८-१० वर्षांपूर्वी पृथ्वीच्या कुठल्याश्या (बहुतेक चीनचाच असावा!) कोपऱ्यात, कुणाच्या तरी डोक्यात खिश्यात घेऊन फिरता येईल अश्या हलक्या, सुटसुटीत, स्वस्त मोबाईल स्टॅन्डची कल्पना आली असावी.
त्याने खटपट करून प्रोडक्ट तयार केलं असावं. रॉ मटेरियल, लॉजिस्टिक्स वगैरेची तजवीज करून घेतली असावी. आणि जगभर (किमान आमच्या डोंबिवलीपर्यंत तरी!) ते स्टॅन्ड जाण्याची साखळी यंत्रणा उभारली असावी.
२+
त्या सर्व प्रक्रियेची फक्त रुपये १० किंमत मोजून मी माझ्या मोबाईलसाठी प्लास्टिकचं फोल्डिंग स्टॅन्ड विकत घेतलं.
ऑफिसला गेल्यावर बॅगेतून ते स्टॅन्ड काढून टेबलवर ठेवताना क्षणभर त्या अज्ञात डोकेबाजाला धन्यवाद देतो मी रोज.
३+
साडे तीन - चार हजार वर्षांपूर्वी कुणा कलंदराने गोलाकार लाकडाला घरंघळत नेता येईल ही कल्पना करून बघितली असावी. त्या गोलाकार चक्रात मधून भोक पाडलं तर "चाक" तयार होईल हे सुचलं असावं.
४+
त्या एका कलंदराच्या एका मेंदूतील एका विचारातून आणि अनंत खटपटींतून आपण आज आहोत तिथवर येण्याचा संपूर्ण मानवजातीचा प्रवास सुरु झाला.
व्योमच्या सायकलमधे हवा भरायला जाताना हे सगळं त्याला किती किती नि कस्कसं सांगू असं होतं.
५+
जीवनातील छोट्या छोट्या यशाबद्दल नकळत, इवलासा का असेना, गर्व बाळगून असतो आपण. हे सगळं यश या पूर्वसंचिताच्या बळावर आहे, त्याची जाणीव अशीच कधीकधी होत जाते आणि "कृतज्ञता" चा अर्थ नव्याने उमगतो मला.
६+
परवा व्योमच्या पुस्तकांना कव्हर लावण्याचा सोहळा पार पडला आमच्याकडे. हे असंच एक किरकोळ स्किल आहे ज्याचा मला प्रचंड अभिमान वाटतो. स्टेपल नं करता, डिंक न वापरता "अजिबात निघणार नाही" असं कव्हर मला लावता येतं - एक स्वतंत्र कागद दुसऱ्या एका स्वतंत्र पुस्तकाभोवती गुंडाळून ---
७+
योग्य ठिकाणी घड्या घालून एकत्र बांधून ठेवता येतो - ही माझ्यासाठी मीच घडवून आणलेली जादू असते.
चिरंजीवांना समोर बसवलं ती जादू घडवून आणताना. डोळे विस्फारून बघत होती स्वारी. नंतर कौतुकाने सर्वांना सांगत होती की त्याच्या बापाला स्टेपलर किंवा डिंकाची गरज भासली नाही.
८+
पण त्याला हे माहित नाही की यात माझं कर्तृत्व तसं शून्य आहे. सगळं प्रकरण फक्त कॉपी पेस्टचं आहे.
माझ्या लहानपणी माझ्या बाबांनी मला असंच समोर बसवून असंच शिकवलं आहे.
बाबांनी, आईने असे कित्येक स्किल्स शिकवले आहेत लहानपणापासून. अनेक संस्कार केले आहेत.
चहा घेऊन झाला की आपला कप घेऊन जाणं, जाताजाता इतरांचे कप उचलणं - सिंकमध्ये नुसते ठेवणं नव्हे - हातासरशी विसळून टाकणं - अजिबातच वेळ नसेल तर ---
१०+
प्रत्येक कपात थोडंसं पाणी टाकून ठेवणं (म्हणजे वाळून जात नाहीत) --- आईने लावलेली ही साधी सवय जन्मभर किती कामी आली आहे सांगता येणं शक्यच नाही.
असे चिक्कार प्रसंग येऊन जातात तेव्हा मनोमन आईबाबांना हात जोडून धन्यवाद देतो मी.
११+
हेच कितीतरी शिक्षकांबद्दल, गुरूंबद्दल, मित्रांबद्दल, इथल्या - फेसबुकवरच्या कितीतरी लोकांबद्दल.
समाज, देश "घडतो" म्हणजे काय हो! आपण सगळे मायक्रो लेव्हलवर वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या स्तरावर अश्या असंख्य कौशल्य-संस्कारांच्या बळावर एक एक इंच पुढे सरकत जातो...आणि ---
१२+
मॅक्रो लेव्हलवर अख्खा समाज घडत जातो.
या अदृश्य शक्तिशाली प्रक्रियेबद्दल कृतज्ञ असायला हवं आपण.
कृतज्ञता नावाची गोष्ट लाजवाब आहे.
जमली पाहिजे.
१३+
जीवनातल्या सगळ्या जय-पराजयांमध्ये नेहेमी आपल्या सोबत पाहिजे.
हे जमलं की मग लाईफ बिकम्स अ थरोली ब्यूटिफुल एक्सपिरियन्स!
मंदिर नको, शाळा-इस्पितळ बांधा - असं म्हणणाऱ्या लोकांची कीव येते.
यांना भारतातल्या शिक्षण, आरोग्य सेवेच्या समस्यांची फार्फार काळजी आहे.
५-६ महिन्यांपूर्वी हे लोक कोणत्या जंगलात गुडूप होते कुणास ठाऊक.
१+
भारतात शाळा इस्पितळं बांधायला हवेत हे कळायला यांना आधी मंदिर विषय चर्चेत यावा लागतो.
बरं हे इतके दळभद्री मेंदूचे आहेत की यांना फक्त मंदिराचाच प्रॉब्लेम नाहीये.
यांना मेट्रो, चांद्रयान, बुलेट ट्रेन, सरदार पटेल पुतळा - काहीही म्हटलं की शाळा इस्पितळं सुचतात.
२+
"तुम्ही मंदिर बांधा, मस्जिदी बांधा काय वाट्टेल ते करा - पण आम्हाला अमुक ठिकाणी तमुक प्रकारच्या शाळा, हॉस्पिटल्सची गरज आहे - त्याकडे दुर्लक्ष करू नका" - असं म्हणण्याचा प्रामाणिकपणा नाही यांच्यात.
On @elonmusk buying @Twitter - everyone's speculating complex, larger than life motives. How come nobody is talking about the obvious lowest hanging fruit : USER BEHAVIOR DATA ?
१०० पैकी ९५ लोक सोशल मीडिया अत्यंत चुकीच्या पद्धतीने वापरतात. (बाकीचे ४ लोक सोशल मीडिया वापरतच नाहीत, तो उरलेला फक्त १ हुशार माणूस सोशल मीडियाचा परफेक्ट वापर करतो!)
१+
हे ९५ लोक फेसबुक वर भरपूर वेळ घालवतात. पण त्यांना विचारलं की या फेसबुक वर खर्च केलेल्या वेळाचा काही फायदा झाला का?
तर त्यांचं उत्तर असतं - नाही! शून्य उपयोग झालाय!
म्हणजे कित्येक दिवस, महिने, वर्ष अक्षरशः वाया गेलेली असतात!
काय कारण असतं?
२+
तर सोशल मीडिया कसा वापरायला हवा - हे त्यांना माहीत नसतं.
बरं - तर कसा वापरावा सोशल मीडिया?
तसं हे शास्त्र फार खोल आहे! ज्यांना ज्यांना हे शास्त्र समजलं आहे त्यांनी फक्त सोशल मीडियाचा वापर करून अक्षरशः लाखो रुपये कमावले आहेत. तुम्ही सुद्धा करू शकता!
द काश्मीर फाईल्सचा विषय देशभर तापलेला असताना, देशाच्या, समाजाच्या दुर्दैवाने, काही लोकांनी विविध नॅरेटिव्ह विनाकारण सेट करायला घेतले आहेत.
काश्मिरी पंडितांबद्दल एवढं वाटतं - पण गोध्राबद्दल, खैरलांजीबद्दल, दलितांवरील अत्याचारांबद्दल काहीच वाटत नाही का? : हा असाच एक नॅरेटिव्ह.
१+
जणूकाही काश्मिरी पंडितांवरील अत्याचारांवर भरभरून लिहिणाऱ्यांना "इतर" प्रकरणांचं काहीच वाटत नाही! वास्तव फार वेगळं आहे.
गोध्रा, खैरलांजी, दलितांवरील अत्याचार - सर्वांवर भरपूर लिहिलं, बोललं जातं. सहवेदना व्यक्त केली जाते. सैराट, झुंड, जय भीम - मनापासून उचलून धरले जातात.
२+
गोध्रा दंगलीचा निषेध समाजातील सर्व स्तरांमधील लोकांकडून वेळोवेळी झाला आहे. गुन्हेगारांवर न्यायालयात केसेस दाखल झाल्या, त्यांचे निकाल देखील लागून झालेत. नरेंद्र मोदी गोध्रास जबाबदार आहेत असं वाटणारे देखील काही कमी नाहीत. त्यांनी आजपर्यंत तो मुद्दा वेळोवेळी उचलून धरलाय
दोन दिवसांपूर्वी "उशिरा उठणाऱ्या बायका काय संस्कार करतील?" असं काहीतरी कुणीतरी लिहून गेलं फेसबुकवर. सर्वत्र आगडोंब उसळला. तुम्हाला माहितीये ना?
हे "बदाम बदाम" व्हायरल गाणं कुठून आलं? कल्पना आहे का?
नवाब मलिक - इडि प्रकरणाचं काय होईल?
रशिया - युक्रेन युद्ध कुठे जातंय?
१+
चित्रा रामकृष्ण आणि त्यांचा हिमालयातील गुरु - काय घडतंय हे सगळं...?
तुम्हाला हे विषय माहीत नाहीत - किंवा - या विषयांवरील चर्चा घडत असताना तुमच्याकडे बोलायला काहीच नसेल - तर - यू आर लूजिंग आऊट द "बीइंग वेल इन्फॉर्म्ड" कॉम्पिटिशन.
ही कॉम्पिटिशन जोरात सुरू झालीये.
२+
"सगळं माहीत असायलाच हवं!" सिन्ड्रोमचे बळी होतोय आपण.
मनुष्य आपला मेंदू ऑप्टीमम पोटेन्शियलला वापरत नाही - हे वाक्य सर्वांना माहितीये.
गंमत ही आहे की ऑप्टीमम पोटेन्शियल म्हणजे काय - ते "आपल्या" व्यक्तिमत्वानुसार ठरवता येणार का, ऑप्टीमम पोटेन्शियलला वापरला जातोय ---
आपण अश्या काळात जगत आहोत ज्यात २ वर्षांपूर्वी शिकलेलं कौशल्य आज इतिहासजमा झालेलं असतं. अशी परिस्थितीत असताना तीनशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या व्यक्तिमत्वांच्या नात्यांवरून तुम्ही आज वाद घालत असाल तर - कोणत्या का बाजूने असेना - तुम्ही हरलेल्या बाजूकडूनच आहात.
१+
फार फार पूर्वी जालन्यातील तरुण इतर जालनेकर तरूणांशी स्पर्धा करायचा. नंतर तो पुणे-मुंबईतील तरूणांशी स्पर्धा करायला लागला. आज ही झेप थेट न्यू यॉर्क पर्यंत जात आहे.
२+
फार फार पूर्वी २०-२२ पर्यंत करिअरची दिशा ठरून जायची. कुठे तरी चिकटला की चिकटला! लाईफ सेट व्हायचं! नंतर हळूहळू "सेटल" होण्याचं वय २५-३०-३५ पर्यंत येऊन ठेपलं. आता "सेटल होणं" ही संकल्पनाच हळूहळू रद्द होणार आहे.