#पुस्तकआणिबरचकही
गोपाळ हरी देशमुख (१८ फेब्रुवारी १८२३-९ ऑक्टोबर १८९२). थोर समाजचिंतक म्हणून गोपाळरावांनी कीर्ती मुख्यतः अधिष्ठित आहे, ती त्यांनी ‘शतपत्रे’ म्हणून लिहिलेल्या निबंधांवर. ‘लोकहितवादी’ हे टोपण नाव घेऊन त्यांनी ही ‘शतपत्रे’ लिहिली. भाऊ महाजन ह्यांच्या प्रभाकर ह्या 👇
पत्रातून ती १८४८ ते १८५० ह्या काळात प्रसिद्ध झाली. ही ‘शतपत्रे’ वस्तुतः १०८ आहेत. त्या पत्रातून लोकहितवादींनी आपली राजकीय मते, तसेच विद्याप्रसार, आचारधर्म, परमार्थ, अनिष्ट चाली, समाजसुधारणा इ. विषयांवरील विचार स्पष्ट केले आहेत. ह्या विचारांनी एकोणिसाव्या शतकातील वैचारिक 👇
प्रबोधनाचा पाया घातला, असे यथार्थपणे म्हटले जाते.लोकहितवादींनी मुख्यत: लिहिले, ते हिंदू समाजाबद्दल. तथापि अन्य धर्मीयांतील त्यांना अनुचित वाटणाऱ्या काही अपप्रवृत्तींवरही त्यांनी टीका केली आहे. इंग्रजही त्यांच्या टीकेतून सुटले नाहीत कारण त्यांची सर्व टीका एका व्यापक सामाजिक 👇
चिकित्सेचे लक्ष्य ठेऊन केली आहे.इतिहास आणि भूगोल ह्या दोन्ही विषयांच्या संदर्भात हिंदूंनी आस्था दाखविली नाही, असे त्यांचे स्पष्ट मत होते
इतिहासाकडे पाठ फिरविणे म्हणजे परिवर्तनाबाबत नकारात्मक वृत्ती ठेवणे. लोकहितवादींचे स्वतःचे पहिले आणि नंतरचेही बरेचसे लेखन इतिहासविषयक आहे, 👇
आपल्या देशाच्या आर्थिक प्रश्नांचाही लोकहितवादी खोलवर जाऊन विचार करीत होते. १८४९ साली प्रसिद्ध झालेला त्यांचा लक्ष्मीज्ञान हा ग्रंथ मराठीतील अगदी आरंभीच्या अर्थशास्त्रीय ग्रंथांपैकी एक आहे (हा ग्रंथ त्यांनी लिहिला, तेव्हा ‘अर्थशास्त्र’ हा शब्द रुढ झालेला नव्हता).‘हिंदुस्थानास 👇
दारिद्र्य येण्याची कारणे ?’ ह्या शीर्षकाने त्यांनी इंदुप्रकाशात लिहिलेले (१८७६) आठ लेखनही महत्त्वाचे आहेत. भारताच्या दारिद्र्याची चिकित्सा लोकहितवादींनी त्यांच्या अन्य लेखनातूनही केली आहे. लोकहितवादींचे खरे नाव जग दिलेले आहे असा कोणताही ग्रंथ उपलब्ध नाही. 👇
टोपण नावानेच त्यांनी सगळे लेखन केले. स्वदेश आणि स्वधर्म याबद्दल लोकहितवादींना अभिमान होता. परंतु विधायक चिकित्सेला पारखे करणारे अंधत्व त्या अभिमानाला नव्हते. त्यांच्या विचाराचे औचित्य काळाने दाखवून दिले आहे. ( संदर्भ - मराठी विश्वकोश)
#पुस्तकआणिबरचकही
डॉ. रत्नाकर मंचरकर ( ६ ऑक्टोबर १९४३ - २० फेब्रुवारी २०१२ ) जुनी नवी साहित्य मीमांसा, नवे वाङ्मयप्रवाह, तौलनिक साहित्याभ्यास ही मंचरकरांच्या अभ्यासाची क्षेत्रे होत. त्यांनी संपादने, संहिता संपादने आणि सर्वांगीण संशोधनात्मक लेखन, सूत्रसंचालने इत्यादी कार्य केले.👇
विशेषतः मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा सखोल व संशोधनात्मक अभ्यास व लेखन केले.मूलगामी संशोधन, सहृदय आकलन, चिकित्सक प्रतिपादन आणि विश्लेषक निष्कर्षण यांमुळे मंचरकरांचे संशोधनात्मक लेखनही सर्वांना आकर्षित करते आणि म्हणून वैशिष्ट्यपूर्ण ठरते. अर्वाचीन मराठी वाङ्मयातील काही विषयांवरही 👇
त्यांनी प्रकाश टाकला आहे. ‘अर्वाचीन मराठी साहित्य आणि साहित्यिक’ (१९ लेख), ‘ग्रामीण-दलित-स्त्रीवादी-जनसाहित्य’ (१६ लेख), तसेच ‘अर्वाचीन मराठी साहित्यविचार आणि समीक्षा यांविषयीचे चिंतन’, ‘अर्वाचीन साहित्यविचार’ (८ लेख), ‘अर्वाचीन मराठी वाङ्मयाच्या समीक्षकांचा परामर्श’ (६ लेख) 👇
#पुस्तकआणिबरचकही
आबाजी नारायण पेडणेकर : (२० फेब्रुवारी १९२८ - ११ ऑगस्ट २००४). मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कथाकार, कवी, समीक्षक आणि भाषांतरकार.
'आम्ही मासे मारतो त्याची गोष्ट’ ही त्यांची पहिली कथा. तर शेलूक (१९७२) हा त्यांचा पहिला कथासंग्रह. कोकणातील प्रादेशिक जीवनाचे 👇
वास्तवपूर्ण चित्रण, विशेषत: कोकणातील माणसे, सांस्कृतिक लोकजीवन, समुद्र, कोकणातील निसर्ग, मालवणी बोली आणि तेथील मानवी जीवनाचा अनुबंध त्यांनी शेलूकमध्ये गुंफला आहे. रेडग्रीन , मैत्र, वेडा आंबा हे त्यांचे पुढील कथासंग्रह होत. या कथासंग्रहातील कथनात त्यांनी फॅन्टसीचा वापर 👇
केला आहे. ‘वेडा आंबा’ ही त्यांची परीकथा अनेक भारतीय भाषांत भाषांतरित झाली. ऐलपैल (१९७६) ही त्यांची कोकणच्या पार्श्वभूमीवरील कादंबरी प्रसिद्ध आहे. कोकणातील प्रादेशिक जीवनाचे आणि निसर्गाचे विविध विभ्रम कादंबरीत त्यांनी रेखाटले आहेत. संतांच्या क्रांतिकारी जीवनाविषयीची आस्था 👇
#पुस्तकआणिबरचकही
अरविंद गोखले (१९ फेब्रुवारी १९१९ - २४ ऑक्टोबर १९९२ ) दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळातील एक श्रेष्ठ मराठी कथाकार.
‘हेअर कटिंग सलून’ ही त्यांची पहिली कथा पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या नियतकालिकात प्रसिद्ध झाली . त्यानंतर लिहिलेल्या सुमारे साडेतीनशे 👇
कथा नजराणा ते दागिना पर्यंत प्रसिद्ध झालेल्या पंचवीस कथासंग्रहांत समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. ‘कातरखेळ’, ‘मंजुळा’, ‘रिक्ता’, ‘कॅक्टस’, ‘विघ्नहर्ती’ ह्या त्यांच्या काही विशेष उल्लेखनीय कथा होत. गोखल्यांचे कथाविश्व नव्या प्रवृत्तींचा वेध घेणारी आहे. पुष्कळदा त्यांच्या कथांना 👇
चमत्कृतिप्रवण घाट प्राप्त होतो त्या नाट्यात्म घटनाचित्रणात रंगतात तसेच त्यांच्या कथा खऱ्याखुऱ्या मध्यमवर्गीय संसारकथा आहेत. मिथिला , शुभा , अनामिका ह्या त्यांच्या कथासंग्रहांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके लाभली तसेच ‘गंधवार्ता’ ह्या कथेस एन्काउंटर ह्या आंतरराष्ट्रीय 👇
चौदा ग्रामीण कथांचा संग्रह. या कथेतील प्रमुख पात्रे भोरवाडी गावात राहणारे. प्रत्येक पात्र रेखाटताना, वातावरण निर्मिती करतांना लेखकाची सुक्ष्म निरिक्षण शक्ति , सर्जनशीलता कुठेही कमी पडत नाही. @LetsReadIndia@PABKTweets #पुस्तकआणिबरचकाही
कथेच्या ओघात ही माणसे काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न करतात. औद्योगिक प्रकल्पात जमीन गेल्यावर एका रात्रीत श्रीमंत झालेले आणि उधळपट्टी करून परत कंगाली अनुभवलेला बाळ्या, आयुष्याची कमाई मुलांसाठी दिल्यावर दुर्लक्षित झालेला मुंजबा खोटी बातमी सांगून लक्ष वेधून घेतो 👇
पण असत्याचा भार काही सहन करता येत नाही. वयाच्या पन्नाशीनंतर जोमाने आयुष्याला सुरुवात करणारा जालिंदर,गावातील राजकारणाला बळी पडून तडफडणारा बापू बेल्हेकर,मुखपृष्ठ कथा गाडा ही वाचकाला गहिवर आणते. वयाची सत्तरी पार केल्यावर फक्त गाड्याच्या शर्यतीतुन आत्मसन्मान शोधण्याच्या प्रयत्नात👇
#पुस्तकआणिबरचकही
पुरुषोत्तम शिवराम रेगे (२ ऑगस्ट १९१०–१७ फेब्रुवारी १९७८) श्रेष्ठ मराठी कवी, तसेच कादंबरीकार नाटककार, समीक्षक व संपादक. छांदसी नावाचा त्यांचा १९६२ साली प्रसिद्ध झालेला समीक्षात्मक लेखांचा संग्रह.साधना आणि इतर कविता ह्या त्यांच्या काव्यसंग्रहानंतर त्यांचे अनेक 👇
कवितासंग्रह प्रसिद्ध झाले. सृजनशक्ती म्हणजेच स्त्रीशक्ती हा त्यांचा कवितेचा प्रधान विषय आहे. जीवनात विविध रूपाने वावरणारी सृजनशक्ती आणि विशेषतः तिचे स्त्रीदेहधारी स्वरूप हेच वेगवेगळ्या रूपांनी आणि स्त्रीप्रतिमांच्या साह्याने त्यांच्या कवितेत प्रकट होत असते. त्यांच्या कथा व 👇
कविता जर्मन, डॅनिश, स्पॅनिश व चिनी भाषांत भाषांतरे झाली आहेत.रूपकथ्थक व मनवा हे त्यांचे दोन कथासंग्रह असून त्यांच्या कथांतूनही त्यांच्या कविमनाचे नाजूक पदर दिसतात. सावित्री,अवलोकिता, रेणू आणि मातृका या रेगे यांच्या चारी कादंबऱ्या काव्यात्म व अर्थगर्भ आहेत.त्यांतील भावविश्व 👇
#पुस्तकआणिबरचकाही
सुहासिनी इर्लेकर (१७ फेब्रुवारी १९३२ – २८ ऑगस्ट २०१०)मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कवयित्री आणि समीक्षक. १९७० नंतरच्या पिढीतील साहित्यात त्यांचे भरीव योगदान असून बालसाहित्य आणि ललितलेखन या साहित्य प्रकारातही त्यांनी योगदान दिले आहे. त्यांची कविता प्रामुख्याने 👇
तालबद्ध व गेयता असणारी आहे भावतरल संवेद्य जाणिवांचा आविष्कार त्यांनी आपल्या छंदबद्ध रचनांतून घडविला आहे. त्यांच्या कवितांमधून कौटूंबिक स्त्री जीवनाचे एक अनुभवविश्व प्रकट झालेले आहे. ग्राम्यसंस्कृती आणि महानगरीय सभ्यता या दोन्ही अक्षांवरून ते स्त्री जीवनातील सामाजिक मुल्यभान 👇
त्यांच्या कवितेत मांडतात. सृजनशील लेखनाबरोबरच संत साहित्याच्या डोळस कलावादी समीक्षक म्हणूनही साहित्य विश्वात परिचित आहेत. त्यांच्या संतसाहित्यविषयक संशोधकीय लेखनात एक वैचारिक आणि वैज्ञानिक शिस्त आढळते.आध्यात्मिक अशा या संशोधनात त्यांनी चिकित्मक वृत्तीला भावनिकतेची जोड दिली; 👇