1970 पर्यंत दरिद्री असलेल्या "कतार" देशाला "पेट्रोलियम, नॅचरल गॅस"चे घबाड सापडले. थोडक्यात त्यांनी जे स्वतः निर्माण केलं नाही ते अमेरिकन कंपन्यांच्या उत्खनन क्षमतेवर विकून पैसे कमावले. त्या देशाच्या "फिफा वर्ल्डकप" आयोजन खर्चाचे कौतुक करत, लिब्रांडू भारताला ज्ञान पाजळत आहेत. 1/7
ते लिब्रांडू 2010 मध्ये भारताने आयोजित केलेल्या (UPA सरकारच्या कृपेने, कलमाडीच्या नेतृत्वात) कॉमनवेल्थ मधील झालेल्या घोटाळ्याबाबत, साहेबांनी बालेवाडीच्या सिंथेटिक ट्रॅकवर गाड्या नेऊन केलेला खेळ सोयीने विसरले. तेच लिब्रांडू खेळाला मोदींनी कसे महत्व दिले पाहिजे हे सांगतायेत.🤣 2/7
तसेच कतारने फिफाच्या आयोजन उदघाटन सोहळ्यात ज्याप्रमाणे इस्लामिक कट्टरता दर्शवणारे सोहळे आयोजित केलेत, प्रेक्षकांना शरियतनुसार अनेक बंधने घातलीत, त्या पद्धतीने भारताने कुठलं आंतरराष्ट्रीय आयोजन करून रामायणासारखे हिंदू सांस्कृतिक कार्यक्रम केलेतर लिब्रांडूंच्या बुडाला आग लागेल. 3/7
बाकी कतारच्या शरियत बंधनांवर कुठल्या तथाकथित जागतिक वृत्तसंस्थेला, महिलावाद्यांना, LGBT ऍक्टिव्हिस्टला तीव्र विरोध दर्शवावा वाटला नाही. यातूनच लक्षात येते "बळी तो कान पिळी" व "पैसे फेको तमाशा देखो" हे दोन्ही सर्व भांड लोकांना लागू पडते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे खोटं असत. 4/7
कतार शक्य तिथं भारताला आडवा गेलाय. कतारचे जिहादप्रेम जग उघड आहे. त्यामुळेच भारतातून फरार झालेला झाकीर नाईक सारखा वैचारिक आतंकवादी कतारने #Qatar2022 फिफा वर्ल्डकपमध्ये बोकांडी बसवून घेतलाय. तसेच त्याच्या माध्यमातून कट्टरपंथी इस्लामचा प्रसार जागतिक स्तरावर करण्याचा प्रयत्न आहे. 5/7
खेळाच्या माध्यमातून कट्टर इस्लामचा प्रसार करण्याचा हा काय पहिला प्रयत्न नाही आणि शेवटचा सुद्धा नसेल. जंटलमेन गेम म्हणवल्या जाणाऱ्या क्रिकेटमध्ये नमाज पढण्याचा पायंडा आधीच घातला गेलाय, ते #ICC ला चालते. फक्त जेव्हा धोनी बलिदान बॅज असलेले ग्लोवस घालतो तेव्हा नियम आठवतात. 6/7
कतारने खेळासाठी 200B डॉलर्स खर्च केले हे अर्ध सत्य, फिफाच्या माध्यमातून कट्टर इस्लामला ग्लॅमर मिळवणे, धर्मप्रसार करणे हा सुद्धा उद्देश आहे. मग तुम्ही फिफासाठी बनलेल्या स्टेडियमची डिझाइन्स पहा, उदघाटनातील धार्मिक सोहळा, की धर्मांतरण पंटर झाकीर नाईक तिथं जाणे असो.
✍️ #मार्मिक 7/7
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
सध्या बॉलिवूडला उतरती कळा लागलेली आहे. हे मत एखाद दोन चित्रपट आपटल्याने तयार झालेलं मत नाहीये. तर कुठल्याच विचारधारेशी, राजकीय पक्षाशी काही देणंघेणं नसलेल्या व्यक्ती जेव्हा बॉलिवूड चित्रपटांबाबत फारसे उत्सुक दिसत नाही तेव्हा हे जाणवते. असेही नाही की लोकांकडे पैसे नाहीत.
परंतु लोकांना बॉलिवूडच्या थिल्लर चित्रपटांवर खर्च करायचा नाहीये. याबाबत प्रामुख्याने काही कारणे लक्षात घेतली तर बॉलिवूडचा हिंदुद्वेष व राष्ट्रविरोधी भावना जोपासणारे घटक कारणीभूत आहेतच. परंतु रसिक प्रेक्षक म्हणून ह्यासोबत मला अजून काही कारणे महत्वाची वाटतात.
बॉलिवूड म्हणजे एकतर उचलेगिरी किंवा अगदी चोथा झालेल्या त्याच कथानकांवर "त्याच तिकिटांवर केलेला तोच खेळ" त्यातल्या त्यात अगदी रद्दाड झालेले पन्नाशीचे हिरो व हिरोइन्स, त्यात अभिनयाचा मोठा अभाव तर आहेच आहे पण त्याची पुसटशी जाणीवही त्या कलाकारांना किंवा एकंदरीत बॉलिवूडला अजून नाही.
आघाडी सरकारकडे वीजबिल माफ करायला, शेतकरी कर्ज माफीला, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेण्याकरीता असलेल्या "सारथी शिष्यवृत्तीस" देण्यासाठी, सरकारी नोकर भरती करायला पैसे (निधी) नाही. परंतु दुसरीकडे धर्मनिरपेक्ष आघाडी सरकारला अल्पसंख्यांक समाजाला आकर्षित
करण्यासाठी कोटीच्या कोटी रुपये आहेत.
औरंगाबाद येथील हज हाऊस बांधणीसाठी ₹ २९.८८ कोटी निधीला मान्यता राज्यसरकारने दिली आहे. सहाय्यक अनुदाने (वेतनेतर) ₹ १२ कोटी निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे, त्यातील 30% निधी बांधकामासाठी "सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन
ऑफ महाराष्ट्र" कंपनीला वितरित करण्याची मान्यता देण्यात येत आहे.
तसेच वक्फ बोर्डच्या बळकटीकरणासाठी ₹ १५ कोटी व वक्फ बोर्डाच्या मालमत्तेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी यंत्रणा उभारणीस ₹ ३.८७ कोटी सुपूर्द करण्यात येत आहे.
डॉ.शीतलताई आमटे यांच्या निधनाची बातमी जशी इतरांसाठी धक्कादायक आहे, तशीच माझासाठीही आहे. त्या सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे त्या अनेक लोकांशी संवाद करायच्या हे कालपासून विविध सोशल पोस्टवरून लक्षात येतच आहे. माझीही इकडेच ओळख झाली होती, त्यानंतर नंबरची देवाणघेवाण आणि संवाद. 1/n
काही महिन्यांपूर्वी लोकसत्ताने ह्या वृत्तपत्रातत त्यांच्याविषयीचे दोन लेख प्रसारित झाल्यावर त्या व्यथित होत्या. त्यावेळी बोलताना "मोठे षडयंत्र आहे, महिला नेतृत्व नको असते अनेकांना, भ्रष्ट लोकांची साखळी आहे, राजकारणी जमिनीवर डाव लावून बसल्याचे बोलले होते"
स्क्रीनशॉट👇 2/n
"लोकसत्ता" वृत्तपत्राने त्यांच्यावर लिहलेल्या लेखाचे खंडन करणारे स्पष्टीकरण ताईंनी लोकसत्ताला पाठवूनही ते छापले जात नाहीये असे त्यांचे म्हणणे होते. त्या स्पष्टीकरण लेखाची pdf माझाकडे आहे व अजून बऱ्याच जणांकडे आहेच. त्यात डॉ. विकास आमटे यांचेही स्पष्टीकरणं छापण्याबाबत पत्र आहे.3/n
सध्या जगभरात कोरोना, भारत-चीन तणाव सोबतच नव्याने चर्चेत आलेला विषय म्हणजे टर्की देशातील इस्तांबूल शहरातील हाइया सोफिया संग्रहालय, आपल्याकडे जसा राम जन्मभूमी- बाबरी मस्जिद वाद जुना होता तसाच वाद आजही पाश्चिमेकडे "हाइया सोफिया"च्या रुपाने धगधगता आहे. #HagiaSofia 1/n
शेकडो वर्षांपूर्वी रोमन शासकांच्या ताब्यात असलेल्या ह्या भूभागात तत्कालीन रोमन राज्याने सध्या जिथे "हाइया सोफिया" इमारत आहे तिथे लाकडी चर्च बनवले, ते तेव्हाच्या युद्धात शत्रूंकडून जाळले गेले, पुन्हा लाकडी चर्च उभारले गेले तेसुद्धा युद्धात जाळण्यात आले.
2/n
नंतरच्या रोमन राजाने त्याच जागेवर पुन्हा भव्यदिव्य दगडी बांधकामातील अस चर्च उभारले, आपण "हाइया सोफिया" वास्तू म्हणून पाहतो ती तेव्हाच उभारलेली दगडी बांधकामातील चर्च आहे. परंतु नंतरच्या काळात युरोपात "ऑटोमन साम्राज्य" उदयास आले आणि त्यांनी वेगाने विस्तारही केला.
3/n
@OfficeofUT साहेब तुम्ही पूर्णपणे राजकीय व्यक्ती नाहीत आधीपासून म्हणून हे मनोगत मांडण्याचा प्रयत्न आहे.
तुम्ही कोरोनाशी लढण्यासाठी तुमच्या पातळीवर उपाययोजना करताय, परंतु दिवसेंदिवस त्या कुठेतरी कमी पडतायेत हे मान्य करा तुम्ही आता कृपया, अपयश मान्य करण्यात काही कमीपणा नाही.
अपयश मान्य केलेत तर ते दूर करण्यासाठी नव्याने प्रयत्न करण्याचे मार्ग मोकळे होतील. तुम्ही तुमच्या पातळीवर निर्णय घेतले त्याला जनतेने जमेल तेवढे सहकार्य केले, पोलीस, वैद्यकीय कर्मचारी, स्वयंसेवी संस्था यांनीही त्यात पूरक असे योगदान दिले. परंतु रोज नव्याने हजारात रुग्ण वाढतायेत.
त्यामुळे ह्या क्षणाला पारंपरिक राजकारण्यांसारखे न वागता संवेदनशील व्यक्ती म्हणून जनतेसमोर येऊन सद्यस्थितीची पूर्णपणे सविस्तर कल्पना द्या. मुंबईची परस्थिती खूप हाताबाहेर गेलेली आहे. तेथील नागरिकांना वाचवण्यासाठी का होईना मनाचा मोठेपणा दाखवून खुलेपणाने केंद्राकडे मदतीची मागणी करा.
"एक होत माळीण"
मध्यरात्री झालेली माळीण घटनेची बातमी तिथं जाणाऱ्या एस.टी. चालक वाहकामुळे दुसऱ्या दिवशी प्रशासनाला समजली. दुपारपर्यंत शेजारील तालुक्यांमध्ये सर्वत्र वाऱ्यासारखी ही बातमी पसरली होती. प्रशासकीय यंत्रणेची हालचाल सुरू झाली होती.
दुपारनंतर ह्या घटनेचे भीषण स्वरूप बातम्यांच्या माध्यमातून देशभर पसरले. आम्हीही मित्रपरिवार गाड्या काढून तिकडे निघालो. वाटेत वाडा-भीमाशंकर रस्त्यावर कधी नाही एवढं ट्रॅफिक लागलं. अनेक पर्यटक बाहेरून भीमाशंकरमध्ये माळीण घटना समजल्यामुळे लँड स्लाईडच्या भीतीने बाहेर पडण्यास सुरुवात
झाली होती. वाडा-भीमाशंकर मार्ग अरुंद असल्याने हे ट्रॅफिक काढून दिले नाहीतर परिस्थिती अजून अवघड बनेल ह्यामुळे प्रत्येकजण आपआपल्या परीने वाहतूक नियमनाचे काम करू लागला होता. आमचाही बराच वेळ अडकलेल्या गाड्यांना मार्ग करून देण्यात गेला. सोबतीला मुसळधार पाऊस कोसळत होताच.