वित्तंबातमी, वित्तसाक्षरता ! मते वैयक्तिक, शिफारस नाही. पुस्तके 👉🏽 https://t.co/WQQxDiaC8U
Oct 27, 2024 • 13 tweets • 2 min read
आर्थिक फसवणुकीचा नवीन फंडा (सत्यकथा)
गेल्या रविवारीची गोष्ट. दुपारी निवांत असताना एका जवळच्या मित्राच्या ओळखीच्या व्यक्तीचा कॉल आला. मार्गदर्शन आणि सल्ला हवाय, अशीच सुरुवात केली त्याने. प्रकरण समजून घेतलं ते थोडक्यात पुढीलप्रमाणे:
👇
तर, याची फसवणूक झाली होतीच, पण त्याहूनही पुढे म्हणजे त्याच्याकडून त्याच्या नकळत इतरांचीही फसवणूक करण्यात आली होती.
तसा हा माणूस पदवीधर होता, पण सध्या अत्यंत आवश्यक असलेली “ऑनलाइन फसवणूक जागरुकता” (Fraudulence Awareness) त्याच्याकडे नव्हती.
👇
Apr 18, 2024 • 15 tweets • 3 min read
𝗣𝗲𝗿𝘀𝗼𝗻𝗮𝗹 𝗙𝗶𝗻𝗮𝗻𝗰𝗲,10 𝗥𝘂𝗹𝗲𝘀.
अर्थात,
वैयक्तिक वित्तीय व्यवस्थापनाचे दहा नियम. #Thread
1) 72 चा नियम: विशिष्ट व्याजदरानुसार तुमची गुंतवणूक दुप्पट होण्यासाठी किती वर्षे लागतील हे जाणून घेण्यासाठी, 72 भागीले व्याजदर
उदा. 8% वार्षिक व्याजदर असल्यास, 72 / 8 = 9
👇
म्हणजे 8% दराने तुमची गुंतवणूक 9 वर्षांत दुप्पट होईल.
याच प्रकारे, अमुक वर्षांत किती व्याजदर असल्यास आपली गुंतवणूक दुप्पट होईल हे 72 च्या नियमाने कसं पाहावं?
समजा 6 वर्षांत गुंतवणूक दुप्पट हवी असल्यास, 72/6 = 12,
म्हणजे 6 वर्षांत गुंतवणूक दुप्पट हवी असल्यास व्याजदर 12% असावा.
👇
तुमच्याकडे नसलेला शेअर तुम्ही आधीच विकता.कारण तुमचा अंदाज तो शेअर खाली येईल असा असतो.आणि त्यानुसार किंमत घसरल्यावर तुम्ही शेअर खरेदी करता आणि व्यवहार पूर्ण होतो.
👇🏽
"आम्ही आमचा अहवाल प्रसिद्ध केल्यापासून पुढील 36 तासांत, अदानी आम्ही उपस्थित केलेल्या एकाही मुद्द्यावर बोलले नाहीत. आमच्या अहवालाच्या अखेरीस, 👇🏽 1/6 #Thread
आम्ही 88 सरळ प्रश्न विचारलेत ज्याद्वारे कंपनीला आपले म्हणणे पारदर्शकतेने मांडण्याची संधी होती.
पण आतापर्यंत अदानींकडून यापैकी एकाही प्रश्नाचे निराकारण करण्यात आलेले नाही. त्याऐवजी, अपेक्षेप्रमाणे, अदानींनी बढाया आणि धमक्यांचा अवलंब केला.
👇🏽
Dec 26, 2022 • 14 tweets • 5 min read
वर्षाला फक्त तीन अधिकचे हफ्ते तुमचं गृहकर्ज व्याजासहित परत करू शकतील ?
गृहकर्जाचा हफ्ता, जिथे कंपाऊंडिंगचा नियम तुमच्या विरोधात काम करतो.
पण या कर्जापोटी भरलेली रक्कम तुम्हाला अगदी व्याजासहित परत मिळाली तर ?
तुम्ही कधी स्वताला 'पोस्ट-डेटेड चेक' दिलाय ? तो सुद्धा काही वर्षे पुढील तारखेचा ?
आज आपण एका अशाच व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्याने आयुष्यातील एका संघर्षाच्या टप्प्यावर स्वतःला असाच पोस्ट-डेटेड चेक दिला होता, तो सुद्धा तब्बल दहा मिलियन म्हणजेच एक कोटी डॉलर्सचा.
👇 #Thread#म
हि गोष्ट आहे एका ख्यातनाम कलाकाराची जो आज हॉलीवूडमध्ये आघाडीचा अन् गुणी अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे.
पण एक काळ होता जेव्हा केवळ एक धडपड्या कलाकार अशी ओळख असणारा तो स्वतःला सिद्ध करू शकेल अशा एका संधीच्या शोधात होता.
त्या तरुणाचे स्वप्न होते उत्तम कॉमेडियन आणि अभिनेता होण्याचे.
👇
Dec 12, 2022 • 9 tweets • 3 min read
यूपीआयद्वारे चुकीच्या खात्यात पैसे पाठवले गेल्यास काय करावे?
तूमचे पैसे परत मिळविण्यासाठी खालील पर्यायांचा वापर करू शकता.
🔸जर तुम्ही GPay, PhonePe, Paytm सारख्या #UPI एपद्वारे हस्तांतरण व्यवहार केला असेल तर सर्वप्रथम त्या एपच्या ग्राहकसेवेशी संपर्क करून मदत मागू शकता. #म
👇🏽
🔸त्याच दरम्यान तुमच्या बँकेच्या हेल्पलाइनशी सुद्धा संपर्क साधून व्यवहाराची माहिती द्या.
याआधी तुमच्या फोनवर त्या चुकीच्या व्यवहाराद्वारे पैसे खात्यातून वजा झाल्याचा तुम्हाला बँकेकडून आलेला मेसेज जपून ठेवा. या मेसेजमधील तपशील रकमेच्या परताव्यासाठी आवश्यक ठरतात.
👇🏽
Dec 3, 2022 • 6 tweets • 2 min read
भारतीय रिझर्व्ह बँकेने 1 डिसेंबर 2022 पासून रिटेल डिजिटल रुपया ( e₹ ) ची किरकोळ वापरासाठी प्रायोगिक तत्वावर सुरवात केली आहे.
या डिजिटल चलनाला सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (#CBDC) असे नाव देण्यात आले आहे.
थोडक्यात पाहूया नक्की काय आणि कसा आहे डिजिटल रुपया.
🔶मोबाईल वॉलेटप्रमाणेच यात पेमेंट करण्याची सुविधा असेल.
🔶तुम्हाला बँकेतून डिजिटल रुपया खरेदी करावा लागेल. त्यानंतर तुम्ही वॉलेट ते वॉलेट असे व्यवहार करू शकाल.
👇
Nov 25, 2022 • 12 tweets • 4 min read
भारतीय प्रमाणवेळेनुसार ,
अमेरिकन बाजार किती वाजता सुरु होतं ?
युरोपियन बाजाराचे वेळापत्रक काय ?
एसजीएक्स निफ्टी किती वाजता बंद होतं ?
डाऊजोन्स आणि नॅसडॅक.. यातील स्टॉक एक्स्चेंज कोणतं आणि निर्देशांक कुठलं ?
#Thread 👇 #म
उद्या आपलं शेअर मार्केट कसं सुरुवात करेल याचा अंदाज बांधण्यासाठी आज संध्याकाळी अमेरिकन बाजाराची सुरवात कशी झाली आणि ते बंद होताना वाढीसह झाले कि घटीने ?
बरं एसजीएक्स निफ्टीची आताची स्थिती काय आहे ?
अगदी भल्या पहाटे तिथे काय परिस्थिती आहे ?
या बाबींचा अंदाज घ्यावा लागतो.
👇
Nov 24, 2022 • 5 tweets • 2 min read
ट्रेडिंगचा करिअर म्हणून विचार करत असाल तर. #Thread
🔸मित्रपरिवारात ट्रेडर म्हणून मिरवायला आवड असेल, अगदीच अनभिज्ञ असणाऱ्यांसमोर 'मार्केट टर्म्स' फेकणे तुम्हाला कूल वाटत असेल तर आताच मागे फिरा.
🔸कुणालाही आदर्श, गुरु वगैरे मानू नका, कुणाही सोबत तुलना नको
👇🏽
🔸प्रत्येकाची आव्हाने, शैली अन् भोवतालची परिस्थिती वेगळी असते.
🔸तुमची कौशल्ये वेळोवेळी अद्ययावत ठेवा.
🔸कॅश, फ्युचर्स की ऑप्शन्स ? त्यातही इक्विटी की इंडायसेस ? तुमचं मैदान निश्चित करा.इथे उगाचच ऑल-राऊंडर होण्याचा प्रयत्न करू नका.
👇🏽
Oct 27, 2022 • 21 tweets • 5 min read
युक्रेन आज धगधगतंय, पण आज भारतासह जगभरातील अब्जावधी लोकांच्या रोजच्या जगण्याचा भाग बनलेल्या एका शोधाची पाळेमुळे त्याच युक्रेनपर्यंत जातात.#Thread#म
गोष्टीसाठी तयार?
वर्ष 1992 चा काळ,अमेरिकेत बिल क्लिंटन यांनी जॉर्ज बुश सिनिअर यांचा पराभव करून अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली होती👇
आखात वरवर तरी शांत झाल्याचं भासत होतं, भारतापुरतं सांगायचं तर पंतप्रधान नरसिंह राव व अर्थमंत्री मनमोहन सिंह या द्वयींकडून खुलं आर्थिक धोरण नामक औषधाचा कडूजार डोस देशाच्या अर्थव्यवस्थेला देऊन झाला होता.
तसं बरच काही झालं होतं त्यावर्षी पण आपली आजची गोष्ट युक्रेनमध्ये सुरू होते.👇
Oct 25, 2022 • 5 tweets • 4 min read
पॅसिव्ह उत्पन्न हवं असेल तर आधी पॅसिव्ह #गुंतवणुक सुध्दा करायला शिका.
उदा.बेस्ट ऑफर शोधून अनेक युटीलीटी बिल्स ऑनलाईन भरणा, क्रेडिट कार्डचा स्मार्ट वापर करून वाणसामान खरेदी अशा अनेक प्रकारातून महिन्याकाठी काही शे रुपये वाचवता येतात.
👇🏽
Aug 23, 2022 • 6 tweets • 1 min read
अदानी समूहाची एनडीटीव्हीवर अप्रत्यक्ष पद्धतीने पकड.
अदानी समूहाची मीडिया कंपनी एएमजी मीडिया नेटवर्क्स लिमिटेड (AMNL) NDTVमधील 29.18% हिस्सा अप्रत्यक्ष पद्धतीने खरेदी करेल.
आजच्या मीडिया रिपोर्ट्समधुन ही माहिती समोर आलेय.अदानी ग्रुपने NDTV त स्टेक खरेदीची खुली ऑफर सादर केलेय.
👇🏽
विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड (VPCL) या AMG Media Networks Limited (AMNL) ची पूर्ण मालकीच्या उपकंपनीमार्फत हे अधिग्रहण केले जाईल.
आणि AMG Media Networks Limited (AMNL) ही अदानी एंटरप्रायझेसच्या मालकीची आहे.
👇🏽
Aug 23, 2022 • 22 tweets • 6 min read
जेमतेम दहावी झालेल्या त्या मराठी तरुणाने बघता-बघता उभारली हजार कोटींच्यावर बाजारमूल्य असलेली ग्लोबल कंपनी..
ऐकायचेय गोष्ट एका पहिल्या पिढीतील मऱ्हाटी उद्योजकाची ?☕️
गोष्ट आहे पुण्यातील, ऐंशीचं दशक होतं ते..
👇 #म#मीउद्यमी#Thread
दहावी उत्तीर्ण होऊनही औपचारिक शिक्षणात रस नसलेला सतरा अठरा वर्षे वयाचा कैलाश उच्च शिक्षण घेण्याऐवजी घराला आर्थिक मदत करण्याच्या इराद्याने पुण्यात एका इलेक्ट्रिक वस्तू दुरुस्त करणाऱ्या रिपेअर शॉपमध्ये काम करू लागला.
👇
Jul 24, 2022 • 5 tweets • 2 min read
कष्टाचं फळ मिळतंच !
एक गैरसमज.
अनेक 'मोटिव्हेशनल स्पीकर्स' कष्टाचं महत्वं नेहमी सांगत असतात, अर्थात त्यात त्यांचं अर्थकारण आहे.
कष्टाचं फळ मिळू शकतं हे खरंय, पण ते "मिळतंच" हे मात्र साफ खोटं.कष्ट महत्वाचेच यात दुमत नाही पण फक्त कष्टानेच फळ मिळतं असंही नाही. #Thread #म
👇
अनेकांना पटणार नाही पण जोरावर असलेलं नशीब आणि योग्य वेळी घेतलेली जोखीम हे दोन घटक या आपल्या "कष्टाचं "फळ मिळवून देण्यात महत्वाचे असतात.
यातील नशिबाचं महत्व समजून घेण्यासाठी बिल गेट्सबद्दल पैशाचे मानसशास्त्र अर्थात सायकोलॉजी ऑफ मनी या पुस्तकातील हा भाग वाचनीय आहे.
नक्की वाचा 👇