प्रसंग 1:
तुम्ही एका पर्वतावरील कड्यावर उभे आहात. पुढे अत्यंत कठीण असा रस्ता आहे. जेथे तुमच्या उजव्या बाजूला दरी आहे , डावीकडे दगडाची प्रचंड मोठी भिंत आणि रस्ता जेमतेम अर्ध्या फुटाचा.
आणि तुम्ही पुढे जायचा निर्णय घेता.
प्रसंग 2:
तुम्ही जंगलात उभे आहात. तुमच्या समोर वाघ आला. तुम्ही पळून न जाता वाघावर हल्ला करून स्वतःचा बचाव करण्याचा निर्णय घेता.
प्रसंग 3:
तुमचे तुमच्या मित्राबरोबर प्रचंड भांडण झाले. मारामारी झाली. आणि तुम्ही त्या मित्राची कधीही न बोलण्याचा निर्णय घेतला
हे तिन्ही प्रसंग स्वप्नातले आहेत.
आता तुम्ही या स्वप्नात कितीही निर्णय स्वतःच्या इच्छेनें घेतलेले आहेत असे तुम्हाला वाटत असेल तरी खरंच तसे आहे का?
कारण स्वप्नात डोंगर, दरी, पायवाट, वाघ, जंगल ही प्रत्येक गोष्ट मनाने तयार केलेली आहे.
तुम्ही स्वतः देखील त्या स्वप्नात तुमच्या मनानेच तयार केलेले आहेत. म्हणजेच थोडक्यात तुमच्या मनानेच ही सर्व रूपे या स्वप्नात घेतलेले आहेत.
तुमच्या समोर जो वाघ आला त्याची देखील तुमच्यासमोर यायची इच्छा झालेली असणार. तुमचा मित्र भांडत असेल त्याचे देखील स्वतःची तिथे कोणती इच्छा आहे असे तुम्हाला वाटते का?
मात्र स्वप्नामध्ये तुम्हाला स्वतःची इच्छा आहे असा फील तेथे जगताना देखील असतो व तुमच्या समोरच्या भांडणाऱ्या मित्राला देखील त्याची स्वतःची इच्छा आहे असे वाटत असते.
परंतु स्वप्नाच्या जगातून बाहेर आल्यानंतर काय?
त्यापेक्षा पुढे जाऊन जर विचार केला तर स्वप्नात मनानेच तुमचे रूप घेतले होते, वाघाच्या देखील व तुमच्या मित्राच्या देखील. म्हणजेच तेथे वेगळेपण जाणवत असेल तरी सगळे काही मनच होते. एक मनच काय हे अस्तित्वात होते. बाकी सर्व दिसणारे जाणवणारे एकप्रकारची माया होती. भास होता.
म्हणजे केवळ मन आणि मनच अस्तित्वात होते बाकी सर्व एका प्रकारे मृगजळ. तुम्ही स्वतः देखील, तो पर्वत, दरी, वाघ तुमचा मित्र या सर्व गोष्टी देखील. मग तिथे तुमची स्वतंत्र इच्छा असण्याचा कुठेही वाव आहे का?
सेम टु सेम इथे होत असते.
सर्वत्र फक्त ब्रह्म ही एकच गोष्ट अस्तित्वात आहे. ज्याला कोणी परमेश्वर नाव देते तर कोणी काय.. पण ते एक आणि एकच च तत्व अस्तित्वात. त्यामुळे..आपण सगळे, आपल्या आजूबाजूचे सगळे भास
So,
There is no Free Will
We feel that we have one.🙂🙏
त्रिकाळ
(ही निव्वळ काल्पनिक भयकथा आहे. कोणत्याही जिवंत किंवा मृत व्यक्तीचा आणि घटनांचा याच्याशी कोठेही संबंध नाही)
भाग 1
कोकणा मधील एक गाव. तसे तुरळक वस्तीचे. भर पावसाळ्याचे दिवस होते. आधीच पुर येऊन गेलेला. यावेळचा पूर तसा भयानक होता. आजूबाजूच्या वस्त्यांमधील लोक वाहून गेले होते
बाजूच्या गावांमध्ये प्रचंड मोठी दरड कोसळली होती. भर रात्री. अख्खीच्या अख्खी कुटुंब पूर्ण डोंगराखाली गाडली गेली. आजूबाजूचे सर्व गावे व त्यामधील लोक निसर्गाच्या अशा प्रकारच्या रूपाला भेदरून गेले होते.
एकंदरीतच स्मशान शांतता होती. एकप्रकारची काळी विकृत सावली पडली होती.
या गावामधील रम्या तसा हुशार मुलगा आणि धाडसी देखील. दहावी मध्ये होता तो. फारशी कोणाची फिकीर नाही. त्याच्या घरी कधी पुराचे पाणी शिरत नसे. यावर्षी त्यानेदेखील स्वतःच्या घरात पाच फूट पाणी अनुभवले होते.
तुला कल्पना नाहीये की मी तुला भेटवस्तू देण्यासाठी काय काय नाही शोधले
कोणतीच गोष्ट बरोबर वाटत नव्हती भेटवस्तू म्हणून.
कारण
सोन्याच्या खाणीला सोन्याचा कण देऊन काय उपयोग?
आणि समुद्राला पाण्याचा थेंब देऊन काय उपयोग?
मी असेही म्हणू शकत नाही की माझं हृदय आणि आत्मा मी तुला देईन
कारण ते आधीच तुझं झालेल आहे
म्हणून मी तुझ्यासाठी आरसा आणलेला आहे.
त्यामध्ये स्वतःला बघ, मीच दिसेन.
रुमी....
हा अनुवाद आहे माझ्या एका आवडत्या कवितेचा. अर्थात ती कविता देखील इंग्लिशमध्ये अनुवाद केलेली आहे पर्शियन लैंग्वेज मधून. इंग्लिश मध्ये ही कविता वाचताना खूप छान वाटते. मराठीतले भाषांतर तेवढे खास वाटत नाही. खालील आहे इंग्लिश भाषांतर पर्शियन भाषेतून केलेले. किंवा मला जमले नाही नीट.
दरवर्षीप्रमाणे 2020 मध्ये देखील देखील जंगलात जाण्याचे ठरवले. जंगलातला अनुभव हा वेगळाच असतो. परंतु त्या वर्षी जे काही बघितले ते मात्र अफाट आणि कल्पनेच्या बाहेर होते. लिहायचे म्हटले तर किती मोठे लिहावे लागेल याची कल्पना नाही.
बाकी जंगलांमध्ये आपल्याला गाड्या फिरवतात व ठराविक जागां पाशी जाऊन आपल्याला प्राणी दिसतात किंवा पक्षी दिसतात व त्याचा आनंद आपण घेत असतो व फोटो काढत असतो. परंतु चिपळूण जवळ कोकणातील ही जागा मात्र बाकी जंगल सफारी या कल्पनेच्या पूर्णपणे वेगळी व अत्यंत जबरदस्त आहे.
या ठिकाणी जाण्याचे आम्हाला अभिजीत (माझा भाऊ) ने सुचवले होते वर्षभरापूर्वीच. परंतु त्याचा विचार मात्र आम्ही आत्ता या वर्षी केला. जवळपास 40 एकर चे हे जंगल खाजगी मालकीचे आहे. निशिकांत तांबे म्हणजेच नंदू आणि तांबे परिवार यांनी हे जंगल अशा प्रकारे समृद्ध केले आहे की त्याला तोड नाही.
अमावस्येची भुताटकी
2010 सालची गोष्ट आहे. त्यावेळेला मी अलिबाग मध्ये आरसीएफ थळ या कंपनीच्या एका कामासाठी अलिबागला राहत होतो. आरसीएफ कंपनीचेच गेस्ट हाऊस किहीम ला होते. तेथे मी आणि समिरन दत्ता म्हणून माझा ऑफिस मधील मित्र 3 महिने कामासाठी होतो.
शनिवार-रविवारच्या एका सुट्टीसाठी जुलै महिन्यात मी महाड ला आलो होतो. तेथून परत अलिबागला जाण्याकरता संध्याकाळची गाडी पकडली. जुलै महिन्यातला दिवस होते प्रचंड पाऊस होता. त्यामध्ये अमावस्येचा दिवस त्यामुळे पावसाचा जोर थोडा जास्तच होता.
एसटी महामंडळाची लाल गाडी थांबत थांबत साधारण पावणेबाराच्या सुमारास रात्री अलिबागच्या आधी एक कार्ले खिंड लागते तिथे आली. माझ्या गाडीचा ड्रायव्हर मला नेण्याकरता तिथेच येणार होता. मी कार्ले खिंडीच्या आधी एक तीठा आहे तिथे उतरलो.
एकाला स्वप्न पडले. त्याने ते मित्राला सांगितले. त्यावर मित्र म्हणाला "कायपण, असे स्वप्न पडूच शकत नाही, काहीही.. Prove कर तुझे स्वप्न."
आता तो काही स्वप्न मित्राला दाखवू शकत नाही. It's subjective experience.
देव नाहीच्चे आणि आहे तर दाखव म्हणणारे हे त्या मित्रासारखेच😂 #11pmWords