दहावी उत्तीर्ण होऊनही औपचारिक शिक्षणात रस नसलेला सतरा अठरा वर्षे वयाचा कैलाश उच्च शिक्षण घेण्याऐवजी घराला आर्थिक मदत करण्याच्या इराद्याने पुण्यात एका इलेक्ट्रिक वस्तू दुरुस्त करणाऱ्या रिपेअर शॉपमध्ये काम करू लागला.
👇
इथे तो कॅल्क्युलेटर आणि रेडिओ, टेपरेकॉर्डरसारख्या त्या काळात लोकांच्या रोजच्या जगण्याचा भाग असलेल्या या वस्तू दुरुस्त करायचा.
ते वर्ष होतं 1985.कैलाशला त्याकाळी महिन्याला पगार होता 400 रुपये.दरम्यान दुकान मालकाने कैलाशला महिनाभरासाठी आपल्या मुंबईच्या दुकानात शिकण्यासाठी पाठवले.👇
हळूहळू स्क्रीन प्रिंटिंग, रेडिओ रिपेअरिंग अशा कामात तो निष्णात झाला.
यातूनच आता स्वतःचं काहीतरी सुरु करण्याची उर्मी त्यांच्यात निर्माण झाली आणि मग त्याने 1991 मध्ये पुण्यात स्वतःचे कॅल्क्युलेटर दुरुस्तीचे दुकान उघडले.
👇
यासाठी त्याने आपल्या कमाईतून बचत म्हणून केलेली रुपये 15000 हजार गुंतवणूक म्हणून वापरली.
काही काळातच कैलाशने इतर मशिन्सही दुरुस्त करायला सुरुवात केली. यातूनच लवकर त्याला न्यू इंडिया इन्शुरन्ससाठी वार्षिक देखभाल करार अर्थात एएमसी मिळाला.
👇
याच काळात बारावी नंतर शिक्षणास रामराम करू पाहणाऱ्या आपल्या लहान भाव संजयला तसे करण्यापासून परावृत्त करून त्यावेळी शिक्षणासाठी लागणारी आर्थिक मदतही केली.
व्यवसायानिमित्त अनेकदा कैलाश यांचं बँकेत जाण व्हायचं. व्यवसायानिमित्त म्हणजे बँकेतील तेव्हाची अत्यंत महत्वाची वस्तू असलेल्या👇
कॅल्क्युलेटर दुरुस्त करायला ते जायचे.आणि हीच ती वेळ जेव्हा त्यांनी पहिल्यांदा संगणक पाहिला.
हि आज टीव्हीसदृश दिसणारी वस्तू येणारं भविष्य व्यापणार हे कैलाश यांनी जाणलं आणि याच्याशी ओळख व्हायलाच हवी हे नक्की करून त्याकाळी पन्नास हजार खर्च करून संगणक घेतला, 👇
त्यावेळी त्या कॉम्प्यूटरचा वापर बिलिंगसाठी करू लागला.गंमत म्हणजे त्याकाळी अनेकजण त्यांच्या दुकानात केवळ कम्प्युटर नावाची गोष्ट असते कशी हे पाहायला यायचे.
त्याकाळी जग संगणक क्रांती अनुभवू लागलं होतं तर भारतात हि क्रांती अगदी उंबरठ्यापर्यंत येऊन ठेपली होती.
👇
संगणक आला म्हणजे त्यासाठी लागणाऱ्या देखभाल, दुरुस्ती आणि विविध प्रणाली अर्थात सॉफ्टवेअर यांची गरज भासणारच, याचा योग्यवेळी अंदाज घेणाऱ्या कैलाशनी 1993 मध्ये CAT कॉम्प्युटर सर्विसेस सुरू केली. त्यांची ही कंपनी संगणक देखभाल सेवा देत असे.
👇
दुरुस्तीसाठी येणाऱ्या बहुतांश संगणकाच्या नादुरुस्तीचे कारण मशीन्सना झालेल्या विषाणूची लागण हे असायचं. हे पाहून कैलाश यांनी आपला भाऊ संजयला ‘अँटी व्हायरस प्रोग्रामवर’ लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला.
अँटीव्हायरस प्रोग्राम्सच्या भविष्यातील मागणीचा अंदाज घेऊन,👇
काटकर बंधूंनी हार्डवेअर दुरुस्ती बाजूला ठेवून आता ‘अँटी-व्हायरस’ सोल्यूशन्सवर लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलं.
आणि 1995 मध्ये त्यांनी ‘Quickheal Antivirus’ हे त्यांचे पहिले उत्पादन लाँच केले जे DOS या संगणक प्रणालीसाठी होतं.
👇
आपलं हे उत्पादन बाजारातील इतर अँटी-व्हायरस’ उत्पादनांपेक्षा वाजवी राहील याची काळजी काटकर बंधूंनी घेतली.
यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद चांगला लाभला.यानंतर 1998 पर्यंत काटकर ब्रदर्सने हार्डवेअर दुरुस्ती पूर्णतः थांबवून आपलं संपूर्ण लक्ष अँटीव्हायरसकडे वळवलं.
👇
कैलाश मार्केटिंग तर संजय ‘रिसर्च एंड डेवलपमेंट’ पाहणार अशा आपल्या भूमिका त्यांनी निश्चित केल्या.
सुरवातीला प्रतिसाद चांगला मिळत असला तरी व्यवसाय पुण्यापुरता मर्यादित होता.त्यामुळे नवीन ग्राहक मिळविताना अडचणी येऊ लागल्या.
परिणामी 1999 च्या दरम्यान बँका आणि गुंतवणूकदारांकडून 👇
प्रतिसाद कमी झाल्याने काटकर बंधूंवर व्यवसाय बंद करण्याची वेळ आली होती.
आता वेळ होती आक्रमक पद्धतीने मार्केटिंग करण्याची. आणि एके दिवशी 'टाईम्स ऑफ इंडिया' या वृत्तपत्रात ‘क्विकहिलची’ अर्ध्या पानाची जाहिरात प्रसिद्ध झाली. आणि व्यवसायाने कात टाकली.
👇
पण उत्क्रांतीसाठी सिमोलंघन गरजेचं असतं..
वर्ष 2002 मध्ये काटकर बंधूंनी व्यवसाय पुण्याबाहेर नेण्याचं ठरवलं. वर्ष 2003 ला नाशिकमध्ये क्विकहीलची पहिली शाखा उघडली.
2002 ते 2010 या काळादरम्यान क्विक हीलने पुण्याबाहेरील अनेक मोठ्या शहरांमध्ये विस्तार करण्यास सुरुवात केली.
👇
आता त्यांची कंपनीने ‘एंटरप्राइज सोल्युशन्स’ व्यवसायात प्रवेश केला. कंपनी आता हळूहळू एक जागतिक ब्रँड म्हणून नावारुपास येऊ लागली.
2007 मध्ये कंपनीचे नाव बदलून ‘क्विकहील टेक्नोलॉजीज लिमिटेड’ (Quickheal Technologies Limited) असे करण्यात आले.
👇
2010 मध्ये कंपनीत Sequoia Capital कडून आलेल्या 60 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून देशभरात कंपनीच्या शाखा उघडण्यात आल्या.
तामिळनाडूतील शाखा उघडल्यानंतर पुढील दोन वर्षांत जपान, अमेरिका, आफ्रिका आणि यूएईमध्ये शाखा उघडून कंपनी खऱ्या अर्थाने ग्लोबल झाली.
👇
2011 मध्ये क्विकहीलने एंटरप्राइझ ग्राहकांसाठी सुरक्षा सॉफ्टवेअर विकसित करण्यास सुरुवात केली.
आज कंपनी रिटेल आणि एंटरप्राइझ या दोन्ही घटकांना उत्पादने पुरवते.
👇
प्रायव्हेट लिमिटेड ते पब्लिक लिमिटेड होणे हे कोणत्याही कंपनीसाठी महत्वाचा टप्पा असतो.क्विकहील बाबत असं झालं नसतं तरच नवल होतं.
2016 मध्ये 'क्विक हीलचा' आयपीओ आला आणि पहिल्या पिढीतील एका मराठी उद्योजकाची हि कंपनी बाजारात सूचीबद्ध झाली.कंपनीचं आजचं बाजारमूल्य बाराशे कोटी आहे.
👇
‘इंटेल’ (Intel) या जगप्रसिद्ध कंपनीची टॅगलाईन आहे,
‘इंटेल इनसाईड’.
कंपनीची आपल्या क्षेत्रावरील पकड इतकी मजबूत कि जगातील जवळपास प्रत्येक संगणकात इंटेलचा एखादा तरी भाग असणारच असा आत्मविश्वास त्या टॅगलाईन मधून दिसतो.
👇
हे सांगण्याचं कारण, कदाचित उद्या कदाचित परदेशात असताना तिकडे कुणाच्या लॅपटॉपची सुरक्षा ‘क्विकहील’ करत असल्याचं तुमच्या लक्षात आल्यास आश्चर्य वाटू देऊ नका,
कारण 'क्विक हील'चीही टॅगलाईन काहीशी अशीच राहिलेय.
"तुमच्या संगणकात कोण राहतं ? ‘क्विकहील’ कि व्हायरस ?"
😀
माहिती अनेकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या थ्रेडचं पाहिलं ट्वीट रिट्वीट करा. 👇🏽 #म
हीच कथा काहीशा विस्ताराने वाचायची असल्यास आमच्या वेबसाईटला भेट द्या.
अदानी समूहाची एनडीटीव्हीवर अप्रत्यक्ष पद्धतीने पकड.
अदानी समूहाची मीडिया कंपनी एएमजी मीडिया नेटवर्क्स लिमिटेड (AMNL) NDTVमधील 29.18% हिस्सा अप्रत्यक्ष पद्धतीने खरेदी करेल.
आजच्या मीडिया रिपोर्ट्समधुन ही माहिती समोर आलेय.अदानी ग्रुपने NDTV त स्टेक खरेदीची खुली ऑफर सादर केलेय.
👇🏽
विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड (VPCL) या AMG Media Networks Limited (AMNL) ची पूर्ण मालकीच्या उपकंपनीमार्फत हे अधिग्रहण केले जाईल.
आणि AMG Media Networks Limited (AMNL) ही अदानी एंटरप्रायझेसच्या मालकीची आहे.
👇🏽
या संदर्भात सादर करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, VCPL ला RRPR होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडमधील 99.5% स्टेक खरेदी करण्याचा अधिकार आहे. VCPL ने या अधिकारातून हिस्सा खरेदीचा निर्णय घेतला आहे.
RRPR होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड ही प्रवर्तक समूह कंपनी आहे.
👇🏽