मेट्रोच्या कामामुळे दि. 10 ऑगस्टपर्यंत #घोडबंदर रोडवरील #वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे @ThaneTraffic उपायुक्त दत्तात्रय कांबळे यांनी कळविले आहे. #प्रवेशबंद - मुंबई-नाशिक महामार्गाने घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना कापूरबावडी जंक्शन येथे "प्रवेश बंद" करण्यात येत आहे.
#पर्यायीमार्ग - मुंबई ठाणेकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी अवजड वाहने कापूरबावडी वाहतूक शाखाजवळून उजव्या वळणाने खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
मुंबई-ठाणेकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी जड अवजड वाहने कापूरबावडी जंक्शन जवळून उजवे वळण घेवून कशेळी, अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
#प्रवेशबंद - मुंब्रा, कळवा कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे. #पर्यायीमार्ग - या मार्गावरील सर्व वाहने गॅमन मार्गे खारेगाव खाडी ब्रिज खालून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
#प्रवेशबंद - नाशिक कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना मानकोली नाका येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे. #पर्यायीमार्ग- या मार्गावरील सर्व वाहने ही मानकोली ब्रिज खालून उजवे वळण घेवून अंजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
#जड अवजड वाहने सोडून इतर वाहने ही पिलर क्रमांक 24 ते 26 चे गर्डर टाकण्याच्या वेळी ओवळा सिग्नल कट येथून डावीकडे वळण घेवुन सेवा रस्त्याने पुढे विहंग हिल सोसायटी कट जवळ उजवे बाजुस वळण घेवुन मुख्य रस्त्यास मिळून इच्छित स्थळी जातील.
पिलर क्रमांक 44 ते 45 चे गर्डर टाकण्याच्या वेळी विहंग हिल सोसायटी कट येथून डावीकडे वळण घेवुन सेवा रस्त्याने पुढे नागला बंदर सिग्नल कटजवळ उजव्या बाजूच्या वळणाने मुख्य रस्त्यास मिळून इच्छितस्थळी जातील.
पिलर क्रमांक 69 ते 70 व पिलर क्र. 100 ते 101 चे गर्डर टाकण्याच्या वेळी नागला बंदर सिग्नल कट येथून डावीकडे वळण घेवुन सेवा रस्त्याने पुढे सी.एन.जी. पंप कट जवळ उजवे बाजुस वळण घेवुन मुख्य रस्त्यास मिळून इच्छित स्थळी जातील. #ThaneTrafice
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
@CMOMaharashtra एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या मुंबई महानगर प्रदेशातील रस्ते प्रकल्प आढावा बैठकीत चिंचोटी ते अंजूर फाटा मार्गाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून @MMRDAOfficial कडे हस्तांतरित करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
शीळ फाटा ते मानकोली, कल्याण ते बापगाव, कल्याण ते टिटवाळा, कल्याण ते पडघा, टिटवाळा ते बदलापूर हे रस्ते प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कल्याण, डोंबिवली, ठाण्यातील वाहतूक कोंडी दूर होणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
शीळफाटा-कल्याण-भिवंडी रस्त्याच्या भूसंपादनाच्या मोबदल्याचा विषय तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी ठाणे जिल्हा प्रशासनाला दिले. बदलापूर मार्गावर ठिकठिकाणी केलेले नियमबाह्य गतिरोधक तातडीने काढण्यासाठीची अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
#ठाण्यातील वागळे इस्टेट आयटीआय तसेच कोपरी आयटीआयच्या ताब्यातील जागा क्लस्टर डेव्हलपमेंटकरीता ठाणे महापालिकेस वर्ग करण्याबाबत आज मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली.
यासंदर्भात कौशल्य विकास विभाग आणि ठाणे महापालिका यांनी त्वरीत संयुक्त बैठक घ्यावी. आयटीआयच्या मुलांची सोय व्हावी व त्यांचे नुकसान होऊ नये या पद्धतीने चर्चा करुन कार्यवाही करावी, अशा सूचना @CMOMaharashtra श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या.
बैठकीस @TMCaTweetAway आयुक्त विपीन शर्मा, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे सहसचिव नामदेव भोसले, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगंबर दळवी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.