उद्या आपलं शेअर मार्केट कसं सुरुवात करेल याचा अंदाज बांधण्यासाठी आज संध्याकाळी अमेरिकन बाजाराची सुरवात कशी झाली आणि ते बंद होताना वाढीसह झाले कि घटीने ?
बरं एसजीएक्स निफ्टीची आताची स्थिती काय आहे ?
अगदी भल्या पहाटे तिथे काय परिस्थिती आहे ?
या बाबींचा अंदाज घ्यावा लागतो.
👇
#शेअरमार्केट मध्ये बऱ्यापैकी स्थिरावलेल्यांसाठी वर सांगितलेलं नवीन नाही.
पण यातीलही अनेकजण किंवा बाजारात सुरुवात करू पाहणाऱ्यांचा याबाबत गोंधळ उडतो.
म्हणजे जगातील हे बाजार किती वाजता सुरु होतात?
त्यांच्या वेळा काय ?
महत्वाचे निर्देशांक कोणते ?
असे अनेक प्रश्न त्यांना पडतात.
👇
1) सुरुवात एसजीएक्स निफ्टीपासूनच करूया.
एसजीएक्स निफ्टी हे सिंगापूर स्टॉक एक्स्चेंजमध्ये सूचीबद्ध असलेलं भारतीय निर्देशांक निफ्टीचे डेरीव्हीटिव्ह असून त्याचे दैनंदिन व्यवहार 16 तास चालतात.जे भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 6.30 ते रात्री 11.30 पर्यंत चालू असतात.
👇
2)अमेरिकन शेअर मार्केट
नॅसडॅक व न्यूयॉर्क हे अमरिकेतील प्रमुख स्टॉक एक्स्चेंजेस असून एसएंडपी 500 अर्थात 'स्टँडर्ड एन्ड पुअर 500' (S&P 500) व डाऊ जोन्स (DowJones) हे दोन निर्देशांक आहेत.
जसे आपल्याकडे बीएसई व एनएसई हे स्टॉक एक्स्चेंजेस तर सेन्सेक्स व निफ्टी हे निर्देशांक आहेत
👇
अमेरिकन मार्केटचे व्यवहार भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 ते मध्यरात्री दीडपर्यंत चालतात.
3) युरोपियन मार्केट
यात युरोपमधील प्रमुख शेअर बाजारांचा समावेश होतो.जसं इंग्लंडचे लंडन स्टॉक एक्स्चेंज, जर्मनीचं डॉयच्च बोर्स, स्पेनचं बीएमई स्पॅनिश व युरोपियन युनियनचे ‘युरोनेक्स्ट.
👇
भारतीय प्रमाणवेळेनुसार युरोपियन बाजार सर्वसाधारणपणे दुपारी दीड वाजता सुरु होतात, जे रात्री दहा वाजेपर्यंत चालू असतात.
चीनचे ‘शांघाय स्टॉक एक्स्चेंज’, तैवानमधील ‘तैवान स्टॉक एक्स्चेंज’.तर दक्षिण कोरियातील ‘केआरएक्स कोरियन एक्स्चेंज’ यांचा समावेश आहे.
याच प्रमाणे सिंगापूर शेअर बाजारात भारतीय निर्देशांक निफ्टीवर बेतलेला एसजीएक्स निफ्टी हा निर्देशांक सुद्धा आशियाई बाजाराचा भाग आहे.
👇
विविध आशियाई देशातील बाजारांचा विचार करता भारतीय प्रमाणवेळेनुसार आशियाई बाजार सकाळी साडे पाच ते दुपारी साडे तीनपर्यंत सुरु असतात. आणि आधी सांगितल्यानुसार एसजीएक्स निफ्टी निर्देशांक मात्र 16 तास सुरु असतं.
👇
खालील तक्त्यात आपल्याला जगातील महत्वाचे शेअर मार्केट त्यांच्या निर्देशांकासह आणि त्यांच्या व्यवहाराचा दैनंदिन कालावधी भारतीय वेळापत्रकानुसार समजून घेता येईल.
सदर तक्ता तुम्ही तुमच्या मित्रपरीवारासोबत शेअर करू शकता. #म
माहिती आवडली असल्यास थ्रेडचं पाहिलं👇🏽 ट्विट रिट्विट करा. 🙏🏽 #म
युक्रेन आज धगधगतंय, पण आज भारतासह जगभरातील अब्जावधी लोकांच्या रोजच्या जगण्याचा भाग बनलेल्या एका शोधाची पाळेमुळे त्याच युक्रेनपर्यंत जातात.#Thread#म
गोष्टीसाठी तयार?
वर्ष 1992 चा काळ,अमेरिकेत बिल क्लिंटन यांनी जॉर्ज बुश सिनिअर यांचा पराभव करून अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली होती👇
आखात वरवर तरी शांत झाल्याचं भासत होतं, भारतापुरतं सांगायचं तर पंतप्रधान नरसिंह राव व अर्थमंत्री मनमोहन सिंह या द्वयींकडून खुलं आर्थिक धोरण नामक औषधाचा कडूजार डोस देशाच्या अर्थव्यवस्थेला देऊन झाला होता.
तसं बरच काही झालं होतं त्यावर्षी पण आपली आजची गोष्ट युक्रेनमध्ये सुरू होते.👇
तेच ते आज जळत असलेलं युक्रेन..
तर झालं काय होतं,
त्या वर्षी म्हणजे 1992 साली जॅन कौम नावाचा एक 16 वर्षांचा मुलगा युक्रेनमधून त्याच्या आई व आजीबरोबर अमेरिकेत कॅलिफोर्नियातील माऊंटन व्ह्यू या गावी आपली गरीबी व दारिद्र्य सोबत घेऊनच आला.
👇
उदा.बेस्ट ऑफर शोधून अनेक युटीलीटी बिल्स ऑनलाईन भरणा, क्रेडिट कार्डचा स्मार्ट वापर करून वाणसामान खरेदी अशा अनेक प्रकारातून महिन्याकाठी काही शे रुपये वाचवता येतात.
👇🏽
असे वाचलेले पाच-सहाशे रुपये बचत हीच कमाई अर्थात ‘सेव्हिंग इज अर्निंग’ या न्यायाने गुंतवणूक म्हणून वापरता येतात. आजच्या दराने असे पाच-सहाशे रुपये तुम्हाला महिन्याला 3 निफ्टीबीज देऊ शकतात.
👇🏽
अदानी समूहाची एनडीटीव्हीवर अप्रत्यक्ष पद्धतीने पकड.
अदानी समूहाची मीडिया कंपनी एएमजी मीडिया नेटवर्क्स लिमिटेड (AMNL) NDTVमधील 29.18% हिस्सा अप्रत्यक्ष पद्धतीने खरेदी करेल.
आजच्या मीडिया रिपोर्ट्समधुन ही माहिती समोर आलेय.अदानी ग्रुपने NDTV त स्टेक खरेदीची खुली ऑफर सादर केलेय.
👇🏽
विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड (VPCL) या AMG Media Networks Limited (AMNL) ची पूर्ण मालकीच्या उपकंपनीमार्फत हे अधिग्रहण केले जाईल.
आणि AMG Media Networks Limited (AMNL) ही अदानी एंटरप्रायझेसच्या मालकीची आहे.
👇🏽
या संदर्भात सादर करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, VCPL ला RRPR होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडमधील 99.5% स्टेक खरेदी करण्याचा अधिकार आहे. VCPL ने या अधिकारातून हिस्सा खरेदीचा निर्णय घेतला आहे.
RRPR होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड ही प्रवर्तक समूह कंपनी आहे.
👇🏽
दहावी उत्तीर्ण होऊनही औपचारिक शिक्षणात रस नसलेला सतरा अठरा वर्षे वयाचा कैलाश उच्च शिक्षण घेण्याऐवजी घराला आर्थिक मदत करण्याच्या इराद्याने पुण्यात एका इलेक्ट्रिक वस्तू दुरुस्त करणाऱ्या रिपेअर शॉपमध्ये काम करू लागला.
👇
इथे तो कॅल्क्युलेटर आणि रेडिओ, टेपरेकॉर्डरसारख्या त्या काळात लोकांच्या रोजच्या जगण्याचा भाग असलेल्या या वस्तू दुरुस्त करायचा.
ते वर्ष होतं 1985.कैलाशला त्याकाळी महिन्याला पगार होता 400 रुपये.दरम्यान दुकान मालकाने कैलाशला महिनाभरासाठी आपल्या मुंबईच्या दुकानात शिकण्यासाठी पाठवले.👇