रूढी परंपरांना फाटा देत #आर्थिक_कुर्बानी सारखे उपक्रम राबवणाऱ्या @PaigambarSpeaks सारख्या युवकांची मुस्लिम समाजाला नितांत आवश्यकता आहे. (१/९)
मागील ९ वर्षे सलग चालू असलेला #आर्थिक_कुर्बानी हा उपक्रम आता हळू हळू मुस्लिम समाजा पर्यंत पोहचवत आहेत. (२/९)
मशिद, मदरसा मधील विद्यार्थी, अनाथ आश्रम यांना कुर्बानीच्या पैशातून मदत करण्या पासून सुरू झालेला प्रवास. कुर्बानी केरळसाठी (केरळ मधील पूरग्रस्तांना मदत करणे) (३/९)
#आर्थिक_कुर्बानी कोल्हापूर सांगली पुरग्रस्तांसाठी ज्यामध्ये पळुस तालुक्यातील भिलवडी गावातील तब्बल ५०० पेक्षा जास्त पूरग्रस्त कुटुंबियांना अन्नधान्य किट अगदी साडी आणि चादर सह देण्यात आले होते (४/९)
आणि याच गावातील १५० विद्यार्थ्यांना शालेय वस्तू देखील आर्थिक कुर्बानी च्या माध्यमातून देण्यात आल्या.
आणि गेल्या ३ वर्षांपासून सलग #आर्थिक_कुर्बानी शिक्षणासाठी राबवली जात आहे. (५/९)
१ हजार पेक्षाही जास्त विद्यार्थ्यांना आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी या उमपक्रमातून विविध पद्धतीने मदत केली गेली आहे. अगदी यवतमाळ मधील आदिवासी भागात ज्या ठिकाणी मुलांना नीटपणे कपडे ही घालायला नाही अशा ठिकाणी (६/९)
१०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पोहोचवण्यात आले जे विद्यार्थी अजूनही वापरत आहेत. उर्दु माध्यमातील ११ वी व १२ वी सायन्स च्या १०० विद्यार्थिनींना वर्षभराच्या वह्या आणि जर्नल असतील, मराठी माध्यमातील ४० विद्यार्थी बसणाऱ्या खोलीचे फरशी काम करणे असेल (७/९)
किंवा सातारा मधील जिजाऊ वसतिगृह मधील ४० विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू देणे असो या सर्वच गोष्टी आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आल्या. अशी अनेक शैक्षणिक कामे आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी मधून करण्यात आली (८/९)
याही वर्षी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. जवळपास दिड लाख रुपये आजपर्यंत जमा झालेले आहेत. यावर्षीची कामे लवकरच आपल्या सर्वांसमोर येतीलच.. (९/९)
आपल्याला हि या मोहिमेत सहभागी व्हायचे असेल तर " पैगंबर शेख यांचा संपर्क क्रमांक - 9970070705 "
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
अमोल शिंदे यांच्या फेसबुक वॉलवरून...
अफझल खान आणि औरंगजेब दोघांच्या पण कबरी मी पाहिल्या आहेत, तिथं जाऊन आलोय, मला त्या जागा आवर्जून बघायच्या होत्या, कारण या कबरीमागे आपल्या महाराजांचा आपल्या पूर्वजांचा इतिहास आहे. @AmolShi48525416 👇
अफझल खानाला मारल्यानंतर महाराजांचा दरारा असा पसरला की बरेच आदिलशाही किल्लेदार महाराज येत आहेत हे ऐकूणच किल्ला सोडून पळाले, अफझल खानाला मारल्यावर अवघ्या ७-८ दिवसात (एका ठिकाणी मी वाचले फक्त दोन दिवसात) 👇
महाराजांनी जावळी पासून पन्हाळ्यापर्यंत मुलुख काबीज केला, ही खूपच मोठी मजल होती, अफझल खानासारख्या मातब्बर सरदाराला मारल्यामुळे महाराजांची जी दहशत निर्माण झाली, त्यामुळेच महाराजांना पन्हाळ्यापर्यंत एव्हढ्या कमी वेळात मुलुख काबीज करता आला. 👇
साहेब एका सभेत बोलून गेले पण कार्यकर्त्यांनी एका रात्रीत तथाकथित कट्टर हिंदू होणे जरा अनैसर्गिकच आहे, एका रात्रीत हनुमान चाळीसा पाठ करणे, काल पर्यंत ज्याच्या हॉटेलची बिर्याणी भारी लागत होती त्याने दर्ग्यात काय काय लपवून ठेवलं असेल हा विचार करणे, 👇
सोशल मीडियावर व्यक्त होतांना विवेकबुद्धीचा गळा दाबून व्हाट्सएप फॉरवर्ड पोस्ट करणे, कालपर्यंतच्या अब्दुल भाई ला, मुल्ला, पंचरवाला आणि इतर टोपण नावाने बोलावणे आणि इतर कट्टर विचार इतक्या लवकर रुचत नसतात.... 👇
त्यासाठी भाजप सारखी लवचिकता आणि क्रुरता अंगीकृत असणे आवश्यक आहे. सध्या तरी इतर पक्षांना ती प्राप्त करण्यासाठी खूप योगाभ्यास आणि बलिदान करण्याची आवश्यकता आहे. 👇
दलित समाजाबद्दल आलेल्या एखाद्या बातमीबद्दल प्रकाश आंबेडकरांची बाईट घेतली जाते, ओबीसी समाजाबद्दल आलेल्या एखाद्या वक्तव्याबद्दल मुंडे, भुजबळ यांची प्रतिक्रिया घेतली जाते, मुस्लिम समाजाबद्दल घडलेल्या घटनेबद्दल ओवेसी प्रतिक्रिया देतात. (1/4)👇
अमोल मिटकरी यांनी धार्मिक विधी बाबत केलेल्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी काही प्रतिक्रिया का दिली नाही ? ब्राह्मण समाजाला खरा धोका टीका करणाऱ्या मिटकरी पेक्षा या टिकेवर काहीच प्रतिक्रिया न देणाऱ्या फडणवीसांकडून आहे. (2/4) 👇
जेव्हा स्वतःच्या राजकारणाचा विषय येतो तेव्हा फडणवीस " मी ब्राह्मण असल्यामुळे माझ्यावर टीका होते " असे वक्तव्य करून समाजाची सहानुभूती घेतात. मग जेव्हा समाजाला गरज आहे तेव्हा मूग गिळून गप्प कसे बसतात. (3/4) 👇
गणेशराव एका समाजाचे मोठे प्रस्थ, रात्रं-दिवस आपल्या जातीच्या अधिकाऱ्यांसाठी भांडत बसायचे, कुणाच्या जॉइनिंगसाठी तर कुणावरच्या अन्यायासाठी आंदोलने करायचे. सोशल मीडियावर समर्थनार्थ ट्रेंड चालवायचे.
असंच एकदा गणेशराव काही कामानिमित्त सरकारी कचेरीत गेले, बराच वेळ बाहेर बाकड्यावर वाट पाहूनही आपला नंबर काही येईना, म्हणून त्यांनी साहेबांच्या रूममध्ये डोकावून पाहिले. शिपायाच्या चहा-पाण्याची सोय करून समाजाच्या नावाने बनवलेले व्हिजिटिंग कार्ड आत पाठवले.
बऱ्याच वेळाने गणेशराव यांना आतून बोलावणे आले. आतमध्ये गेल्यावर पाटीवरचे आडनाव पाहून गणेशरावने ओळखले की अधिकारी "आपलेच" आहेत. मग गणेशरावांनी आपुलकीने बोलणे सुरू केले. सगळं बोलूनही अधिकारी काही कामाचा विषय काढेना. मग गणेशरावांना राग अनावर झाला.