आज आपण गुंतवणुकीला उशिरा सुरवात केल्याने आपले किती नुकसान होते हे एका उदाहरणावरून पाहणार आहोत.चक्रवाढ व्याज कसे काम करते चला तर पाहुया:-
खाली दिलेल्या पहिल्या चार्ट मध्ये पाहू शकता :-
Thread
2) आपण जर 10000 रुपयेची गुंतवणूक #SIP ( Systematic Investment Plan ) द्वारे पुढील 120 महिन्यासाठी केली आणि परतावा 15% भेटला तर भविष्यातील मुद्दल 27.86 लाख असेल . यामध्ये आपण एक लक्षात घेतले पाहिजे की इथे आपण एकही SIP थकवलेली नाही पूर्ण 120 महीने 10000 रुपये गुंतवलेले आहेत .
3) पण, काही कारणास्तव एखादी SIP आपल्याकडून Bounce झाली तर भविष्यातील रक्कम ही 27.42 लाख असेल. पहिल्या regular SIP पेक्षा 44 हजार कमी - कारण 10000 Rs च्या SIP ची मुद्दल 120 महिन्याने आज 44 हजार झाली असती .
4) आता जर आपण गुंतवणुकीला 1 वर्ष उशिरा म्हणजे 12 महिन्यांनंतर SIP चालू केली तर किती रुपये आपले कमी होतील बघूया :-
5) हो बरोबर पहिले तुम्ही जर 12 महीने उशिरा गुंतवणुकीला सुरवात केली तर तब्बल 4.53 लाख रुपये मुद्दल मधून कमी होतात . बघितले तर 12 महिन्यामध्ये आपण स्वत: गुंतवलेली मुद्दल तर 1.20 लाख असती .
चक्रवाढ व्याजचा फायदा घ्याचा असेल तर जसे जमेल तसे गुंतवणुकीला लवकरात लवकर सुरवात करा ,
6) सातत्य ठेवा , तुमचे उत्पन्न जसे वाढेल तशी गुंतवणूक वाढवा , 10,15 वर्ष गुंतवणुकीला हात लावू नका चक्रवाढ व्याजाला त्याचे काम करू द्या .
🟡आर्थिक स्वातंत्र्य मिळविणे हे ध्येय नसून सुंदर आयुष्य जगण्याचा एक गुंतवणुकीद्वारे मार्ग आहे .🟡
धन्यवाद .
ARTHFREEDOM
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
2) Mr.A नावच्या व्यक्तीने वयाच्या ३१ वयापासुन १०००० महिन्याला गुंतवणुकीस सुरवात केली आणि त्याने असे ठरवले की माझे जसे Increment होईल तसे मी या १०००० मध्ये प्रत्येक वर्षी १०% या मध्ये additional रक्कम* वाढवत जाईल जसे –
पाहिल्यावर्षी १०००० ,
दुसर्या वर्षी – ११००० ( १००००*१०%) ,
3)तिसर्या वर्षी १२१०० ( ११०००*१०%) असेच पुढे चालू राहील ....
Mr. A ही गुंतवणूक पुढील १५ वर्ष करणार आहे आणि आपण अस गृहीत धरू की त्याने ही रक्कम काही Equity Mutual Fund, Debt Fund आणि Gold या मध्ये Asset Allocation करून Invest केली आणि त्याला यावर १०% परतावा भेटत आहे
एक सामान्य माणूस ज्यावेळेस आर्थिक नियोजनाबद्दल बोलतो त्यावेळेस अस गुहीत धरतो कि आर्थिक नियोजन करणे खुप कठीण काम आहे कोण बेरीज ,बाजाबाकी ,महागाई यांचे आकडेमोड करत बसणार
3) एक मध्यमवर्गीय माणुस आयुष्यभर पैसे कमावून पण तो मध्यमवर्गीय का राहतो ?
कारण तो गरज नसलेल्या अनेक वर्ष विविध प्रकारच्या Policies खरेदी करत राहतो जसे - Money Back , Endowment , Life Insurance जिथे या सगळ्या पॉलिसिंचा 20 वर्षेचा CAGR 5-6% आहे
✅ मध्यमवर्गीयांसाठी #INSURANCE + #RETURN अशी विमा योजना खरच फायदेशीर आहे का ? आणि एक मध्यमवर्गीय माणूस आयुष्यभर पैसे कमवून पण श्रीमंत का होत नाही त्याचे उत्तर 👇
2) खूप लोक विचारात होते की लाइफ insurance कोणता घेतला पाहिजे आणि का त्या सर्वांसाठी हा खूप महत्वाचा #Thread
जर मध्यमवर्गीय वर्गाने Insurance ( विमा योजना ) मध्ये गुंतवणूक करण्याऐवजी वेगळा(Seprate) जीवन विमा(Term Insurance) घेऊन उर्वरित रक्कम चांगल्या गुंतवणुकीच्या
3)पर्यायामध्ये गुंतवली तर त्याला कसा फायदा होऊ शकतो ते आपण पाहू .
एका चांगल्या नावाजलेल्या Insurance कंपनी कडून Mr. Kiran यांना काल एक फोन आला . त्यामध्ये एक चांगला व्यक्ती जो कि Senior Sales Manager आहे तो किरण यांना insurance बद्दल माहिती देत होता तसा तो बोलताना खुप अनुभवी
✅1) जर तुमचे लग्न झाले असेल आणि तुमच्यावर कोणी अवलंबून (Dependent) असेल 👨👩👧👧- ( पत्नी , मुले , आई -वडील ) तर पहिले Pure #टर्म_इन्शुरस खरेदी करा बाकीचे सर्व नंतर
✅ 2) कंपनी सोडून एखादा Private हेल्थ इन्शुरस घ्या जो की कधी Hospital Emergency आली तर तुमची कित्येक वर्षाची savings वाचवेन . पुढे सविस्तर Health Insurance बद्दल एक Thread पोस्ट करेन.
✅3) 6 महीने ते 9 महिन्याचा खर्च येवढा #आपत्कालीन_निधि ( Emergency Fund ) बनवा . उदाहरण समझा एखाद्या व्यक्तीचा महिन्याचा पगार 50000 आहे तर त्याच्याकडे 50000 x 6 महीने = 3 लाखाचा आपत्कालीन निधि असलाच हवा जो तो Job loss किवा घरात एखादी आर्थिक अडचण आली तर कमी येईन.
मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुण, पती व पत्नी आपले आर्थिक जीवन सुधारावे म्हणून खूप प्रयत्न करतात. उच्च शिक्षण घेऊन 3, 5 वर्षात चांगल्या मोठ्या पगारची नोकरीही मिळवतात 1) #Thread
2) पण, तरीही त्यांना आर्थिक स्वातंत्र्य ( #Financial_Freedom ) प्राप्त नाही करता येत. अगोदरच त्यांच्या लग्नात खूप खर्च झालेला असतो. खर्च येवढा असतो की , तो जर कोठे गुंतवला असता तर काही वर्षात त्यांना कॅश मध्ये स्वता:साठी घर घेता आले असते.
3) जेवढा पगार जास्त तेवढी त्यांची जीवनशैली ( #Lifestyle ) उच्च असते. जेव्हा खर्चाची वेळ येते तेव्हा ते सगळे केलेली मेहनत विसरून आयुष्य जगायला सुरवात करतात आणि काही काळाने म्हणजे लग्नाच्या एक दोन वर्षांनंतर नंतर एक हप्त्यावर