अरब लोक याहून मोठ्या डायनिंग टेबल एवढ्या थाळीत बिर्याणी भात पसरून मध्ये उंट किंवा आणखी कुठल्यातरी अभक्ष्य प्रकारच्या तंगड्या ठेऊन धा-बारा जण त्यावर तुटून पडतात म्हणे. नशीब त्या ताटात स्वतः च्या तंगड्या घालत नाहीत.
काय एक एक संस्कृती (?). जपान मध्ये सार्वजनिक ठिकाणी गरम पाण्याच्या हौदात नैसर्गिक कपड्यात धा बारा जण पुरुष बायका जाऊन बसायची पद्धत आहे म्हणे.
असो.
तर अशी पनीर-काजू ची मंदी खाल्ल्यावर मेंदू मध्ये मंदी आलेली आहे.
मद्य पिऊन सुंद बेडकासारख काही लोक बसतात, तशी काहीतरी अवस्था झाली आहे. दुपार पासून हफिसात काम केलंच नाही. तरी 4 किमी सायकल चालवत घरी आलो. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णानी सांगितल्या प्रमाणे जेवणाच्या नुसत्या "वासांसि अजीर्णानि" होईल म्हणून रात्री फक्त लिंबू पाणी पिऊन झोपणार आहे.
काही दिवसांपूर्वी मी "मांड्या आणि गल्ल्या दाखवत फिरणाऱ्या" असा उल्लेख "अतिप्रगत" हिंदू महिलांबद्दल केला. त्यावर मला "तू ठरवणार काय, मुलींनी कुठले कपडे घालायचे?" असा प्रश्न "प्रगत" हिंदुत्ववादी लोकांनी केला. त्यांना स्कर्ट किंवा फ्रॉक मध्ये भारतमाता चालेल काय?
एम. एफ. हुसेन च चित्र सुद्धा अश्याना मान्य आहे काय? भारतमाता म्हणजे आपल्या देशातलं स्त्री तत्व आहे. त्याची अब्रू वेशीला टांगल्यासारखं प्रदर्शन तुम्हाला मान्य नसेल तर भारतीय स्त्रिया दोन पोरांच्या आया झाल्या तरी लहानपणीचेच कपडे घालून फिरणार असतील तर माझी काहीही हरकत नाही.
मुळात आजचा पाश्चात्य स्त्री पोशाख हा जास्तीत जास्त पुरुषांना आकर्षित करेल असाच बनवला जातो आणि तोच त्यांचा मानस आहे. स्त्रीला वस्तू समजू नका म्हणणारे सुद्धा यालाच बळी पडत आहेत.
#विधवा_प्रथा_बंदी
काही ठिकाणी #विधवा_प्रथा बंद करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी ठराव केले. ते पाहून #महाराष्ट्र शासनानं परिपत्रक काढलंय. शासकीय परिपत्रकात वैज्ञानिक दृष्टिकोन वगैरे सांगितलं आहे, पण सध्या "नाव बदलायला कशाला पाहिजे #संभाजीनगर च आहे ते, मी सांगतोय ना!"
असा शासनाचा #वैज्ञानिक#दृष्टिकोन आहे. हे सगळं पाहून मला काही प्रश्न पडले. आपल्या परिचित लोकांमध्ये कुणीही विधवा स्त्रीचा #विधवा म्हणून अपमान केला आहे काय किंवा ऐकिवात आहे काय? माझ्यातरी माहितीत असं प्रकरण अजूनतरी नाही. उलट वयस्कर विधवा स्त्रियांकडं आपला समाज आदरानंच पाहतो.
आता तरुण वयात विधवा होणाऱ्या स्त्रियांबद्दल. मुळात आजकाल लग्न करणाऱ्या किती मुली #मंगळसूत्र घालतात, #कुंकू लावतात, #बांगड्या घालतात? अश्या घटनांमुळं विवाहित स्त्रियांनी कुंकू लावावे की नको हा वैचारिक #गोंधळ जन्माला घातला आहे. म्हणजे एकीकडे न घालणे म्हणजे पुरोगामीत्व