रात्रीच पारिजात का फुलते, बहरते, त्यामागे एक अतिशय गोड प्रेमकथा आहे.
या कथेनुसार, राजकुमारी पारिजातक सूर्याच्या... होय भगवान सुर्य देवाच्या प्रेमात पडली. सूर्यदेवाला त्याच्या वैभवाची आणि शक्तीची पुर्णपणे जाणीव होती. तरीही एका अटीवर तिच्याशी त्याने लग्न करण्याचे वचन दिले.
अट अशी होती की, काहीही झाले तरी तिने त्याच्याकडे कधीही पहायचे नाही. अट विचित्रच होती खरी...पण प्रेमात रममाण झालेल्या परीजातने याचा कधी विचारच केला नाही.
त्यांनी शरद ऋतूमध्ये लग्न केले आणि बघता बघता उन्हाळ्यापर्यंतचा काळ कसा भरकन निघून गेला.
उन्हाळा येताच सुर्यदेवाची शक्ती पूर्वीपेक्षा अफाट वाढली.... इतकी, की पारिजात त्याच्या एका कटाक्षात भस्म होऊन जाईल. अशाच एका दुपारच्या वेळी सूर्य पारिजातच्या दारात खाली उतरला आणि पारिजात भान हरपून त्याच्याकडे पाहातच राहिली. वचनभंगामुळे तो प्रचंड क्रोधीत झाला
आणि रागाच्या भरात अजूनच तापला. या सगळ्यात पारिजात राख होऊन स्वतःच्याच राखेत बुडून गेली.... तथापि, जेव्हा त्याचा राग शांत झाला तेव्हा त्याला पारिजातच्या जीवापाड प्रेमाची जाणिव झाली. शरीर भस्म झाल्याने देवांनी तिला एका झाडाच्या रुपात पुन्हा जिवंत केले.
आणि पुन्हा असं घडू नये यासाठी रात्रीच सूर्यदेव तिच्या भेटीला जातात. या भेटीत परिजातची फुले रात्रीच्या वेळी बहरुन इतकी सुवासिक असतात की जणू सूर्याने त्यांंचं चुंबन घेतलं असेल आणि प्रेमात ती दोघं स्वतःला विसरुन जात असतील....
पहाट होताच देव आपल्या कामावर रुजू होतात आणि त्यांच्या पहिल्या किरणांनी जमिनीला स्पर्श करताच फुले खाली गळून पडतात. याच कथेच्या दुसर्या आवृत्तीत असे म्हटले जाते की सुर्यदेवाने पारिजातचे प्रेम नाकारले आणि राजकन्या ते सहन करू शकली नाही. तिने स्वतःला ठार मारले
आणि तिचे प्रेम पुन्हा पुन्हा सिद्ध करण्यासाठी तिच्याच राखेतून एक झाड वाढले. पडलेली फुलं तिचे अश्रू मानली जातात, ती फुले वाहते, तिच्या प्रियकराची नजर सहन करण्यास ती फुलं असमर्थ असतात......!
पारिजातक वृक्ष थेट स्वर्गातून आलेला आहे.
समुद्रमंथनातून निघालेले हे तेरावं रत्न देवांचा राजा या नात्याने इंद्राकडे होतं. स्वर्गातील इंद्राच्या रोपवाटिकेत तो लावला होता. एकदा नारदमुनींनी ही फुलं रुक्मिणी आणि सत्यभामेला दिली आणि मग या वृक्षासाठी दोघींनी हट्ट केला. रुक्मिणीलाही या वृक्षाची फुले हवी होती.
सत्यभामेला तर आख्खा वृक्षच हवा होता....श्रीकृष्णाने सत्यभामेसाठी हा वृक्ष इंद्राशी लढाई करून पृथ्वीवर आणला. कृष्णाने वृक्ष सत्यभामेच्या दारात लावला पण फुलं मात्र रुक्मिणीच्या अंगणात पडत असत...
याशिवाय असं म्हटलं जातं की पारिजातका खाली उभं राहून एखादी गोष्ट मागितली
तर पारिजातक ती इच्छा पूर्ण करतो. इच्छापूर्ती करणारा वृक्ष म्हटलं जातं....
तुम्ही कितीही थकून आलात आणि पारिजातकाच्या खोडाला स्पर्श केल्यास ते तुमचा थकवा काढून घेऊन तुम्हाला उत्साह देतो असंही म्हणतात.
बरेचदा तुमच्या आजूबाजूला अशी माणसं असतात ज्यांना कधीच कुठल्याच गोष्टीमध्ये चांगलं, सकारात्मक असं काहीही दिसत नसतं, किंवा आपण असं म्हणूया कि त्यांनी आपली नजर फक्त आणि फक्त सगळ्या गोष्टींमध्ये चूक काढण्यासाठीच तयार केलेली असते.
बरं त्यांना काय चुकीचे आहे हे विचारल्यानंतर logically तस फारसं काही सांगता येतं नाही किंवा त्या चुकीच्या गोष्टी ऐवजी नक्की काय करायला हवं ह्याचही उत्तर त्यांच्याकडे नसते आणि जरी असलं तरी त्या उत्तर हे त्यांच्या विचारसरणीप्रमाणेच नकारात्मक असतं.
ही अशी माणसं एनर्जी ड्रेनर असतात.
अशी माणसं आपल्या आसपास असतील तर त्याचा सगळ्यात पहिला परिणाम आपल्यावर होतो आपण करत असलेल्या कामावर होतो.
अश्यावेळी एकच करायाचं, आपल्या कोणत्याही गोष्टीबाबत ह्यांच्याशी बोलायच नाही. ह्यांच्यापर्यंत आपली कोणतीही गोष्ट, आपले कोणतेही प्लॅन जाणार नाहीत ह्याची काळजी घ्यायची.
*बोधकथा : पैसा* 🏮
सत्तर हजार कोटींचा मालक सायरस मिस्त्री रिकाम्या हाती गेला... भाऊ तू सत्तर रुपयांचा मालक असलास तरी रिकामाच जाणार आहेस.
फक्त सायरस आणि तुझ्यात एवढाच फरक असेल की सायरस गेला तरी त्याची बायका पोरं रस्त्यावर येणार नाहीत. दहा पिढ्या बसून खातील.
इथे तू गेल्यावर तुझ्या घरच्यांचा बँड वाजलेला असेल. मानसिक धक्क्या पलीकडचा आर्थिक झटका सोसवताना त्यांची अनेक वर्ष निघून जातील. सगळं पुन्हा शून्यातून उभं करावं लागेल.
आनंदाने जगावं वगैरे लॉजिक सांगू नकोस. पैसे कमावणं थांबव कोण किती आनंदात जगतं हे लगेच कळेल.
काळ बदलला आहे. लोकांना तू कमी आणि पैसा अधिक प्रिय आहे.
मृत्यू गरीब श्रीमंत बघत नाही हे ठीक आहे पण श्रीमंतांचं मरण आपल्यासारखं नसतं हे लक्षात घे.
फिलॉसॉफी जेवू घालत नाही. कलियुग आहे. मृत्यूनंतर जगायचं असेल तर अवलंबून असणाऱ्यांची आधी सोय कर मग वाट्टेल त्या गोष्टी ऐकवत बस.
सिनेमा चालणे न चालणे याची कबर मल्टिप्लेक्स ने खोदली आहे, १९९९ ला एकाच वेळी गोविंदा,अमिताभ बच्चन, आमिर खान, मिथुन, फरदिन खान,अक्षय खन्ना यांचे सिनेमा बघू शकत होतो.सिनेमा हिट होत होती कारण तिकीट २५ ₹ stall आणि बाल्कनी ४० होती. लोकं परिवार घेऊन कुठला ही कधी ही सिनेमा पाहू शकत होती.
आज विचार करावा लागतो ४ पिक्चर रिलिज होतात त्यात एक सिनेमा म्हणजे १२०० मध्ये ४ तिकीट, २०० चे पॉपकॉर्न, १८० चे समोसा, २० ₹ पार्किंग,एवढं सगळं करून फिल्म बेकार असते.
मग तुम्हीच सांगा हे Boycott वगैरे सगळं बाजुला केला तरी आज सामान्य माणसाच्या हातात आहे का सिनेमा थिएटर मध्ये जाऊन
बघावा?
सिनेमा, अर्थकारण आणि त्यात OTT PLATFORM आली असताना लोकं कधी ही आपल्या सवडीने आपल्या घरात सिनेमे पाहू शकतात तर ते का म्हणून थिएटर मध्ये जाऊन पाहतील?
South Film industry, Bollywood, मराठी फिल्म इंडस्ट्री या पलिकडे जाऊन आपण विचार केला पाहिजे.
स्वतःला Mr Perfectionist म्हणवून घेतो आमीर खान. Perfectionist बनण्या आधी स्वताचे काही असावे लागते.
आमीर खान चे खालील सिनेमे आणि ते कुठून कॉपी केले आहे याची लिस्ट बघा, जर बॉलीवुड चा Mr Perfectionist असा आहे तर इतर हीरो कसे असतिल यावर बोलायला देखील नको.
ज्या दिशेने बॉलीवुड जात आहे
येत्या दोन वर्षातच अशी परिस्थिती निर्माण होईल की बॉलीवुड boycott करण्याची देखील गरज नसेल, ते चित्रपट कोणी बघणारच नाही.
चीन मधील काही बातमीपत्र आणि अधिकार्यांनी लाल सिंह चड्डा ची स्तुति केली आहे आणि येत्या काही दिवसांत तो चित्रपट चीन मध्ये कसे 1000 कोटी कमवेल हे दाखवले जाईल.
त्याचे गणित कसे केले जाते हे आता सर्वांनाच कळले आहे. Secret Superstar सारखा वाह्यात चित्रपट चीन मध्ये कसा 1500 कोटी कमवतो हे भारतातील लोकांना कळत नसेल असे वाटत असेल तर ते नक्किच मूर्ख आहेत. खरच चीन मध्ये हाऊस फुल चालला असता तर त्याचे सोशल मीडिया वर पडसाद नक्कीच दिसले असते.
पहिली गोष्ट अग्निपथ ही योजना केंद्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने डिझाईन केल्याली नसून आर्मीच्या मानव संसाधन विभागाने बनवलेली आहे.अग्निपथ अंतर्गत साडे सतरा ते २१ वयोगटातील १०० जणांना ट्रेनिंग देऊन आर्मीमध्ये सहभागी केलं जाईल,४ वर्ष त्यांचं काम पाहून त्यातील योग्य २५ जणांना
परमानेंट नोकरी दिली जाईल आणि बाकीच्या ७५ जाणांना निवृत्त केलं जाईल,पुन्हा दूसऱ्या बॅच मधील १०० पैकी २५ योग्य जणांना कायमस्वरूपी नोकरी देऊन ७५ जणांना निवृत्त केलं जाईल.
यादरम्यान पहिल्या वर्षी त्यांना ३०,००० रूपये प्रतिमाहिना पगार भेटेल ज्यात दरवर्षी वाढ केली जाईल
आणि शेवटच्या वर्षी ४०,००० रूपये प्रतिमहिना पगार असेल.
★निवृत्त करताना त्यांना ११,७१,००० रूपये सेवानिधी दिला जाईल.
यादरम्यान कोणता अग्निवीर शहिद झाल्यास त्याच्या कुटूंबियांना १ कोटी निधी दिला जाईल. (पगार + सेवानिधी +, +४८,००,००० लाख रूपये असे विविध निधी व्याजासहित)
MPSC , UPSC च्या मोहजालात अडकून तिशी पार होते. आई बाप पुण्यात ठेवून पाण्यासारखा पैसा खर्च करतात आणि पदरी निराशा येते.
त्या ऐवजी... १० + २ + ३ वर्षाची कोणतीही पदवी घ्या...
अग्नीवीर व्हा. चार वर्षात शरीर, मन कणखर करा...
उत्तम पर्फोर्म केले पूर्ण वेळ सैन्यात जाल...
सामान्य पर्फोर्म केले तरी हरकत नाही बाहेर पडताना खिशात १२ ते १५ लाख असतील.. वय असेल २५ .
रसरशीत तारुण्य , दणकट शरीर , कणखर मन आणि खिशात पैसे कोणताही व्यवसाय सुरु करा, शेती मध्ये पैसे घाला आणि राबा कुणाच्याही पाया पडायची गरज नाही.. आई बापांना मालमत्ता गहाण ठेवायची गरज नाही
स्व कमाईवर धंदा सुरु कराल...
तीस वर्षाचे होईतो छान सेटल झालेले असाल.. तुमचे MPSC वाले मित्र अजूनही तिथेच रेंगाळत असतील...
शारीरिक सक्षमता तुम्हाला बाहेर पडल्यावर पोलीस भरती, security अश्या किती तरी ठिकाणी नोकरीला पात्र करेल..
देशासाठी लढताना कामी आलात तर जन्म सफल होईल...