बॉयकॉट ट्रेंड : द्वेष नव्हे त्वेष

1) बॉलीवूड नेहमी हिंदूंच्या भावना दुखावणारे विषय का घेत होते?

2) द काश्मीर फाईल्स, बाहुबली, कांतारा सारखे चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होते तेव्हा बॉलीवूडमध्ये त्याचं मनापासून तोंडभरून कौतुक का होत नव्हतं?

3) विजय
देवराकोंडा, प्रभास सारख्या उत्तम दाक्षिणात्य कलाकारांना घेऊन बॉलीवूडवाले फालतू, दर्जाहीन चित्रपट का निर्माण करतात?

4) उत्तान दृश्ये, अनावश्यक शिवीगाळ, अश्लीलता आणि सवंगपणा पसरवणाऱ्या बॉलीवूडला सर्वसामान्य भारतीय का म्हणून आपलं म्हणेल?

5) चांगल्या उत्तम साहित्य, नाटक, इतर
प्रादेशिक चित्रपटांचे हीन दर्जाचे remakes बनवून बॉलीवूड निर्मात्यांचा पैसा, कलाकारांचा वेळ, मेहनत आणि प्रेक्षकांची अभिरुची वाया घालवतात त्याबाबत तुम्ही नाराजी का व्यक्त केली नाही?

6) नसिरुद्दीन शहा, अनुराग कश्यप, प्रकाश राज, वीर दास, नंदिता दास, स्वरा भास्कर, सोनम कपूर सारखे
कलाकार लोकं देव देश धर्म विरोधी शक्तींना कायम प्रत्यक्ष /अप्रत्यक्षपणे पाठींबा देत असतात, खळबळजनक वक्तव्ये करतात तेव्हा बॉलीवूड मधली तुमच्यासारखी सुजाण मंडळी का चुप्पी साधतात?

7) बादशाह, यो यो हनी सिंग, मिका सिंग सारखे गायक संगीताच्या नावाखाली सतत रम, रमा, रमी सारखे विषय घेत
असतील, तर एका लिमिट नंतर लोकंही त्यांची गाणी का म्हणून ऐकतील?

8) संगीताचा महासागर सामोरी असतानाही तनिष्क बागची, मित ब्रदर्स - अंजान सारखे संगीतकार जुन्या गाण्यांना नव्या पद्धतीत बनवून उगाचच नव्या बाटलीत जुनी दारू भरतात

9) आपलं बॉलीवूड हे काही तथाकथित भाई लोकांच्या दहशतीखाली
वावरत आहे हे कटू सत्य आपण कधी स्वीकारणार? एका तथाकथित अल्पसंख्यांक समाजाचे गेली कित्येक वर्षे चुकीच्या पद्धतीने लांगुनचालन केले जाते, त्यांच्या नावाने सतत victim cards खेळली, खेळवली जातात, हे जनतेला आता कळून चुकलं आहे, जनता का शांत बसेल?

10) पुरस्कार सोहळ्यांमधील दिसणारं
सर्रासपणे दिसणारं राजकारण सुजाण जनता का म्हणून दुर्लक्षित करेल?

11) बजेट 100, 150, 200, 250 कोटींच्या नावाखाली 500 रुपयांची तिकिटं घेऊन लोकं सतत आपल्याच देव, देश, धर्माचा आपल्याच डोळ्यांपुढे होणारा अपमान, विटंबना का म्हणून सहन करेल?? आपल्या संस्कृती व सभ्यतेचा सातत्याने होणारा
उपमर्द का सहन करेल??

12) सुशांतसिंग राजपूत सारख्या कलाकाराचा गूढ मृत्यू होतो, कंगना राणावतच्या ऑफिसवर बुलडोझर चालवला जातो तेव्हा अशा संवेदनशील प्रकरणांत सुद्धा बॉलीवूडमधली अनेक दिग्गज मंडळी अजिबात ब्र काढत नाही. असं का?

13) मराठी पात्रांना लाचखोर, भ्रष्टाचारी, दाक्षिणात्य
पात्रांना विनोदी, पंजाबी पात्रांना बावळट, बिहारी पात्रांना निरक्षर, गुजराती पात्रांना लबाड आदी गोष्टी सातत्याने दाखवून बॉलीवूड नेमकं काय सिद्ध करू इच्छित आहे? संबंधित प्रांताच्या पात्रांमध्ये इतर स्वभावधर्म नसतात का?

14) लेस्बियन, समलिंगी, गुन्हेगारी, Underworld, ज्या गोष्टी
खुद्द विज्ञानाला, निसर्गाला अमान्य आहेत, ज्या गोष्टी खोट्या आहेत, समाज विघातक आहेत, अशा गोष्टींचा पुरस्कार बॉलीवूड का करतो? आणि प्रेक्षकांच्या माथी का मारतो?

15) वास्तववादी, सत्यघटना अथवा ऐतिहासिक विषयांवर आधारित चित्रपटांमध्ये artistic liberty च्या नायक - नायिकांची प्रणयदृश्ये,
गाणी, भव्यदिव्य सेट्स, खोटायकी दाखवणे म्हणजे बॉलीवूडचा जन्मसिद्ध अधिकार असल्याप्रमाणे का म्हणून चितारले जातात?

बॉलीवूडमध्ये जी बॉयकॉट ट्रेंड नावाची जी सुनामी आली आहे ती येण्यापूर्वीची परिस्थिती म्हणजे वादळापूर्वीची शांतता होती... तो एक निद्रिस्त ज्वालामुखी होता... केवळ हिंदू
समाजच नव्हे तर या देशातील प्रत्येक नागरिक आता राष्ट्रवादी विचारांचा पाईक होण्याला महत्त्व देतोय.. तुम्हीही दर्जेदार विषय आणि त्याची मांडणी आणा प्रेक्षक अक्षरशः तुटून पडतील आणि उत्पन्नाची ' बॉर्डर ' क्रॉस करतील

#BoycottbollywoodCompletely
#BoycottBollywoodForever
#BoycottPathan

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with विश्राम परब (मुळीक) 🚩🇮🇳 मैं भी मोदीजी का परिवार

विश्राम परब (मुळीक) 🚩🇮🇳 मैं भी मोदीजी का परिवार Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @VishramParab2

Jan 27
22 जानेवारीच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात आपण अनेकांची उपस्थिती बघितली. परंतु या गर्दीत २ अशी व्यक्तिमत्व उपस्थित होते ज्यांची चर्चा कुठेही झाली नाही

श्रीरामलला सिंहासनावर विराजमान होत होते, तेव्हा छत्तीसगडच्या रामनामी संप्रदायाचे प्रमुखही तिथे उपस्थित होते... कधी काळी त्यांच्या
Image
Image
पूर्वजांना मंदिरात जाण्यापासून रोखले गेले... बाबरने राम मंदिर तोडले तेव्हा या समाजाच्या पूर्वजांनी राम मंदिर आमच्याकडून हिसकावले, पण तुम्ही आमचे राम कसे हिसकावून घ्याल? तेव्हा त्यांचे पूर्वज म्हणाले होते की, रामाला आमच्यापासून दूर कसे करतात तेच पाहतो, त्या नंतर या जमातीने पूर्ण
शरीरावर रामाचं नाव गोंदवायला सुरुवात केली... आणि कपडेही ते रामनाम असलेलेच धारण करतात

रामनामी संप्रदायाला प्राणप्रतिष्ठा महोत्सवासाठी आदरपूर्वक आमंत्रित करण्यात आले होते.. या रामोत्सवात केवळ या लोकांनीच नाही तर नवीन पिढीतील 50 जणांनी सहभाग घेतला.. त्यांच्या उपस्थितीमुळे कुठंतरी
Read 4 tweets
Oct 22, 2023
ज्या सभ्यता आपल्या पूर्वजांवर झालेले क्रूर अत्याचार आणि जघन्य अपराध विसरतात, कालांतराने त्या सभ्यता नष्ट होतात.

ज्यू जेव्हा निर्वासित जीवन जगत होते, तेव्हा ते तिथल्या नद्यांच्या काठावर बसून येरुसलेमच्या दिशेने तोंड करून विरह गीत म्हणायचे, येरुसलेम परत मिळेपर्यंत आम्ही कोणताही सण Image
साजरा करणार नाही, अशी शपथ त्यांनी घेतली होती.या वनवासाच्या जीवनात कोणताही आनंद नव्हता, गाणी नव्हती, संगीत नव्हते व केवळ आणि केवळ मातृभूमीचे दुःख होते

सुमारे 2500 वर्षांपूर्वी इस्रायलमधील ज्यूंचे शेवटचे राज्य ज्यूडिया संपले आणि ज्यू निर्वासित झाले आणि इतर देशांमध्ये भटकायला लागले
इस्लामच्या प्रसारामुळे येरुसलेम (ज्यू) आणि बैथेलहम (ख्रिश्चन) ही धार्मिक स्थळे मुस्लिमांच्या ताब्यात गेली

तुर्की राजवटीत (1098-1251) मुस्लिमांनी त्यांची धार्मिक स्थळे पाडून त्यावर मशिदी बांधल्या. ज्यूंचे उरलेले धार्मिक स्थळ 'रोनी (वेलिंग) वॉल' (रडणारी भिंत) ही काही मीटर लांबीची
Read 14 tweets
Oct 17, 2023
इस्त्रायल ने धोका कसा काय खाल्ला?

असा सगळ्यांनाच प्रश्न पडला होता..

इस्त्रायल आणि पँलेस्टाईन ही दोन वेगवेगळी राष्ट्र घोषित करून ते परस्परांचे शेजारी म्हणून राहू शकत नाहीत का ? प्रेमळ नाही पण मानवी नाते ठेवून राहू शकत नाहीत का?

हा पण प्रश्न सगळ्यांना पडला होता..

याची उत्तरे..
दोन वेगळी राष्ट्रे होऊया, सीमा ठरवून घेऊ.. वादग्रस्त भागावर चर्चा करू हा प्रस्ताव इस्त्रायल ने २०१४ ला दिला होता.. उत्तरादाखल हमास ने एक मोठा हल्ला केला .. आणि विषय स्थगित झाला

२०२१ मध्ये हमास ने प्रस्ताव दिला.. या युध्दजन्य परिस्थितीचा शेवट करूया.. आपण शांती आणूया गाझा पट्टीतील
पँलेस्टीनी नागरिकांना इस्त्रायल मध्ये रोजगारासाठी येऊ द्या... वगैरे

इस्त्रायल ने प्रस्ताव स्वीकारला... सैन्याच्या नियंत्रणात का होईना पण गाझापट्टीतील नागरिक इकडे रोजगारासाठी येऊ लागले. इस्त्रायल मध्ये या लोकांना मिळत असलेले वेतन हे गाझा मधील वेतनाच्या ८ ते १० पट जास्त होते कारण
Read 12 tweets
Sep 8, 2023
डोकं शांत ठेवून... पुढे पन्नास वर्षं देश प्रगतीपथावर...

जाॅर्ज सोरोस : जन्म १९३०
मुळ नाव : जाॅर्ज श्वार्ट्झ, ज्यू (हिटलरनी ज्यूंना त्रास द्यायला सुरवात केल्यावर या तालेवार ज्यू कुटूंबानी आडनाव बदलून 'सोरोस' केलं)
जन्मानी हंगेरीयन, कर्मानी अमेरीकन,
जगातला एकोणतीसावा सर्वाधिक Image
श्रीमंत,
शेअरमार्केट मधे हेजफंड स्वरूपात गुंतवणुक करत पैसा कमावणारा अब्जाधीश आहे..
१९९२ ला 'बँक ऑफ इंग्लंड' वर सट्टाहल्ला करत ब्रिटीश पौंडाच्या किमती पाडून एक अब्ज डाॅलर छापले याने...
१९९७ ला असाच हल्ला थायलंड आणि मलेशिया च्या चलनावर करून सट्टा लावत त्या देशांची इकाॅनाॅमीच बरबाद
करून टाकली याने
बालपणी घेतलेल्या 'हिटलरशाहीच्या' अनुभवामुळे हा कुठल्याही देशातल्या 'राईटविंग' सरकारचा कट्टर विरोधक...
त्यामुळेच,
आपल्या 'ओपन सोसायटी फाऊंडेशन' द्वारे
'समतेचं राज्य यावं यासाठी कट्टर उजवी विचारसरणी मोडण्याचा कार्यक्रम' या भंपक समाजसेवेच्या पडद्याआडून लिब्रांडूजचा
Read 11 tweets
Aug 10, 2023
नरेंद्र मोदी पत्रकारांना का टाळतात?
एका मानसतज्ज्ञाने एक व्यक्ती म्हणून केलेले पंतप्रधान मोदींचे विश्लेषण

आवर्जून वाचावी अशी पोस्ट विशेष म्हणजे मोदींच्या राजकारणाशीच दुरान्वयानेही संबंध नसलेली

“सोन्याच्या शुद्धतेचं प्रमाणपत्र”

(एका मानसोपचार तज्ज्ञाने केलेले प्रदीर्घ विश्लेषण)
सव्वाशे कोटी लोकसंख्येचा देश नुसता राखायचा म्हटलं तरी ते सोपं काम नाही... प्रत्येक राज्य वेगळं, तिथले प्रश्न वेगळे, नैसर्गिक-भौगोलिक समस्या वेगळ्या, तिथल्या नागरिकांच्या गरजा वेगळ्या... प्रत्येक राज्यनिहाय ही अशी यादी करायची म्हटली तरी आपलं डोकं हलेल, अशी स्थिती त्यात पुन्हा
विरोधकांनी तोफा डागायला केलेली सुरूवात आणि दररोज एक नवा विषय काढून माजवलेलं रणकंदन...! ह्या सगळ्या जंजाळात नुसतं टिकून राहिलं तरी खूप झालं असतं..!

आपणच जरा विचार करून पाहू. आपल्या परिचयातली किंवा नात्यातली व्यक्ती, आपला मित्र-मैत्रिण किंवा आँफिसमधला सहकारी आपल्याविषयी एखादा शब्द
Read 46 tweets
Jun 14, 2023
नाव: श्री.संभाजीराव विनायकराव भिडे गुरुजी
वय: 89
शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist)
पूर्वाश्रमीचे काम: फर्ग्युसन महाविद्यालयात फिजिक्स चे प्राध्यापक
पूर्वाश्रमीची सांपत्तिक परिस्थिती: सातारा जिल्ह्यातील वारुगड किल्ल्याचे वंशपरंपरागत सबनीस (पायथ्याच्या शेकडो एकर Image
जमीनी आजही नावावर)
पुण्यात आज अब्जात मूल्य असलेला भूखंड नोकरीत असताना आईचे नावावर घेतलेला
सध्याचे काम: श्री शिवप्रतिष्ठानहिंदुस्थानच्या माध्यमातून समर्थांना अपेक्षित महंत व शिवपाईक घडविण्याच्या कामात गेली ६ दशके पूर्णवेळकार्यरत
संपत्ती: एक धोतर-सदरा-टोपी अंगावर, एक दोरीवर, एक
सतरंजी, १०x१० ची एक खोली, भेट मिळालेली पुस्तके आणि यांच्या एका हाकेवर धाऊन येण्यास सिद्ध असलेले १० लाख सत्शील, सद्विचारी, सदाचरणी, सद्वर्तनी, निर्व्यसनी तरुण
दिनचर्या: आजही रोज १५० जोर, १५० बैठका आणि १५० सूर्यनमस्कार स्वत: घालतात, केवळ सायकल व लाल बसने प्रवास, अखंड भ्रमंती,
Read 4 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us!

:(