पारतंत्र्यातून भारताची सुटका करण्यासाठी चले जाव चळवळ आणि त्यासारख्या असंख्य गोष्टींमधून मुंबईने मोलाचे योगदान दिले होते. जाज्वल्य देश भावना जागृत करून #स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मुंबई अग्रभागी राहिली होती.
त्यामुळे, #स्वातंत्र्याचा_अमृतमहोत्सव मुंबईतील प्रत्येक घरात, प्रत्येक परिसरात आणि प्रत्येक मुंबईकराला सहभागी करून घेऊन साजरा करण्यासाठी #बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मागील महिनाभर अथक प्रयत्न केले आहेत.
त्याचा परिपाक म्हणून आज संपूर्ण #मुंबई महानगर #तिरंगा रंगात आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी उत्साहात न्हाऊन निघाले आहे. मुंबईतल्या उंच इमारतींवर अभिमानाने झळकणारा राष्ट्रध्वज तिरंगा प्रत्येक चाळीत आणि झोपडपट्टी बहुल परिसरातील प्रत्येक घरावर देखील तितक्याच अभिमानाने फडकतो आहे.
महाडमध्ये पोचले बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पथक; प्रत्यक्ष मदत कार्यास तातडीने प्रारंभ.
अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या रायगड जिल्ह्यातील महाड मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मदतकार्यासाठी ११० अधिकारी- कर्मचारी यांचा समावेश असलेले पथक
(१/८)
तसेच ६ जणांचा समावेश असलेले वैद्यकीय पथकही पाठविण्यात आले आहे. आवश्यक यंत्रसामग्री आणि वाहने यांच्यासह सदर पथक महाडमध्ये पोहोचले असून या पथकाने लागलीच मदत कार्यास सुरुवात देखील केली आहे.
(२/८)
रायगड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमध्ये मदत कार्य करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या निर्देशानुसार आणि बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. इक्बाल सिंह चहल
आपत्कालीन प्रसंगी मदत कार्यासाठी तत्पर असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २ चमू ह्या अनुक्रमे रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना.
(१/९)
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना विविध नागरी सेवा सुविधा अव्याहतपणे देणारी आपली बृहन्मुंबई महानगरपालिका आपत्कालीन परिस्थितीच्या प्रसंगी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राबाहेर देखील तत्परतेने मदत कार्य करीत असते.
(२/९)
याच अनुषंगाने आज बृहन्मुंबई महानगरपालिकेची २ पथके रायगडच्या व कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाली आहेत. रायगड व कोल्हापूरच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या पथकांचे नियोजन हे महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांच्या सूचनेनुसार
घाटकोपर मधील कारच्या या घटनेशी महानगरपालिकेचा दुरान्वयानेही संबंध नाही. ही खासगी सोसायटी परिसरातील घटना आहे. सदर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ बाबतची वस्तुस्थिती पुढीलप्रमाणे आहे.
घाटकोपर पश्चिम परिसरातील एका खासगी सोसायटीच्या परिसरात उभी असलेली ही कार पाण्यात बुडत असल्याची घटना आज सकाळी घडलेली आहे.
सदर सोसायटीच्या आवारात एक विहिर आहे. या विहिरीच्या अर्ध्या भागावर 'आरसीसी' करून ती विहीर झाकण्यात आली होती.
(२/n)
त्या 'आरसीसी' केलेल्या भागावर सोसायटीतील रहिवाशी 'कार पार्क' करीत असत. हाच 'आरसीसी' चा भाग खचून त्यावर 'पार्क' केलेली एक कार पाण्यात बुडाली, अशी प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.
(३/n)
विभाग नियंत्रण कक्ष- रुग्णशय्या उपलब्ध करून देण्यासाठी अधिकृत स्त्रोत
बृहन्मुंबई महानगरपालिकेशी थेट संबंध नसलेले, परंतु रुग्णशय्या उपलब्ध करून देण्यासाठी मदत करणाऱ्या नागरिकांनी देखील विभाग नियंत्रण कक्षाशीच संपर्क साधावा.
नियम व निर्धारित प्रक्रियेनुसार कार्य करणे सर्वांच्याच हिताचे आहे.
केवळ एका हेल्पलाईन क्रमांकावर भार येऊ नये यासाठी रुग्णशय्या वितरण प्रणालीचे विकेंद्रीकरण करण्यात आले होते.
विभाग नियंत्रण कक्षाशी संपर्क न झाल्यास आपण १९१६ या मध्यवर्ती क्रमांकावर तक्रार करू शकता.
We appreciate concern of individuals & groups not related to BMC offering help to citizens tweeting to us, but citizens must know that even they will reach out to us to ask for beds. Please follow protocols in the interest of all
Bed allocation system was decentralised since a single helpline, with innumerable calls, could not have taken the load alone & it would only increase wait time for citizens. If a War Room does not respond as per need, escalate complaint to 1916. Only War Rooms can allocate beds.