ट्विटर आभाळ हेपल्या लोकांनी हे वाचा आणि मग राजकारण करा ..!👇👇
इथे माझे एक मित्र आहेत मागे जानेवारी 2022 मध्ये झालेल्या ग्रामपंचायतच्या टप्प्यात त्यांनी गावात सरपंच पदा साठी निवडणूक लढवली होती. त्यांचे #Twitter वर जवळपास 75 K अनुसारक आहेत.
मी पण त्यांचा प्रचंड मोठा अनुसारक आहे ,पण ते लहान लोकाकडे अजिबात लक्ष देत नाहीत. प्रकांड पंडित, विद्ववतेचा महामेरू, राजकीय , सामाजिक , जागतिक ,वैश्विक अश्या गोष्टीवर त्याचा प्रचंड असा अभ्यास ,राज्यातील किती तरी तरुणांना याचा फायदा होतो.
ते इतके हुशार आहेत की सांगता सोय नाही AC रूम मध्ये बसून आभाळ हेपलत असतात.
त्यांनी गावात सरपंच व्हावा अशी त्यांचा सर्वच अनुसारक लोकांची इच्छा होती मग त्यांनी गेल्या वर्षी फॉर्म भरला सर्वांनी त्याना आश्वस्त केले की आम्ही प्रत्येक जण आपल्या प्रचार साठी येऊ जमेल तशी तन मन धन यांनी
आपला प्रचार ,प्रसार करू सोबत वेडीओ, DTP ,डिजिटल माध्यमातून लागणारे सर्व साहित्य त्यांना विनामूल्य पोहच पण केला होता. तेव्हा क्राउड फंडिंग द्वारे गुगल पे वर पैसे जमा करून सरपंच पदांसाठी डिपॉझिट भरले पण होते.
गावाची लोकसंख्या जवळपास 8 K ते 10 K होती .तेव्हा आम्ही सर्व आशावादी होतो की महाराष्ट्रच्या राजकारण मध्ये एका नवीन विलासराव देशमुख यांचा उदय होईल अशी आशा होती .आणि आमच्या शापित मराठवाड्याच्या पदरीचा लोकनेत्याचा दुष्काळ संपणार होताच.
13 TMC भांडणारे आपण 13 मेम्बर ची ग्रामपंचायत सरळ एक पुढील पार्टीचे पानिपत करून जिंकू अशी समस्त भोळ्या भाबड्या सर्व अनुसारकाना प्रचंड आशावाद निर्माण करून गेली.
तर असो........
गावात फॉर्म भरून निवडणूक लढवली पण वॉर्डात 500 मतदान असताना मित्रांला 67 मत पडली ,
समाज माध्यमातून मिळालेल्या अनुसारकना हा प्रचंड मोठा धक्का होता.
ज्यांनी नुसत टिम्ब जरी ट्विट केलं तरी 2 k, 3 k लाईक असत तिथे हा पराभव जिव्हारी लागला. तेव्हा गावातील राजकारण मध्ये राजकारण करताना समाज माध्यमातून येणारे फॉलोवर्स ही खोटी आशा असते हे सोडून दिले पाहिजे.
गावाकडे एक म्हण आहे " पांदिला बसलेली लोक तुला बघुन उठत नाय...आणि तू गावगाडा हाक " तस समाज माध्यमातून मिळालेल्या फॉलोवर्स वर गाव काय कुट राजकीय बस्तान बसेल ही भोळी आशा आहे.वाटत तितकी ग्रामपंचायत सोपी नसते राजेहो....
मेहबूब भाई शेख ~युवकांचं नेतृत्व
मोठे बंधू , सहकारी मार्गदर्शक मित्र #महेबूब भाई शेख ज्यांना कसलाही राजकीय वारसा नाही, अगदी सामान्य कुटुंबातील निष्ठावंत कार्यकर्त्याला राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड करून राष्ट्रवादी पक्षाने न्याय केला होता
आणि पक्षाने केलेली निवड ही अगदी सार्थ ठरली. "न भूतो ना भविष्य असा युवक प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीला लाभला.
लहान वया पासून आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचारांनी भारावलेला एक तरुण महाराष्ट्र राज्याचा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष होतो ही बाब सामान्य नाही!
केलेली कित्येक आंदोलने, घेतलेली आक्रमक भूमिका, व कित्येक नेते भाजपामध्ये जात असताना लाचार न होता आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा विचार टिकला पाहिजे म्हणून भाजपच्या विरोधात खंबीर खिंड लढवणारा 'महेबूब शेख' नावाचा युवक राज्याचे प्रतिनिधित्व करत आहे.
त्यासाठी कलमं कोणती कोणती लावली आहेत बघा.
कलम 307 - खुनाचा प्रयत्न
कलम 355 - जबर दुखापत पोहोचविणे
कलम 353 - लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी हल्ला करणे.
कलम 294 - कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा त्याबद्दल कोणतेही अश्लील गाणे, नृत्यगीत किंवा शब्द गातो किंवा उच्चारतो
कलम 500 - अब्रुनुकसानी
कलम 501 - अब्रुनकसानीकारक असल्याचे माहीत असलेले साहित्य छापणे किंवा कोरणे
कलम 120 ब - अपराधिक षडयंत्र रचणे
कलम 34 - समान उद्देश साध्य करण्याकरिता अधिक व्यक्तीनी केलेल्या कृती.
अजून चार पाच कलमं होती ती टाकली नाहीत पण ती सुद्धा अशीच बेडकाचा बैल केल्यासारखीच आहेत.
या गड्याने विनयभंग आणि बलात्काराची कलमं तेवढी लावायची शिल्लक ठेवली आहेत,
महाराष्ट्रात जी सत्तेची रस्सीखेच चालू आहे तिला हिंदुत्वाचा रंग देण्याचा प्रयत्न केला चालला आहे.. आणि हा प्रयत्न करणारे हिंदुत्वाचे चौथे दावेदार बनले आहेत.. सेना, भाजप, राज ठाकरे आणि आता हे एकनाथ शिंदे..
मुखी हिंदुत्व तर आहे पण लेखी वेळ, निधी, बडवे, उपलब्धता, काँग्रेस, राष्ट्रवादी अशी खरी कारण दिली गेली आहेत.. कुठेही हिंदुत्वाशी प्रतारणा केल्याचा उल्लेख नाही.काँग्रेस राष्ट्रवादी सोबत युती करणं ही काही हिंदुत्व शिवसेनेने सोडल्याच किंवा हिंदुत्वाशी प्रतारणा केल्याच प्रमाण होत नाही.
कारण राजकिय पक्ष हा हिंदू, अहिंदू नसतो..
हे सगळं दाखवण्यासाठी चाललं आहे हे लहान लेकराला ही कळत हे या घोडम्यांना कळायला हवं.. जी असतील ती खरी कारण सांगावीत आणि विषय मिटवावा..
मी माझ्या विधानपरिषद निवडणूक निकालाच्या लेखात लिहिलं होतं की फुटन हे काही शिवसेनेला नवीन नाही..
काही वर्षांपूर्वी मी शिवसेनेला ट्रोल करायचो. त्यांची अस्मिता, स्वाभिमान वगैरे सगळं ढोंगी वाटायचं. "मुका घेतला तरी युती करणार नाही", असे म्हणत शिवसेना प्रत्येक निवडणुकीत युती कायम ठेवायची. त्यांच्या मंत्र्यांचं "खिशात राजीनामा घेऊन फिरतो", असं सांगणं पण हास्यास्पद वाटायचं.
भाजपला देशभरात मिळालेलं पाशवी बहुमत पाहून शिवसेना युतीत धाकटा भाऊ बनून आनंदाने राहील असं वाटायचं. उद्धव ठाकरे नेभळट वाटायचे. याच काळात मोदींना आव्हान देतील, असे मानले गेलेले समाजवादी नितीश कुमार, काँग्रेसी सिंधिया वगैरे लोकांनी भाजपच्या आक्रमणासमोर सपशेल नांगी टाकली.
पण उद्धव ठाकरे पंचवीस वर्षांची युती तोडून भाजप विरोधात उभे राहिले! तिथे पहिल्यांदा धक्का बसला. नंतर कोरोनाच्या काळात त्यांनी जनतेशी साधलेला संवाद आणि पारदर्शकता ठेवून केलेलं काम पाहून हा माणूस आवडू लागला.
कोणत्याही पुरानात किंवा इतिहासात नसलेला मात्र शेकडो वर्षाची परंपरा असलेला एक सण म्हणजे येळवस म्हणजे वेळाआमावस्या...
हा सण हिरवाईचा अपूर्व सोहळा... 2 जानेवारी रोजी अख्ख्या लातूर जिल्ह्यातील शेतात भरेल, यावेळी कोरोनाचे संकट आहे, त्यामुळे प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर
केल्या आहेत, त्या सांभाळून वेळाआमावस्या साजरी होईल. त्या विषयी महाराष्ट्राला समजावे म्हणून हा लेख प्रपंच...!!
कसा असतो सोहळा…!!
वेळाआमावस्या चार दिवस अगोदर साधनाची जमवा-जमव सुरु होते. त्यात तुरीच्या शेंगा, चवळी,भुईमूग हा सगळा रानमेवा जमा होतो...