फुटबॉल विश्वचषकाच्या ९२ वर्षांच्या इतिहासातील दुसराच खेळाडू, ज्याने अंतिम फेरीत हॅट्ट्रिक गोल केला.
अर्जेंटिनासमोर ७९ मिनिटे गुडघे टेकलेल्या संघाचे एमबाप्पेने सिंहात रूपांतर केले.
बर्याचदा चित्रपटांमध्ये शेवटच्या क्षणी नायक येतो आणि सगळा खेळ फिरवतो.
८० व्या मिनिटाला अर्जेंटिनाच्या खेळाडूच्या चुकीमुळे फ्रान्सला पहिली पेनल्टी मिळाली आणि एमबाप्पेने चेंडू गोलपोस्टमध्ये मारला. मेस्सीच्या पहिल्या विश्वचषक विजयाच्या सेलिब्रेशनची वाट पाहत जगाने श्वास घेतला होता.
हा गोल करण्यापूर्वी एमबाप्पेने FIFA विश्वचषक २०२२ मध्ये फक्त पाच मैदानी गोल केले. या विश्वचषकातील पेनल्टीवरील त्याचा हा पहिलाच गोल होता. अंतिम फेरीचा थरार शिगेला पोहोचला होता. मेस्सीच्या समर्थकांना काही समजण्यापूर्वीच अवघ्या ९७ सेकंदात त्याचे संपूर्ण जग हादरले.
एमबाप्पेने वन मॅन आर्मीप्रमाणे हाफलाइनमधून बॉल एकट्याने नेण्यास सुरुवात केली. अर्जेंटिनाचा एकही बचावपटू त्याला रोखू शकला नाही. गोलपोस्टच्या डाव्या कोपऱ्यात तळाशी असलेला फटका मारला आणि गोल झाला. सामना २-२ असा बरोबरीत सुटला. फुटबॉल विश्वचषकाची अंतिम फेरी अधिकच रोमांचक झाली होती.
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो प्रेक्षक गॅलरीत बसले होते, एमबाप्पेच्या खेळाने मॅक्रो आणि फ्रेंच प्रेक्षकांना आता विजय दिसू लागला होता. सध्याच्या फुटबॉल विश्वातील २ सर्वोत्कृष्ट खेळाडू समोरासमोर होते त्यामुळे दोघांपैकी कोणीही कसलीही कसर सोडणार नाही याची खात्री होती.
अतिरिक्त वेळेतल्या पहिल्या हाफ मधे मेस्सीने १०८ व्या मिनिटाला गोल करून अर्जेंटिनाला सामन्यात ३-२ अशी आघाडी मिळवून दिली.
अतिरिक्त वेळेत फक्त १२ मिनिटे शिल्लक होते, अर्जेंटिनाचे बचावपटू कोणत्याही परिस्थितीत गोल होऊ देणार नाहीत असं वाटत होतं.
पण परत एकदा ११८ व्या मिनिटाला पुन्हा गेम पलटला, एमबाप्पेचा फटका अर्जेंटिनाचा खेळाडू गोन्झालो मॉन्टिएलला लागला आणि त्याच्या बदल्यात फ्रान्सला पेनल्टी मिळाली. एमबाप्पेने चेंडू गोलपोस्टच्या आत ढकलला आणि सामन्यात ३-३ अशी बरोबरी झाली.
विशेष म्हणजे या विश्वचषकात फायनलपूर्वी एमबाप्पेने ५ गोल केले होते आणि पाचही मैदानी गोल होते. एमबाप्पेने वर्ल्ड कप फायनलमध्ये पेनल्टीवर २ गोल केले.
या युवा खेळाडूने टीमवर आलेली वेळ आणि परिस्थिती क्षणात बदलली होती. परिणामी पेनल्टी शूटआऊटमध्ये विजेता ठरणार होता.
किलियन एमबाप्पेने आपल्या संघाकडून पहिला अटेम्प्ट केला आणि बाॅल गोलपोस्ट मधे पोहोचवला. त्यानंतर फ्रान्सच्या दोन खेळाडूंना सलग शूटआऊटमध्ये एकही गोल करता आला नाही आणि परिणामी फ्रान्सचा पेनल्टी शुट-आउट मधे ४-२ असा पराभव झाला.
मेस्सीचा हा बहुधा शेवटचा विश्वचषक असावा; त्यात त्याने त्याचं स्वप्न पुर्ण ही केलं.
पण पुढील ३ विश्वचषक जिंकण्याच्या इराद्यानेच एमबाप्पे मैदानात उतरेल आणि तेव्हा संपूर्ण जगाला कालच्या एमबाप्पेच्या खेळाची आठवण येत राहील."❤🙌🔥
'जुन्नर तालुक्याचा ताजमहाल म्हणजेच हापूसबागचा हबशी घुमट किंवा सौदागर घुमट.'
१७ व्या शतकातील निजामशाही राजवटीतील मुघलकालीन स्थापत्य शैलीचा एक अनोखा नमुना.
आफ्रिकेतील हाबसन प्रांतातून आलेल्या निजामशाहाचा वजीर मलिकांबर जुन्नर येथील हबशीबाग येथे वास्तव्यास होता.
आज याच हबशीबागचा उल्लेख हापुसबाग असा करण्यात येतो.
ऊंचच ऊंच 55 फुट रुंद व 60 फुट लांब कोरीव शिळेतील चौरसाकृती ही वास्तू लक्ष वेधून घेते.
साधारण 50 फुट ऊंचीच्या नक्षीदार भिंतीवरील कमानीवर 30 फुट उंच असलेला वरील घुमट अलगद तोलुन धरल्याचे एक उत्कृष्ट उदाहरण पहावयास मिळते...
आतील भागात ९ समाध्या असुन. येथे आपण जोरात आवाज दिला तर त्या ध्वनिचे ९ पडसाद पुन्हा पुन्हा त्याच वेळी ऐकू येतात. व याच आतील भिंतीवर कुराणातील आयते कोरल्याचे निदर्शनास येते.
या वास्तूचा मलिकांबरशी संबंधीत कुण्या मोठ्या असामीचे हे स्मारक असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.