देशाच्या स्वातंत्र्यानंतर आपण मानसिक दृष्ट्या अनेक वर्षांसाठी गुलाम होतो हे काही वेगळं सांगणं आवश्यक वाटत नाही.आपल्या शालेय जीवनातील पुस्तकांमध्ये आपण नाझी होलोकास्ट बद्दल नक्की वाचलं असेलच... 1/11
...पण कधी भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तानातील हिंदूंची काय अवस्था झाली होती आणि त्यांना काय सहन करावं लागलं होतं या बद्दल कधी वाचलं आहे का ? नक्कीच नाही ! 2/11
काही वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदींनी १४ ऑगस्ट हा दिवस पार्टीशन रिमेम्बरंस होरर्स डे म्हणून ओळखला जाईल असे सांगितल्यावर आपल्या देशातील तथाकथित पुरोगाम्यांनी, व्यक्ती आणि विचार स्वातंत्र्यावर विश्वास ठेवणाऱ्या सगळ्यांनीच याचा कडाडून विरोध केला, हे तेच आहेत जे स्टीवन… 3/11
…स्पिल्सबर्ग ने दिग्दर्शित केलेल्या शिंडलर्स लिस्ट पाहून डोळ्यातून अश्रू काढतात. असो मूळ मुद्द्याकडे परत येत. भारताच्या स्वातंत्र्याची लढाई हि काही ठराविक लोकांमुळे आणि त्यातल्या त्यात केवळ अहिंसेच्या मार्गाने मुळीच मिळालेली नाही. 4/11
म्लेंच्छांच्या विरोधात सुरु झालेल्या लढाईपासून ते इंग्रजांच्या विरोधात चालू असलेल्या लढाईपर्यंत अनेक हजारो लोक हुतात्मे झाले. अनेकांनी स्वतःच्या प्राणांची, घरादाराची पर्वा न करता हा देश अखंड राहो यासाठी बलिदान दिले. 5/11
सशस्त्र क्रांतीचा वापर करूनच ब्रिटिशांची जुलमी राजवट आतून पोकळ करण्याचे कार्य हजारो स्वातंत्र्य सेनान्यांनी केले पण आपल्या देशाचे दुर्भाग्य होते कि या सगळ्यांच्या कष्टाचे चीज झाले नाही. 6/11
भारताची फाळणी हि 'धार्मिक' कारणांवरूनच घडली आणि त्या सगळ्यात हिंदू अक्षरशः होरपळून निघाले. 7/11
१४ ऑगस्ट रोजी पाकिस्तानातील हिंदूंवर अमानुष अत्याचार झाले, लाखोंच्या संख्येने स्थलांतरित होत असलेल्या हिंदूंची हत्या करण्यात आली, मृतदेहांचे खच तयार झाले आणि हे असे होत असताना आपल्या इथले काही सत्ताधीश त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत होते. 8/11
१४ ऑगस्ट रोजी पाकिस्तातून मृतदेहांचा खच असलेल्या ट्रेन भारतात येत होत्या. रेल्वे स्टेशन राक्तानी माखलेली होती. भारताच्या विविध कोपऱ्यांमध्ये देखील हिंदूंवरच का अत्याचार होत होते आणि आपण ते विसरावेत हा प्रश्न १४ ऑगस्ट या दिवशी विचारणं आत्यंतिक गरजेचं आहे ! 9/11
अनेकांनी वर्षानुवर्षे कष्टाने कमावलेल्या जमिनी, जागा, अन्न वस्त्र निवार्याची साधनं सगळं काही, काही लोकांच्या चुकीच्या निर्णयांमुळे सोडावं लागलं. याची झळ इंग्रजांचे चेले असलेल्या भारतातील नेत्यांना बसली नाही ती बसली ती सामान्यातल्या सामान्य माणसाला. 10/11
आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य आणि त्या मागचे कष्ट याचा कधीही विसर पडू नये यासाठीच या आजच्या दिवसाचे महत्व. 11/11
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
#Thread : म.वि.आ सरकार चे पतन, शरद पवार आणि इतिहासाची पुनरावृत्ती !
भारताच्या राजकारणामध्ये अनेक उलाढाली झालेल्या आपण पाहिल्या आहेत, वाचल्या आहेत. आघाड्या येतात, आघाड्या तुटतात आणि इतिहासाची पुनरावृत्ती होते. २९ जून २०२२ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.... 1/20
...यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला हि एका दृष्टीने इतिहासाची पुनरावृत्तीच आहे. 2/20
१९७८ साली, जून-जुलै महिन्यातच अधिवेशन सुरु असताना, रेड्डी काँग्रेस (यशवंतराव चव्हाण, शरद पवार, वसंत दादा पाटील, सुशील कुमार शिंदे) मधील नेत्यांनी शरद पवारांच्या बंडामुळे महाराष्ट्रातलं पाहिलं आघाडी सरकार पडलं आणि वसंतदादा पाटील यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. 3/20
#Thread : नॉर्थ काश्मीर - बॉम्बिंग आणि शेलिंग पासून मुक्त !
अनुच्छेद ३७० हटवल्यामुळे काय फरक पडला ? दहशतवादी कारवाया कमी झाल्या का ? असा प्रश्न जसा अनेक वेळेला विरोधकांना पडतो तसाच सरकारच्या समर्थकांना देखील पडतो. याचेच उत्तर या वृत्तात आहे. 1/9
उत्तर काश्मीर मधील माचील सेक्टर मधील दुधी या गावातल्या लोकांनी २०१९ च्या आधी सीझफायर वायोलेशन मुळे
अनेक वर्ष अशांततेचा सामना केलेला आहे. 2/9
पाकिस्तान्यांनी अनेक वेळेला बॉम्बिंग आणि शेलिंग केल्यामुळे इथल्या रहिवास्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे तर काही कुटुंबियांना जवळच्या लोकांना मृत्युमुखी पडताना देखील पाहायला लागले आहे आणि हे असेच गेली अनेक दशके सुरु आहे. 3/9
#Thread : तिस्ता सेटलवाड, गुजरात दंगल आणि 'कोलॉसल फ्रॉड'
२४ जून २०२२ रोजी, सुप्रीम कोर्टाने गुजरात मध्ये २००२ साली झालेल्या दंग्यांमध्ये तेव्हा दोषी ठरवलेल्या सगळ्यांना निर्दोष करार दिला, याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील नाव होते. 1/15
परंतु, एका महिलेला आणि एका इसरो शास्त्रज्ञाला गुजरात ए.टी.एस ने कस्टडी मध्ये घेतले. टिस्टा सेटलवाद आणि आर.बी.श्रीकुमार असे या दोघांचे नाव. 2/15
टिस्टा सेटलवाद ह्या तथाकथित मानवाधिकार ऍक्टिविस्ट ने गुजरात दंगलीनंतर तत्कालीन गुजरात मुख्यमंत्री नरेंद्र मोदी व ६२ जणांच्या विरोधात दंगली भडकावण्यासाठी, मुसलमानांना मुद्दाम मारण्यासाठी क्रिमिनल प्रॉसिक्युशन व्हावे अशी मागणी तेव्हा केली होती. 3/15
#Thread :
२५ जून १९७५ रोजी, इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू करून संविधानाची हत्या केली हे सगळ्यांना माहित आहेच ! पण नेमकं काय काय केलं हे जाणून घेऊया :
भारताची आंतरिक सुरक्षा धोक्यात आली आहे असे कारण देऊन आणीबाणी लागू केली ! 1/10
(खरं कारण - जे.पी. आंदोलनाचे वाढते स्वरूप आणि इंदिरा गांधींच्या विरोधात सामान्य जनतेचा वाढत चाललेला रोष या कारणामुळे काँग्रेस ने आणीबाणी जाहीर केली होती)
२५ जून १९७५ ला आणीबाणीची घोषणा केली व देशभरातील जवळपास सगळ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले. 2/10
परंतु, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांना अटक करण्यात आले नाही.
प्रेसवर संपूर्ण सेन्सॉरशिप जाहीर करण्यात आली.
कोणत्याही वृत्तपत्राला अटक केलेल्या व्यक्तींची संख्या, नावे, किंवा ठावठिकाणा सांगण्यापासून मनाई केली होती. 3/10
सी.ए.ए. , शेतकरी आंदोलन किंवा इतर कोणत्याही आंदोलनानंतर आपल्या देशाची मानसिकता निर्माण झाली आहे कि कोणतीही योजना सरकारने आणली कि त्याचा जाळ पोळ करून, पब्लिक प्रॉपर्टी चे नुकसान करून त्या वोजनेला विरोध करणे. 1/11
तसेच काही सध्या 'अग्निपथ' योजनेच्या बाबत सुरु आहे. बिहार मध्ये या विरोधाचे भयानक पडसाद दिसले. युवकांनी अगदी रेल्वे वगैरे जळाल्याच्या बातम्या समोर आल्या. यात काडीमात्र शंका नाही कि या सगळ्यात राजकीय हात आहे. पण, अग्निपथ योजना नेमकी काय आहे हे समजावून सांगणे गरजेचे आहे ! 2/11
अग्निपथ योजनेच्या अंतर्गत सरकार १७.५ - २१ वर्षांच्या युवक/युवतींना भारतीय सशस्त्र सैन्य दलांमध्ये सहभागी करून घेणार. संपूर्ण भारतातून मेरिट च्या आधारावर हि रिक्रुटमेंट ड्राइव्ह होणार. या युवकांचा सेवा काळ ४ वर्षांचा असेल. 3/11
#Thread : राष्ट्रपती निवडणूक २०२२ - पवारांची माघार कि हार निश्चित म्हणून 'टू मिनिट फेम' मिळवण्याचा प्रयत्न ?
राज्यसभा निवडणुकांची धामधुमी संपली असली तरी भारताच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची तयारी सध्या जोरदार सुरु आहे...
1/19
पुढचा राष्ट्रपती कोण होणार या वर विविध राजकीय विश्लेषक अंदाज लावत असताना, आजन्म भावी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असलेल्या आपल्या पवार साहेबांनी नेहमीप्रमाणे स्वतःला 'लार्जर दॅन लाईफ' दाखवण्याचा प्रयत्न केला आणि तो सबशेलपणे कसा फसला आहे ते पाहूया. 2/19
राष्ट्रपती निवडणुकीसाठी भारताच्या मुख्य विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आज दिल्लीत बैठक घेतली. कांग्रेस, टीएमसी, सीपीआई, सीपीआई (एम), सीपीआईएमएल, आरएसपी, शिवसेना, एनसीपी, राजद, सपा, नेशनल कॉन्फ्रेंस, पीडीपी, जद (एस), डीएमके, आरएलडी, आईयूएमएल आणि झामुमो असे पक्ष या बैठकीला उपस्थित होते