तुला कल्पना नाहीये की मी तुला भेटवस्तू देण्यासाठी काय काय नाही शोधले
कोणतीच गोष्ट बरोबर वाटत नव्हती भेटवस्तू म्हणून.
कारण
सोन्याच्या खाणीला सोन्याचा कण देऊन काय उपयोग?
आणि समुद्राला पाण्याचा थेंब देऊन काय उपयोग?
मी असेही म्हणू शकत नाही की माझं हृदय आणि आत्मा मी तुला देईन
कारण ते आधीच तुझं झालेल आहे
म्हणून मी तुझ्यासाठी आरसा आणलेला आहे.
त्यामध्ये स्वतःला बघ, मीच दिसेन.
रुमी....
हा अनुवाद आहे माझ्या एका आवडत्या कवितेचा. अर्थात ती कविता देखील इंग्लिशमध्ये अनुवाद केलेली आहे पर्शियन लैंग्वेज मधून. इंग्लिश मध्ये ही कविता वाचताना खूप छान वाटते. मराठीतले भाषांतर तेवढे खास वाटत नाही. खालील आहे इंग्लिश भाषांतर पर्शियन भाषेतून केलेले. किंवा मला जमले नाही नीट.
You have no idea how hard I've looked for a gift to bring You. Nothing seemed right.
What's the point of bringing gold to the gold mine, or water to the ocean.
Everything I came up with was like taking spices to the Orient.
It's no good giving my heart and my soul because you already have these.
So I've brought you a mirror.
Look at yourself and remember me.
रुमी म्हणजे माझा आवडता गूढवादी सूफी संत आणि कवी. या सर्व कविता त्याने आपल्या गुरु साठी केलेल्या आहेत. त्याच्या गूढवादी आणि प्रेमाच्या कविता आज पूर्ण जगात आणि मुख्यतः अमेरिकेत आणि युरोपमध्ये सर्वात जास्त फेमस आहेत.
हल्ली कोणत्याही पिक्चर मध्ये प्रियकर आणि प्रेयसी साठी वापरल्या जातात आणि वाट लावतात त्यांची हा भाग निराळा.
रुमी म्हणजे अत्यंत फेमस इस्लामिक स्कॉलर त्या काळातील म्हणजे बाराव्या शतकातील. एके दिवशी बाहेर पडलेला असताना त्याला एक फकीर दिसतो काय. तो फकीर त्याला काही गूढ प्रश्न विचारतो.
त्याची उत्तरे रूम मी देण्याचा प्रयत्न करतो. परंतू खरी उत्तरे फकीरा कडून ऐकल्यावर मात्र रुमी कायमस्वरूपी त्याच्या पायाशी जाऊन बसतो.
तो फकीर म्हणजे कोठेही न थांबणारा आणि देशोदेशी फिरणारा असा अवलिया. शम्स - ए - तब्रिझी. त्याला त्या काळातील लोक " द बर्ड" म्हणून देखील ओळखायचे.
कारण कोणत्याही ठिकाणी निवास नाही सतत वेगवेगळ्या देशांमध्ये प्रवास चालू. त्याच्या कविता देखील प्रचंड जबरदस्त आहेत.
रूमी त्याला आपल्या घरी आणून ठेवतो काय त्यानंतर सर्व ठिकाणी फिरणारा फकीर एके दिवशी अचानक गायब होतो. रुमी प्रचंड व्याकूळ होतो आपला गुरु आपल्याला सोडून कुठे गेला.
आपल्या शिष्यांना रुमी आजूबाजूच्या सर्व देशांमध्ये पाठवतो मग त्याला त्याच्या गुरु चा पत्ता कळतो.
तो पुन्हा त्याला घेऊन येतो आणि आपल्या घरी ठेवतो. रुमी आणि फकीर यांच्यामधील घनिष्ठ संबंध आणि प्रेम यामुळे रुमीचे शिष्य आणि घरातील सर्वांचीच चिडचिड चालू होते.
प्रत्येक गोष्टीत फक्त त्याच्या गुरुलाच महत्त्व मिळत आहे हे बघून रुणिचे शिष्य आणि घरचे हे त्याच्या गुरूवर वैतागलेले असतात.
दोघांनी पुस्तक लिहायला घेतले असते अध्यात्मातील आणि भक्ती रस आणि प्रेम यांच्या वरील कविता . दोघेजण त्याबाबतचा बोलत बसलेले असतात आणि रूमीच्या गुरूला कोणीतरी
बाहेर बोलते म्हणून तो जातो. त्यानंतर तो कधीच रुमेलिआ आपल्या आयुष्यात दिसत नाही. असे म्हटले जाते की रूमीच्या मोठ्या मुलाने त्याचा खून केला. कारण तो खोलीतून बाहेर गेल्यानंतर एका जिन्याची थोडे रक्त दिसते तेवढेच.
रुमी शोकाने वेडा होतो. आपले अख्खे आयुष्य ते पुरलेले पुस्तक लेण्यांमध्ये घालवतो. त्यांची प्रत्येक कविता वेड लावणारी आहे. त्यामध्ये प्रचंड काकुळता भरलेली आहे प्रचंड प्रेम भरलेले आहे प्रचंड वेडेपणा भरलेला आहे.
खरेतर कविता हा माझा विषय अजिबात नाही परंतु 2008 ला मी सहज रुमी ला वाचायला घेतले आणि ते आजतागायत वाचतोच आहे. प्रचंड मोठे काम आहे त्याचे. पर्शियन भाषेतून इंग्लिश मध्ये केलेला अनुवाद हादेखील अत्यंत उत्तम आणि छान केलेला आहे.
मला पर्शियन कळत नाही परंतु त्याचे इंग्रजी भाषांतर वाचताना खरोखर मजा वाटते आणि आनंद मिळतो.
यावरून बाराव्या शतकामधील सुफी तोदेखील परश्या मधील त्याचे विचार हे भारतामधील भक्तियोग आणि अद्वैतवाद या दोघांनाही जोडणारे आणि मिळणारे आहेत.
याच रूमीच्या काही कविता मी खाली देत आहे इंग्रजीमधून ज्या मला आवडतात. तुम्हाला देखील आवडतील.
I: what about my eyes?
He: Keep them on the road.
I: What about my passion?
He: Keep it burning.
I : What about my heart?
He: Tell me what you hold inside it?
I : Pain and sorrow.
He: Stay with it. The wound is the place where the Light enters you.
हि कविता इतकी प्रचंड आवडते
#
Lovers don't finally meet somewhere. They're in each other all along.
#
Do you know what u are?
u are a manuscript oƒ a divine letter.
u are a mirror reflecting a noble face.
This universe is not outside of u.
Look inside urself;
everything that u want,
u are already that.
You think of yourself
as a citizen of the universe.
You think you belong
to this world of dust and matter.
Out of this dust
you have created a personal image,
and have forgotten
about the essence of your true origin
##
Making true love is not about feeling the skin,
It's about feeling the soul without touching.
##
"Out beyond ideas of wrongdoing
and rightdoing there is a field.
I'll meet you there.
When the soul lies down in that grass
the world is too full to talk about."
त्रिकाळ
(ही निव्वळ काल्पनिक भयकथा आहे. कोणत्याही जिवंत किंवा मृत व्यक्तीचा आणि घटनांचा याच्याशी कोठेही संबंध नाही)
भाग 1
कोकणा मधील एक गाव. तसे तुरळक वस्तीचे. भर पावसाळ्याचे दिवस होते. आधीच पुर येऊन गेलेला. यावेळचा पूर तसा भयानक होता. आजूबाजूच्या वस्त्यांमधील लोक वाहून गेले होते
बाजूच्या गावांमध्ये प्रचंड मोठी दरड कोसळली होती. भर रात्री. अख्खीच्या अख्खी कुटुंब पूर्ण डोंगराखाली गाडली गेली. आजूबाजूचे सर्व गावे व त्यामधील लोक निसर्गाच्या अशा प्रकारच्या रूपाला भेदरून गेले होते.
एकंदरीतच स्मशान शांतता होती. एकप्रकारची काळी विकृत सावली पडली होती.
या गावामधील रम्या तसा हुशार मुलगा आणि धाडसी देखील. दहावी मध्ये होता तो. फारशी कोणाची फिकीर नाही. त्याच्या घरी कधी पुराचे पाणी शिरत नसे. यावर्षी त्यानेदेखील स्वतःच्या घरात पाच फूट पाणी अनुभवले होते.
प्रसंग 1:
तुम्ही एका पर्वतावरील कड्यावर उभे आहात. पुढे अत्यंत कठीण असा रस्ता आहे. जेथे तुमच्या उजव्या बाजूला दरी आहे , डावीकडे दगडाची प्रचंड मोठी भिंत आणि रस्ता जेमतेम अर्ध्या फुटाचा.
आणि तुम्ही पुढे जायचा निर्णय घेता.
प्रसंग 2:
तुम्ही जंगलात उभे आहात. तुमच्या समोर वाघ आला. तुम्ही पळून न जाता वाघावर हल्ला करून स्वतःचा बचाव करण्याचा निर्णय घेता.
प्रसंग 3:
तुमचे तुमच्या मित्राबरोबर प्रचंड भांडण झाले. मारामारी झाली. आणि तुम्ही त्या मित्राची कधीही न बोलण्याचा निर्णय घेतला
हे तिन्ही प्रसंग स्वप्नातले आहेत.
आता तुम्ही या स्वप्नात कितीही निर्णय स्वतःच्या इच्छेनें घेतलेले आहेत असे तुम्हाला वाटत असेल तरी खरंच तसे आहे का?
कारण स्वप्नात डोंगर, दरी, पायवाट, वाघ, जंगल ही प्रत्येक गोष्ट मनाने तयार केलेली आहे.
दरवर्षीप्रमाणे 2020 मध्ये देखील देखील जंगलात जाण्याचे ठरवले. जंगलातला अनुभव हा वेगळाच असतो. परंतु त्या वर्षी जे काही बघितले ते मात्र अफाट आणि कल्पनेच्या बाहेर होते. लिहायचे म्हटले तर किती मोठे लिहावे लागेल याची कल्पना नाही.
बाकी जंगलांमध्ये आपल्याला गाड्या फिरवतात व ठराविक जागां पाशी जाऊन आपल्याला प्राणी दिसतात किंवा पक्षी दिसतात व त्याचा आनंद आपण घेत असतो व फोटो काढत असतो. परंतु चिपळूण जवळ कोकणातील ही जागा मात्र बाकी जंगल सफारी या कल्पनेच्या पूर्णपणे वेगळी व अत्यंत जबरदस्त आहे.
या ठिकाणी जाण्याचे आम्हाला अभिजीत (माझा भाऊ) ने सुचवले होते वर्षभरापूर्वीच. परंतु त्याचा विचार मात्र आम्ही आत्ता या वर्षी केला. जवळपास 40 एकर चे हे जंगल खाजगी मालकीचे आहे. निशिकांत तांबे म्हणजेच नंदू आणि तांबे परिवार यांनी हे जंगल अशा प्रकारे समृद्ध केले आहे की त्याला तोड नाही.
अमावस्येची भुताटकी
2010 सालची गोष्ट आहे. त्यावेळेला मी अलिबाग मध्ये आरसीएफ थळ या कंपनीच्या एका कामासाठी अलिबागला राहत होतो. आरसीएफ कंपनीचेच गेस्ट हाऊस किहीम ला होते. तेथे मी आणि समिरन दत्ता म्हणून माझा ऑफिस मधील मित्र 3 महिने कामासाठी होतो.
शनिवार-रविवारच्या एका सुट्टीसाठी जुलै महिन्यात मी महाड ला आलो होतो. तेथून परत अलिबागला जाण्याकरता संध्याकाळची गाडी पकडली. जुलै महिन्यातला दिवस होते प्रचंड पाऊस होता. त्यामध्ये अमावस्येचा दिवस त्यामुळे पावसाचा जोर थोडा जास्तच होता.
एसटी महामंडळाची लाल गाडी थांबत थांबत साधारण पावणेबाराच्या सुमारास रात्री अलिबागच्या आधी एक कार्ले खिंड लागते तिथे आली. माझ्या गाडीचा ड्रायव्हर मला नेण्याकरता तिथेच येणार होता. मी कार्ले खिंडीच्या आधी एक तीठा आहे तिथे उतरलो.
एकाला स्वप्न पडले. त्याने ते मित्राला सांगितले. त्यावर मित्र म्हणाला "कायपण, असे स्वप्न पडूच शकत नाही, काहीही.. Prove कर तुझे स्वप्न."
आता तो काही स्वप्न मित्राला दाखवू शकत नाही. It's subjective experience.
देव नाहीच्चे आणि आहे तर दाखव म्हणणारे हे त्या मित्रासारखेच😂 #11pmWords