"स्त्रियांनी शिकावे" हे ज्यांचे ब्रीद वाक्य होते. व विधवा पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, अश्या भारतीय स्त्रीवादाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंचे एकूणच सर्व कार्य समाजाला आजही प्रेरणा देणारे आहे. (1/27)
आतापर्यंत स्त्रियांसाठी पहिली शाळा सुरू करणारे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले इतकीच ओळख आपल्याला माहित आहे.
पण याव्यतिरिक्तही सावित्रीमाई फुले यांचे कार्य अतिशय मोलाचे आहे, अस्पृश्यांचे हाल पाहून लहानपणापासूनच (2/27)
ज्योतिबांचे काळीज पिळवटून निघत असे. अशा अमानुष रुढी-परंपरा व कर्मकांडाविरुद्ध ज्योतिबांचे मन पेटून उठले.
ज्योतिबांच्या मनातील पेटत्या ज्योतिला प्रज्वलीत करण्याचे कार्य सावित्रीमाईंनी केले व त्या खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीची प्रखर ज्योत झाल्या. (3/27)
महिलांच्या हक्कांबाबत समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी "महिला सेवा मंडळाची" स्थापना करणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीमाई या लेखिका व कवयित्री सुद्धा होत्या.
३ जानेवारी ई.स १८३१ साली नायगाव येथे जन्मलेल्या सावित्रीमाई या लग्नाच्या वेळी निरक्षर होत्या. (4/27)
त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते.
पुढे लग्नानंतर महात्मा फुलेंनी सावित्रीमाईंना त्यांच्या घरीच शिक्षण दिले. लग्नावेळी म्हणजेच १८४० रोजी सावित्रीमाईंचे वय ९ तर ज्योतीरावांचे वय १३ होते. महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा (5/27)
चळवळीतील एक महत्त्वाच्या व्यक्ती सावित्रीमाईंनी शिक्षणाचे महत्व लक्षात घेऊन
"समाजात बदल घडवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शिक्षण."
हा मूलमंत्र देऊन ज्योतिरावांच्या साथीने इसवी सन १८४८ रोजी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली.
सावित्रीमाईंच्या (6/27)
शाळेत सुरुवातीला ६ मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली.
तत्कालीन मनुवादी सनातन्यांनी सावित्रीमाईंचा, व मुलींच्या शाळेचा प्रचंड विरोध केला. व अंगावर शेण फेकले. पण सावित्रीमाई डगमगल्या नाहीत. त्यांनी स्त्री सुधारणावादाची (7/27)
चळवळ अतिशय खंबीरपणाने सुरूच ठेवली.
"समाजामधल्या प्रत्येक स्त्रीला सुखी करावयाचे असेल तर तिला शिक्षण आणि स्वातंत्र्य द्या." असा संदेश देणाऱ्या सावित्रीमाईंनी शिक्षणाच्या प्रसारासाठी व स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी अन्य सामाजिक क्षेत्रातही (8/27)
काम करणे गरजेचे आहे. हे ओळखून माईंनी प्रचलित रुढींना आळा घातला.
त्यावेळी "बाल-जरठ" विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षीच विधवा व्हायच्या.
तत्कालीन समाजात विधवा पुनर्विवाह हा अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा (9/27)
विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून त्यांना कुरूप बनविले जाई. तर पतीच्या निधनावेळी काही माहिला गरोदर असत.
विधवा म्हणून समाज छळ करणार व जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा (10/27)
मग आत्महत्या करत किंवा भृणहत्या करत.
ही भयानक परिस्थिती पाहून सावित्रीमाईंनी व ज्योतीरावांनी या समस्येवर उपाय म्हणून २८ जानेवारी १८६३ साली "बालहत्या प्रतिबंधक गृह" सुरू केले. व ज्योतीरावांच्या पश्चात सावित्रीमाईंनी ते पुढे समर्थपणे चालवले. (11/27)
या बालहत्या प्रतिबंधक गृहातील अनेक स्त्रियांचे बाळांतपण हे सावित्रीमाईंनी केले. व या सर्व अनाथ बालकांना माई आपलीच मुले मानत.
त्यावेळी पुणे व एकूणच सर्वच ठिकाणी भयानक अशी परिस्थिती होती व अस्पृश्यतेचे तंतोतंत पालन त्यावेळी केले जात होते. (12/27)
ज्यांना शूद्र असे संबोधले गेले ती माणसे रस्त्याने चालले की त्यांना कमरेला झाडू आणि गळ्यात मडके बांधून जावे लागत असे.
विधवा स्त्रियांच्या बाबतीत तर खूप भयानक प्रथा आणि परंपरा होत्या. स्त्री विधवा झाली की तिच्या बांगड्या फोडल्या जात, कुंकू पुसले जात, (13/27)
तिचे अंगावरील अलंकार काढून घेत, एवढ्यावरच न थांबता न्हाव्याला बोलावून त्याच्यापुढं बसवत व वस्ताऱ्याने संपूर्ण केस काढून विद्रूप बनवित. मगच त्या नवऱ्याची अंत्ययात्रा काढीत.
पुढचे जीवन त्या स्त्रीला पशूपेक्षा हलाकीचे जगावे लागत. हे थांबवण्यासाठी (14/27)
सावित्रीमाईंनी सर्व न्हावी समाजाला एकत्रीत बोलवून त्यांची सभा भरविली आणि त्या सभेत जोतीरावांनी केशवपनाबद्दल आपले विचार मांडले.
“एका पैशासाठी तुम्ही किती वाईट काम करता याची तुम्हांला जाणीव आहे काय? आधीच बिचारीचा नवरा मेल्याचं दुःख भरपूर असत. त्यात तिच्या डोक्याला वस्तारा लावून (16/27)
चेहरा विद्रूप करता, त्या बिचारीला किती वाईट वाटत असेल याचा विचार केलाय का तुम्ही कधी? त्या विधवेच्या ठिकाणी तुमची भगिनी ठेवून बघा. या साऱ्या तुमच्याच भगिनी आहेत.
भावांनो, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, हे काम तुम्ही बंद करा.” (17/27)
सावित्रीमाई फुले यांचे हे विचार सर्व न्हाव्यांना पटले.
त्या काळात दिनबंधू वृत्तपत्राचे संपादक नारायण मेघाजी लोखंडे कामगार संघटना चालवित होते.
त्यांनी सर्व नाभिकांना संघटित केले. सर्व न्हाव्यांनी विधवा स्त्रियांचे केसाला वस्तारा न लावण्याची प्रतिज्ञा केली.
(18/27)
अशा पद्धतीने न्हाव्यांचा संप घडवून आणण्यात माई व जोतीराव यशस्वी झाले.
पुढे सन १८६८ ला पाण्याचा तीव्र दुष्काळ पडला. पाण्यासाठी लोकांना वणवण फिरावं लागत होते. सनातनी लोक नगरपालिकेच्या सार्वजनिक हौदाचे पाणी घेऊन जात. परंतु अस्पृश्यांना (19/27)
कोणीच पाणी घेऊ देत नसत. तहानेने व्याकुळ अस्पृश्य उन्हाळ्याच्या कडक उन्हात पाण्यासाठी रानोमाळ भटकत होते.
कुणी नदीच्या पात्रात वाळूत खड्डे खोदीत होते आणि त्यातून घोटभर येणारे पाणी मडक्यात भरीत होते.
हा प्रकार जोतीराव आणि सावित्रीमाईंच्या नजरेस (20/27)
आला त्यांनी अस्पृश्यांना पिण्यासाठी पाणी द्यावं म्हणून समाजापुढे आवाहन केले परंतु कोणीच या गोष्टीला तयार झाले नाहीत.
हे पाहून सावित्रीमाई जोतीरावांना म्हणाल्या,
"सनातनी लोकांना पाझर फुटणे शक्य नाही. त्यांच्या नादाला लागण्यापेक्षा आपण आपल्या (21/27)
वाड्यातील पाण्याचा हौद खुला करूया."
जोतीरावांनी प्रत्यक्ष हा निर्णय अंमलात आणला आणि सर्व अस्पृश्यांसाठी स्वतःच्या वाड्यातील पिण्याच्या पाण्याचे हौद सावित्रीमाईंनी व जोतिरावांनी खुले करून दिले.
जोतिरावांच्या निधनानंतर इ.स. १८९० मध्ये सावित्रीमाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली.
इ.स. १८९३ साली सासवड येथे झालेल्या ‘सत्यशोधक परिषदे’चे अध्यक्षपदही सावित्रीमाईंनी भूषविले.
आपल्या विचारांचा (23/27)
प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला.
‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढे १८९७ मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतःच्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी (24/27)
काम केले. दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाच्या बळी ठरल्या.
पांडुरंग गायकवाड यांच्या मुलाला मुंढव्याबाहेरील महार वस्तीत प्लेग झाला आहे हे कळताच सावित्रीमाई त्या बालकाकडे धावून गेल्या आणि त्याला पाठीवर घेऊन रुग्णालयात नेले.
या प्रक्रियेत, (25/27)
सावित्रीमाईंना प्लेगची लागण झाली.
व गायकवाड यांच्या मुलाला वाचवताना सावित्रीमाईंचा १० मार्च १८९७ रोजी रात्री ९.०० वाजता वीरतापूर्वक मृत्यू झाला.. (26/27)
#सावित्रीमाईंनी ज्यांच्या नेतृत्वात "केशवपन" परंपरेला विरोध करत सर्व न्हाव्यांचा संप घडवून आणला असे, भारतीय संघटित कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे हे एक समाज सुधारकाबरोबर उत्तम पत्रकार देखील होते..(1/15)
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्थापलेल्या "सत्यशोधक समाज" मुंबई शाखेचे अध्यक्ष असणारे नारायण मेघाजी लोखंडे यांचा जन्म इ.स १८४८ रोजी एका शेतकऱ्याच्या कुटुंबात झाला.
अतिशय गरीब परिस्थितीतून लोखंडेंनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. व ते रेल्वे (2/15)
खात्यात कारकून म्हणून तर 'पोस्ट खात्यात' काही काळ नोकरीस राहिले, पुढे लोखंडेंनी मुंबईच्या मांडवी भागात एका कापड गिरणीत भांडारपालाची नोकरी मिळवली.
तिथे त्यांनी दिवसातून १३-१४ तास दहशतीच्या वातावरणात काम करीत असलेले गिरणी कामगार बघितले. (3/15)
#समानता व बंधुभावाचे मूल्य समाजात रुजवणारे तसेच 'श्यामची आई' ही अजरामर साहित्यकृती निर्माण करणारे थोर स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक आणि संवेदनशील शिक्षक पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजी मानवतेविषयी महान असा संदेश देताना म्हणतात, (2/16)
"आपल्याला वैचारिक दर्जा वाढवायचा असेल तर मनातील विचारांना बदलण्याचा प्रयत्न करा.
व्देषाची लाट आली तर, प्रेमाचा सिंधू घेऊन चला.
संकुचितपणा येत असेल तर विशालता घेऊन चला.
क्षुद्रता पेरू पाहात असाल तर उदारता घेऊन चला.
मनात अंधारुन येत असेल तर प्रकाशाचे झोत आणा." (3/16)
असे प्रतिपादन करणाऱ्या क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुलेंच्या शेतीविषयक विचारांना गती देणारे परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हाच विचार अधिक समृद्ध करत (2/12)
"शेतीवरचा बोजा कमी करा, एकच मुल शेतीत ठेवा, बाकीच्यांना तिथून बाहेर काढा नी उद्योग, व्यापार, शिक्षण, सेवा क्षेत्रात घाला."
तसेच "शेतकऱ्यांनी शिक्षण घेतल्याखेरीज त्यांच्यामध्ये नवविचार, नवतंत्रज्ञानाची बीजे रुजवता येणार नाही. त्यामुळे त्यांनी शिक्षणाची कास (3/12)