योजना यादव यांनी ही पोस्ट लिहिली आहे. त्यांनी घडलेला कथितय. त्या मेहता पब्लिशिंग हाऊस मध्ये संपादकीय प्रमुख आहेत.
ही हद्द झाली. अशक्य हद्द. सुधा मूर्तींच्या कार्यक्रमाचं नियोजन सुरू होतं. तेव्हापासून दिवसाला भिडेंकडून दोन तीन फोन येत होते. #म
१/९
सुधाताईंनी आधीच कुणाला भेटणार नसल्याचं सांगितलं होतं. पण हे महाशय हट्टाला पेटले होते. आम्ही ऑफिसवर फोन येत होते तेव्हाच नाही म्हणून सांगितलं होतं. पण त्यांनी त्यांचं हॉटेल शोधलं. सुधा मूर्ती यायच्या आधीच हे तिथं पोहोचले. परत गेले. #म#मराठी
२/९
सुधा मूर्ती दुपारी हॉटेलवर आल्या आणि रूमवर विश्रांतीला गेल्या. संध्याकाळी 5 ला कार्यक्रम होता. हे तीन वाजल्यापासून लॉबीमध्ये ठाण मांडून बसले. शेवटी सुधाताईना मी मागच्या दरवाज्याने बाहेर काढलं. #म#मराठी
३/९
त्या गाडीत बसताना भिडेंचे कार्यकर्ते पळत आले, तर तिथून आम्हाला अक्षरशः गाडी दामटायला लागली. त्या मला म्हणाल्या, कोण आहे ही व्यक्ती? त्यांना मी परिचय सांगितला. तर त्या थोड्या त्रासल्याच होत्या. म्हणाल्या, यांना मला भेटून काय करायचं आहे? ते त्यावेळी आम्हालाही माहीत नव्हतं. #म
४/९
आम्ही हॉलवर पोहोचलो. कार्यक्रम वेळेत सुरू झाला.
आमचा नेहमी प्रमाणे कार्यक्रम सुरळीत सुरू होता. तिकडे भिडेंचे कार्यकर्ते हॉल बाहेर जमा व्हायला लागले. तस पोलिसांना टेन्शन येऊ लागलं. पोलिसांना फक्त काही अघटित घडू नये म्हणून काळजी घ्यायची होती. #म#मराठी
५/९
म्हणून ते आमच्या मागे लागले की तुम्ही दोन मिनिट भिडेना त्यांना भेटू द्या. कार्यक्रमाच्या मध्यात वाचकांना सोडून सुधा ताईंना उठायचं नव्हतं. तरी त्या नाईलाजाने उठल्या. आणि वैतागून भेटायला गेल्या. त्याआधी त्यांनी मला त्यांचं वय विचारलं फक्त. #म#मराठी
६/९
फार वयस्कर असतील तर त्या नमस्कार करतात म्हणून. त्यांना पाहिल्यावर ते त्यांना फार म्हातारे वाटले म्हणून त्यांनी त्यांना नमस्कार केला.
सुधाताईंनी मला हॉटेलवर परत जाते वेळी सांगितलं की भिडे त्यांना म्हणत होते की त्यांना दीड तास बोलायचं आहे. #मराठी#म ७/९
सुधाताई म्हणाल्या माझ्याकडे दीड मिनिटापेक्षा जास्त वेळ नाही. नंतर आमची सुधाताईंचा फोटो वापरून कसा प्रोपौगंडा होईल यावरही बोललो. सुधाताई म्हणत होत्या, 'योजना, अग अशा लोकांशी आपण काय बोलणार. त्यांना भेटायचं असेल आणि आपल्याला शक्य असेल तर भेटून घ्यायचं. आणि सोडून द्यायचं' #म
८/९
आणि ANI सारख्या मीडियाने ही अशी बातमी देणं म्हणजे सगळ्यात दुर्दैव आहे.
योजना यादव यांनी त्यांची मूळ पोस्ट फेसबुकवरून डिलीट केली आहे. त्यामुळे आणखी संभ्रम निर्माण झाला आहे. @sudhamurty#म#मराठी
अनेकांनी @sudhamurty या ट्विटर खात्यावरील व्हिडिओची लिंक पोस्ट केली आहे. सुधा मूर्ती यांच्याकडून ते ट्विटर खाते त्यांचे नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर #योजना_यादव यांना ट्रोल केल्यामुळे आणि काही फोन कललमुळे त्यांनी ही पोस्ट डिलीट केली असल्याचे सांगण्यात येत आहे. #म#मराठी
सदरील प्रकरणात #सांगली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभिजित देशमुख यांनी बीबीसी मराठीला दिलेली प्रतिक्रिया महत्वाची वाटते. सोबत सविस्तर वाचनासाठी लिंक जोडली आहे. #म#मराठी#सुधा_मूर्ती
पण तिने सांगितलेल्या काही आठवणी आयुष्यभरासाठी काळजात घर करून बसलेल्या आहेत. त्यातली एक गोष्ट म्हसोबाची!
कधीकाळी पिकलं नाही म्हणून बांधावरून कोणत्या चुलत आज्याने म्हसोबाचा देव फेकून दिलेला. आजीने टोपी गमजा करून तो पुन्हा बसवला. #म#मराठी १/७
अन् पिकं भरभराटीला लागल्याचे ती सांगायची!
जेवढं रामाला अन् गावातल्या मारुतीला आजी-आज्यासारख्या माणसांनी मान दिला तेवढाच मान या बांधावरल्या आसरा, म्हसोबा, नर्सोबा, मरीआई, येडाई, काळूबाई दिवाळी पाडव्यानिमित्त रानात घातल्या जाणाऱ्या पांढऱ्या पांडवांना दिला. #म#मराठी
२/७
ज्याला मंदिर नाही, साधे छत, सन्मानाचे स्थान, प्रतिष्ठित नाव, कोणती वैशिष्ट्यपूर्ण उपाधी नाही, ज्याची कोणती आरती नाही. तरीही आमचे अव्याहत संरक्षण करणारी अन् जगण्याची प्रेरणास्थाने म्हणूनच आमचा शेतकरी बाप, आजा, पंजा अशा असंख्य पिढ्या त्याच्याकडं बघतात. #म#मराठी
३/७