निवडणूक आयोगाच्या निर्णयावर माजी लोकसभा सेक्रेटरी जनरल PDT आचारी यांचे मत -
- शिंदे गटाच्या याचिकेच्या मेंटेनेब्लिटीचा मुद्दा न्यायालयाने सोडवायला पाहिजे होता. त्यांनी तो आयोगाकडे सोपवला. आयोगाच्या निर्णयाचा इतर बाबींवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
- दहावी अनुसूची म्हणजेच पक्षांतर बंदी कायदा हा संविधानिक कायदा आहे. सिम्बॉल ऑर्डर 1968 हा दुय्यम कायदा आहे. त्यामुळे पक्षांतर बंदी कायद्याला प्राधान्य दिले पाहिजे. तो मुद्दा आधी निकाली काढला पाहिजे कारण सरकारच्या वैधतेचा प्रश्न आहे.
- 2003च्या घटनादुरुस्ती नंतर पक्षापासून वेगळे होणाऱ्या गटाला संरक्षण मिळू शकत नाही. स्पिकर जेव्हा पक्षांतराचा विचार करतील तेव्हा आयोगाचा निर्णय न बघता तेव्हाची स्थिती लक्षात घ्यावी जेव्हा तिकीट दिले होते. तेव्हा मुळ पक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्ष होता.
- सादिक अली प्रकरणात आयोगाने सभागृह व संघटनेतील संख्याबळ विचारात घेतले होते. इथे या निर्णयापासून फारकत घेत संघटनेतील संख्याबळ विचारात घेतलेले नाही. यासाठी दिलेली कारणे स्वीकार्य नाहीत, तार्किक नाहीत.
-निवडणूक आयोग सिम्बॉल ऑर्डर 1968 अन्वये पक्षाचे डेमोक्रॅटिक कॅरॅक्टर ठरवू शकत नाही, तसे आयोगाला अधिकार नाहीत. कुठल्या पक्षाच्या निवडणूका वेळेवर होतात ? या लॉजिकने आयोगाने सर्व पक्षांची नोंदणी करायला पाहिजे.
- Elections commission's order is not logical, based on questionable assumptions.
[ Source - Interview with Livelaw ]
* उद्धव ठाकरे यांच्या वतीने आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यांनी निर्णयावर घेतलेले काही आक्षेप :-
- आयोगाकडून पक्षांतर आणि सिम्बॉल ऑर्डर हे वेगळे विषय असे समजण्यात चूक झालेली आहे. पक्षांतरवर तेव्हाच कारवाई होते जेव्हा सदस्याने त्याच्या कृतींद्वारे सदस्यत्वाचा त्याग केलेला असतो. दोन्ही गोष्टी इंटरलिन्कड आहेत. सिम्बॉल ऑर्डर पक्षांतराची कारवाई ओव्हरराईड करू शकत नाही.
- पक्षात फूट पडली असल्याचा आयोगाचा निष्कर्ष चुकीचा आहे. केवळ सभागृह पक्षात फूट दाखवण्यात आलेली आहे. पूर्ण पक्षात फूट पडली असल्याबाबत कोणतेही पुरावे सादर करण्यात आलेले नाहीत.
- ठाकरे गटाकडे संघटनेत स्पष्ट बहुमत आहे. प्रतिनिधी सभा हि पक्षाच्या प्राथमिक सदस्यांचे प्रतिनिधित्व करते. प्रतिनिधी सभेत ठाकरे गटाकडे 160/200 एवढे बहुमत आहे.
- पक्षाच्या घटनेचा विचार न करण्याचा आयोगाचा निर्णय चुकीचा आहे. निष्पक्ष भूमिका निभावण्यात आयोग अपयशी ठरला आहे. 2018 च्या घटनादुरुस्तीचा मुद्दा वादाचा विषयच नव्हता. यावर बाजू मांडण्याची संधी न देता निष्कर्ष काढला आहे.
- आयोगाने पक्षपाती भूमिका घेतली आहे. काही मुद्द्यांवर ठाकरे गटाची बाजू ऐकू न घेता निष्कर्ष काढले आहेत जसे कि पक्षाच्या घटनेत केलेले बदल.
हे वर्तन आयोगाच्या घटनात्मक जबाबदारीच्या विरुद्ध आहे.
- संसदेच्या तसेच विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांचे वेगवेगळे मत असताना आणि काही सदस्य अपात्र होण्याची शक्यता असताना केवळ सभागृहातील सदस्यांच्या संख्याबळावरून निर्णय केला जाऊ शकत नाही.
उद्या ठाकरे गटाच्या वतीने आयोगाच्या निर्णयाला स्थिगीती देण्याची मागणी केली जाऊ शकते. कोर्ट हि मागणी मान्य करेल कि चालू प्रकरणासोबतच शेवटी यावर निर्णय करेल किंवा आधी हायकोर्टात दाद मागण्याची सूचना केली जाईल याबाबत उद्या चित्र स्पष्ट होईल !
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षचिन्हा वर निर्णय देताना पक्षाच्या घटनेत 2018 साली केलेलं बदल हे लोकशाही तत्वांच्या विरुद्ध असल्याचे मत नोंदवले आहे. यावर अनेकांची अशी प्रतिक्रिया आली कि मग आयोगाने पक्षाची मान्यता रद्द..
का केली नाही ?
लोकप्रतिनिधी कायदा 1951, सेक्शन 29A नुसार निवडणूक आयोग राजकीय पक्षांची नोंदणी करत असते. हे पक्ष Registered Unrecognised political parties(RUPP) म्हणून ओळखले जातात.
राज्यस्तरीय पक्ष किंवा राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी पक्षांना काही अटी पूर्ण कराव्या लागतात. उदा. राज्यस्तरीय पक्ष मान्यतेसाठी विधानसभेच्या निवडणूकित 6% मते मिळालेली असावीत.
राष्ट्रीय पक्ष मान्यतेसाठी 4 किंवा त्यापेक्षा जास्त राज्यात मान्यता मिळालेली असावी.
शिवसेना पक्षचिन्हा संदर्भात निवडणूक आयोगाचा निर्णय !
शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षातील उध्दव ठाकरे गट व एकनाथ शिंदे गट यांच्यात पक्ष-चिन्ह दावेदारी बाबत जो वाद होता त्यावर निर्णय दिला. हा निर्णय आयोगाने कशाच्या आधारे दिला आहे ते त्याबाबत सविस्तर 👇
शिंदे गटाला अधिकृत शिवसेना व धनुष्यबाण चिन्ह बहाल करताना आयोगाने 78 पानांचा निकाल दिलेला आहे. यात सुरुवातीला पूर्ण घटनाक्रम, दोन्ही गटांचे दावे, चिन्ह फ्रीज करण्याचा अंतरिम आदेश व दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ई. माहिती दिलेली आहे.
ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या युक्तिवादाचा सारांश म्हणजे शिंदे गटाकडून पक्षात फूट पडल्याचे सिद्ध करण्यात आलेले नाही. सभागृह पक्षात फूट म्हणजे संघटनेत फूट असे होत नाही. मेजोरीटी टेस्ट हि एकमेव कसोटी नाही, पक्षाची घटना हि देखील महत्त्वाची कसोटी. पक्षांतरचा मुद्द्यावर निर्णय..
पहिला प्रश्न हा कि उद्धव ठाकरे गटाला स्वतंत्र अस्तित्व आहे का ? शिवसेना(UBT) हे नाव व मशाल तात्पुरती सोय होती. आता एकच पक्ष अस्तित्वात आहे शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना पक्ष.
उद्धव ठाकरेंना स्वतःचा वेगळा पक्ष करण्यासाठी आयोगाकडे नवीन पक्ष मान्यतेसाठी अर्ज करावा लागेल +
नवीन पक्षाला मान्यता देण्याच्या अटी व तरतूदी या वेगळ्या आहेत. शिवाय नवीन पक्ष म्हणून नोंद करणे म्हणजे शिवसेना पक्षाकडून मिळालेल्या आमदारकी वर पाणी सोडणे. सभागृहात स्पिकर महोदयांनी शिंदे गटाच्या गटनेता व व्हीप ला मान्यता दिलेली आहे.
आणि स्पीकर च्या निवडणूकित व शिंदे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावात विरोधात मत दिले म्हणून आदित्य ठाकरे वगळता ठाकरे गटाच्या इतर आमदारांविरोधात पक्षांतर याचिका स्पिकर पुढे प्रलंबित आहेत.
मराठी माध्यमांनी रोज उठुन आज निर्णय उद्या निर्णय अश्या हेडलाईन्स देण्यापेक्षा न्यायालयीन कामकाज समजून घेतले पाहिजे.
न्यायालयाने म्हंटले आहे कि नबाम राबिया प्रकरणात 7 बेंच द्वारे पुनर्विचार करण्याची गरज आहे आहे कि हे चालू प्रकारनाच्या..
फॅक्टस पासून स्वतंत्र किंवा विलगपणे बघितले जाऊ शकत नाही. राबिया प्रकरणातील निर्णयाचा चालू प्रकरणाच्या फॅक्चूअल पोसिझन वर काही परिणाम होतो का यावर विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे रेफरन्स बाबतचा निर्णय हा मेरिट्स वर सुनावणी झाल्यावरच होईल.
आता पूर्ण प्रकरणावर सुनावणी होईल. त्यात राबिया निर्णयापासून उपाध्यक्ष, पक्षांतर, फ्लोर टेस्ट, नवीन स्पिकर असे सगळे मुद्दे येतील. जर पूर्ण प्रकरण बघितल्यानंतर न्यायालयाला असे वाटले कि राबिया निर्णयाचा या चालू प्रकरणावर परिणाम होतो किंवा ह्या प्रकरणासाठी त्या निर्णयातील काही बाबी..
सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तापेच यावरील प्रलंबित याचिकांवर पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर तीन दिवस सुनावणी झाली. हि सुनावणी नेमकी कोणत्या मुद्द्यांबाबत होती त्याबाबतचा हा थ्रेड 👇
2016 साली अरुणाचल प्रदेशातील नबाम राबिया प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता कि स्पिकरला पदावरून दूर करण्यासाठी नोटीस दिलेली असेल तर स्पिकर सदस्यांच्या अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेऊ शकत नाहीत.
ठाकरे गटाच्या वतीने ऍड. कपिल सिब्बल यांनी या निर्णयाचा सात न्यायधीशांकडून पुनर्विचार व्हावा अशी मागणी केली आहे. सिब्बल यांनी त्यांची बाजू मांडताना म्हंटले कि स्पिकर हे घटनात्मक पद आहे. घटनात्मक पदास कोणत्याही परिस्थितीत काम करण्यापासून किंवा कर्तव्य बजावण्यापासून रोखले किंवा
17 जानेवारी रोजी CJI जस्टीस चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेतील कॉलेजिअम ने मद्रास उच्च न्यायालयात न्यायधीश पदासाठी पाच नावांची शिफारस केली. यातले एक नाव म्हणजे ऍड. LC व्हिक्टोरिया गोवरी.
हे नाव न्यायधीश पदासाठी पुढे केल्यायापासून याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू होत्या. पत्रकार सौरव दास यांनी article14 साठी लिहिलेल्या रिपोर्ट नंतर गोवरी यांच्या नावाला होत असणारा विरोध तीव्र झाला. ऍड.गोवरी यांच्याबद्दल दोन गंभीर आक्षेप आहेत.
पहिला म्हणजे त्या जाहिरपणे भाजप पक्षाशी संबंधित आहेत. त्यांच्या ट्विटर बायो मधे नॅशनल सेक्रेटरी महिला मोर्चा भाजप या पदावर त्या असल्याचे नमूद केले होते.
दुसरा गंभीर आक्षेप म्हणजे त्या ख्रिश्चन व मुस्लिम समाजाबद्दल पूर्वग्रहदूषित मते बाळगून आहेत.