दरवर्षीप्रमाणे 2020 मध्ये देखील देखील जंगलात जाण्याचे ठरवले. जंगलातला अनुभव हा वेगळाच असतो. परंतु त्या वर्षी जे काही बघितले ते मात्र अफाट आणि कल्पनेच्या बाहेर होते. लिहायचे म्हटले तर किती मोठे लिहावे लागेल याची कल्पना नाही.
बाकी जंगलांमध्ये आपल्याला गाड्या फिरवतात व ठराविक जागां पाशी जाऊन आपल्याला प्राणी दिसतात किंवा पक्षी दिसतात व त्याचा आनंद आपण घेत असतो व फोटो काढत असतो. परंतु चिपळूण जवळ कोकणातील ही जागा मात्र बाकी जंगल सफारी या कल्पनेच्या पूर्णपणे वेगळी व अत्यंत जबरदस्त आहे.
या ठिकाणी जाण्याचे आम्हाला अभिजीत (माझा भाऊ) ने सुचवले होते वर्षभरापूर्वीच. परंतु त्याचा विचार मात्र आम्ही आत्ता या वर्षी केला. जवळपास 40 एकर चे हे जंगल खाजगी मालकीचे आहे. निशिकांत तांबे म्हणजेच नंदू आणि तांबे परिवार यांनी हे जंगल अशा प्रकारे समृद्ध केले आहे की त्याला तोड नाही.
पुण्यावरून सर्वप्रथम आम्ही महाडला गेलो,माझ्या घरी वस्ती केली. महाडला जाताना ताम्हीणी घाटात सकाळी इतके प्रचंड वारे सुटले होते. त्याचे व्हिडिओ मी मागच्या पोस्ट मध्ये टाकले होते. तरी देखील त्याचे काही फोटो व्हिडिओ मी येथे टाकेन. महाडला गेल्यानंतर तेथे संध्याकाळी वाळण कोंड येथे गेलो.
कारण माझे काढलेले फोटो बघितल्यानंतर माझ्या ग्रुप मधील सर्वांना तिथे जायचे होते. अर्थात ती जागा प्रचंड सुंदर आहे व सर्वांना आवडली.
दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत आम्ही तांबे sanctuary येथे पोहोचलो.
रस्त्यावरूनच कल्पना आली की जन्म माणसापासून अत्यंत लांब अशा ठिकाणी ही जागा आहे. गेल्यावर ती जागा बघतानाच आम्ही भान विसरून गेलो होतो इतकी जबरदस्त झाडी लागली. आम्ही आमच्या गाड्या लावल्या. त्यानंतर नंदू यांनी आम्हाला चहा दिला.
बोलण्या मधूनच त्याने सर्वांचे मन जिंकून घेतले होते व आम्हाला काहीतरी जबरदस्त नवीन बघायला मिळणार आहे याची खात्री झाली.
त्यानंतर आम्ही जेथे राहणार आहोत ती जागा बघितली ते बघून तर अक्षरशहा चिन्मय अथर्व ओंकार या सर्वांनी आनंदाने किंकाळ्या मारलेले आहेत.
इतकी प्रचंड सुंदर जागा बांधलेले आहे राहण्याकरता व ती देखील जंगलाच्या कुशीत. जांभळा दगडामध्ये केलेले काम व जबरदस्त आर्किटेक्ट डोके लावून तयार केलेल्या रूम्स व त्यातील सुविधा बघितल्यानंतर मग खुश होऊन जाते. व रूमच्या दरवाजा समोर दिसणारे प्रचंड मोठे जंगल
त्यातून येणारे प्रचंड पक्ष्यांचे आवाज व त्याशिवाय पूर्ण नीरव शांतता हे म्हणजे स्वर्गीय सुख आहे.
त्यानंतर लगेचच आम्ही ते जंगल बघण्याकरता साडेचार वाजता निघालो. त्याआधीच नंदूने आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे काही बेडूक दाखवले कोळी दाखवले व त्याच प्रमाणे त्यांची माहिती देखील दिली. twitter.com/i/web/status/1…
जंगलामध्ये जाताना त्याच्या हातात एक बरणी होती व त्यामध्ये एक मण्यार होते. काळा जर्द पांढऱ्या रेषा असलेला अत्यंत सुंदर परंतु अत्यंत विषारी साप. तो बहुदा आदल्या दिवशीच तेथे घराभोवती सापडला होता व त्याला जंगलात नेऊन सोडायचे होते.
तो बहुदा आदल्या दिवशीच तेथे घराभोवती सापडला होता व त्याला जंगलात नेऊन सोडायचे होते.
त्याला आम्ही जंगलात सोडले व त्याचा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला परंतु अत्यंत चपळ असा तो झाडीमध्ये निघून गेला होता. त्यानंतर अंधार पडू लागला.
पूर्ण अंधार झाल्यावर आम्ही जंगलातील झाल्या पाशी गेलो जेथून पाणी वाहण्याचा अत्यंत सुंदर आवाज व रातकिड्यांचा आवाज येत होता. वाटेत विंचू बघितला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कोळी बघितले त्याचप्रमाणे सोल्जर 🐜 म्हणजेच मुंग्यांची अत्यंत शिस्तशीर असलेली एक प्रजाती बघितली.
याची सर्व माहिती नंदू आम्हाला इतक्या सविस्तर सांगत होता. प्रत्येक क्षणाला ज्ञानामध्ये नवीन भर पडत होती निसर्गाला जवळून बघण्याची व जाणून घ्यायची अजून इच्छा जागृत झालेले होती. सर्वांचे वेगवेगळे प्रश्न व त्यावर त्याला माहिती असलेली सर्व उत्तरे तो देत होता. जंगला बद्दलचे त्याचे ज्ञान
ज्ञान प्रचंड आहे इतकेच समजले. बाहेर कॉर्पोरेट लाईफ मध्ये किंवा शैक्षणिक क्षेत्रात किंवा कोणत्याही क्षेत्रात आपल्याला फक्त माहिती मिळत असते. ज्ञान मात्र फक्त निसर्गाच्या सान्निध्यात मिळते याची जाणीव झाली.
मी आणि नंदू बॅटरी घेऊन ओढ्यामध्ये शिरलो तेथे जवळपास माझ्या चेहर्या इतका मोठा किंवा त्याहून मोठा बेडूक बसला होता ज्याला बुल फ्रॉग असे म्हणतात. अवाढव्य बेडूक. त्याचप्रमाणे बिबट्याच्या पिल्लांची पाऊलखुणा चिखलामध्ये उमटलेले दिसले.
सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की कोठेही फिरताना नंदू एकच गोष्ट सांगत असतो ती म्हणजे कोणत्याही जंगलाच्या भागात फिरताना तेथील नैसर्गिक गोष्टींमध्ये ढवळाढवळ करायची नाही. रात्रीच्या त्या प्रचंड अंधारात देखील त्याचे लक्ष पायाखाली असणाऱ्या गोगलगाई त्याचप्रमाणे विविध प्रकारचे कोळी
कोणत्याही प्रकारे चिरडले जाणार नाहीत किंवा त्यांना आपल्यामुळे व्यत्यय येणार नाही याची काळजी तो घेत होता व आम्हाला देखील ती काळजी घेण्यास सांगत होता. ते जंगल व त्या पाऊल वाटा व त्या पाउल वाटांवर असणारे जीव याबद्दल त्याला खडानखडा माहिती आहे.
काही ठिकाणी गोगलगाई हाईबरनेट मध्ये जाण्याच्या प्रोसेस मध्ये होत्या. आणि त्यांचे कवच त्या तयार करीत होत्या.आपण बघतो तेव्हा त्या गोगलगाय पूर्ण कवच असलेल्या असतात. येथे मात्र काही गोगलगायी चे कवच 25 टक्के झालेले होते तर काहींचे 50 टक्के. व त्या सर्व गोगलगाईंची जागाही त्याला माहीत 🙄
कोळ्यांची प्रचंड मोठी मादी व ज्याप्रमाणे साप कात टाकतात त्याप्रमाणे गोळी आपला सर्व व वरील कवचापासून वेगळे होतात ते कवच होते. नर हा मादीपेक्षा इतका लहान असतो ते देखील बघितले. त्यांचा सेक्स होण्याची प्रोसेस बहुदा चालू होणार होती. हे सर्व कॅमेरा मध्ये टिपलेले आहे.
आम्हाला तर आधी असे वाटले की ती पिल्ले आहेत. परंतु ते नर होते. मादीला भूक लागली तर ती सेक्स केल्यानंतर नराला खाऊन टाकते. ते बघता आले नाही. कारण तेथेच थांबावे लागले असते. गवतातून जाताना खूप जपून जावे लागत होते कारण प्रचंड विषारी साप तेथे आहेत.
असे करत तब्बल 3 तास पूर्ण अंधारात आम्ही जंगलात फिरत होतो.खूपच भारी होते ते सगळे. मग रात्री जेवण देखील अगदी घरगुती आणि साधे. खूप चेपून जेवलो सगळेजण. जवळपास रात्रभर जागून काढली व्हरांड्यात बसून. कारण खाली जाऊ नका असे तो म्हणाला होता.साप असतात.
आम्ही त्याचे प्रात्यक्षिक गेल्याबरोबर मण्यार ल बघून घेतलेले होते.
रात्री कौलांवर ती सिव्हेट कॅट फिरते हे त्याने सांगितले होते. त्याप्रमाणेच आम्ही बसलो होतो, वर खुडखुड चालू झाली. ही एक जंगली मांजर आहे. अत्यंत लाजाळू असल्यामुळे व फारशी नजरेसमोर येत नसल्यामुळे तिचे फोटो मिळणे कठीण
त्याच प्रमाणे अजून एक गोष्ट ऐकून काहीजणांना धक्का बसेल ती म्हणजे जगातील सर्वात महागडी कॉफी बनवली जाते ती मिळते या मांजराच्या विष्ठेमधून. सर्वात महाग कॉफी आहे ती या जगात. त्यामुळे कॉफी प्रेमी या मांजराचे नाव नक्की ऐकून असतात.
रात्रभर पूर्ण शांत परिसर त्यामध्ये असणारे फक्त रातकिड्यांची किरकिर व नीरव शांतता आणि पौर्णिमेच्या आधीची रात्र असल्यामुळे पडलेले प्रचंड चांदणे. अशी रात्र म्हणजे दैवी.
दुसऱ्या दिवशी सकाळी पक्षी बघायचे होते त्याप्रमाणे प्रचंड पक्षी दिसले. म्हणजे जे जे पक्षी बघण्याकरता कैक लांब फिरून यावे लागते ते पक्षी घराच्या आजूबाजूला सर्वत्र होते जंगलांमध्ये जास्त लांब देखील जावे लागले नाही. प्रत्येकाचे फोटो येऊ शकले नाहीत कारण सूर्यप्रकाश किंवा प्रचंड झाडी.
असल्यामुळे फोटो काढण्यात येणाऱ्या अडचणी किंवा पक्षी अत्यंत उंच जाऊन बसल्यामुळे काही फोटो आले तरी त्यांना काही अर्थ राहत नाही त्यामुळे. परंतु खऱ्या निसर्गप्रेमी ला फोटो काढण्यापेक्षा इतक्या प्रकारचे पक्षी बघणे व त्यांची माहिती मिळणे जास्त महत्त्वाचे
त्यामुळे आम्ही प्रचंड खूश होतो. गरुड आपले नवीन घरटे बनवीत होता त्यासाठी लागणाऱ्या काड्या दुसऱ्या झाडावरून तोडून आपल्या घरट्याकडे नेताना एखाद-दुसरा फोटो आला. सर्व दिवस आम्ही आजूबाजूला फोटो काढण्यात घालवला.
रात्री आपल्या शहरात दिसणारच परंतु पटकन उडून जाणार आहे barn owl 🦉म्हणजे घुबड हे देखील अत्यंत स्पष्टपणे आमच्यासमोर होते. एक नर व मादी यांचे जोडपे.
त्या रात्री मात्र आम्ही मुले लवकर झोपलो परंतु मुली मात्र उत्साहाने व्हरांड्यात बसून पुन्हा एकदा जंगल अनुभवत होत्या. twitter.com/i/web/status/1…
हे जंगल म्हणजे मिनी ऍमेझॉन सारखेच आहे प्रचंड दाट त्यामधून वाहणारे पाणी त्याच्या आजूबाजूला असणारे प्रचंड कीटक पक्षी साप हे सर्वकाही.
अर्थात वेगवेगळ्या सीजन मध्ये दिसणारे पक्षी किंवा अगदी समोर येऊन बसणारे पक्षी वेगवेगळे असतात. त्यामुळे ज्यांना कोणालाही फोटोग्राफी करायची असते
त्यांच्यासाठी वारंवार अशा जागी जाणे फार महत्त्वाचे असते. त्यामुळे आम्हीदेखील तेथे आता जर दोन तीन महिन्याने जात राहणार आहोत हे नक्की.
या जंगलाची एडवर्टाइजमेंट तुम्हाला कोठेही दिसणार नाही कारण नंदूला या जंगलामध्ये नुसता टाईमपास म्हणून येणारे लोक नको आहेत.
त्यापेक्षा लोक न आलेले बरे असेच तो सांगतो. जंगलाबद्दल असणारा प्रचंड जिव्हाळा प्रेम त्या सर्व कुटुंबामध्ये दिसून येते. पपईचे इतकी प्रचंड झाडे आहेत परंतु घरातील कोणीही माणूस ते पपई खात नाहीत कारण ते पक्ष्यांसाठी आहेत असेच ते मानतात.
तेथील पाणी देखील पूर्णपणे नैसर्गिक आहे कोणत्याही नळाचे पाणी घ्या व प्या. कोणत्याही प्युरिफायर ची गरज नाही. जंगलामध्ये असताना त्या वाहणाऱ्या पाण्याचे पाणी पीत आम्ही पुढे जात होतो.
शहरात राहून प्रचंड पैसा कमावून येथे मोठ्या नोकऱ्या कमवून किंवा मोठी पदवी मिळवून काही हाताला लागत
नाही याची जाणीव तेथे गेल्यावर लगेच होते हे त्या जागेचे महत्त्व आहे. जवळपास 90 टक्के लोक जे काही करत असतात व आपण आहे त्यामध्ये आहोत यात वाद नाही. परंतु त्या गोष्टी पूर्णपणे निरर्थक आहेत याची जाणीव तेथे गेल्यावर होते. येथील पैसा गाड्या बंगले पार्ट्या या सर्व गोष्टी अत्यंत क्षुल्लक
व केवळ माणसाला विनाशाकडे नेतात याबद्दल माझ्या अजिबात दुमत नाही. अर्थात मी देखील त्याच प्रकारच्या आयुष्य जगत असल्यामुळे फक्त बाकीचं वर टीका करणे हा माझा हेतू नाही तर मला देखील कधीतरी या सगळ्या भानगडीतून बाहेर पडायची जबरदस्त इच्छा आहे
व हे सर्व बघितल्यावर त्या इच्छेला एका प्रकारे प्रोत्साहन मिळाल्यासारखे वाटते.
तेथून निघताना सर्वांनी ग्रुप फोटो काढला बॅगा हातात घेतल्या आणि तेवढ्यात एका सापाने बेडकाला पकडल्याचा आवाज आला. तशाच बॅगा खाली टाकून त्यातून भराभर कॅमेरे काढून सगळेजण ते बघण्याकरता गेले.
एकूणच माझ्या ग्रुपमधील सर्वजण या गोष्टींसाठी वेडेपिसे आहेत.
यानंतर मी काही व्हिडिओ वगैरे बनवणार आहे ते टाकेनच. परंतु या पोस्ट बरोबर काही सहज काढलेले फोटो टाकत आहे. अजून कॅमेरा मधून फोटो बघितले देखील नाहीयेत.
परंतु शक्य तेवढे येथे टाकायचा प्रयत्न करतो. खाली असलेले व्हिडीओ व फ़ोटो बघून तुम्हाला एकंदरीत अंदाज येईल ठिकाय जबरदस्त जागा आहे व काय जबरदस्त इच्छेने व प्रयत्नाने ती जपलेली आहे.
Hats off...
त्रिकाळ
(ही निव्वळ काल्पनिक भयकथा आहे. कोणत्याही जिवंत किंवा मृत व्यक्तीचा आणि घटनांचा याच्याशी कोठेही संबंध नाही)
भाग 1
कोकणा मधील एक गाव. तसे तुरळक वस्तीचे. भर पावसाळ्याचे दिवस होते. आधीच पुर येऊन गेलेला. यावेळचा पूर तसा भयानक होता. आजूबाजूच्या वस्त्यांमधील लोक वाहून गेले होते
बाजूच्या गावांमध्ये प्रचंड मोठी दरड कोसळली होती. भर रात्री. अख्खीच्या अख्खी कुटुंब पूर्ण डोंगराखाली गाडली गेली. आजूबाजूचे सर्व गावे व त्यामधील लोक निसर्गाच्या अशा प्रकारच्या रूपाला भेदरून गेले होते.
एकंदरीतच स्मशान शांतता होती. एकप्रकारची काळी विकृत सावली पडली होती.
या गावामधील रम्या तसा हुशार मुलगा आणि धाडसी देखील. दहावी मध्ये होता तो. फारशी कोणाची फिकीर नाही. त्याच्या घरी कधी पुराचे पाणी शिरत नसे. यावर्षी त्यानेदेखील स्वतःच्या घरात पाच फूट पाणी अनुभवले होते.
तुला कल्पना नाहीये की मी तुला भेटवस्तू देण्यासाठी काय काय नाही शोधले
कोणतीच गोष्ट बरोबर वाटत नव्हती भेटवस्तू म्हणून.
कारण
सोन्याच्या खाणीला सोन्याचा कण देऊन काय उपयोग?
आणि समुद्राला पाण्याचा थेंब देऊन काय उपयोग?
मी असेही म्हणू शकत नाही की माझं हृदय आणि आत्मा मी तुला देईन
कारण ते आधीच तुझं झालेल आहे
म्हणून मी तुझ्यासाठी आरसा आणलेला आहे.
त्यामध्ये स्वतःला बघ, मीच दिसेन.
रुमी....
हा अनुवाद आहे माझ्या एका आवडत्या कवितेचा. अर्थात ती कविता देखील इंग्लिशमध्ये अनुवाद केलेली आहे पर्शियन लैंग्वेज मधून. इंग्लिश मध्ये ही कविता वाचताना खूप छान वाटते. मराठीतले भाषांतर तेवढे खास वाटत नाही. खालील आहे इंग्लिश भाषांतर पर्शियन भाषेतून केलेले. किंवा मला जमले नाही नीट.
प्रसंग 1:
तुम्ही एका पर्वतावरील कड्यावर उभे आहात. पुढे अत्यंत कठीण असा रस्ता आहे. जेथे तुमच्या उजव्या बाजूला दरी आहे , डावीकडे दगडाची प्रचंड मोठी भिंत आणि रस्ता जेमतेम अर्ध्या फुटाचा.
आणि तुम्ही पुढे जायचा निर्णय घेता.
प्रसंग 2:
तुम्ही जंगलात उभे आहात. तुमच्या समोर वाघ आला. तुम्ही पळून न जाता वाघावर हल्ला करून स्वतःचा बचाव करण्याचा निर्णय घेता.
प्रसंग 3:
तुमचे तुमच्या मित्राबरोबर प्रचंड भांडण झाले. मारामारी झाली. आणि तुम्ही त्या मित्राची कधीही न बोलण्याचा निर्णय घेतला
हे तिन्ही प्रसंग स्वप्नातले आहेत.
आता तुम्ही या स्वप्नात कितीही निर्णय स्वतःच्या इच्छेनें घेतलेले आहेत असे तुम्हाला वाटत असेल तरी खरंच तसे आहे का?
कारण स्वप्नात डोंगर, दरी, पायवाट, वाघ, जंगल ही प्रत्येक गोष्ट मनाने तयार केलेली आहे.
अमावस्येची भुताटकी
2010 सालची गोष्ट आहे. त्यावेळेला मी अलिबाग मध्ये आरसीएफ थळ या कंपनीच्या एका कामासाठी अलिबागला राहत होतो. आरसीएफ कंपनीचेच गेस्ट हाऊस किहीम ला होते. तेथे मी आणि समिरन दत्ता म्हणून माझा ऑफिस मधील मित्र 3 महिने कामासाठी होतो.
शनिवार-रविवारच्या एका सुट्टीसाठी जुलै महिन्यात मी महाड ला आलो होतो. तेथून परत अलिबागला जाण्याकरता संध्याकाळची गाडी पकडली. जुलै महिन्यातला दिवस होते प्रचंड पाऊस होता. त्यामध्ये अमावस्येचा दिवस त्यामुळे पावसाचा जोर थोडा जास्तच होता.
एसटी महामंडळाची लाल गाडी थांबत थांबत साधारण पावणेबाराच्या सुमारास रात्री अलिबागच्या आधी एक कार्ले खिंड लागते तिथे आली. माझ्या गाडीचा ड्रायव्हर मला नेण्याकरता तिथेच येणार होता. मी कार्ले खिंडीच्या आधी एक तीठा आहे तिथे उतरलो.
एकाला स्वप्न पडले. त्याने ते मित्राला सांगितले. त्यावर मित्र म्हणाला "कायपण, असे स्वप्न पडूच शकत नाही, काहीही.. Prove कर तुझे स्वप्न."
आता तो काही स्वप्न मित्राला दाखवू शकत नाही. It's subjective experience.
देव नाहीच्चे आणि आहे तर दाखव म्हणणारे हे त्या मित्रासारखेच😂 #11pmWords