#Post
१९९९ साली, एन.डी.टी.व्ही ला दिलेल्या मुलाखतीत बाळासाहेब म्हणाले होते, 'ज्या माणसाचा (शरद पवार) वाजपेयी सरकारच्या पाडण्यात हात आहे, त्या माणसासोबत मी (शिवसेना) जाणार नाही'' !
(1/12)
आणि त्यांनी त्या वेळेला 'स्काउंड्रल' (बदमाश, बेभरवशी) असा शब्द प्रयोग राष्ट्रवादी काँग्रेस च्या सर्वेसर्वांबद्दल केला होता. बाळासाहेबांनी, त्यांच्या हयातीत तरी कधी, शरद पवारांसोबत, राजकीय हातमिळवणी केली नाही कारण त्यांना ज्ञात होतं कि जिथे
यांचा हात लागतो तिथे ज्याच्या सोबत हात मिळवला जातो त्याचा ऱ्हास होतो !
भाजपा आणि शिवसेने मध्ये सुरुवातीपासून वाद होते का ? ह्या प्रश्नच उत्तर निश्चितच 'हो' असं आहे, आणि यात काहीही वावगं नाही, कारण दोन राजकीय पक्ष म्हणलं कि मतभेद हे होणारच !
पण तरीही, 'हिंदुत्वाच्या' नावाने, हे दोन्ही पक्ष एकमेकांना धरून मोठे झाले ! अनेक वर्षांच्या नंतर (जवळपास २० वर्षांनी) भाजपा आणि शिवसेनेला, २०१४ साली, एक स्थिर सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली. बाळासाहेबांची पुण्याई आणि मोदी लाटेत, या दोन्ही पक्षांना जबरदस्त जनादेश मिळालं !
देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सरकार ने दमदार कामगिरी केली. अनेक विकास कामे देखील पार पडली. शिवसेनेचे संघटन अजून बळकट होतहोते.
याच आधारावर, २०१९ च्या निवडणुका लढल्या गेल्या.
मोदींचे पोस्टर लावलेले सगळ्यांनी पाहिले, शहा , ठाकरेंच्या स्टेज वर येऊन युती सरकारला मतदान करा असे जनतेला आवाहन करताना सगळ्यांना दिसले, राऊत, मोदींचे गुणगान गाताना देखील दिसले !
आणि जेव्हा, निवडणुका झाल्या, लोकांनी युतीला निवडून दिलं तेव्हा अचानक उद्धव ठाकरेंनी मारलेली कोलांटी उडी आणि चुकीच्या माणसासोबत केलेली हात मिळवणी, हि ठाकरेंच्या अस्तित्वासाठी (शिवसेनेसाठी) जीवघेणी ठरली !
या सगळ्यात काय झालं ! उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले खरे,
आदित्य ठाकरे मंत्री झाले खरे, पण, अल्प सुखासाठी त्यांनी स्वतःच सर्वस्व गमावलं ! वैचारिक पातळीवर, बाळासाहेबांनी जोडलेला कार्यकर्ता गमावला, एकनाथ शिंदेंसारखा कडवट शिवसैनिक गमावला आणि सरतेशेवटी पक्षही गमावला. रोज नाचक्की होते तो विषय वेगळाच !
काँग्रेस चे माहित नाही पण राष्ट्रवादी काँग्रेस चे संघटन मात्र या अडीच वर्षाच्या काळात बळकट झाले. स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्याच गुरूच्या पाठीत खंजीर खुपसून, सत्ता स्थापन केलेल्या माणसासोबत जाऊ नये,
हि शिकवण आपल्याच वडिलांनी आपल्याला दिली आहे हे विसरून, उद्धव ठाकरे तिकडे गेले कसे हे मोठं कोडं आहे !
आज लागलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे, सच्चा शिवसैनिक निश्चितच आनंदात असेल, पण कुंपणावर बसून (सोशल मीडियावर) उद्धवरावांची.
आदित्य ठाकरेंची व्हावा करणारा, उद्धव ठाकरेंचा कार्यकर्त्याची मात्र सुतक असेल हे निश्चित !
पुन्हा एकदा सिद्ध झालं, स्वतःच्या विचारांवर अटळ रहा, अन्यथा पतन होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही !
एकनाथ शिंदेंचे आणि त्यांच्या सोबत येण्याचे धारिष्ठ दाखवणाऱ्या सगळ्या शिवसैनिकांचे अभिनंदन आणि अर्थातच, देवेंद्र फडणवीसांना शिरसाष्टांग दंडवत !
- मल्हार पांडे
(12/12)
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
#Thread :
स्वातंत्र्यानंतर जिथे म्हणून आपल्या नावाचा झेंडा गाडता येईल तिथे तिथे गांधी परिवाराने संधी सोडली नाही. गोष्ट १९८४ सालची आहे. इंदिरा गांधी, अंदमान निकोबार बेटांच्या प्रवासावर यायला सज्ज होत्या. १९ फेब्रुवारी ला त्या तिथे पोहोचल्या. 1/11
गांधी पॉईंट’ ला सकाळपासून ताटकळत उभे असलेल्या अंदमानातील रहिवासीयांसमोर त्यांचे भाषण झाले आणि त्या पिगमेलियन पॉईंट साठी रवाना झाल्या. 2/11
काँग्रेस च्या स्थानिक लोकसभा उमेदवाराच्या संकल्पनेतून, या जागेचे नाव पिगमेलियन पॉईंट पासून इंदिरा पॉईंट, इंदिरा गांधींच्या साठी, इंदिरा गांधींच्या समोर ठेवण्यात येणार होते व याच साठी इंदिरा गांधी तिथे गेल्या होत्या. 3/11
नमस्कार !
येत्या प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन केल्यानंतर काय करताय ? इतिहास हा विषय म्हटलं की प्रत्येकाच्या मनात कुतूहल निर्माण होतं, इतिहासातली पात्र डोळ्यांच्या समोर उभी राहतात, काही प्रसंग आपली छाती फुलवतात तर काही प्रसंग डोळ्यात आसवे आणतात,
या सगळ्या गोष्टी आपल्या समोर मांडण्याचे कार्य जो करतो त्याला आपण इतिहासकार असे म्हणतो...
पण, इतिहास म्हणजे नेमकं काय ? तो समजून घेणं का गरजेचं आहे ? इतिहास लिहताना, वाचताना काय दक्षता घ्यावी, हे असे सगळे प्रश्न आपल्या मनात वेळोवेळी पडत असतात !
अश्याच सगळ्या गोष्टींची उत्तरं देण्यासाठी, झुंज संस्थेने "सुप्रसिद्ध लेखक व इतिहासकार श्री. Kaustubh Kasture" यांचे "इतिहास समजून घेताना" हे व्याख्यान आयोजित केले आहे.
#Thread : तीर्थक्षेत्र कॉरिडॉर, पंतप्रधान मोदी आणि भारताचे सांस्कृतिक पुनरूत्थान...
२०१४ पासून तुमच्या आमच्या सगळ्यांच्या वागणुकीत, मानसिकतेमध्ये एक मोठा बदल, कळत नकळत घडला आहे. 1/22
खासकरून, आमच्या वयोगटातील मुलांमध्ये हा बदल जास्त ठळकपणे दिसतो आहे हे मी स्वानुभवावरून सांगू शकतो. आमच्या पिढीतील लोकांमध्ये, पूर्वी, इतिहास, मंदिरं, संस्कृती या बद्दल आज जितकी आस्था निर्माण झाली आहे तितकी होती असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरेल. 2/22
२०१४ नंतर अर्थात नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्या नंतर, या सगळ्या विषयाबद्दल कुतूहल, जिज्ञासा मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आणि याचे कारण म्हणजे मोदींनी एक मोठी गोष्ट घडवून आणली. ती म्हणजे, या सगळ्या मंदिरांकडे, धर्मस्थळांकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन. 3/22
#थ्रेड : आव्हाड : ''स्त्रीला इस्लाम मध्ये अनन्यसाधारण महत्व आहे !'' खरंच का ?
राजकारणासाठी स्वतःच्या धर्माची आणि त्या धर्माच्या अनुयायांची विटंबना करणे हे जितेंद्र आव्हाड सारख्या नेत्यांचे दैनंदिन कार्य आहे हे वेळोवेळी सिद्ध झालंच आहे.
(1/14)
काल, एका ट्विट मध्ये अब्दुल सत्तर यांच्या विरोधात निषेध नोंदवताना, हिंदुत्वाला नावं ठेवत असताना ते म्हटले कि 'ते (अब्दुल सत्तार) हिंदुत्वाच्या नादाला लागून स्वतःचा धर्म विसरले आहेत, इस्लाम मध्ये स्त्रीला अनन्यसाधारण महत्व आहे'.
यात किती तथ्य आहे हे आपण इस्लाम चा धर्मग्रंथ अर्थात 'कुराण' काही निवडक दहा आयातींमधून पाहुयात.
कुराण, सुरा : २:२२३
'तुमच्या स्त्रिया तुमच्या शेतजमिनीसारख्या आहेत, तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही तिथे आणि हवं ते करा'.
#Thread : Sufis: Saints or Barbarians?
A part of History has always been kept hidden from the Bhartiya readers to further the fake doctrine of western Secularism. Read this thread to understand more 1/13
One of the biggest lies we've been ever fed is Sufis did Hindus no harm, as they were here just to spread the message of love and peace! But the historical facts from their writings suggest something else. 2/13
One of the most eminent writers of all time, Sitaram Goel has debunked the myth about Sufis is his numerous articles. 3/13
#Thread :
काँग्रेस आणि तुष्टीकरणाचे राजकारण हे समीकरण काही नवीन आहे असं नाही ! स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक वेळेला काँग्रेस ने स्वतःचा राजकीय फायदा करवून घेण्यासाठी... 1/19
...आणि ब्रिटिश सरकार मधील मोठमोठाली पदे स्वतःकडे ठेवण्यासाठी अनेक वेळेला भारताच्या बहुतांश लोकांच्या विरोधातील धोरणे मान्य करून राबवल्याची अगणित उदाहरणे आपल्यासमोर आहेत. तश्याच पद्धतीचं राजकारण मुद्दामहून काँग्रेस ने इंग्लंड मध्ये झालेल्या राजकारणामुळे छेडले आहे. 2/19
'ऋषी सुनक (एक हिंदू) जो इंग्लंड मधील अल्पसंख्यांक आहे तो तिथला पंतप्रधान होऊ शकतो तर भारतात एखादा अल्पसंख्यांक समाजातील व्यक्ती पंतप्रधान का होऊ शकत नाही? इथे अल्पसंख्यांक म्हणजे मुस्लिम असे या सर्वांचे म्हणणे होते. 3/19