तेंव्हा मध्यप्रदेशमधे मी एका हिटिंग फर्नेसचा मोठा प्रोजक्ट हेड करत होतो.
काही डेडलाईन्स पाळायच्या असल्याने मी सलग पंधरा-पंधरा दिवस साईट २४ तास साईट रोटेशन पद्धतीने (दोन शिफ्टमधे) चालू ठेवायचो.
फक्त झोपायला जवळच्या हॅाटेलवर यायचो बाकी सलग १६- १८ तास साईटवरच जायचे. असेच एक
२/२४
दिवस काम संपवून रात्री उशीरा २ वाजता हॅाटेलवर पोहचलो, आंघोळ, जेवण करून झोपायला ३ वाजले.
नुकतीच झोप लागलीच होती की साधारण साडेतीन- चार वाजता माझा मोबाईल वाजला…. तो साईटवरील एक सहकारी सतिशचा होता, मी फोन लगेच उचलला, त्याचा आवाज प्रचंड घाबरलेला होता - एका दमात तो म्हणाला -
३/२४
फर्नेसजवळ मोठं गॅस लिकेज झालेय आणि आम्हाला काहीच कळत नाही काय करायचे ते, तुम्ही ताबडतोप इकडे या!
मी आहे त्या कपड्यातच झोपेतून उठून फॅक्टरीकडे पळालो….रात्रीची वेळ असली तरी फॅक्टरी अगदी ५ मिनिटाच्या अंतरावर असल्याने मी हॉटेलमधून पळतच फॅक्टरीत गेलो. तिथे जावून पाहतो तर आगीचे
४/२४
लोळ पसरलेले….
कमीतकमी ४० ते पन्नास माणसं वेड्यासारखी पळत होती, सगळी घाबरलेली, जीवाच्या आकांताने ओरडत होती. एकदोन जण फायर एक्स्टिंग्युशर्स घेऊन आग विझवायचा प्रयत्न करत होती तर काही जण अग्निशमन यंत्रणा चालू करायचा प्रयत्न करत होती पण आग काही थांबत नव्हती.
माझा सहकारी सतिश
५/२४
ज्याने मला फोन केला होता तो माझ्या बाजूलाच होता, त्याला मी विचारले नक्की कशामुळे झालं तर तो म्हणाला अचानक हाय प्रेशर फ्लेक्सिबल पाईप लिक झाला आणि त्यातला गॅस जवळच असलेल्या फर्नेसच्या आजूबाजूस गेला व पेटला. मी फक्त ऐवढं ऐकलं आणि सरळ त्या आगीकडे झेपावलो.
कोणाला काही कळायच्या
६/२४
आत त्या पाईपच्या इनलेटला असलेल्या मेन व्हॉल्वचा हॅंडल जोरात ओढला आणि तो बंद करायचा प्रयत्न केला.
आग अचानक कमी तर झालीच पण एक जोराचा आगीचा लोळ माझ्या अंगावर आला….
ज्या उजव्या हाताने मी तो व्हॅाल्व बंद करत होतो त्या हाताला जोरदार भाजले…. पण मला पक्की खात्री होती की मी हा
७/२४
व्हॅाल्व बंद केला तर मोठा अनर्थ टळू शकेल, त्यामुळे मी तशाही परिस्थितीत दुसऱ्या हाताने जोर लावून तो बंद केला.
आग कमी होत होती मात्र एक जोराचा बॅकफायर माझ्या तोंडावर आणि दुसऱ्या हातावर पण बसला…. काही सेकंदात सर्व आग आटोक्यात आली.
मी ओरडून सतिशला मेन पॅनेल सप्लाय ऑफ करायला
८/२४
सांगितले. त्याने ते केलं आणि तो मला पाहून जोरात ओरडला - अरे तूम्हाला तर खूप भाजलेय…..
माझा हात सहज डोक्यावर फिरवला गेला तर जाणवलं की माझ्या डोक्यावर केसच नाहीत…जळाले होते जणू.
कोणीतरी जोरात ओरडलं - अरे ये लडके को पानी के टाकी के नीचे लेके जावो…
मी हे ऐकलं आणि स्वतःच
९/२४
वेड्यासारखा पाण्याच्या टाकीकडे धावलो… एक लहानशा सिमेंटच्या टाकीखाली मी बसलो….वरून आजूबाजूने सर्वजण माझ्यावर पाणी टाकत होते… मला काहीच समजत नव्हते….
मी त्यातून माझ्या सहकाऱ्याला विचारत होतो- आग विझली का रे? तो म्हणाला पुर्ण विझली…पण तुम्हालाच जोरदार भाजलेय.
तेवढ्यात
१०/२४
तिथला एक कामगार बाईक घेऊन आला. मी टाकीखालून त्या बाईककडे जायला निघालो तेवढ्यात मला भाजण्याच्या प्रचंड वेदना सूरू झाल्या….
सगळी जळजळ आणि आगआग व्हायला लागली. अगदी काही सेकंदात मला मी जनावरासारखा ओरडायला लागलो…. मला अशा अवस्थेत ते दवाखान्यात घेऊन गेले.
पुढच्या काही वेळात
११/२४
माझ्यावर उपचार सूरू झाले परंतू अंगाची आग काही थांबत नव्हती…मी जोरात ओरडत होतो…किती वेळ ओरडत होतो ते माहित नाही पण त्या वेदना अत्यंत भयंकर होत्या…
त्यात भर उन्हाळ्याचे दिवस, प्रचंड गर्मी आणि त्या दवाखान्यात एसीही नव्हता… खर तर तो दवाखाना म्हणजे मॅटरनिटी हॅास्पिटल होते.
१२/२४
माझ्यामुळे कित्येक नवजात अर्भक आणि त्यांच्या माता अस्वस्थ झाल्या. इकडे मी जोरजोरात ओरडत होतो. अगदी भयंकर,असहाय्यपणे. अन बाजूला ती लहान मुलं रडत होती.
तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही.
साधारण संध्याकाळी ६/७ वाजता मला जरा आराम पडला…तेंव्हा कळाले माझे दोन्ही हात, चेहरा भाजला
१३/२४
गेलाय…मी भीतीने पुर्ण गळून गेलो.घरी फोन करून सांगावं तर घरचे घाबरतील म्हणून सहकाऱ्याला विनंती केली की घरी सांगू नकोस.
दोन दिवसांनी मी माझा चेहरा आरशात पाहिला आणि घाबरलो…जणू काही मी दुस्वप्न पाहतोय ते ही खरोखरीचं!
दोन्ही हातालाही बॅंडेज होतं तिथे राहून पुढील उपचार शक्य
१४/२४
नव्हते म्हणून मुंबईत यायचा निर्णय घेतला. इकडे मुंबईत संजिवनी हॅस्पिटल मधे कंपनीने व्यवस्था केली आणि डॅाक्टरांना विनंती करून साधारण तिसऱ्या दिवशी आम्ही मुंबईला आलो.
निघताना तिथले बरेच कामगार भावुक होऊन मला सोडवायला आले, त्यांच्या चेहऱ्यावर त्यांचे जीव वाचवल्याची कृतज्ञता
१५/२४
होतीच पण माझ्याबद्दलची काळजी आणि प्रेमही दिसत होते.
पुढे तीन आठवडे मी ॲडमीट होतो, चेहरा नीट होईल का? डाग राहतील की जातील? हाताची जखम याची भीती असे असंख्य प्रश्न मला पडायचे…
प्रत्येक दिवस भीती,चिंता,काळजी आणि प्रचंड नकारात्मक होता.
दोन्ही हात बॅंडेज मधे असल्याने अगतिकता
१६/२४
म्हणजे काय हे पुरेपुर कळालं. हे सगळं होवूनही मी आईवडीलांना किंवा कुटूंबातील कोणालाही कल्पना दिली नव्हती.
शेवटी मला डिस्चार्ज मिळाला. चेहरा ठीक झाला होता पण जखमा खोल होत्या. मी आता तसा फार भीतीदायक दिसत नव्हतो.
मग आता दोन पर्याय होते. मुंबईत रहायचं की घरी गावी जायचं?
१७/२४
डॉक्टरांनी बरीच काळजी घ्यायला सांगितलं होतं. औषध, योग्य आहार आणि कुटूंबाच्या मायेची गरज आता जाणवत होती. मी त्याच दिवशी गावी जायचा निर्णय घेतला.
घरी कोणालाही कसलीही कल्पना नसताना मी अचानक संध्याकाळी पोहचलो…मला असं पाहून आईने जो टाहो फोडला होता तो मी कधीच विसरू शकत नाही…
१८/२४
वडील, भाऊ, बहिणी आणि इतर सर्वच अत्यंत भावुक झाले.
पुढे तीन ते चार महिने मला पुर्ण बरे व्हायला गेले. त्या वेदना, भीती, जखमा त्यावरील पुढे चाललेले उपचार सगळचं भीतीदायक होतं. घरच्यांना मी जसजसा बरा होतं होतो तस बरं वाटायचं पण त्यांची कुजबुज सूरू झाली होती.
त्यांना मी पुन्हा
१९/२४
परत जातोय की काय याची चिंता असायची.
आईवडील काहीही झालं तरी मला आता या इंडस्ट्रीत काम करू द्यायला तयार नव्हते. नव्हे तर ते मुंबईलाच पाठवायला तयार नव्हते.
मी मात्र मला काय करायचेय यावर ठाम होतो. एक दिवस मीच बाबांसोबत हळूच विषय काढला…. “आता मी बरा झालोय आणि पुन्हा मुंबईला
२०/२४
कामाला जायचंय….” झालं घरात पुन्हा कल्लोळ सूरू झाला!
कमीतकमी दोन दिवस प्रचंड गदारोळ…खर तर वडीलांना माझ्या भावना कळतं होत्या…. त्यामुळे एका रात्री त्यांना मी शांतपणे माझे म्हणणे सांगितले - “चार-पाच वर्षांचा प्रचंड संघर्ष आणि कष्ट या अशा प्रसंगांने मला हरवू शकत नाही, मी
२१/२४
कोणतीही हिरोगीरी करायला त्या आगीत गेलो नव्हतो…एकतर माझी ती जबाबदारी होती. मला कोणता व्हॉल्व्ह बंद करायचा याची पुर्ण कल्पना होती!
दुसरं मी हे काम मनापासून करतोय, त्यातही अशा प्रसंगातही मला पुन्हा जावंस वाटतेय कारण आतातर हा गॅस (LPG) माझ्या रक्तात गेलाय…इथून पुढच्या काळात
२२/२४
मी अधिक काळजी घेईनं. पण मला जावूद्या. हे असं घाबरून किंवा कंफर्ट झोनमधे मला जे हवंय ते करू शकणार नाही. मला या सुरक्षिततेत गुदमरतेय.
बाबांना माझी दया आली, त्याच रात्री त्यांनी स्वतः माझी कपडे, काही औषध स्वतः बॅगेत भरली. अन सकाळी सातच्या एसटीने मुंबईकडे पुन्हा पाठवून दिलं!
२३/२४
अझिम प्रेमजी म्हणतात - Success is achieved twice. Once in the mind & the second time in the real world.
आपल्याला उंच भरारी घ्यायची असेल तर काही पाश तोडता यायला हवेत…
भीती आणि संकटाच्या पलिकडे “ध्येय”गाठायचे स्वप्न मनापासून जपता यायला हवे.
उर्जा साक्षर होणं ही काळाची गरज आहे. एकविसावं शतकं हे विज्ञान-तंत्रज्ञान तसेच चौथ्या औद्योगिक क्रांतीचे आहे.
सोलार, विंडएनर्जी, बायोएनर्जी, इलेक्ट्रिक गाड्या हे शब्द जरी आज रोजचे झाले असले तरी जैविक इंधने- डिझेल,पेट्रोल, कोळसा, सीएनजी, एलपीजी #उर्जासाक्षरता#SaturdayThread
१/१२
रोजच्या वापरातले प्लॅस्टिक, सौंदर्यप्रसाधने, डांबर, औद्योगिक वापरासाठीचे फरनेस ॲाईल, लाईट डिझेल ॲाईल तसेच आपल्या आजूबाजूच्या शेकडो गरजेच्या वस्तूंसाठी हे जैविक इंधन क्रूड ॲाईलच्या स्वरुपात वापरले जाते.
आपण कल्पनाही करू शकत नाही इतके मोठे हे उर्जा विश्व आहे. बरं ते आपल्या
२/१२
अगदी बेसिक गोष्टींसाठी वापरले जाते तरीही आपण फक्त डिझेल, पेट्रोल, एलपीजी आणि हल्ली सीएनजी भाववाढ इथपर्यंतच सिमित ठेवतो.
खर तर क्रुड ॲाईल, त्यावरील प्रोसेस आणि त्यातून आपण काढत असलेली उत्पादने ही मानवाला गेल्या दिड-दोन शतकात मिळालेले वरदान आहे. आज कितीही आपण ग्रीन हायड्रोजन
३/१२
महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपुर्ण भारतात तापमानाचा पारा अंगाची लाही लाही करतोय.
पुर्वी या दिवसात विदर्भात जायचे म्हटले तरी एसीमधेही दरदरून घाम फुटायचा पण समस्त मानवजातीची पृथ्वीवर कृपा झाली व ग्लोबल वॉर्मिंगमुळे अखंड विश्वाचेच चंद्रपुर व्हायला सूरूवात झालीये.
ग्लोबल वॉर्मिंग हा आजचा मुद्दा नाही तो खरं तर आपल्या प्रत्येक श्वासासोबतचा मुद्दा आहे त्यावर पुन्हा कधीतरी.
आजचा विषय म्हणजे यावर्षी आपल्या आयुष्यात आलेला नवा उन्हाळा.
आपल्याकडे एप्रिल, मे मधे तापमान वाढते आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणात विजेची गरजही वाढते, बरं हे दरवर्षी
२/१०
होणारं ऋतुचक्र काही नवे नाही. वीजेची गरज अचानक किती जास्त वाढू शकते याचे वर्षानूवर्षाचे सरासरी आकडे सरकार दरबारी असतातच.
मागचे दशकानुदशके हे चालू आहे. बरं आपल्याकडे ७५ ते ८०% वाजनिर्मिती ही कोळश्यावरच होते त्यामुळे वीजनिर्मितीसाठी कच्चा माल काय लागणार याबाबत काही संदिग्धता
३/१०
काही महिन्यांपूर्वी अत्यंत अभ्यासपुर्ण मराठी पुस्तक वाचनात आले.
मी अगदी ॲाफीसमधेच थांबून एका बैठकीत संध्याकाळी ७ ते ११.३० वाजेपर्यंत त्याचा फडशा पाडला. पुढचे काही दिवस त्या पुस्तकातील भाग पुन्हा पुन्हा वाचला. त्या लेखकाबद्दल खूप आदर तयार झाला.
काहीही करून त्यांना भेटायचे आणि त्यांना धन्यवाद सांगायचे हे मनोमन ठरवलं.
खरं सांगायच तर मागच्या पाचएक वर्षात माझ्या वाचनात मराठी पुस्तक फार मोजकी येताहेत, आणि त्यात मला नक्कीच सुधारणा करायच्या आहेत. मला ते पुस्तक वाचून अजून काही मराठी पुस्तकं वाचायची प्रेरणाही मिळाली होती.
२/१४
दरम्यान मी त्यांची अजून एक पुस्तक वाचून काढले. लेखकाचा एकंदर आवाका मोठा होताच शिवाय त्यांचे कष्टही त्या लिखाणातून दिसत होते. मी काही जवळच्या मित्रांकडून त्या लेखकाचा नंबर मिळवायचा प्रयत्न करत होतो पण यश मिळत नव्हते.
असेच काही दिवस गेले, मी ही कामात बिझी झालो होतो. एक दिवस
३/१४
आमची काही पुर्वी ओळख नव्हती, मी जिथे नोकरी करायचो त्याच बिल्डिंगमधे तो ही एका कंपनीत काम करायचा. आमची दोघांचीही सकाळी जायची एकच वेळ होती त्यामुळे येताजाता दिसायचा.
मुंबईत येऊन मला एक महिनापण झाला नव्हता. लोकल ट्रेनची मला प्रचंड भीती वाटायची, पहिल्यांदा ट्राय करायला गेलो
👇
आणि जाम चेंबलो गेलो, अगदी भूगा झाला त्यामुळे रोज बसने कांदिवली ते अंधेरी प्रवास करायचो.
एक दिवस सकाळी सकाळी नेहमीप्रमाणे बसमधे शिरलो आणि अचानक युवराज पण त्या बसमधे मला दिसला. मी पटकन त्याच्या बाजूच्या सीटवर बसलो. त्यानेही मला लगेच ओळखले. बस सूरू झाली तसा दोघांनीही एकाच वेळी
👇