चीफ जस्टीस AN रे यांच्या कार्यकाळात रिव्ह्यू याचिकेच्या माध्यमातून केशवनांद प्रकरणातील निर्णय बदलण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला होता. 1976 साली सरकारने त्या निर्णयाचा अडथळा दूर...
करण्यासाठी घटनादुरुस्तीचा मार्ग निवडला आणि सर्वात वादग्रस्त अशी 42वी घटनादुरुस्ती केली. 42व्या घटनादुरुस्तीने घटनेत ईतके बदल केले होते कि तीला 'मिनी कॉन्स्टिट्युशन' म्हणुन ओळखले जाते. अर्थात यातील अनेक बदल सरकारला निरंकुश अधिकार मिळवून देण्यासाठी होते.
मिनर्वा मिल्स प्रकरण हे 42व्या घटनादुरुस्तीने अनु.368 आणि 31C मधे केलेल्या दुरुस्तीशी संबंधित आहे.
मिनर्वा मिल्स हि कर्नाटक मधील एक कापड गिरणी होती. 1971 साली सरकारने टेक्स्टाईल अंडरटेकिंग ऍक्ट नुसार गैरकारभाराचा ठपका ठेवत या कंपनीचे राष्ट्रीयकरण केले. 39व्या घटनादुरुस्तीने..
हा कायदा 9व्या परिशिष्टत समाविष्ट करण्यात आला होता. कंपनीच्या वतीने या राष्ट्रीयकरण कायद्याला आणि 42व्या घटनादुरुस्तीने अनु.368 व 31C मधे केलेल्या घटनादुरुस्तीला आव्हान देण्यात आले.
42व्या घटनादुरुस्तीने अनु.368 मधे दोन नवीन उपकलम समाविष्ट केले
- या घटनादुरुस्ती पूर्वी किंवा..
नंतर केलेल्या कोणत्याही घटनादुरुस्तीला कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येणार नाही.
- संसदेच्या घटेनच्या कोणत्याही तरतुदीत बदल करण्याच्या आधिकारांवर कोणतेही बंधन असणार नाही.
पाच न्यायधीशांच्या घटनापीठासमोर या प्रकरणाची सूनावणी झाली.
याचिकाकर्त्यांच्या वतीने नानी पालखीवाला..
यांनी मुद्दा मांडला कि अनु.368 मधील बदल हे केशवनांद निर्णयाचे पूर्णपणे उल्लंघन असून मूलभूत संरचना संकल्पनेशी विपरीत आहेत.
जुलै 1980 मधे सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी निर्णय दिला. जस्टीस YV चंद्रचूड 【सोबत जस्टीस उंटवालीया, AC गुप्ता, PS कैलासम】यांनी लिहिलेल्या बहुमताच्या..
निर्णयात सुरुवातीला अनु.368 मधील घटनादुरुस्ती अधिकारांवर कोणतेही बंधन नसण्याबाबत जे बदल करण्यात आले त्याच्या वैधतेचा विचार करण्यात आला. त्यांनी म्हंटले कि केशवनांद प्रकरणात न्यायालयाने संसदेच्या घटनादुरुस्ती अधिकारांवर मूलभूत संरचेचे बंधन घातले. 368 मधील या नव्या दुरुस्ती..
मागचा खरा उद्देश हे बंधन काढून टाकण्याचा आहे. नव्या तरतूदीने संसदेला व्यापक, अमर्याद असे अधिकार प्रदान केले आहेत.
घटेनच्या उद्देशिकेत नागरिकांना सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक व्यवस्थेचे आश्वासन देण्यात आले आहे. लोकशाही हि पोकळ स्वप्नवत कल्पना नाही.
ती एक अर्थपूर्ण संकल्पना आहे जीचे मूलभूत वैशिष्ट्ये उद्देशिकेत दिलेले आहेत जसे कि सामाजिक आर्थिक राजकीय न्याय, अभिव्यक्ती विचार श्रद्धा उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जा व संधी यांची समानता ई. व्यक्तीची प्रतिष्ठा, बंधुभाव आणि देशाची अखंडता हि उद्देशिकेत दिलेली ध्येय आहेत.
अनु.368 मधील हि घटनादुरुस्ती ज्या आधारांवर उद्देशिक उभी तेच आधार उध्वस्त करत आहे.
दुरुस्ती करण्याचा अधिकार म्हणजे उध्वस्त करण्याचा अधिकार नव्हे. घटनेने संसदेला मर्यादित घटनादुरुस्ती अधिकार दिलेले आहेत. या अधिकारांत संसद स्वतःचे अधिकार अमर्याद करू शकत नाही.
मर्यादित घटनादुरुस्ती अधिकार हा मूलभूत संरचनेचा भाग आहे. अनु.368 मधील नवी तरतूद मर्यादित घटनादुरुस्ती अधिकारांचे उल्लंघन करणारी आहे म्हणून घटनाबाह्य ठरते.
संसदेने केलेल्या घटनादुरुस्तीला कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येणार नाही अश्या स्वरूपाची तरतूद म्हणजे न्यायालयाचा..
पुनर्विलोकन अधिकार काढून घेणे आहे. कायद्याची वैधता ठरवणे हे न्यायधीशांचे कामच नव्हे तर कर्तव्य देखील आहे. या तरतूदीमुळे नियंत्रित घटेनचे रूपांतर अनियंत्रित घटनेत होईल. मूलभूत हक्कांसाठी दाद मागण्याचा हक्क निरर्थक होईल. हे घटनादुरुस्ती मर्यादांचे उल्लंघन असून..
अनु.368 मधील हि तरतूद देखील घटनाबाह्य ठरते असे जस्टीस चंद्रचूड यांनी स्पष्ट केले.
42व्या घटनादुरुस्तीने अनु.31C मधे बदल करून भाग 4 मधील कोणत्याही मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणी केलेला कायद्याला अनु.14 व 19 चे उल्लंघन या कारणास्तव रद्द करता येणार नाही अशी तरतुद करण्यात आली होती
[त्यापूर्वी असे सरंक्षण फक्त अनु.39 b & c मधील तत्वासाठीच होते]
पालखीवाला यांनी असा आक्षेप घेतला होता कि 31C मधील दुरुस्ती मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वे यातील समतोल बिघडवत असून यामुळे मूलभूत संरचेने उल्लंघन होते आहे.
जस्टीस चंद्रचूड यांनी 31C मधील दुरुस्ती च्या वैधतेचा विचार..
करताना लिहिले कि भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास आणि संविधान सभेतील चर्चा यावरून दिसून येते कि नागरिकांसाठि व्यक्तिस्वातंत्र्य हे अत्यंत महत्वाचे असून या स्वातंत्र्यांना घटेनचा अविभाज्य अंतर्भूत भाग म्हणून बघितले जाते.
मूलभूत हक्कांना समाजात अत्यंत मह्त्व असून केशवनांद..
प्रकरणात त्यांचे वर्णन घटनेचा अनन्यसाधारण अविभाज्य गाभा असे केले आहे. मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे एकत्रितपणे राज्यघटनेचा विवेक दर्शवितात जे की घटेनच्या पूर्ण योजनेवरून लक्षात येते. हे रथाच्या दोन चाकांप्रमाणे असून दोन्ही तितकेच महत्वाचे आहेत.
हे सामाजिक क्रांतीचे द्वि-सुत्र आहे. संविधान हे मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वांच्या संतुलित पायावर उभे आहे. यातील एकाला दुसऱ्यापेक्षा अतिरिक्त प्राधान्य दिल्याने संविधानाचे समतोल ढासळेल. मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वे यातील समतोल हा मूलभूत संरचनेचा एक भाग आहे.
अनु.13(2) मधे तरतूद आहे सरकारला कि मूलभूत हक्कांचे हनन करणारा कायदा करता येणार नाही. अनु.31C मधील नव्या घटनादुरुस्तीचा परिणाम असा होतो कि जरी कायदा अनु.14,19 मधील हक्कांचे उल्लंघन करत असला तरी तो मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी आहे या कारणाने त्यावर आक्षेप घेता येणार नाही.
अशाप्रकारे अनेक कायदे हे कुठल्यातरी मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणी साठी आहेत म्हणून सहजपणे जस्टीफाय केले जाऊ शकतात.
अनु.14 व 19 हे केवळ दिखाऊ हक्क नाहीत. लोकशाहीच्या योग्य व सुदृढ अंमलबजावणीसाठी ते गरजेचे आहेत. मूलभूत हक्कांचे हनन होत असल्यास कोर्टात दाद मागण्याचा हक्क..
अनु.32 मधे दिलेला आहे. असंख्य कायद्यांसाठी अनु.14 & 19 लागू होणार नसतील तर अनु.32 हे निरर्थक ठरेल.
अनु.31C मधील घटनादुरुस्ती हि अनु.32 अन्वये मूलभूत हक्कांच्या उल्लंघनासाठी दाद मागण्याचा हक्क कमी करण्याचा सोपा मार्ग आहे. या घटनादुरुस्तीचे स्वरूप अशाप्रकारचे आहे की यामुळे..
बेसिक मूलभूत स्वातंत्र्यांचे पूर्णपणे उल्लंघन होते.
अनु 31A प्रमाणेच 31C च्या वैधतेचा विचार करावा असा मुद्दा सरकारर्तेफे उपस्थित करण्यात आला होता. त्यावर 31A मधे जनहितार्थ विशिष्ट स्वरूपाच्या कायद्याना (जमीनदारी निर्मूलन कायदे) संरक्षण देण्यात आले आहे. मात्र अनु.31C मधे..
कुठलीही वर्गवारी केलेली नाही. अशाप्रकारे कुठलेही स्वरुप निश्चित नसलेल्या अमर्याद कायद्याना अनु.14 & 19 पासून संरक्षण दिल्यास मूलभूत स्वातंत्र्ये केवळ कागदोपत्री राहतील असे जस्टीस चंद्रचूड यांनी म्हंटले.
असिमीत अधिकारांचे नरक आणि टागोरांच्या कल्पनेतील 'स्वातंत्र्याचा स्वर्ग' यांच्या मधे केवळ घटनेचे तीन अनुच्छेद उभे आहेत. अनु.14,19 आणि 21. हे गोल्डन ट्रँगल आहे जे नागरिकांना घटनेच्या उद्देशिकेत नमूद उद्देशांच्या अंमलबजावणीद्वारे समतावादी समाजाचे आश्वासन प्रदान करते.
31C मधल्या घटनादुरुस्तीने या गोल्डन ट्रँगल मधील दोन बाजू (अनु 14 &19) काढून घेतल्या आहेत.
त्यामुळे अनु.31C मधील घटनादुरुस्ती हि घटेनच्या मूलभूत संरचना कसोटीचे उल्लंघन करते असे म्हणत न्यायालयाने घटनाबाह्य ठरवली.
केशवनांद प्रकरणात न्यायालयाने घटनादुरुस्ती अधिकारांवर मूलभूत संरचेचे बंधन आखून दिलें होते. मिनर्वा मिल्स प्रकारनात न्यायालयाने 'मर्यादित घटनादुरुस्ती अधिकार' हेच मूलभूत संरचेनचा भाग आहेत व कोणत्याही मार्गाने त्याचे उल्लंघन करता येणार नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट केले !!
2013 पासून PewDiePie हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राइबर काऊंट नुसार जगात एक नंबर होते. भारतीय चॅनेल टीसिरीज हे हळूहळू करत दोन नंबरवर पोहोचले आणि सुरू झाली या दोन चॅनेलमधे नंबर वन ची स्पर्धा.
अल्पकाळातच या स्पर्धेने राष्ट्रीय स्वरूप धारण केले आणि भारतीय चॅनेल जगात एक नंबर बनवण्यासाठी भारतीय नेटकऱ्यांनी जोरदार पाठिंबा दिला. या देशकार्यात टिसिरीज सबस्क्राइब करून हातभार लावला. परिणामी भारतीय चॅनेल टिसिरीज नंबर वन झाले आणि आजही आहे.
गौतम भाई अदानी मोठ्या मेहनतीने थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने जागतिक श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. त्यांच्यापुढे आहे अमेरिकन एलोन मस्क. या एलोन चे चाहते भारतात जरी असले तरी इथे मुद्दा देशाचा आहे.
#थ्रेडसिरीज
संविधानाची मूलभूत संरचना
The Basic Structure !
भाग चार - केशवानंद भारती केस (I)
गोलकनाथ प्रकरणात सुप्रीम कोर्टाने संसदेला मूलभूत हक्क संकुचित किंवा त्यात बदल करता येत नाही असा निर्णय देऊन सरकारचे हात बांधले होते. यानंतर दोन महत्वाच्या प्रकरणात कोर्टाने..
सरकारची पाठ जमिनीला टेकवली.
बँकांच्या राष्ट्रीयकरणाची सुरुवात तशी 1949 साली झाली जेव्हा RBIचे राष्ट्रीयकरणं झाले होते. पूढे 1955 साली इम्पेरियल बँक नॅशनलाईज करून SBI स्थापन करण्यात आली. 1967 नंतर प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरणं करण्याच्या मुद्द्याने पुन्हा उचल खाल्ली.
इंदिराची PM झाल्या होत्या आणि सोशालिस्ट धोरण आक्रमकपणे राबवण्यास सुरुवात झाली होती. बँक राष्ट्रीयकरणावरून इंदिरा गांधी आणि मोरारजी देसाई यांच्यात मतभेद झाले. मोरारजी यांचे मत होते कि बँका कायद्याने नियंत्रित कराव्यात तर इंदिराजी राष्ट्रीयकरणाच्या बाजूने होत्या.
#थ्रेडसिरीज
संविधानाची मूलभूत संरचना
The Basic Structure !
भाग तीन - संसदेच्या अधिकारांवर मर्यादा !
19व्या शतकाच्या मध्यात गोलकनाथ चॅटर्जी हे ख्रिश्चन धर्माची दिक्षा घेऊन बंगाल सोडून पंजाब मधे येऊन स्थायिक झाले होते. तिथे त्यांना स्कॉटिश मिशनरी ने रहायला थोडी जागा दिली होती.
कालांतराने त्यांची मुले हेंरी आणि विल्यम गोलकनाथ यांनी परदेशातून शिक्षण घेऊन परत आल्यावर तिथेच जवळपास पाचशे एकर जागा घेतली होती. पंजाब सरकारने Punjab Security of land tenures act,1953 अंतर्गत त्यातली सुमारे 420 एकर जागा सरप्लस लँड ठरवत ती अधिग्रहित करण्याचे आदेश दिले.
गोलकनाथ यांच्या तर्फे या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यांनी Punjab land tenures act हा कायदा आणि 17व्या घटनादुरुस्तीने हा कायदा नवव्या परिशिष्टात समाविष्ट केल्यामुळे या घटनादुरुस्तीच्या घटनात्मक वैधतेवर आक्षेप घेतला.
शंकरी प्रसाद केस मधे संसदेच्या घटनादुरुस्ती अधिकरांना सर्वोच्च न्यायालयाने संमती दिल्यानंतर सरकारने घटनादुरुस्ती करण्याचा सपाटा लावला. 1964 साली सरकारने 17वी घटनादुरुस्ती केली..
शंकरी प्रसाद निर्णयात न्यायालयाने अनु.31A आणि 31B वैध ठरवुन संपत्ती अधिग्रहण कायद्याना संरक्षण दिले असले तरी वेगवेगळ्या राज्यांच्या नव्या कायद्याना उच्च न्यायालयात आव्हान मिळत होते. काही प्रकरणात न्यायालयाने राज्यांचे कायदे रद्द केले होते.
यावर उपाय म्हणुन संसदेने 17व्या घटनादुरुस्तीने अनु.31A मधे उपकलम समाविष्ट करून मार्केट रेट नुसार मोबदला देऊन सीलिंग अंतर्गत येणाऱ्या जमिनी अधिग्रहित करण्यासाठी कायदे करण्याची तरतूद करण्यात केली तसेच नवव्या परिशिष्टात राज्यांचे 44 कायदे समाविष्ट करून त्यांना संरक्षण दिले.
#थ्रेडसिरीज
संविधानाचा मूलभूत गाभा
The Basic Structure...!
भाग 1 - First Case First Amendment !
संसदेला संविधानात दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे मात्र संविधानाचा मूलभूत गाभा, बेसिक स्ट्रक्चर मधे बदल करण्याचा करण्याचा अधिकार नाही हे सर्वांनी अनेकवेळा वाचले ऐकले असेलच..
हा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती प्रकरणात दिला होता हे देखील सर्वाना माहिती आहेच. हि थ्रेड सिरीज लिहिण्यामागचा हेतू एकूणच बेसिक स्ट्रक्चर हि संकल्पना काय आहे, याची पार्श्वभूमी काय होती, कोर्टात आणि कोर्टाबाहेर प्रकरण दर प्रकरण काय घडामोडी घडल्या..
केशवनांद भारती प्रकारनात नेमका निर्णय काय देण्यात आला आणि नंतरच्या काही प्रकरणात न्यायालयाने या संकल्पनेला भरीव स्वरूप कसे दिले ई. गोष्टीचा सविस्तर आढावा घेण्याचा आहे.
थोडक्यात 1951 ते 80 पर्यंतचा संसदेची, सुप्रीम कोर्टाची संविधानिक वाटचाल...!
उद्योगपती नवीन जिंदल यांनी 1993 साली त्यांच्या रायगड,म.प्रदेश येथील फॅक्टरी च्या आवारात राष्ट्रध्वज फडकवला होता. तिथल्या स्थानिक प्रशासनाने तुम्हाला अशाप्रकारे दररोज राष्ट्रध्वज लावण्याचा अधिकार नाही असे सांगत त्यांना मनाई केली.
यावर नवीन जिंदल यांनी उच्च न्यायालयात याचिका दखल केली कि राष्ट्रध्वज फडकवणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे आणि ध्वज संहिता हि घटनेच्या अनु.13 नुसार कायदा नाही त्यामुळे त्याद्वारे मूलभूत अधिकार नियंत्रित केले जाऊ शकत नाहीत. उच्च न्यायालयाने जिंदल यांना राष्ट्रध्वज लावण्याची परवानगी
दिली.
यावर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील याचिका दाखल केली. 2004 साली चीफ जस्टीस खरे यांच्या बेंचने याप्रकरणी निर्णय दिला.
न्यायालयाने निर्णयात सुरुवातीला राष्ट्रध्वजाचे महत्व अधोरेखित करताना म्हंटले आहे कि राष्ट्रध्वज हा देशाचे स्वातंत्र्य, आदर्श, आकांशा आणि यशाचं...