DISTRICT INFORMATION OFFICE, THANE Profile picture
Official Twitter Account of District Information Office, #THANE, Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra
Oct 28, 2022 9 tweets 4 min read
कोपरी पुलावर आनंदनगर सब वे येथे लोखंडी गर्डर टाकण्याच्या कामामुळे दि. २९ ऑक्टोंबर रोजी रात्री २३.०० वाजेपासून ३० ऑक्टोंबर रोजी सकाळी ६.०० वाजेपर्यंत या मार्गावरील ठाणे बाजूकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गात बदल करण्यात येणार आहे - @ThaneTraffic पोलीस उप आयुक्त दत्तात्रय कांबळे #प्रवेशबंद - ठाणे शहरातून मुंबई पूर्व द्रुतगतीमार्गाने मुंबईकडे जाणाऱ्या जड अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद.
#पर्यायीमार्ग - खारेगाव टोलनाका येथून डावीकडे वळून गॅमन चौक- पारसिक रेती बंदर-मुंब्रा बायपास - शिळफाटा उजवीकडून महापेमार्गे रबाळे - ऐरोली ब्रिजमार्गे जातील.
Jul 28, 2022 8 tweets 4 min read
मेट्रोच्या कामामुळे दि. 10 ऑगस्टपर्यंत #घोडबंदर रोडवरील #वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे @ThaneTraffic उपायुक्त दत्तात्रय कांबळे यांनी कळविले आहे.
#प्रवेशबंद - मुंबई-नाशिक महामार्गाने घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना कापूरबावडी जंक्शन येथे "प्रवेश बंद" करण्यात येत आहे. #पर्यायीमार्ग - मुंबई ठाणेकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी अवजड वाहने कापूरबावडी वाहतूक शाखाजवळून उजव्या वळणाने खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.

#Alert
#Thane
Jul 28, 2022 4 tweets 2 min read
@CMOMaharashtra एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या मुंबई महानगर प्रदेशातील रस्ते प्रकल्प आढावा बैठकीत चिंचोटी ते अंजूर फाटा मार्गाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून @MMRDAOfficial कडे हस्तांतरित करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. शीळ फाटा ते मानकोली, कल्याण ते बापगाव, कल्याण ते टिटवाळा, कल्याण ते पडघा, टिटवाळा ते बदलापूर हे रस्ते प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कल्याण, डोंबिवली, ठाण्यातील वाहतूक कोंडी दूर होणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
Jul 28, 2022 4 tweets 2 min read
#ठाण्यातील वागळे इस्टेट आयटीआय तसेच कोपरी आयटीआयच्या ताब्यातील जागा क्लस्टर डेव्हलपमेंटकरीता ठाणे महापालिकेस वर्ग करण्याबाबत आज मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. यासंदर्भात कौशल्य विकास विभाग आणि ठाणे महापालिका यांनी त्वरीत संयुक्त बैठक घ्यावी. आयटीआयच्या मुलांची सोय व्हावी व त्यांचे नुकसान होऊ नये या पद्धतीने चर्चा करुन कार्यवाही करावी, अशा सूचना @CMOMaharashtra श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या.