जेव्हा संविधानसभेत कलम 370 चा (तेव्हा 306 A) प्रस्ताव आणला गेला तेव्हा तिथे "एक निशान एक विधान एक प्रधान" फेम श्यामाप्रसाद मुखर्जी सुद्धा उपस्थित होते. पण त्यांनी याविरोधात शब्द सुद्धा काढला नाही.
या प्रस्तावाला विरोध करणारे एकमेव नेते म्हणजे मौलाना हसरत मोहानी #जयंती
मोहानी यांनी विचारलं की जम्मू काश्मीर साठी वेगळं प्रावधान कशासाठी? तेव्हा प्रस्ताव मांडणाऱ्या गोपालस्वामी अयंगार यांनी सांगितलं की तेथील परिस्थिती देशातील इतर प्रदेशांपेक्षा वेगळी आहे. यावर सरदार पटेल सुद्धा शांत होते.
स्वातंत्र्यलढ्यात भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, अशफाकउल्ला खान यांनी प्रसिद्ध केलेलं "इंकलाब झिंदाबाद" हे घोषवाक्य मोहानी यांनीच देशाला दिलं.
मोहानी यांचा जन्म आजच्याच 1 जानेवारी 1875 या वर्षी उत्तरप्रदेशमधील मोहन कसबा या गावात झाला.
1903 मध्ये त्यांनी अलिगढ मध्ये "उर्दू ए मौला" नावाचे मासिक सुरू केले. यातून ते ब्रिटिश भारतीय जनतेवर करीत असलेल्या अन्यायावर लिहीत असतं. स्वदेशी चळवळीबद्दल लेख लिहिल्यामुळे मासिक सुरू केल्यानंतर त्यांना काही दिवसांनीच 2 वर्षांची शिक्षा झाली.
यानंतरही त्यांनी लिहिणे बंद केले नाही.
1907 मध्ये काँग्रेस मध्ये प्रवेश केला, आणि तेथून आपले कार्य सुरू ठेवले.
मोहानी हे एक उत्तम शायर सुद्धा होते.
मथुरा कि नगर है आशिक़ी का
दम भरती है आरज़ू इसी का,
हर ज़र्रा-ए-सर-ज़मीन-ए-गोकुल
दारा है जमाल-ए-दिलबरी का.
ही त्यांची कृष्णावर लिहिलेली शायरी उत्तर भारतात खूप प्रसिद्ध आहे.
मौलाना हसरत मोहानी यांची आज जयंती.
विनम्र अभिवादन 💫💐
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
भीक आणि शिक्षणाचा विषय निघाल्यावर डोळ्यासमोर पटकन एक माणूस उभा राहिला,
तो म्हणजे मुलांच्या शिक्षणासाठी 1 रुपया भीक मागणारा "मतीन भोसले"....
देशाला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्षांपेक्षा जास्त काळ झाला तरी समाजातील अनेक घटक शिक्षणापासून वंचित आहे. अशा घटकांपैकी एक म्हणजे, "फासेपारधी समाज". हे तेच जे रानात फिरून ससे, तितर-बाटी यांची शिकार करतात व शहरात किंवा गावात विकतात. केवळ हेच त्यांचे एकमेव उत्पन्नाचे साधन..
अमरावती-यवतमाळ या जिल्ह्यात फासेपारधी समाज मोठ्या प्रमाणात आहे. काही दिवस या जंगलात किंवा काही दिवस या गावात राहायचे त्यानंतर दुसऱ्या जागी जायचे. असा त्यांचा प्रवास असतो. एका जागी स्थायिक नसल्यामुळे मुलांचे शिक्षण कसे होणार? मग मुलेही आई-वडिलांबरोबर रानात शिकारीला..
नेताजी बोस यांना उजव्यांनी कितीही हायजॅक आणि ते कसे नेहरू विरोधी होते इत्यादी जनतेमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरीही उजवे यात कधीच यशस्वी होणार नाही. सरदार पटेलांप्रमाणे नेताजींना जवळ करण्याचा फक्त एकच उद्देश आहे, ते म्हणजे नेहरूंचे महत्त्व कमी करणे.
(१/६)
पण तत्कालीन काँग्रेसमध्ये नेताजींचे सर्वात जवळचे मित्र हे नेहरूच होते,
जेव्हा सुभाषचंद्र बोस यांना दुसऱ्यांदा काँग्रेसचं अध्यक्ष म्हणून निवडलं गेलं तेव्हा सरदार पटेल यांच्या सोबत अन्य १२ नेत्यांनी काँग्रेसच्या कार्य समितीचा राजीनामा दिला होता. पण नेहरूंनी असं केलं नाही ..
(२/६)
कारण त्यांना नेताजींवर पूर्ण विश्वास होता.
पुढे जाऊन नेताजींना जेव्हा आझाद हिंद सेनेची स्थापना केली तेव्हा सेनेतील एका तुकडीला नेहरूंचे नाव दिले.
१९४५ मध्ये जेव्हा आझाद हिंद सेनेच्या हजारो सैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले तेव्हा नेहरूंनी त्यांच्या बचावासाठी
(३/६)
काल @dreamz_unite सरांनी लिहिलेल्या मदरसा संदर्भात थ्रेडरुपी प्रश्नांना खालील थ्रेड मधून उत्तर देण्याचा प्रयत्न करेन.
सरांचे प्रश्न अपुऱ्या माहितीवर आधारित असले तरी मदरशांबद्दल अनेकांच्या मनात शंका कुशंका असतात, कुतूहल असते.
(1/13)
भारतात सर्वात प्रथम मदरसा तेराव्या शतकाच्या आसपास दिल्लीत सुरू करण्यात आला. तेव्हा धार्मिक शिक्षण देणे हेच मुख्य उद्दिष्ट होते.
मुघल काळात प्रशासनातील "मुफ्ती" आणि "काझी" या दोन पदांसाठी मदरशांचे शिक्षण अनिवार्य होते. तेव्हा तेथे शिकणे अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाई.
(2/13)
मदरशांमध्ये सर्वात प्रथम आधुनिक शिक्षणाची सुरुवात 1780 पासून सुरू झाली, इंग्रज सरकार यासाठी आर्थिक मदत करत.
पण 1857 च्या उठावानंतर इंग्रज मुस्लिमांकडे संशयाच्या नजरेने बघू लागले, आणि त्यांनी मदरशांना आर्थिक मदत बंद केली, पुन्हा मदरसे धार्मिक शिक्षणाकडे वळले.
(3/13)