उद्धवसाहेब तुमचं चुकलंच!
१) मुख्यमंत्री म्हणून एकही खातं तुम्ही स्वतःकडे ठेवलं नाहीत, तुमचं चुकलंच.
२) शिवसेनेच्या वाट्याची सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास ही दोन्ही खाती ज्यातून पक्षाला रसद मिळते, तुम्ही #गद्दारनाथ च्या हातात दिली. तुमचं चुकलंच.
३) स्वतःच्या मुलाला पर्यटन, पर्यावरण सारखं दुर्लक्षित खातं दिलं, तुमचं चुकलंच.
४) मुख्यमंत्री म्हणून सगळ्या पक्षांचे झालात, सगळ्या जनतेचे झालात, फक्त स्वतःच्या पक्षाकडेच लक्ष द्यायचा आधीच्या मुख्यमंत्र्यांचा शिरस्ता सोडलात; तुमचं चुकलंच.
५) सगळ्या सहकाऱ्यांवर विश्वास टाकलात, पाठीशी ठामपणे उभे राहिले, तुमचं चुकलंच.
६) जळगावचा पान टपरीवाला संबंध नसताना #गद्दारनाथ चे मोठे मोठे फोटो टाकत होतात, पण तुम्ही सहकाऱ्याला दाबलं नाहीत, पूर्ण स्वातंत्र्य दिलंत; तुमचं चुकलंच.
७) तुम्ही आजारी होतात, पण आजारातही प्रचंड वेदना सोसून सगळ्यांकडे लक्ष दिलंत. पण व्हिडीओ बनवून मीडियावर पसरवले नाहीत, तुमचं चुकलंच.
८) तुम्ही शस्त्रक्रियेसाठी इस्पितळात दाखल झालात आणि #गद्दारनाथ कडे मुख्यमंत्री पदाचा चार्ज म्हणून पाळीव मीडियात बातम्या पसरवल्या, पण विश्वास ठेवलात. पुत्राकडे चार्ज द्यायचा सोडून तुम्ही त्याच #गद्दारनाथ कडे चार्ज दिलात, तुमचं चुकलंच.
९) "ठाकूर, जो सिर झुकते नहीं, वो कट जाते है" म्हणणाऱ्या निष्ठुर महाशक्तीसमोर ताठ मानेने उभे राहिलात. प्रामाणिकपणा दाखवत राजकारण न करता जे करायचं ते सर्वांसमोर, असेच वागलात. आपल्या सहकाऱ्यांचे, मित्रपक्षांचे पंख छाटायचे असतात, तेव्हाच खुर्ची बळकट होते, विसरलात तुम्ही. तुमचं चुकलंच
१०) आकडे न लपवता येणाऱ्या परिस्थितीला धीरोदात्तपणे सामोरे गेलात, भयाण संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढलंत. स्वतःची शस्त्रक्रिया पुढे ढकलून लढत राहिलात. तुमचं चुकलंच.
११) केवळ पक्षप्रमुख न राहता अवघ्या महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख झालात, तुमचं चुकलंच.
१२) विरोधी पक्षाच्या आमदारांचीही कामे चुटकीसरशी केलीत, त्यांचे फोन टॅप करत बसला नाहीत, तुमचं चुकलंच.
१३) शेवटचं! राजकारणात "तडजोड" करावी लागतेचं. पण तुम्ही झुकला नाहीत, वाकला नाहीत. कोण करतं का असा वेडेपणा. ३५० वर्षांपूर्वी फक्त छत्रपती संभाजीराजांनी केलेलं तसं. तुमचं चुकलंच.
भरपूर चुकलं हो तुमचं. पण लाखो करोडो जनता या चुकांसाठीच तुमच्यावर प्रेम करतेय. जीव ओवाळून टाकणारे #शिवसैनिक शेवटच्या श्वासापर्यंत सोबत आहेत. ज्यांनी आयुष्यभर विरोध केला, अशा काँग्रेस राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनाही तुम्ही आज कुटुंबप्रमुख वाटताय.
नेहमी असेच रहा साहेब.
जय महाराष्ट्र!
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
आज झालेली एका नटाची आत्महत्या(?) हा आधी नमूद केलेल्या प्रकरणाशी निगडीत आहे, अशी खास सूत्रांची माहिती. ड्रग्स आणि इतर तत्सम पदार्थांसाठी भारतातील सर्वात मोठा स्रोत असलेल्या राज्यातील ही आत्महत्या(?) गॅंगवॉरच्या संदर्भाने पाहिली पाहिजे. #म#मराठी
एका देशी अंमली पदार्थ विक्रेती गॅंग याच राज्यातून देशभर ड्रग्स पुरवते. याच राज्यातील कुप्रसिद्ध अभिनेत्री याच व्यवहारांतून पुढे आली आणि चित्रपटसृष्टीत तिचे बस्तान बसले. दुसरी परदेशातून सांभाळलेली गॅंग, एक स्थानिक गॅंग आणि नायजेरियन आफ्रिकन गॅंग अशा चार मोठ्या गॅंग मायानगरीत आहेत.
आधीच्या अभिनेत्याच्या आत्महत्येच्या निमित्ताने यातल्या मोठ्या गॅंगचा बराच बाजारहिस्सा या "कुप्रसिद्ध" राज्यातील गँगने बळकवण्याचा प्रयत्न केला. दलाल पत्रकाराला पकडून "त्या" विशिष्ट गँगचे पेडलर्स अडकवले गेले.
यातून सावरल्यावर समोरील बाजूने इकडची माणसे धमकवायला सुरुवात केली.
एक दलबदलू जो एका दलाल पत्रकाराच्या सुटकेसाठी हास्यास्पद प्रयत्न करतोय, त्याचे मुख्य कारण प्रेम नसून महानगरातील अंमली पदार्थाच्या व्यवसायातील वाटा हेच आहे. आधी २-३ गॅंग ह्या व्यवसाय चालवत होत्या, असे कळते. दलालाने सतत एका बहुचर्चित प्रकरणात एका गँगला सतत लक्ष्य केले. #म#मराठी
ह्यातून दुसऱ्या गँगला अंमली पदार्थांच्या मोठ्या बाजारावर नवीन हिस्सा काबीज करता आला. ही गॅंग चालवणारे परदेशी हस्तक हे ह्या दलबदलूचे भागीदार आहेत. दलालाच्या अटकेनंतर ही मोहीम थंड पडू लागली आणि ह्या गँगमध्ये हिश्श्यावरून वादावादी होऊ लागली.
सदर दलाल पत्रकार बाहेर येणं याकरीता गरजेचं बनलं कारण पहिल्या गँगने दुसऱ्याची नावे पोलिसांकडे फोडून स्थिती पुन्हा बरोबरीत आणली. अशा वेळेला दलाल पत्रकारामार्फत पुन्हा एकदा टीव्हीवर मोहीम चालवणे, दुसऱ्या गँगला गरजेचं झालंय. त्यातून उपोषण, होम हवन सारखे हास्यास्पद प्रकार होत आहेत.
चांगला वकील कोर्टात काहीही सिद्ध करू शकतो आणि कायद्याचा किस पाडू शकतो. पण काही मूलभूत गोष्टी असतात, त्याचा विसर पडू नये. करार जरी दोन कंपन्यांमध्ये झाला असला, तरी अंतिमतः तो व्यक्तीच करतात. #म#मराठी#ArnabGoswami
करार कंपन्यांच्यामध्ये, पण कामाची देखरेख आणि देणी देण्याचे काम विशिष्ट व्यक्तीच करतात. बऱ्याचदा न्याय्य देणी नाकारली जातात आणि इतरांनाही तसेच करण्यास प्रवृत्त केले जाते. जर त्यातील एक व्यक्ती राजकीय, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या खूप प्रभावशाली असेल, तर दुसरी व्यक्ती पूर्ण अडकते.
अशा वेळी दुसऱ्या बाजूला राजकीय व सामाजिक दडपण आणून न्याय नाकारला गेला तसेच इतरांनाही तसेच करण्यास प्रवृत्त केले तर आर्थिकदृष्ट्या दडपण येऊन समोरची व्यक्ती आत्महत्येस प्रवृत्त होत असेल आणि तशी आत्महत्या पीडित व्यक्ती चिठ्ठी लिहून करत आहे तर नक्कीच आत्महत्येस प्रवृत्त केलंय.