महाराष्ट्रात वोट जिहाद झाला आणि मुस्लिमांच्या मतांमुळे महाविकासआघाडी जिंकली असं बोलणाऱ्यांसाठी..
विदर्भातील 10 लोकसभेच्या जागांपैकी MVA 7 जागा जिंकली. 1) गडचिरोली लोकसभेत मुस्लिमांची लोकसंख्या 2% आहे, इथे काँग्रेसला 53% मत मिळाली.
1/42) भंडारा गोंदिया लोकसभेत मुस्लिमांची लोकसंख्या 1.8% आहे, इथे काँग्रेसला 48% मत मिळाली. 3) चंद्रपूर लोकसभेत मुस्लिमांची लोकसंख्या 5% आहे, इथे काँग्रेसला 58% मत मिळाली.
2/4
Oct 11 • 13 tweets • 3 min read
#थ्रेड
#मदरसा
राज्य सरकार मग ते महाविकास आघाडीचं असो अथवा महायुतीच, राज्यातील मदरशांसाठी काही आर्थिक तरतूद करत असतं.
यावर अनेक जण टीका करतात. याला त्यांचा मदरशांबद्दल असलेला गैरसमज सुद्धा कारणीभूत असतो.
मदरसे म्हणजे नक्की काय, आणि सरकार कोणत्या मदरशांना मदत करत हे पाहूया
1/12
भारतात सर्वात प्रथम मदरसा तेराव्या शतकाच्या आसपास दिल्लीत सुरू करण्यात आला. तेव्हा धार्मिक शिक्षण देणे हेच मुख्य उद्दिष्ट होते.
मुघल काळात प्रशासनातील "मुफ्ती" आणि "काझी" या दोन पदांसाठी मदरशांचे शिक्षण अनिवार्य होते. तेव्हा तेथे शिकणे अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाई.
2/12
Aug 1 • 5 tweets • 1 min read
पोलिस भरतीवरून जरांगे पाटलांवर टीका केली जात आहे की EWS मधून मराठे बाहेर पडले आणि मुसलमान घुसले.
EWS 10% आहे, आणि मराठा समाजासाठी असलेलं SEBC सुद्धा 10% एवढंच असून
त्यात मराठा समाजातील उमेदवारशिवाय कोणालाच संधी नाही..
1/5
आधी EWS चा लाभ मराठा समाजाला व्हायचा पण त्यात ओपन कॅटेगरी मध्ये असलेले इतरही घटक येत असल्यामुळे 70 ते 80% जागांवर मराठा समाजातील उमेदवारांना संधी मिळायची. आता SEBC मध्ये 10% असलेल्या पूर्ण जागांवर फक्त मराठा समाजातीलच उमेदवार असतात.
2/5
Jun 9 • 5 tweets • 1 min read
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एका विशिष्ट समाजाच्या लोकांनी मतदान केलं म्हणून त्यांचे उमेदवार जिंकले असं देवेंद्र फडणवीस म्हणाले..निकालानंतर विरोधकांनी केवळ मुस्लिमांच्या मतांवर निवडून आले म्हणत ठाकरेंवर टीका करणं सुरू केलं आहे, पण खरंच उद्धव ठाकरेंना फक्त मुस्लिमांनी..
1/5
मतदान केलं का? याबाबत आकडेवारी सांगते की, 1) दक्षिण मुंबईत 23% मुस्लिम मतदार आहेत, येथून अरविंद सावंत विजयी झाले. सावंत यांना 51% मते मिळाली. आता पूर्णच्या पूर्ण मुस्लिमांनी जरी सेनेला मतदान केलं असलं तरी उर्वरित मतदान इतर समाजाचं सुद्धा सेनेला मिळालं..
2/5
Aug 16, 2023 • 9 tweets • 2 min read
शरद पोंक्षेनी फिरोज गांधींच्या नावाचा विषय काढला, ते खान होते वगैरे म्हणून आपली मानसिकता जाहीर तर केलीच, पण स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेल्या एका नेत्याचा त्यांनी अपमान केला.
फिरोज गांधींच्या नावावरच नेहमी वाद होत राहिला, यात त्यांनी केलेलं कार्य त्यामानाने समोर आलच नाही.. 1/8
इंदिरा गांधींनी स्वातंत्र्य आंदोलनात युवकांना जोडण्यासाठी "वानर सेना" नावाची एक संघटना काढली होती, 1930 मध्ये फिरोज गांधी यांच्याशी जोडले गेले.
महात्मा गांधींची दांडी यात्रा सुरू असताना देशभरात काँग्रेसच्या लोकांनी आंदोलने केली.
2/8
Aug 5, 2023 • 11 tweets • 2 min read
#थ्रेड
कलम 370 साठी नेहरू जबाबदार ?
ऑक्टोबर 1947 मध्ये जेव्हा काश्मीरचं भारतात विलीनीकरण करण्यात आल तेव्हाच, महाराजा हरिसिंह यांनी सांगितलं होत की या विलय पत्रात अस काहीही नाही, ज्यामुळे भविष्यात तयार होणार भारताच संविधान स्वीकारण्यासाठी आम्ही वचनबद्ध असू..
(1/11)
बहुसंख्य मुस्लिम लोकसंख्या असलेल्या काश्मीर मध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे नेते शेख अब्दुल्ला हे प्रचंड लोकप्रिय होते, ते जे म्हणतील ती काश्मिरी जनतेसाठी काळ्या दगडावरची रेघ अशी स्थिती होती, ही बाब नेहरूंनी ओळखली आणि अब्दुलांना आपल्याकडे वळवल..
जेव्हा संविधानसभेत कलम 370 चा (तेव्हा 306 A) प्रस्ताव आणला गेला तेव्हा तिथे "एक निशान एक विधान एक प्रधान" फेम श्यामाप्रसाद मुखर्जी सुद्धा उपस्थित होते. पण त्यांनी याविरोधात शब्द सुद्धा काढला नाही.
या प्रस्तावाला विरोध करणारे एकमेव नेते म्हणजे मौलाना हसरत मोहानी #जयंती
मोहानी यांनी विचारलं की जम्मू काश्मीर साठी वेगळं प्रावधान कशासाठी? तेव्हा प्रस्ताव मांडणाऱ्या गोपालस्वामी अयंगार यांनी सांगितलं की तेथील परिस्थिती देशातील इतर प्रदेशांपेक्षा वेगळी आहे. यावर सरदार पटेल सुद्धा शांत होते.
Dec 9, 2022 • 8 tweets • 2 min read
भीक आणि शिक्षणाचा विषय निघाल्यावर डोळ्यासमोर पटकन एक माणूस उभा राहिला,
तो म्हणजे मुलांच्या शिक्षणासाठी 1 रुपया भीक मागणारा "मतीन भोसले"....
देशाला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्षांपेक्षा जास्त काळ झाला तरी समाजातील अनेक घटक शिक्षणापासून वंचित आहे. अशा घटकांपैकी एक म्हणजे, "फासेपारधी समाज". हे तेच जे रानात फिरून ससे, तितर-बाटी यांची शिकार करतात व शहरात किंवा गावात विकतात. केवळ हेच त्यांचे एकमेव उत्पन्नाचे साधन..
नेताजी बोस यांना उजव्यांनी कितीही हायजॅक आणि ते कसे नेहरू विरोधी होते इत्यादी जनतेमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरीही उजवे यात कधीच यशस्वी होणार नाही. सरदार पटेलांप्रमाणे नेताजींना जवळ करण्याचा फक्त एकच उद्देश आहे, ते म्हणजे नेहरूंचे महत्त्व कमी करणे.
(१/६)
पण तत्कालीन काँग्रेसमध्ये नेताजींचे सर्वात जवळचे मित्र हे नेहरूच होते,
जेव्हा सुभाषचंद्र बोस यांना दुसऱ्यांदा काँग्रेसचं अध्यक्ष म्हणून निवडलं गेलं तेव्हा सरदार पटेल यांच्या सोबत अन्य १२ नेत्यांनी काँग्रेसच्या कार्य समितीचा राजीनामा दिला होता. पण नेहरूंनी असं केलं नाही ..
(२/६)
May 10, 2022 • 14 tweets • 3 min read
काल @dreamz_unite सरांनी लिहिलेल्या मदरसा संदर्भात थ्रेडरुपी प्रश्नांना खालील थ्रेड मधून उत्तर देण्याचा प्रयत्न करेन.
सरांचे प्रश्न अपुऱ्या माहितीवर आधारित असले तरी मदरशांबद्दल अनेकांच्या मनात शंका कुशंका असतात, कुतूहल असते.
(1/13)
भारतात सर्वात प्रथम मदरसा तेराव्या शतकाच्या आसपास दिल्लीत सुरू करण्यात आला. तेव्हा धार्मिक शिक्षण देणे हेच मुख्य उद्दिष्ट होते.
मुघल काळात प्रशासनातील "मुफ्ती" आणि "काझी" या दोन पदांसाठी मदरशांचे शिक्षण अनिवार्य होते. तेव्हा तेथे शिकणे अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाई.
(2/13)