#पुस्तकआणिबरचकही
मल्लिका अमर शेख ( १६ फेब्रुवारी १९५७ ) शाहीर अमर शेख ह्यांच्या कन्या. मल्लिकाने शालेय जीवनापासूनच कविता करायला सुरुवात केली. नृत्य, अभिनय, संगीत ह्या कला जोपासण्याचा प्रयत्न केला. पुढे वेगळे जीवन आणि वेगळा विचार जगणार्या कवी नामदेव ढसाळ यांच्याशी विवाह केला.👇
मॅट्रिकपर्यंतचे शालेय शिक्षण घेऊन विवाहोत्तर जीवनात त्या अनुभवाच्या शाळेतच बरेचसे शिकल्या. जे शिकल्या त्याचे प्रतिबिंब त्यांच्या लेखनात पडले आहे. १९७९ साली ‘वाळूचा प्रियकर’ नावाचा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. बर्याच उशिरा म्हणजे १९९३ मध्ये ‘महानगर’ कवितासंग्रह 👇
आला. संस्कृतीचा भेदक उपहास करणारी त्यांची कविता प्रामुख्याने स्त्री-मनाच्या जाणिवा व्यक्त करते. स्त्री-वादी कवयित्रींमध्ये मल्लिका अमरशेखांचे नाव ठळकपणे घ्यावे लागते. ‘देहऋतु’ (१९९९) आणि ‘समग्राच्या डोळा भिडवून’ (२००७) हे अलीकडचे कवितासंग्रह याची साक्ष देतात. मानवी दुःखे आणि 👇
स्त्री यांचे समीकरण का असावे?त्याबद्दल संस्कृतिरक्षक उदासीन का आहेत? असे प्रश्न त्यांना पडतात. त्यांनी १९९४ साली ‘सूर एका वादळाचा’ हे शाहीर अमरशेख यांच्याविषयीचे पुस्तक संपादित केले आहे. त्यांचे अत्यंत गाजलेले पुस्तक म्हणजे १९८४ साली प्रसिद्ध झालेले आत्मकथन. त्याचे नावच 👇
‘मला उद्ध्वस्त व्हायचंय’ असे आहे. प्रामाणिक, पारदर्शी आत्मकथन सामान्य मध्यमवर्गीय स्त्रीच्या आयुष्यात घडणार्या घटनांपेक्षा वेगळे अनुभव या सार्याचे बेधडक निवेदनामुळे हे आत्मकथन वैशिष्ट्यपूर्ण ठरले.त्यांना २०१६ चा साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचा वागयज्ञ पुरस्कार मिळाला. 👇
दया पवार प्रतिष्ठान चा दया पवार स्मुर्ती पुरस्कार २०१९ साली मिळाला.
#पुस्तकआणिबरचकही
गोपाळ हरी देशमुख (१८ फेब्रुवारी १८२३-९ ऑक्टोबर १८९२). थोर समाजचिंतक म्हणून गोपाळरावांनी कीर्ती मुख्यतः अधिष्ठित आहे, ती त्यांनी ‘शतपत्रे’ म्हणून लिहिलेल्या निबंधांवर. ‘लोकहितवादी’ हे टोपण नाव घेऊन त्यांनी ही ‘शतपत्रे’ लिहिली. भाऊ महाजन ह्यांच्या प्रभाकर ह्या 👇
पत्रातून ती १८४८ ते १८५० ह्या काळात प्रसिद्ध झाली. ही ‘शतपत्रे’ वस्तुतः १०८ आहेत. त्या पत्रातून लोकहितवादींनी आपली राजकीय मते, तसेच विद्याप्रसार, आचारधर्म, परमार्थ, अनिष्ट चाली, समाजसुधारणा इ. विषयांवरील विचार स्पष्ट केले आहेत. ह्या विचारांनी एकोणिसाव्या शतकातील वैचारिक 👇
प्रबोधनाचा पाया घातला, असे यथार्थपणे म्हटले जाते.लोकहितवादींनी मुख्यत: लिहिले, ते हिंदू समाजाबद्दल. तथापि अन्य धर्मीयांतील त्यांना अनुचित वाटणाऱ्या काही अपप्रवृत्तींवरही त्यांनी टीका केली आहे. इंग्रजही त्यांच्या टीकेतून सुटले नाहीत कारण त्यांची सर्व टीका एका व्यापक सामाजिक 👇
चौदा ग्रामीण कथांचा संग्रह. या कथेतील प्रमुख पात्रे भोरवाडी गावात राहणारे. प्रत्येक पात्र रेखाटताना, वातावरण निर्मिती करतांना लेखकाची सुक्ष्म निरिक्षण शक्ति , सर्जनशीलता कुठेही कमी पडत नाही. @LetsReadIndia@PABKTweets #पुस्तकआणिबरचकाही
कथेच्या ओघात ही माणसे काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न करतात. औद्योगिक प्रकल्पात जमीन गेल्यावर एका रात्रीत श्रीमंत झालेले आणि उधळपट्टी करून परत कंगाली अनुभवलेला बाळ्या, आयुष्याची कमाई मुलांसाठी दिल्यावर दुर्लक्षित झालेला मुंजबा खोटी बातमी सांगून लक्ष वेधून घेतो 👇
पण असत्याचा भार काही सहन करता येत नाही. वयाच्या पन्नाशीनंतर जोमाने आयुष्याला सुरुवात करणारा जालिंदर,गावातील राजकारणाला बळी पडून तडफडणारा बापू बेल्हेकर,मुखपृष्ठ कथा गाडा ही वाचकाला गहिवर आणते. वयाची सत्तरी पार केल्यावर फक्त गाड्याच्या शर्यतीतुन आत्मसन्मान शोधण्याच्या प्रयत्नात👇
#पुस्तकआणिबरचकही
पुरुषोत्तम शिवराम रेगे (२ ऑगस्ट १९१०–१७ फेब्रुवारी १९७८) श्रेष्ठ मराठी कवी, तसेच कादंबरीकार नाटककार, समीक्षक व संपादक. छांदसी नावाचा त्यांचा १९६२ साली प्रसिद्ध झालेला समीक्षात्मक लेखांचा संग्रह.साधना आणि इतर कविता ह्या त्यांच्या काव्यसंग्रहानंतर त्यांचे अनेक 👇
कवितासंग्रह प्रसिद्ध झाले. सृजनशक्ती म्हणजेच स्त्रीशक्ती हा त्यांचा कवितेचा प्रधान विषय आहे. जीवनात विविध रूपाने वावरणारी सृजनशक्ती आणि विशेषतः तिचे स्त्रीदेहधारी स्वरूप हेच वेगवेगळ्या रूपांनी आणि स्त्रीप्रतिमांच्या साह्याने त्यांच्या कवितेत प्रकट होत असते. त्यांच्या कथा व 👇
कविता जर्मन, डॅनिश, स्पॅनिश व चिनी भाषांत भाषांतरे झाली आहेत.रूपकथ्थक व मनवा हे त्यांचे दोन कथासंग्रह असून त्यांच्या कथांतूनही त्यांच्या कविमनाचे नाजूक पदर दिसतात. सावित्री,अवलोकिता, रेणू आणि मातृका या रेगे यांच्या चारी कादंबऱ्या काव्यात्म व अर्थगर्भ आहेत.त्यांतील भावविश्व 👇
#पुस्तकआणिबरचकाही
सुहासिनी इर्लेकर (१७ फेब्रुवारी १९३२ – २८ ऑगस्ट २०१०)मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कवयित्री आणि समीक्षक. १९७० नंतरच्या पिढीतील साहित्यात त्यांचे भरीव योगदान असून बालसाहित्य आणि ललितलेखन या साहित्य प्रकारातही त्यांनी योगदान दिले आहे. त्यांची कविता प्रामुख्याने 👇
तालबद्ध व गेयता असणारी आहे भावतरल संवेद्य जाणिवांचा आविष्कार त्यांनी आपल्या छंदबद्ध रचनांतून घडविला आहे. त्यांच्या कवितांमधून कौटूंबिक स्त्री जीवनाचे एक अनुभवविश्व प्रकट झालेले आहे. ग्राम्यसंस्कृती आणि महानगरीय सभ्यता या दोन्ही अक्षांवरून ते स्त्री जीवनातील सामाजिक मुल्यभान 👇
त्यांच्या कवितेत मांडतात. सृजनशील लेखनाबरोबरच संत साहित्याच्या डोळस कलावादी समीक्षक म्हणूनही साहित्य विश्वात परिचित आहेत. त्यांच्या संतसाहित्यविषयक संशोधकीय लेखनात एक वैचारिक आणि वैज्ञानिक शिस्त आढळते.आध्यात्मिक अशा या संशोधनात त्यांनी चिकित्मक वृत्तीला भावनिकतेची जोड दिली; 👇
#पुस्तकआणिबरचकाही
मिर्झा असदुल्लाखान गालिब ( २७ डिसेंबर १७९७, १५ फेब्रुवारी १८६९) प्रसिद्ध फारसी आणि उर्दू कवी होते. गालिब यांनी फारसी भाषेत लिखाण काम सुरू केले. त्यांच्या साहित्यात जीवनाचे गंभीर तत्त्वज्ञान त्यांनी मांडले. वयाच्या ११व्या वर्षापासून गालिब शेर लिहीत होते. 👇
जीवनाच्या झळा सोसून मिर्झा गालिबने त्या सुंदर करून काव्यातून मांडल्या. त्यांनी एकूण १८,००० च्या वर शेर फारसी भाषेत रचले. पुढे मित्रांच्या आग्रहाखातर त्यातीलच १०००-१२०० शेर त्यांनी उर्दू भाषेत लिहिले. गालिबच्या कवितांचा परिचय सेतू माधव पगडी, वसंत पोतदार आणि विद्याधर गोखले आदी 👇
मराठी लेखकांनी करून दिला आहे. डॉ. अक्षयकुमार काळे यांनी तर ’गालिबचे उर्दू काव्यविश्व : अर्थ आणि भाष्य’ हा ग्रंथराज लिहिला असून रसिकांना शब्दागणिक तो समजावा म्हणून गालिबच्या कवितेतील प्रत्येक शब्दाचा अर्थ देऊन त्यांनी गालिब जाणत्या वाचकांपर्यंत पोचविण्याची अपूर्व धडपड केली आहे.👇
#पुस्तकआणिबरचकाही
नामदेव ढसाळ ( १५ फेब्रुवारी १९४९ - १५ जानेवारी २०१४ ) कविता ही त्यांच्या स्वतःच्या प्रातिभिक सामर्थ्याची साक्ष तर आहेच, पण त्याबरोबर ती तिच्या निर्मितीकाळाशी अभिन्नपणे निगडित आहे. काळाचे सर्व चढ-उतार तिने पाहिले आहेत, पचवले आहेत. ढसाळांच्या लेखनामागे 👇
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आणि कृतींचा पाया आहे,सातत्याने कवितालेखन, अखंड चणचण आणि त्यासाठी करायची धावपळ, राजकीय आयुष्यातल्या उलथापालथी, दलित पॅन्थरचा उदयास्त, खासगी आयुष्यातले ताणतणाव, प्रकृती अस्वास्थ्य हे सगळे पेलत, त्यांची कविता ताज्या दमाने उसळी घेताना दिसते. 👇
स्वतःला आणि भोवतालाला तपासत पुढे जाताना दिसते.ढसाळांच्या कवितेचा प्रभाव मराठी कवितेवर अटळच आहे. पण तो भारतीय भाषांतूनही आहे. जर्मन भूमीवर त्यांना कविता-वाचनासाठी निमंत्रित करण्यात आले (बर्लिन फेस्टिव्हल, जून २००१), त्यांची ही अविरत ऊर्जा त्यांच्या गद्यलेखनातही पाहता येते. 👇