#पुस्तकआणिबरचकही
अरविंद गोखले (१९ फेब्रुवारी १९१९ - २४ ऑक्टोबर १९९२ ) दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळातील एक श्रेष्ठ मराठी कथाकार.
‘हेअर कटिंग सलून’ ही त्यांची पहिली कथा पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या नियतकालिकात प्रसिद्ध झाली . त्यानंतर लिहिलेल्या सुमारे साडेतीनशे 👇
कथा नजराणा ते दागिना पर्यंत प्रसिद्ध झालेल्या पंचवीस कथासंग्रहांत समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. ‘कातरखेळ’, ‘मंजुळा’, ‘रिक्ता’, ‘कॅक्टस’, ‘विघ्नहर्ती’ ह्या त्यांच्या काही विशेष उल्लेखनीय कथा होत. गोखल्यांचे कथाविश्व नव्या प्रवृत्तींचा वेध घेणारी आहे. पुष्कळदा त्यांच्या कथांना 👇
चमत्कृतिप्रवण घाट प्राप्त होतो त्या नाट्यात्म घटनाचित्रणात रंगतात तसेच त्यांच्या कथा खऱ्याखुऱ्या मध्यमवर्गीय संसारकथा आहेत. मिथिला , शुभा , अनामिका ह्या त्यांच्या कथासंग्रहांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके लाभली तसेच ‘गंधवार्ता’ ह्या कथेस एन्काउंटर ह्या आंतरराष्ट्रीय 👇
दर्जाच्या इंग्रजी मासिकाचे आशियाई-अरबी-आफ्रिका कथास्पर्धेचे पारितोषिक मिळाले. त्यांच्या अनेक कथांचे यूरोपीय व भारतीय भाषांतून अनुवाद झालेले आहेत. स्वतंत्र कथालेखनाखेरीज काही वेचक अमेरिकन कथांचे अनुवाद त्यांनी केलेले आहेत तसेच ना. सी. फडके, वामन चोरघडे, व्यंकटेश माडगूळकर 👇
ह्यांच्या निवडक कथांचे संपादन केले आहे. अमेरिकेस पहावे जाऊन हे त्यांचे प्रवासवर्णनपर पुस्तक.
व्रतस्थ वृत्तीने कथालेखन करणाऱ्या गोखल्यांनी स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी लघुकथा समृद्ध केली आहे. ( संदर्भ - मराठी विश्वकोश)
#पुस्तकआणिबरचकही
रामचंद्र श्रीपाद जोग ( १५ मे १९०३ - २१ फेब्रुवारी १९७७ ) जोगांचा खरा परिचय साहित्यक्षेत्राला झाला तो त्यांच्या ‘अभिनव काव्यप्रकाश’ (१९३०) या ग्रंथामुळे. यात जोगांनी इंग्रजी साहित्यशास्त्र व मानसशास्त्र यांची जोड देऊन जुन्या संस्कृत-साहित्यशास्त्राचे 👇
संस्करण केले व अर्वाचीन वाङ्मयनिर्मितीच्या रसग्रहणाला आणि मूल्यमापनाला समर्थ ठरेल अशी अभिनवता साहित्य-विचार धारा प्रदान केली. ‘काव्यविभ्रम’ (१९५१) या ग्रंथातील अलंकारावरील त्यांचे विवेचन स्वतंत्र प्रज्ञेचे द्योतक आहे. त्यांनी अलंकारांना काव्याच्या उपरे, बाह्यपदार्थ न मानता 👇
ते विभ्रम कसे आहेत, ते सप्रमाण पटवून दिले. ‘मराठी वाङ्मयाभिरुचीचे विहंगमावलोकन’ या त्यांच्या व्याख्यानमालेत त्यांनी सहाशे-सातशे वर्षांतील मराठी वाङ्मयाचे विहंगमावलोकन केले. मराठी साहित्य परिषदेच्या वाङ्मयेतिहासाचे तीन खंड त्यांनी संपादित केले., 👇
#पुस्तकआणिबरचकही
डॉ. रत्नाकर मंचरकर ( ६ ऑक्टोबर १९४३ - २० फेब्रुवारी २०१२ ) जुनी नवी साहित्य मीमांसा, नवे वाङ्मयप्रवाह, तौलनिक साहित्याभ्यास ही मंचरकरांच्या अभ्यासाची क्षेत्रे होत. त्यांनी संपादने, संहिता संपादने आणि सर्वांगीण संशोधनात्मक लेखन, सूत्रसंचालने इत्यादी कार्य केले.👇
विशेषतः मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा सखोल व संशोधनात्मक अभ्यास व लेखन केले.मूलगामी संशोधन, सहृदय आकलन, चिकित्सक प्रतिपादन आणि विश्लेषक निष्कर्षण यांमुळे मंचरकरांचे संशोधनात्मक लेखनही सर्वांना आकर्षित करते आणि म्हणून वैशिष्ट्यपूर्ण ठरते. अर्वाचीन मराठी वाङ्मयातील काही विषयांवरही 👇
त्यांनी प्रकाश टाकला आहे. ‘अर्वाचीन मराठी साहित्य आणि साहित्यिक’ (१९ लेख), ‘ग्रामीण-दलित-स्त्रीवादी-जनसाहित्य’ (१६ लेख), तसेच ‘अर्वाचीन मराठी साहित्यविचार आणि समीक्षा यांविषयीचे चिंतन’, ‘अर्वाचीन साहित्यविचार’ (८ लेख), ‘अर्वाचीन मराठी वाङ्मयाच्या समीक्षकांचा परामर्श’ (६ लेख) 👇
#पुस्तकआणिबरचकही
आबाजी नारायण पेडणेकर : (२० फेब्रुवारी १९२८ - ११ ऑगस्ट २००४). मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कथाकार, कवी, समीक्षक आणि भाषांतरकार.
'आम्ही मासे मारतो त्याची गोष्ट’ ही त्यांची पहिली कथा. तर शेलूक (१९७२) हा त्यांचा पहिला कथासंग्रह. कोकणातील प्रादेशिक जीवनाचे 👇
वास्तवपूर्ण चित्रण, विशेषत: कोकणातील माणसे, सांस्कृतिक लोकजीवन, समुद्र, कोकणातील निसर्ग, मालवणी बोली आणि तेथील मानवी जीवनाचा अनुबंध त्यांनी शेलूकमध्ये गुंफला आहे. रेडग्रीन , मैत्र, वेडा आंबा हे त्यांचे पुढील कथासंग्रह होत. या कथासंग्रहातील कथनात त्यांनी फॅन्टसीचा वापर 👇
केला आहे. ‘वेडा आंबा’ ही त्यांची परीकथा अनेक भारतीय भाषांत भाषांतरित झाली. ऐलपैल (१९७६) ही त्यांची कोकणच्या पार्श्वभूमीवरील कादंबरी प्रसिद्ध आहे. कोकणातील प्रादेशिक जीवनाचे आणि निसर्गाचे विविध विभ्रम कादंबरीत त्यांनी रेखाटले आहेत. संतांच्या क्रांतिकारी जीवनाविषयीची आस्था 👇
#पुस्तकआणिबरचकही
गोपाळ हरी देशमुख (१८ फेब्रुवारी १८२३-९ ऑक्टोबर १८९२). थोर समाजचिंतक म्हणून गोपाळरावांनी कीर्ती मुख्यतः अधिष्ठित आहे, ती त्यांनी ‘शतपत्रे’ म्हणून लिहिलेल्या निबंधांवर. ‘लोकहितवादी’ हे टोपण नाव घेऊन त्यांनी ही ‘शतपत्रे’ लिहिली. भाऊ महाजन ह्यांच्या प्रभाकर ह्या 👇
पत्रातून ती १८४८ ते १८५० ह्या काळात प्रसिद्ध झाली. ही ‘शतपत्रे’ वस्तुतः १०८ आहेत. त्या पत्रातून लोकहितवादींनी आपली राजकीय मते, तसेच विद्याप्रसार, आचारधर्म, परमार्थ, अनिष्ट चाली, समाजसुधारणा इ. विषयांवरील विचार स्पष्ट केले आहेत. ह्या विचारांनी एकोणिसाव्या शतकातील वैचारिक 👇
प्रबोधनाचा पाया घातला, असे यथार्थपणे म्हटले जाते.लोकहितवादींनी मुख्यत: लिहिले, ते हिंदू समाजाबद्दल. तथापि अन्य धर्मीयांतील त्यांना अनुचित वाटणाऱ्या काही अपप्रवृत्तींवरही त्यांनी टीका केली आहे. इंग्रजही त्यांच्या टीकेतून सुटले नाहीत कारण त्यांची सर्व टीका एका व्यापक सामाजिक 👇
चौदा ग्रामीण कथांचा संग्रह. या कथेतील प्रमुख पात्रे भोरवाडी गावात राहणारे. प्रत्येक पात्र रेखाटताना, वातावरण निर्मिती करतांना लेखकाची सुक्ष्म निरिक्षण शक्ति , सर्जनशीलता कुठेही कमी पडत नाही. @LetsReadIndia@PABKTweets #पुस्तकआणिबरचकाही
कथेच्या ओघात ही माणसे काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न करतात. औद्योगिक प्रकल्पात जमीन गेल्यावर एका रात्रीत श्रीमंत झालेले आणि उधळपट्टी करून परत कंगाली अनुभवलेला बाळ्या, आयुष्याची कमाई मुलांसाठी दिल्यावर दुर्लक्षित झालेला मुंजबा खोटी बातमी सांगून लक्ष वेधून घेतो 👇
पण असत्याचा भार काही सहन करता येत नाही. वयाच्या पन्नाशीनंतर जोमाने आयुष्याला सुरुवात करणारा जालिंदर,गावातील राजकारणाला बळी पडून तडफडणारा बापू बेल्हेकर,मुखपृष्ठ कथा गाडा ही वाचकाला गहिवर आणते. वयाची सत्तरी पार केल्यावर फक्त गाड्याच्या शर्यतीतुन आत्मसन्मान शोधण्याच्या प्रयत्नात👇
#पुस्तकआणिबरचकही
पुरुषोत्तम शिवराम रेगे (२ ऑगस्ट १९१०–१७ फेब्रुवारी १९७८) श्रेष्ठ मराठी कवी, तसेच कादंबरीकार नाटककार, समीक्षक व संपादक. छांदसी नावाचा त्यांचा १९६२ साली प्रसिद्ध झालेला समीक्षात्मक लेखांचा संग्रह.साधना आणि इतर कविता ह्या त्यांच्या काव्यसंग्रहानंतर त्यांचे अनेक 👇
कवितासंग्रह प्रसिद्ध झाले. सृजनशक्ती म्हणजेच स्त्रीशक्ती हा त्यांचा कवितेचा प्रधान विषय आहे. जीवनात विविध रूपाने वावरणारी सृजनशक्ती आणि विशेषतः तिचे स्त्रीदेहधारी स्वरूप हेच वेगवेगळ्या रूपांनी आणि स्त्रीप्रतिमांच्या साह्याने त्यांच्या कवितेत प्रकट होत असते. त्यांच्या कथा व 👇
कविता जर्मन, डॅनिश, स्पॅनिश व चिनी भाषांत भाषांतरे झाली आहेत.रूपकथ्थक व मनवा हे त्यांचे दोन कथासंग्रह असून त्यांच्या कथांतूनही त्यांच्या कविमनाचे नाजूक पदर दिसतात. सावित्री,अवलोकिता, रेणू आणि मातृका या रेगे यांच्या चारी कादंबऱ्या काव्यात्म व अर्थगर्भ आहेत.त्यांतील भावविश्व 👇