतजी भेटले याचा झालेला आभास आजही अविस्मरणीय आहे.
उर्जा साक्षर होणं ही काळाची गरज आहे. एकविसावं शतकं हे विज्ञान-तंत्रज्ञान तसेच चौथ्या औद्योगिक क्रांतीचे आहे.
सोलार, विंडएनर्जी, बायोएनर्जी, इलेक्ट्रिक गाड्या हे शब्द जरी आज रोजचे झाले असले तरी जैविक इंधने- डिझेल,पेट्रोल, कोळसा, सीएनजी, एलपीजी #उर्जासाक्षरता#SaturdayThread
१/१२
रोजच्या वापरातले प्लॅस्टिक, सौंदर्यप्रसाधने, डांबर, औद्योगिक वापरासाठीचे फरनेस ॲाईल, लाईट डिझेल ॲाईल तसेच आपल्या आजूबाजूच्या शेकडो गरजेच्या वस्तूंसाठी हे जैविक इंधन क्रूड ॲाईलच्या स्वरुपात वापरले जाते.
आपण कल्पनाही करू शकत नाही इतके मोठे हे उर्जा विश्व आहे. बरं ते आपल्या
२/१२
अगदी बेसिक गोष्टींसाठी वापरले जाते तरीही आपण फक्त डिझेल, पेट्रोल, एलपीजी आणि हल्ली सीएनजी भाववाढ इथपर्यंतच सिमित ठेवतो.
खर तर क्रुड ॲाईल, त्यावरील प्रोसेस आणि त्यातून आपण काढत असलेली उत्पादने ही मानवाला गेल्या दिड-दोन शतकात मिळालेले वरदान आहे. आज कितीही आपण ग्रीन हायड्रोजन
३/१२
महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपुर्ण भारतात तापमानाचा पारा अंगाची लाही लाही करतोय.
पुर्वी या दिवसात विदर्भात जायचे म्हटले तरी एसीमधेही दरदरून घाम फुटायचा पण समस्त मानवजातीची पृथ्वीवर कृपा झाली व ग्लोबल वॉर्मिंगमुळे अखंड विश्वाचेच चंद्रपुर व्हायला सूरूवात झालीये.
ग्लोबल वॉर्मिंग हा आजचा मुद्दा नाही तो खरं तर आपल्या प्रत्येक श्वासासोबतचा मुद्दा आहे त्यावर पुन्हा कधीतरी.
आजचा विषय म्हणजे यावर्षी आपल्या आयुष्यात आलेला नवा उन्हाळा.
आपल्याकडे एप्रिल, मे मधे तापमान वाढते आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणात विजेची गरजही वाढते, बरं हे दरवर्षी
२/१०
होणारं ऋतुचक्र काही नवे नाही. वीजेची गरज अचानक किती जास्त वाढू शकते याचे वर्षानूवर्षाचे सरासरी आकडे सरकार दरबारी असतातच.
मागचे दशकानुदशके हे चालू आहे. बरं आपल्याकडे ७५ ते ८०% वाजनिर्मिती ही कोळश्यावरच होते त्यामुळे वीजनिर्मितीसाठी कच्चा माल काय लागणार याबाबत काही संदिग्धता
३/१०
काही महिन्यांपूर्वी अत्यंत अभ्यासपुर्ण मराठी पुस्तक वाचनात आले.
मी अगदी ॲाफीसमधेच थांबून एका बैठकीत संध्याकाळी ७ ते ११.३० वाजेपर्यंत त्याचा फडशा पाडला. पुढचे काही दिवस त्या पुस्तकातील भाग पुन्हा पुन्हा वाचला. त्या लेखकाबद्दल खूप आदर तयार झाला.
काहीही करून त्यांना भेटायचे आणि त्यांना धन्यवाद सांगायचे हे मनोमन ठरवलं.
खरं सांगायच तर मागच्या पाचएक वर्षात माझ्या वाचनात मराठी पुस्तक फार मोजकी येताहेत, आणि त्यात मला नक्कीच सुधारणा करायच्या आहेत. मला ते पुस्तक वाचून अजून काही मराठी पुस्तकं वाचायची प्रेरणाही मिळाली होती.
२/१४
दरम्यान मी त्यांची अजून एक पुस्तक वाचून काढले. लेखकाचा एकंदर आवाका मोठा होताच शिवाय त्यांचे कष्टही त्या लिखाणातून दिसत होते. मी काही जवळच्या मित्रांकडून त्या लेखकाचा नंबर मिळवायचा प्रयत्न करत होतो पण यश मिळत नव्हते.
असेच काही दिवस गेले, मी ही कामात बिझी झालो होतो. एक दिवस
३/१४
आमची काही पुर्वी ओळख नव्हती, मी जिथे नोकरी करायचो त्याच बिल्डिंगमधे तो ही एका कंपनीत काम करायचा. आमची दोघांचीही सकाळी जायची एकच वेळ होती त्यामुळे येताजाता दिसायचा.
मुंबईत येऊन मला एक महिनापण झाला नव्हता. लोकल ट्रेनची मला प्रचंड भीती वाटायची, पहिल्यांदा ट्राय करायला गेलो
👇
आणि जाम चेंबलो गेलो, अगदी भूगा झाला त्यामुळे रोज बसने कांदिवली ते अंधेरी प्रवास करायचो.
एक दिवस सकाळी सकाळी नेहमीप्रमाणे बसमधे शिरलो आणि अचानक युवराज पण त्या बसमधे मला दिसला. मी पटकन त्याच्या बाजूच्या सीटवर बसलो. त्यानेही मला लगेच ओळखले. बस सूरू झाली तसा दोघांनीही एकाच वेळी
👇
प्राथमिक शाळेत असताना वडिलांनी सांगितलेलं एक वाक्य डोक्यात फिट्ट झालंय - “जनावरात आणि माणसात एक फरक फार महत्वाचा आहे, माणसाला वाचन करण्याची सर्वोच्च शक्ती लाभलीये… जो तीचा वापर करेल, ज्ञान मिळवेल, शहाणा होईल, सतत वाचत राहील आणि मिळालेल्या ज्ञानाचा वापर करेल तो पुढे जाईल.
१/९
आपल्या सारख्या सर्वसामान्य माणसांना प्रगतीचा याहून सोपा मार्ग दुसरा कोणताच नाही….शाळेत शिकून, वाचायला येत असून जर वाचत नसाल तर म्हसरात, कुत्र्यामांजरात आणि तुमच्यात फरक तो काय?”
आज जी मला एखाद्या विषयातील Clarity आहे ती लहानपणी किंवा पाच-दहा वर्षांपूर्वी नक्कीच नव्हती आणि
२/९
आज जो Confidence आहे तो ही नव्हताच.
पुढील पाच वर्षांनी या दोन्ही बाबतीत मी कदाचित अजून समृद्ध होईन..... बरेच दोष, चुका समजतील, अजून सुधारणा होतील पण पुर्ण Clarity आणि Confidence येईपर्यंत मी Pause घेतला असता तर हा आयुष्याचा प्रवास कदाचित अवघड आणि खुप धिम्या गतीने झाला असता.
३/९